माझा पुणे सिटी बसमधील प्रवास
सुट्टयांचे दिवस. गतसालाप्रमाणे याही वेळेस आमचे पुण्यात आगमन झाले. पण इतर वर्षी न होणारी गोष्ट यावेळेस होणार होती ती म्हणजे माझे पाय सिटी बसला लागणार होते.
नेहमी पुण्यात फिरताना मी नातेवाईकांच्या कारचा किंवा गाडीचा आधार घेऊनच फिरतच असे. कारमद्धये मोबाईलमद्धये घातलेली मूंडी इष्ट स्थळी पोहचल्यावरच बाहेर निघायची. त्यामुळे रस्ते स्थळे खाणाखूणा लक्ष्ात ठेवण्याची गरजच पडली नव्हती.
बसचा प्रवास आजपर्यंत मी कौशल्याने टाळत होतो. कारणे अनेक होती.लहानपणापासुनच मुळात प्रवासाविषयी अढी होती. लहानपणी उलट्यांसाठी अनेक पिशव्या घेऊन प्रवास करावा लागे. बसमद्ये माझे रक्त आणि अन्न दोन्ही शोषले जाई. शिक्षणासाठी शहरात आलो आणि माझ्या गावाकडे जाण्यासाठी प्रवास करावाच लागे. यातुन फक्त उलट्या कमी होत गेल्या पण अढी तशीच होती.
यावेळेच मात्र माझ्या मातोश्र्ीकडुन सर्व नातेवाईकांना सुचना गेल्या होत्या की यावेस मला सिटी बसचा प्रवास घडवुन आणायचाच आणि कोणीही मला कुठेही सोडायचे नाही.
मी मावशीकडे उतरलो होतो आणि पुढच्या दिवशी जुरासिक वल्ड बघण्याचा कार्यक्रम माझ्या भाऊजींनी ठरवला. ते रक्षकचौकात रहात. आता यात मेख अशी होती की जर मला पिच्चर पहायचा असेल तर मला एकट्यालाच जावे लागणार होते. शेवटी हो ना करत डायनासोअरवरच्या पेमामुळे मी जाण्याचे ठरवले.
१२६ नंबरची बस तिथे पोहचते अशी मोघम माहिती मला दिली गेलेली होती. कुठून बसायचे ते ठिकाण सांगण्यात आले होते. फक्त बस पकडणे तिकीट काढणे आणि योग्य ठिकाणी उतरणे एवढी तिनच सोपी कार्ये पार पाडायची होती. पण माझ्यासाठी ती चक्क एका युद्धासमान होती.
मी त्या ठिकाणी पोहचलो. आणि पहिला झटका बसला.तिथे चार स्टॉप होतो. तिथे एका स्टॉपकडुन दुसरीकडे पळण्यात अर्धा तास गेला. तरीही त्यापैकी कुठला निवडावा हे कळेना. पुण्यात पत्ता विचारणे म्हणजे काय हे सुज्ञास सांगणे न लगे. मी मावशीला फोन केला. ती उचलेना. पत्ता विचाणे हेच आत नशीबी होते. शेवटी तो स्टॉप सापडला. तो त्या चारपैकी कुठलाच नव्हाता. मुळात तो स्टॉप आहे यावरच विश्वास बसेना. कारण तिथे माझ्यामागे फक्त एक झाड उभे होते.
मला फक्त १२६ हा आकडा माहिती होता. ती बस जर चुकली तर नेमकी कुणीकडे जाणारी बस पकडायची हा नवा प्रश्ण पडला कारण कोणत्याही बसवर सर्व थांबे लिहिलेले नसतात. तेवढ्यात एक बस माझ्याकडे येऊ लागली. आता तो १२६ नंबर नेमका कुठे असतो हा नवा प्रश्ण. जवळ येता येता तो नंबर मला दिसला आणी वैश्विक कोडे सोडविल्यासारखा आनंद झाला.एखाद्या चित्याला लाजवेल अशी झेप मी बसच्या पुढच्या दरवाज्यात मारली. अर्थात तो स्टॉप गर्दीचा नसल्याने मला कोणी अडवले नाही.
लगेच समोरच्या चालकाला प्रश्ण टाकला"ही बस रक्षकनगरला जाते ना?" " नाय" माझा ठोका चुकला. "रक्षकचौकात जाते. " माझा जीव समोरच्या सिटवर पडला.
आत पाहतो तर निम्मी सिट्स नव्हती. हा तिसरा धक्का. कंडक्टर माझ्याकडे येऊ लागला. " रक्षक.." या तिन शब्दानंतर माझा तोल गेला. मागे लेडीजसिटवर पडता पडता वाचलो. पाकीट काढुन तिकीट काढले आणि त्याच्याकडे माफक हसण्याचा करुण प्रयत्न केला आणि तो चौक आल्यावर सांगण्याची विनंती केली. एक करुण कटाक्ष टाकुन त्याने मूंडी हलवली आणि पुढे गेला.
काही वेळाने माझा शेजारचा माणुस उठणार आहे हे जाणवले. माझ्या पुढची आणि मागची माणसे बाह्या सावरु लागली. पण तमाम पुणेकरांच्या हातावर तुरी देऊन मी ती जाग बळकावली.
आता मोबाईलमद्ये मी माझी लोकेशन बघु लागलो.नेहमीप्रमाणे नेटवर्क नव्हते.मी नेटसाठी धीर धरायला शिकलो आहे. काहीवेळाने आम्ही बससहीत मुळानदीमद्ये आहोत असे गुगलने सांगितले. मोबाईलमद्ये अचानक आमची बस मुळानदीतुन बाहेर आली आणि फूटपाथवरुन चालु लागली.
आत तो चौक जवळ येत होता. मला त्या चौकात दोन रनगाडे आहेत एवढे आठवत होते. एखाद्या सैनिसारखी मी त्या रनगाडाची वाट पाहत होतो.
तेवढ्यात माझ्या खांद्यावर एक हात पडला तो कंडक्टरचा होता. आमचे हावभाव बघून कंडक्टरच्या मनात करुणा दाटली होती म्हणुन आता पुढच्या चौकात उतरा हे सांगायला आमच्यापाशी आला होता. आम्ही अधिक करुणाभिनय केला असता तर त्याने आमचे पार्सल घरपोच पोहचवले असते असे वाटून राहिले.
शेवटी एकदाची बस थांबली. आम्ही थाटात उतरलो. समोरच्या रनगाड्यांना डोळेभरुन पाहिले. भाऊजी थोड्यावेळात येणार होते. त्यांनी मला रनगाड्या'खाली' उभे रहायला सांगितले होते तसा मी थांबलो आणि प्रवासाचे कार्य यथासांग पार पडले.
पण एका गोष्ट मनात कायम येत होती की पुण्यात किंवा इतर शहरात नवखा माणुस हमखास गडबडतो. एखादे ऑफलाईल चालणारे साधे अॅप तयार का होऊ शकत नाही? तुम्ही कुठे आहात आणि कुठे किती वाजता जायचे आहे एवढे सांगितले की त्या रुटचे बसेस येणारे स्टॉप्स त्यांच्या योग्य वेळा आणि वेळापत्रकाप्रमाणेच चालणारी बस हे शक्य असावे का? जेव्हा गाड्या बदलत जाण्याची गरज असते तेव्हासुद्दा या अॅपने उपलब्ध पर्याय दाखवावेत.
गुगल मॅपवर काही प्रमाणातच उपयोगी पडते. असे काही अॅप अगोदरच असल्यास सांगावे.
याद्या
23809
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
तसं तर माझं अजून काही
In reply to त्यांना नाहेच by नाखु
त्यंना पुणं मुळ्ळीच आवडत नै!
In reply to कैतरीच नाखुकाका तुमचं! मुव्बि by यशोधरा
तुमच्या लेकराला पुणे खूप आवडो
In reply to त्यंना पुणं मुळ्ळीच आवडत नै! by मुक्त विहारि
तो तर आकुर्डीवर भलताच खूष आहे.....
In reply to तुमच्या लेकराला पुणे खूप आवडो by यशोधरा
भगवंताचे>>>म्हंजे कंच्या
In reply to पांडुरंगा!! by शब्दानुज
बरं र्हाइलं टका.
PMPML गुगल केलं. पहिली साईट
आभारी आहे!
In reply to PMPML गुगल केलं. पहिली साईट by पिलीयन रायडर
हैला...
In reply to आभारी आहे! by शब्दानुज
अहो तो जुना प्रसंग विनोदी करण्यासाठी सत्यघटनेला काही कल्पित कंगोरे मी दिले आहेत.असं म्हणुन परत हे...काहीजणांना तरी हा मुद्दा शिरीअस्ली घेतलेले दिसतयं!???... काय होनार या जगाचं ??? काय कलंत नाय :) ;) (धुगधुगी लागलेल्या धाग्यात मी वेळीच प्राण फुंकले होते, हे विसरू नये :) ;) ).
In reply to हैला... by डॉ सुहास म्हात्रे
प्राण फुंकुक फुंकुन तुम्ही
In reply to . by शब्दानुज
"""PMPML गुगल केलं. पहिली
बेस्ट भारीच आहे हो..
In reply to """PMPML गुगल केलं. पहिली by कंजूस
te %kothrud> असा सर्च केला
In reply to बेस्ट भारीच आहे हो.. by पिलीयन रायडर
आयला अरे सिटी बस प्रवास तो !!
अॅप आले
मी दोन वर्षांपूर्वीच हे अँप
In reply to अॅप आले by शब्दानुज
मी दोन वर्षांपूर्वीच हे अँप
In reply to अॅप आले by शब्दानुज