माझा पुणे सिटी बसमधील प्रवास
सुट्टयांचे दिवस. गतसालाप्रमाणे याही वेळेस आमचे पुण्यात आगमन झाले. पण इतर वर्षी न होणारी गोष्ट यावेळेस होणार होती ती म्हणजे माझे पाय सिटी बसला लागणार होते.
नेहमी पुण्यात फिरताना मी नातेवाईकांच्या कारचा किंवा गाडीचा आधार घेऊनच फिरतच असे. कारमद्धये मोबाईलमद्धये घातलेली मूंडी इष्ट स्थळी पोहचल्यावरच बाहेर निघायची. त्यामुळे रस्ते स्थळे खाणाखूणा लक्ष्ात ठेवण्याची गरजच पडली नव्हती.
बसचा प्रवास आजपर्यंत मी कौशल्याने टाळत होतो. कारणे अनेक होती.लहानपणापासुनच मुळात प्रवासाविषयी अढी होती. लहानपणी उलट्यांसाठी अनेक पिशव्या घेऊन प्रवास करावा लागे. बसमद्ये माझे रक्त आणि अन्न दोन्ही शोषले जाई. शिक्षणासाठी शहरात आलो आणि माझ्या गावाकडे जाण्यासाठी प्रवास करावाच लागे. यातुन फक्त उलट्या कमी होत गेल्या पण अढी तशीच होती.
यावेळेच मात्र माझ्या मातोश्र्ीकडुन सर्व नातेवाईकांना सुचना गेल्या होत्या की यावेस मला सिटी बसचा प्रवास घडवुन आणायचाच आणि कोणीही मला कुठेही सोडायचे नाही.
मी मावशीकडे उतरलो होतो आणि पुढच्या दिवशी जुरासिक वल्ड बघण्याचा कार्यक्रम माझ्या भाऊजींनी ठरवला. ते रक्षकचौकात रहात. आता यात मेख अशी होती की जर मला पिच्चर पहायचा असेल तर मला एकट्यालाच जावे लागणार होते. शेवटी हो ना करत डायनासोअरवरच्या पेमामुळे मी जाण्याचे ठरवले.
१२६ नंबरची बस तिथे पोहचते अशी मोघम माहिती मला दिली गेलेली होती. कुठून बसायचे ते ठिकाण सांगण्यात आले होते. फक्त बस पकडणे तिकीट काढणे आणि योग्य ठिकाणी उतरणे एवढी तिनच सोपी कार्ये पार पाडायची होती. पण माझ्यासाठी ती चक्क एका युद्धासमान होती.
मी त्या ठिकाणी पोहचलो. आणि पहिला झटका बसला.तिथे चार स्टॉप होतो. तिथे एका स्टॉपकडुन दुसरीकडे पळण्यात अर्धा तास गेला. तरीही त्यापैकी कुठला निवडावा हे कळेना. पुण्यात पत्ता विचारणे म्हणजे काय हे सुज्ञास सांगणे न लगे. मी मावशीला फोन केला. ती उचलेना. पत्ता विचाणे हेच आत नशीबी होते. शेवटी तो स्टॉप सापडला. तो त्या चारपैकी कुठलाच नव्हाता. मुळात तो स्टॉप आहे यावरच विश्वास बसेना. कारण तिथे माझ्यामागे फक्त एक झाड उभे होते.
मला फक्त १२६ हा आकडा माहिती होता. ती बस जर चुकली तर नेमकी कुणीकडे जाणारी बस पकडायची हा नवा प्रश्ण पडला कारण कोणत्याही बसवर सर्व थांबे लिहिलेले नसतात. तेवढ्यात एक बस माझ्याकडे येऊ लागली. आता तो १२६ नंबर नेमका कुठे असतो हा नवा प्रश्ण. जवळ येता येता तो नंबर मला दिसला आणी वैश्विक कोडे सोडविल्यासारखा आनंद झाला.एखाद्या चित्याला लाजवेल अशी झेप मी बसच्या पुढच्या दरवाज्यात मारली. अर्थात तो स्टॉप गर्दीचा नसल्याने मला कोणी अडवले नाही.
लगेच समोरच्या चालकाला प्रश्ण टाकला"ही बस रक्षकनगरला जाते ना?" " नाय" माझा ठोका चुकला. "रक्षकचौकात जाते. " माझा जीव समोरच्या सिटवर पडला.
आत पाहतो तर निम्मी सिट्स नव्हती. हा तिसरा धक्का. कंडक्टर माझ्याकडे येऊ लागला. " रक्षक.." या तिन शब्दानंतर माझा तोल गेला. मागे लेडीजसिटवर पडता पडता वाचलो. पाकीट काढुन तिकीट काढले आणि त्याच्याकडे माफक हसण्याचा करुण प्रयत्न केला आणि तो चौक आल्यावर सांगण्याची विनंती केली. एक करुण कटाक्ष टाकुन त्याने मूंडी हलवली आणि पुढे गेला.
काही वेळाने माझा शेजारचा माणुस उठणार आहे हे जाणवले. माझ्या पुढची आणि मागची माणसे बाह्या सावरु लागली. पण तमाम पुणेकरांच्या हातावर तुरी देऊन मी ती जाग बळकावली.
आता मोबाईलमद्ये मी माझी लोकेशन बघु लागलो.नेहमीप्रमाणे नेटवर्क नव्हते.मी नेटसाठी धीर धरायला शिकलो आहे. काहीवेळाने आम्ही बससहीत मुळानदीमद्ये आहोत असे गुगलने सांगितले. मोबाईलमद्ये अचानक आमची बस मुळानदीतुन बाहेर आली आणि फूटपाथवरुन चालु लागली.
आत तो चौक जवळ येत होता. मला त्या चौकात दोन रनगाडे आहेत एवढे आठवत होते. एखाद्या सैनिसारखी मी त्या रनगाडाची वाट पाहत होतो.
तेवढ्यात माझ्या खांद्यावर एक हात पडला तो कंडक्टरचा होता. आमचे हावभाव बघून कंडक्टरच्या मनात करुणा दाटली होती म्हणुन आता पुढच्या चौकात उतरा हे सांगायला आमच्यापाशी आला होता. आम्ही अधिक करुणाभिनय केला असता तर त्याने आमचे पार्सल घरपोच पोहचवले असते असे वाटून राहिले.
शेवटी एकदाची बस थांबली. आम्ही थाटात उतरलो. समोरच्या रनगाड्यांना डोळेभरुन पाहिले. भाऊजी थोड्यावेळात येणार होते. त्यांनी मला रनगाड्या'खाली' उभे रहायला सांगितले होते तसा मी थांबलो आणि प्रवासाचे कार्य यथासांग पार पडले.
पण एका गोष्ट मनात कायम येत होती की पुण्यात किंवा इतर शहरात नवखा माणुस हमखास गडबडतो. एखादे ऑफलाईल चालणारे साधे अॅप तयार का होऊ शकत नाही? तुम्ही कुठे आहात आणि कुठे किती वाजता जायचे आहे एवढे सांगितले की त्या रुटचे बसेस येणारे स्टॉप्स त्यांच्या योग्य वेळा आणि वेळापत्रकाप्रमाणेच चालणारी बस हे शक्य असावे का? जेव्हा गाड्या बदलत जाण्याची गरज असते तेव्हासुद्दा या अॅपने उपलब्ध पर्याय दाखवावेत.
गुगल मॅपवर काही प्रमाणातच उपयोगी पडते. असे काही अॅप अगोदरच असल्यास सांगावे.
याद्या
23809
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
श्री सत्यनारायण कथा अध्याय ५ वा...
छान स्वागत केलेत पुण्यात =))
In reply to श्री सत्यनारायण कथा अध्याय ५ वा... by ज्ञानोबाचे पैजार
जय जय दिनदयाळा सत्यनारायण
In reply to श्री सत्यनारायण कथा अध्याय ५ वा... by ज्ञानोबाचे पैजार
जाहीर निषेध
In reply to जय जय दिनदयाळा सत्यनारायण by अत्रुप्त आत्मा
@त्याचा प्रसाद न देणे>>
In reply to जाहीर निषेध by शब्दानुज
अता ं मिपाकर टेंप्युत बसवतील
धन्यवाद पैजारबुवा-कथा डिजिटल
जरुर द्या
In reply to धन्यवाद पैजारबुवा-कथा डिजिटल by कंजूस
मुंबै साठी 'यम-यिन्डीकेटर'
In reply to जरुर द्या by शब्दानुज
मुंबै साठी 'यम-यिन्डीकेटर'
In reply to मुंबै साठी 'यम-यिन्डीकेटर' by भटक्या योगी
विषयांतर -
पुण्यापेक्षा बंगळूरूचा आवाका
In reply to विषयांतर - by विअर्ड विक्स
काडी फुकट
In reply to पुण्यापेक्षा बंगळूरूचा आवाका by बॅटमॅन
केली की गेली? ;)
In reply to काडी फुकट by आदिजोशी
असे अॅप तयार व्हायला हवे या
अहो गेलात की व्यवस्थित... फिर
त्या रुटचे बसेस येणारे
घाबरट स्वभाव असला तर...
पुण्याला नावे ठेवणे?
In reply to घाबरट स्वभाव असला तर... by डॉ सुहास म्हात्रे
पुण्याचं काहीच कधीच चुकत नाही
In reply to पुण्याला नावे ठेवणे? by शब्दानुज
अशामुळेच पुण्याचे नाव खराब होते
In reply to पुण्याला नावे ठेवणे? by शब्दानुज
ओ, ओ, असं काय करताय?
In reply to अशामुळेच पुण्याचे नाव खराब होते by रवीराज
पुणे बससाठी पुणे बस रूट ? ?
सुधारणा
In reply to पुणे बससाठी पुणे बस रूट ? ? by कंजूस
मला तर बुवा मज्जा येते पी.एम
सध्या गूगल मॅप हे ही सुविधा
अॅप हवेच
"निम्मी सिटस नव्हती" म्हणजे
.
In reply to "निम्मी सिटस नव्हती" म्हणजे by असंका
तुम्ही चुकून breakdown
In reply to . by शब्दानुज
:-))
In reply to तुम्ही चुकून breakdown by आदूबाळ
घरचा अभ्यास
आपला
In reply to घरचा अभ्यास by नाखु
माफ करा
In reply to आपला by वपाडाव
अपमान!!!!
पुणेकरांनी ठरवलेच की मी बसनेच
पीएमटी
चेन्नई वगैरे माहीत नाही पण
In reply to पीएमटी by सिरुसेरि
काय हे ?! लेखात पुण्यावर लपून
लेखाला लोकांनी कोथरुडमधल्या
In reply to काय हे ?! लेखात पुण्यावर लपून by डॉ सुहास म्हात्रे
दोन तीन तुलनात्मक घटना देऊ
तेच सांगतोय.
In reply to दोन तीन तुलनात्मक घटना देऊ by कंजूस
(-)
शिव्या?
In reply to (-) by वपाडाव
तेव्हा अक्कल काढण्याएवजी जर
In reply to शिव्या? by शब्दानुज
(-)
In reply to शिव्या? by शब्दानुज
पुण्यात जायचंच कशाला?
तुम्ही हुंबैकर का?
हरवलेला पत्ता!
In reply to तुम्ही हुंबैकर का? by पैसा
खिक्क...नया हय यह
In reply to हरवलेला पत्ता! by शब्दानुज
=))
In reply to हरवलेला पत्ता! by शब्दानुज
बाडिस. नुसतेच शोधू शकत नाहीत
In reply to तुम्ही हुंबैकर का? by पैसा
हुंबैकर
=))
In reply to हुंबैकर by तिमा
=))
In reply to =)) by पैसा
हसताय काय? याला म्हणतात
In reply to =)) by अजया
योगायोगाने माझे बोट त्याचवेळी
In reply to हुंबैकर by तिमा
=))
In reply to हुंबैकर by तिमा
महाराष्ट्रातील इतर शहरे {
मराठवाड्याचे नेतृत्व जेपीभौ
In reply to महाराष्ट्रातील इतर शहरे { by कंजूस
आणि ब्यॅट्यॅला मीरजेची
In reply to मराठवाड्याचे नेतृत्व जेपीभौ by उगा काहितरीच
टक्या
In reply to आणि ब्यॅट्यॅला मीरजेची by टवाळ कार्टा
नाखुन का का ????
In reply to टक्या by नाखु
काय झालं टका आँ>>>>>>>>>
In reply to आणि ब्यॅट्यॅला मीरजेची by टवाळ कार्टा
जगाच मध्यवर्ती ठिकाण राहील की
In reply to महाराष्ट्रातील इतर शहरे { by कंजूस
जगाच मध्यवर्ती ठिकाण राहील की
In reply to जगाच मध्यवर्ती ठिकाण राहील की by शैलेन्द्र
एन्जॉय व्हाइल इट लास्टस!
इतर गावांपैकी - उदगावची लाकडी खेळणी
उदगावच्या लोकनाट्याचे बोर्ड
In reply to इतर गावांपैकी - उदगावची लाकडी खेळणी by सिरुसेरि
होय होय!
In reply to उदगावच्या लोकनाट्याचे बोर्ड by बॅटमॅन
मग वाडीचे पेढे अन बासुंदीही
In reply to होय होय! by पैसा
नाय नाय!
In reply to मग वाडीचे पेढे अन बासुंदीही by बॅटमॅन
वाडीत
In reply to नाय नाय! by पैसा
सातारी कंदी पेढे मला
In reply to वाडीत by नाखु
त्या माशा पाळलेल्या अस्तात.
In reply to नाय नाय! by पैसा
कोल्हापूरच्या स्टँडवर जावून
In reply to उदगावच्या लोकनाट्याचे बोर्ड by बॅटमॅन
आता नैये ना पण? :( की आहे?
In reply to कोल्हापूरच्या स्टँडवर जावून by काळा पहाड
आहे ना अजून.
In reply to आता नैये ना पण? :( की आहे? by बॅटमॅन
जय शिंगापुर आमची सासुरवाडी
In reply to उदगावच्या लोकनाट्याचे बोर्ड by बॅटमॅन
आमच्या लहानपणी { ऐकतोस ना टका
मला का ऐकवताय? ल्ल्ल्लूऊऊ
In reply to आमच्या लहानपणी { ऐकतोस ना टका by कंजूस
सांगलीत
पांडुरंगा!!
असं बरं जावू देवू? आता भोगा
In reply to पांडुरंगा!! by शब्दानुज
बसमध्ये उडी मारणार की
In reply to पांडुरंगा!! by शब्दानुज
कुठेही उडी मारली तरी....
In reply to बसमध्ये उडी मारणार की by यशोधरा
प्रत्येक धाग्यात पुणे शोधणारा
In reply to कुठेही उडी मारली तरी.... by मुक्त विहारि
पुण्याने
In reply to प्रत्येक धाग्यात पुणे शोधणारा by यशोधरा
कैतरीच नाखुकाका तुमचं! मुव्बि
In reply to पुण्याने by नाखु
त्यांना नाहेच
In reply to कैतरीच नाखुकाका तुमचं! मुव्बि by यशोधरा