मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

छायाचित्रण स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा

संपादक मंडळ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ११: प्रतीक्षा ****************************************** छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १: मानवनिर्मित स्थापत्य छायाचित्रणकला स्पर्धा क्र. २: "आनंद" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons) छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ५: "भूक" छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ६: व्यक्तिचित्रण छायाचित्रणकला स्पर्धा क्र. ७: शांतता छायाचित्रणकला स्पर्धा क्र.८ : चतुष्पाद प्राणी छायाचित्रणकला स्पर्धा क्र.९ : सावली छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१० : कृष्णधवल छायाचित्रे ******************************************************** नमस्कार मंडळी. १० वी स्पर्धा श्री जयंत कुलकर्णी यांनी अतिशय उत्तम प्रकारे आयोजित केली आहे आणि यथायोग्य चित्रांना अव्वल क्रमांकही दिले आहेत. त्यांच्या सुरेख लेखासाठी आणि स्पर्धेच्या आयोजनासाठी श्री जयंत कुलकर्णी यांना खूप धन्यवाद! पुन्हा एकदा जुन्या फॉर्मॅटमधे स्पर्धा घेऊया. यावेळच्या स्पर्धेसाठी विषय आहे 'प्रतीक्षा' आता सर्वांना मोठी प्रतीक्षा आहे ती पावसाची. पण यापूर्वीही तुम्ही कधी ना कधी असे प्रतीक्षेचे क्षण टिपले असतील. त्यावर आधारित तुमची छायाचित्रे येऊ द्या या स्पर्धेसाठी. प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. दिनांक २६ जून २०१५ पर्यंत स्पर्धक आपल्या प्रवेशिका पाठवू शकतील. इतर सर्व नियम आधीच्या स्पर्धा क्र. ७,८, ९ प्रमाणेच राहतील. सर्वच स्पर्धकांना शुभेच्छा !

वाचने 67612 वाचनखूण प्रतिक्रिया 99

गणेशा Mon, 06/15/2015 - 15:31
ढगभरल्या आभाळाकडे पहात पावसाच्या थंबांची ही प्रतिक्षा 1 (नोटः फोटोत कुठलेही बदल नाहीत, स्थळ : मावळ, १३ जून, नंतर मान्सुन चा पहिला पाऊस आला दुपारी)

वेल्लाभट Tue, 06/16/2015 - 07:56
a काय राहिले हाती सरले काय आता वाट बघण्यावाचुनि उरले काय आता - अपूर्व ओक स्थळ गुंजवणे, किल्ले राजगड पायथा. एफ ५.६ १/१०० आयएसओ २००

In reply to by तुषार काळभोर

नाखु गुरुवार, 06/18/2015 - 16:52
सहज सुंदर आणि अतिशय कल्पक!!!

In reply to by सौरभ उप्स

वॉव! सौरभ......? उप्स! उप्स!! उप्स!!! फ़ोटो जितका अप्रतिम आहे,तितकाच रचनात्मक आहे. आपल्या कडून आत्ताच पहिला नंबर. आणि हो,फ़ोटो सांगुन चोरत आहे. ब्लॉगवर वापरणार आहे. ;-)

In reply to by चिगो

सौरभ उप्स Tue, 06/16/2015 - 23:30
धन्यवाद सगळ्यांचे... चीगो मी पण सहज म्हणून टाकला हा फोटो पण तुम्हा सर्वांच्या कमेंट मुळे कळाल कि खरच खूप सूट होतोय हा फोटो…।

मोहनराव Tue, 06/16/2015 - 15:25
विषय खुपच चांगला आणि अवघड आहे. आत्तापर्यंतचे सर्व फोटोज छान!

In reply to by मितान

मितान Wed, 06/17/2015 - 12:38
वाट पाहुनी जीव शिणला !!! नॉर्वेतल्या एका छोट्याशा पोर्टवर दर्यावर्दी प्रियकराची वाट बघणारी ही सुंदरी आपल्या कन्याकुमारीची आठवण देऊन गेली !

In reply to by कपिलमुनी

असंका Wed, 06/17/2015 - 16:39
:-)) पण आयडीया चांगली आहे हो त्यांची...मला पण एक पुतळा आठवला होता- "मरमेड" चा.

In reply to by स्वच्छंद

हा फोटो मला खालील ब्लॉगवर देखील पहायला मिळाला http://optionforthepoorandvulnerable.blogspot.in/2010/06/why-am-i-content-to-spend-143-on-things.html तुम्ही अ‍ॅबी या नावाने पण लेखन करता का सर? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

स्वच्छंद Sat, 06/20/2015 - 00:35
नाही हो! काही दिवसापूर्वी सोशल मिडीयावर आला होता फोटो.. स्पर्धेचा विषय ऐकताच प्रथम हाच क्लिक झाला..

In reply to by स्वच्छंद

श्रीरंग_जोशी Sat, 06/20/2015 - 06:10
प्रवेशिकेसाठी नसणारे अन केवळ विषयाशी संबंधीत आहेत म्हणून फोटो टाकताना शीर्षकातच 'स्पर्धेसाठी नाही' हे स्पष्ट लिहावे. हे धागे मूलतः प्रवेशिका सुपुर्त करण्यासाठी असल्याने अधिक काही लिहिले नसल्यास प्रवेशिका आहे असेच समजले जाणार. जालावरचा कुठलाही फोटो मिपावर टाकताना 'जालावरून साभार' असे लिहिण्याचा संकेत आहे. तो देखील पाळावा.

In reply to by श्रीरंग_जोशी

मूळात त्यांना, "स्पर्धेसाठी द्यायचा फ़ोटो स्पर्धकानी स्वत: काढलेला हवा". हा नियमच लक्षात आलेला नाहिये. हे दिसून येत आहे.

In reply to by प्रियाभि..

शब्दबम्बाळ Sat, 06/20/2015 - 15:30
अभिजित भाऊ, या आधीच्या स्पर्धांमधले फोटो पहा. मग जरा अंदाज येईल कि इथे खूप चांगले छायाचित्रकार आहेत! बाकी ज्याची त्याची विवेक बुद्धी आहेच!

In reply to by स्वच्छंद

विषयाला साजेसा मर्मभेदक फोटो ! सगळ्या मुलांच्या चेहर्‍यावरचे भाव मन विदिर्ण करून जातात :(

मोहन Fri, 06/19/2015 - 14:00
व्हेलच्या उडी पूर्ण होउन प्रचंड प्रमाणात पाणी प्रेक्षकांच्या अंगावर उडण्याची प्रतीक्षा ! ? vhel

संदीप डांगे Sat, 06/20/2015 - 14:37
सौरभ उप्स यांनी टाकलेला फोटोसारखा फोटो स्पर्धेत येणार याची अपेक्षा होतीच. पण सौरभ यांचा फोटो सर्वांगाने अप्रतिम. दुसरं असं की काही फोटोज हे दुसर्‍या कलाकारांनी केलेल्या शिल्पकृतींचे आलेले आहेत, त्याबद्दल नम्र आक्षेप नोंदवतो. कृपया असे फोटोज टाकून आमची बँडविड्थ आणि वेळ खाऊ नये. जयंतजींनी मागच्या स्पर्धेत असं स्पष्ट केले होते की दुसर्‍यांच्या कलाकृतीचे फोटो टाकल्यास उपयोग नाही. माझेही असेच मत आहे. फोटोग्राफरचा फोटो ही स्वतःची कलाकृती असली पाहिजे. त्यातून ध्वनित होणारा संदेश फोग्राची कल्पकता हवी. दुसर्‍याची कलाकृती जसे एखादे शिल्प हे मुळात दुसर्‍याचा विचार/कल्पना/सृजन आहे. त्याचा क्लिक संग्रह म्हणून ठीक आहे पण अशा स्पर्धेसाठी देऊ नये. याचीच दुसरी बाजू अशीही आहे की असं एखादं शिल्प अशा पद्धतीने कॅमेर्‍यात पकडलंय की त्यातून (शिल्पातल्या कल्पनेचा संदर्भ घेऊन) दुसरंच काही फोटोग्राफरला सांगायचं आहे तर ते योग्य आहे. असं करण्यात काही समस्या नाही. जसं उदाहरणार्थ, राष्ट्रपतीभवनाच्या सुंदर इमारतीपुढे एखादा भिकारी बसलेला टिपला असेल तर ती फोग्राची स्वतःची कल्पकता/संदेश आहे. त्यात राष्ट्रपतीभवनाच्या उपलब्ध सौंदर्याचा/श्रीमंती/सत्तेचा संदर्भ म्हणून वापर केला आहे.

In reply to by संदीप डांगे

शब्दबम्बाळ Sat, 06/20/2015 - 15:26
तुमच्या आक्षेपाला माझा नम्र आक्षेप! :)) कलाकृतींचे उत्तम छायाचित्र काढायलाही काही गोष्टींचे ज्ञान आवश्यक आहे. तसेच कुठल्या गोष्टीला कलाकृती म्हणणार, हि संज्ञाही धूसरच आहे. वर जयंत सरांनी टाकलेल्या छायाचित्रातली भिंतीवरील ग्राफिटीसुद्धा कलाकृती म्हणता येईल. त्यामुळे स्पर्धेच्या विषयाला अनुसरून असणारे आणि स्वतः काढलेले छायाचित्र असेल तर त्याला आक्षेप नसावा! शेवटी सजीव असो व निर्जीव प्रत्येक जण कोणाची तरी कलाकृतीच, नाही का? ;)