काना-मात्रा-वेलांटी-ऱ्हस्व वा दीर्घ उकार-रफार-अर्घचंद्र-अनुस्वार-विसर्ग यांसारख्या (बाराखडीतील वा इतर) चिन्हांच्या कुबड्यांचा आधार न घेता केवळ मुळाक्षरांच्या स्वबळावर व क्वचित प्रसंगी पाय मोडलेल्या अर्धवट अक्षरांच्या वा, दुसऱ्या टोकाला जाऊन, (मूलध्वनी भासणाऱ्या वा रोजच्या वापरामुळे मूलध्वनी मानल्या जाणाऱ्या) काही थोडक्या जोडाक्षरांच्या साथीने मराठीमध्ये वाक्यरचना - मग ती भले थोडीफार उफराटी/contrived/बाळबोध का वाटेना - होऊ शकते का? मातृभाषेचे हे सामर्थ्य जोखण्यासाठी व ही लवचिकता-खासियत चाचपण्यासाठी फक्त थोडीशी गंमत - किंबहुना खरंतर निव्वळ एक साधा प्रयोग - म्हणून केलेला हा फावल्या वेळेतील खटाटोप मात्र हलकाच घेतला जावा ... गांभीर्याने घेऊ नये. विशेषतः यात 'मराठी भाषेचे व्यवच्छेदक लक्षण' वा 'नवसाहित्याने घेतलेले धोक्याचे वळण' वा 'साहित्याने घेतलेले नवे मोक्याचे वळण' वा तत्सम एखादा गहन-गंभीर अर्थ शोधण्याचा अजिबात प्रयत्न करु नये ... प्रयत्न वाया जाईल - फोल ठरेल.
----------------------------------------------
।। अथ सहज सरळ अक्षर पठण, न कथन न कवन, न वळण शरण न गहन मरण ।।
* मनन-समय? तर मग गजधर-चरण पकड व भजन श्रवण करत तनमनधन हरपत परम सत् भजत बस. भजन भगत-गण: शरद तळवलकर, अक्षय हळदणकर, अजय सरवणकर, समर करमरकर, रजत खळदकर, छगन गडकर, गणपत भटकळ व अनय परळकर
* बबन, तबक-कलश सरळ धर, नमन कर व वर कळस बघ.
* अभय, पटकन् बघ ... अजगर रमतगमत अघळपघळ पसरत ... वळचण पकडत ... दलदल बडवत ... दगड चळत अलगद चढत ... कळतनकळत नद चकवत ... सरपटत फरपटत ... गजगत सरकत ... बदक व तरस भक्षत चलत ... अबब!
* घर गरज? तर मग मरगळ झटकत व चटकन् ठरवत परळ-फलटण शहर बस पकड व मजल-दरमजल करत भडकमकर पथ (हडपसर) पदपथलगत सदर सदन बघ.
* अहमदनगर-रतनगड चलनवलन/दळणवळण: पद, बस, रथ, गज ... बस्! अलबत् न गलबत!
* अग कमल, वर गगन बघ ... पवन पतन व गडद ढग! पटपट परकर धर अन् मग भरभर पळत - पण न गडगडत न नथ हरवत - वरवर चढत धरण-गमन कर.
* मदन, मम मळकट-कळकट पण गजसम बळकट कर सरसकट कलम कर.
* नयन, लवकर अनवट धवल कमळ व भडक-गडद तरल गवत बघ. नवलच नवल!
* सतत अक्षर कसरत अक्षय बरसत
कळफलक बडवत 'कखगघ' वळवत
मन-गत 'सहज सरळ अक्षर' बनवत
कहर करत लहर दडवत-जगवत
सवड दवडत व अक्षर-धन जमवत
कवन बहरत पळभर जन रमवत
* न गडबड-कटकट न नटखट-वटवट
न फसत-फसवत पण हसत-हसवत
सहज सरळ वदन सहज सरळ वचन
परत नमन नमन करत गमन गमन
।। सहज सरळ अक्षर पठण सकल सफल ।।

वाचने
7935
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छगन कमळ बघ.
फार मजेदार प्रयोग आहे.
..सरस..!!
नय पडत फरक नसल तर सहज सरळ
:):)
सध्याची अंकलिपी