पुस्तकांची नावे सुचवा.
नमस्कार मंडळी ,
मला अनुवादित पुस्तके वाचायला आवडतात. कारण विंग्रजी मधुन आस्वाद घ्यायचा असेल तर मग बाजुला शब्दकोष घेवुनच बसावं लागते तरच ती अलंकारीक भाषा समजते. असो.
आपला जीव वाचवण्यासाठी तुरुंगातुन किंवा छळछावण्यांमधुन सहिसलमात पलायनाची वर्णने असलेली पुस्तके मी वाचलेली आहेत. आणि मला तीच जास्त आवडतात.
मला कोणी इथे अशा प्रकारच्या पुस्तकांची नावे सुचवाल काय?
आता पर्यंत मी वाचलेल्या पुस्तकांची यादी.
इतर काही अपलायनवादी पण गुप्तहेरगिरी / पाठलाग असा मसाला असलेली अनुवादित पुस्तके त्यात जॉन ग्रिशम यांच्या पुस्तकांना प्राधान्य. बाकी जेफ्री आर्चर, अॅगथा ख्रिस्ती, सिडने शेल्डन वगैरे.
तर आपणही आपल्याला आवडलेली अशा प्रकारची साहसी , पलायन , गुप्तहेरीच्या रोमहर्षक कहाण्यांनी भरलेली पुस्तके वाचलेली असतील तर कृपया त्याची यादी द्यावी.
धन्यवाद.
| मुळ पुस्तकाचे नांव | मुळ लेखक | पुस्तकाचे अनुवादित नांव | अनुवादाकाचे नांव |
|---|---|---|---|
| पॅपिलॉन | हेन्री शॅरियर | पॅपिलॉन | रविंद्र गुर्जर |
| बँको (पॅपिलॉनचा उत्तरार्ध) | हेन्री शॅरियर | बँको | रविंद्र गुर्जर |
| लाँग वॉक | स्लावोमिर राविझ | मला निसटलंच पाहिजे | श्रीकांत लागु |
| आय डेझर्टेड रोमेल | गंथर बान्हमन | डेझर्टर | विजय देवधर |
| ऑन द विंग्ज ऑफ ईगल्स | केन फोलेट | ऑन द विंग्ज ऑफ ईगल्स | ज्योत्स्ना लेले |
| रॉबिनसन क्रुसो | रॉबिनसन क्रुसो | font size= "1"> शाळेत असताना मराठीत वाचले होते. पण आता अनुवाद कुठेच उपलब्ध नाहीये. | - |
| द क्लायंट | ग्रिशम जॉन | द क्लायंट | माधव कर्वे |
| द पेलिकन ब्रिफ | ग्रिशम जॉन | द पेलिकन ब्रिफ | रविंद्र गुर्जर |
| द रेनमेकर | ग्रिशम जॉन | द रेनमेकर | अनिल काळे |
| फर्स्ट टु डाय | जेम्स पॅटरसन | फर्स्ट टु डाय | रवींद्र गुर्जर |
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जेम्स बॉंड
सिडनी शिल्डेन The best
आयला,
खूप छान धागा. वा.कू. साठवलेली
खूप छान धागा. वा.कू. साठवलेली
जुरासिक पार्क १ आणि २
विंसी-दा-कोड आणि एंजल्स अँड
प्रे हा एक थरारक अनुभव आहे पण
प.द.फ. असेल तर मेलणे!!
माझ्याकडे नै...गुगल* बाबाला
.मोबी फाईल चालत असतील तर मला
हे एक चांगलं काम केलंत.
रॉबीन कुक- मेडीकर क्षेत्रावर
नॉट विदाऊट माय डॉटर
सगळ्यांना धन्यवाद
डेबोराह एलिसची तीन पुस्तके -
आगाथा ख्रिस्ती
'आय आॉफ द निडल'नक्की वाचा..
पॅपिलॉन अतिशय आवडतं. त्याशिवाय...
नुकतेच वाचलेले जबरदस्त
मला आवडलेली
जॉन ग्रिशॅमचं एक अनुवादित