सर्वप्रथम पाककृती द्यायला अक्षम्य उशीर झाला, ह्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो.
म्हणजे त्याचे असे झाले, की फोटो मी एका मोबाइल मध्ये काढले आणि ऐनवेळी त्या मोबाइलची बॅटरी संपली.सुदैवाने दुसरा मोबाईल होता. त्यात काही फोटो काढले. पहिला मोबाइल मुलाने पळवला आणि त्यातील फोटो त्याच्याकडून डिलीट केल्या गेले.त्यामुळे ढेमसे आणि साहित्य, ह्याचे फोटो नाहीत.
जमल्यास फोटो मिळाले तर बघतो.
ढेमस्याचे फोटो तुम्हाला गूगलबाबा देतीलच, पण खालील लिंक बघीतलीत तरी चालेल.
गूगल इमेज सर्चमधील ढेमसे
तसे आमचे नातेवाईक जगभर पसरलेले आहेत. आजोबांची आणि पणजोबांची पुण्याई.त्यात पण विदर्भात जरा जास्तच.
वर्धा-नागपूर भागात हिवाळ्यात जायला मी नेमीच तयार असायचो पण तिथल्या उन्हाळ्यात जायला मी जरा नाखूषच असायचो.
आई मग मला बरीच आमिषे दाखवायची. आईस्क्रीम (लाकडी पॉट भाड्याने आणून आणि भावंडांनी कष्ट करून बनवलेले), नीरा इ.
तरीपण मी बधत नसे. शेवटी आई म्हणायची. "काका तुझ्यासाठी स्पेशल ढेमश्याची भाजी बनवणार आहेत."
ही मात्रा मात्र बरोब्बर लागू पडायची.
आमच्याकडे वांगी, कांदे-बटाटे रस्सा, टॉमॅटो सूप, तोंडली, गवार आणि ढेमश्याची भाजी पुरुष मंडळी बनवतात आणि घरातील इतर मंडळी खातात. ह्या भाज्या बनवता आल्याशिवाय आमच्या घराण्यातील पुरुष लग्नाच्या बाजारात उभे रहात नाहीत.(तसा अलिखित नियमच, आमच्या घराण्यात आहे, असे समजलात तरी हरकत नाही.)
नमनाला इतके तेल भरपूर झाले.
१. निसर्ग आणि इतर (अति)आवश्यक गोष्टी.......
ही भाजी उन्हाळ्यातच करायची. जसजसे उन चढत जाते, तसतशी ही भाजी अधिकाधिक चवदार होत जाते.एकवेळ स्वर्गात अमृत नसेल तरी चालेल पण, ह्या भाजीच्या जोडीला, आमरस हा हवाच.
त्यातही नागपूर भागातले असाल तर दशहरी उत्तम. मी वलसाडला रहात असतांना मी आमरसासाठी केशर आंबा वापरत असे.केशर किंवा दशहरी इथे न मिळाल्याने, ह्यावेळी हापूस आंब्याच्या रसाबरोबर ही भाजी केली.
ही भाजी बर्यापैकी मसालेदार असल्याने, घरात पिण्याच्या पाण्याचा मुबलक साठा असावा.त्यातूनही माठातले किंवा सुरई मधले थंड पाणी असेल तर फार उत्तम. आमच्या प्रकृतीला फ्रीजचे पाणी झेपत नाही.
एखादा मस्त रविवार असावा. भरपूर नाश्ता झालेला असावा आणि बाजारात केशर किंवा दशहरी मिळायला सुरुवात झालेली असावी.बायकोने कुर्ड्या केलेल्या असाव्यात आणि आज सकाळीच तिने सांडगे वाळत घातलेले असावेत.अशावेळी आपण बाजारात फेर-फटका मारायला जावे आणि ताजी ढेमसे दिसावीत.(ही भाजी अशी अचानक करण्यात जास्त मज्जा आहे.)
आता ढेमसे मिळालीच आहेत, तर जरा १-२ डझन आंबे पण आणावेत. दशहरी आणि केशर रोज ताजे आणावेत.इति आमचे तीर्थरूप.
आपण आणलेली ढेमशी बघून, बायकोने पोळ्यांची कणिक जरा जास्तच मळायला घ्यावी आणि पोळ्या करून, तिने स्वयंपाक घर आपल्या ताब्यात द्यावे.
तर मंडळी आता स्वयंपाकघर आपल्या ताब्यात आलेच आहे आणि बायको पण नाही.अशावेळी शांततेने आपण भाजी करायला घेवू या.
मोबाइल फोन बायकोकडे द्या. अशावेळी माझी बायको, मी स्वयंपाक करत आहे,असे बिनदिक्कत सांगते.(तिची सासू सोडून, इतरांना)
२. साहित्य......
अ) कांदे २ (दर ४ ढेमश्यामागे)
ब) लसूण (एका ढेमश्यामागे १)
क) आले १ ईच (दर ४ ढेमश्यामागे)
ड) तीळ १ चहाचा चमचा (दर ४ ढेमश्यामागे)
इ) बडीशोप १ चहाचा चमचा (दर ४ ढेमश्यामागे)
टीप ====> बडीशोप भाजून घेणे.
ई) खोब्रे १ मोठा चमचा (दर ४ ढेमश्यामागे)
उ) एक इंच दालचिनी (आवळ-जावळ कुटून, (दर ४ ढेमश्यामागे))
ऊ) मिरे ४ (दर ४ ढेमश्यामागे)
ए) लवंगा ४ (दर ४ ढेमश्यामागे)
ऐ) मसाला पावडर ====> ही मी ऐन-वेळी बनवतो.त्याची कृती.
छोले मसाला + मालवणी मसाला + चिकन मसाला + मटण मसाला + संडे गरम मसाला + लवंगी मिरच्यांचे तिखट + लोणचे मसाला.....एकुण अर्धी वाटी (दर ८ ढेमश्यामागे)
ओ) एक वाटी तेल
औ) चवी पुरते मीठ
अं) टोमॅटो (ऐच्छिक....मला आवडतात, म्हणून मी घेतो.)
अ:) खसखस (ही हवीच.त्याशिवाय अ: अ: असे खाणारे म्हणत नाहीत)
चला सगळे साहित्य परत एकदा नजरेखालून घ्या आणि आता आपण कृतीकडे वळू या.
३. कृती.....
सर्व प्रथम ढेमशी चिरून घ्या.
आता कढई तापायला ठेवा.आंच जरा जास्तच ठेवा.
कढई तापली की, आंच कमी करून खालील पदार्थ एकामागोमाग टाका.
टीप : एक पदार्थ टाकून झाला, की मग १०-१५ सेकंद ढवळा आणि मग दुसरा पदार्थ टाका.
थोडक्यात, पदार्थ टाकायचा.१०-१५ सेकंद परतायचे आणि मग दुसरा.आंच कमीच ठेवा.मसाला करपता कामा नये.(बायको लक्ष ठेवून आहे.आयुष्यभर बोलणी ऐकण्यापेक्षा, पदार्थ करपू नये, इकडेच लक्ष असू द्या.)
पदार्थाचा क्रम
१. कांदे
२. लसूण आणि आले
३. मिरे आणि लवंगा
४. खोब्रे
५. दालचिनी
६. बडीशोप
७. तीळ
८. खसखस
९. टोमॅटो
टोंमॅटो थोडे अर्धवट शिजले, की मग गॅस बंद करून कढई खाली उतरवा.
४. आता एका मोठ्या कढईत एक वाटी तेल तापायला ठेवा.आंच कमी.बायको त्यावेळी स्वयंपाकघरात नसेल तर, तेलाचे प्रमाण अजून थोडे वाढवलेत तरी चालेल. (जवळ असेल तर एक-दोन चमचे नक्कीच टाका.ती डोळे वटारून बघेल.तिच्याकडे दुर्लक्ष करा.)
५. आता एकीकडे दुसर्या कढईतल्या मसाला, मिक्सर मधे घाला आणि त्याची ग्रेव्ही(मराठी शब्द????????) करून घ्या.
जर तुम्ही प्रथमच ग्रेव्ही वाली भाजी करत असाल तर, आधी ग्रेव्ही करून मग, ४थ्या पायरीकडे वळा.
६. कढईतले तेल तापले की आंच थोडी मोठी करा आणि ही गेव्ही त्या तेलात टाका आणि परतायला सुरुवात करा.
१०-१२ सेकंद परतून झाले की मग आंच कमी करा.
आता छान मस्त खमंग सुवास घरभर पसरत असेल आणि आता ह्याच वेळी बायको आमरस काढायला सुरुवात करेल.
मसाल्याच्या बाजूला तेल सुटायला लागले, की मग चिरलेली ढेमशी टाका.
आता २-४ मिनिटे ढेमशी ढवळत रहा.
कढईवर झाकण ठेवा आणि त्या झाकणावर पाणी ठेवा.
टीप : ह्या भाजीत शक्यतो पाणी घालायचे नाही.ढेमश्यात पाण्याचे प्रमाण बर्यापैकी असते.नुसत्या तेलावर ही भाजी शिजवायची,तरीपण जर मसाला खाली लागत असेल तर, थोडे पाणी घालायला हरकत नाही.पदार्थ करपण्यापेक्षा आणि नंतर परत बायकोची बोलणी खाण्यापेक्षा, पदार्थ पाणचट झाला तरी हरकत नाही.प्रयोग म्हणून, ढेमश्याचा रस्सा केला आहे, असे सांगावे.(आपण नाही का, धागा शतकी व्हावा म्हणून "पुणे" ह्या शब्दाचा वापर करत.तसेच आहे.)
अधुन-मधून परतत रहा.मसाला खाली लागता कामा नये.
ढेमशी शिजली की रंग बदलतात. साधारण शिजलेल्या तोंडली सारखा रंग येतो आणि चमच्याने सहज तुकडा पडतो.आता चवी पुरते मीठ घालून परत एकदा, २-३ मिनिटे, भाजी नीट परतून घ्यावी.
हे असे झाले की, ढेमश्याची भाजी झाली, हे ओळखावे आणि पुढील तयारी करावी.
७. तयारी (ही हवीच)
ही भाजी आज आपण आपल्या बायकोला खायला घालत आहोत.त्यामुळे ही भाजी खायचा पहिला अधिकार तिचा.
एका बाऊल मध्ये ही भाजी घ्या. दुसर्या बाऊल मध्ये आमरस घ्या.(आमरसात तूप आणि थोडी मिरपूड घाला.)
एका ताटात हे २ बाऊल अधिक चटणी/कोशिंबीर घ्या.
एका हातात ताट आणि दुसर्या हातात माठातले पाणी भरलेला ग्लास घेवून, हा नजराणी बायकोला पेश करा.
ती एक घास खाते आणि टच्चकन तिच्या डोळ्यातून एक-दोन थेंब पाणी ओघळते.
आपण तिचे अश्रू पाहून, पाण्याचा ग्लास तिच्या ओठी लावावा आणि म्हणावे,"पुढच्या वेळी भाजीत जरा तिखटाचे प्रमाण कमीच करीन."
ती हसून म्हणते," नाही हो. भाजी मस्तच झाली आहे.डोळ्यात जरा कचरा गेला होता."
तिचे आपल्यावरील प्रेम आपल्याला समजते आणि आपण परत एका सुखी दिवसाचे धनी होतो.
वाचने
29538
प्रतिक्रिया
44
मिसळपाव
प्रतिक्रिया
आधी फोटो पाहिले. तुमच्या
दंडवत
अखेर तो दिवस (भारतात रात्र)
In reply to दंडवत by श्रीरंग_जोशी
करून पाहिनच.
भाजीत तेल आणि बायकोला मस्का जरा जास्तच वाटतो आहे.....
In reply to करून पाहिनच. by प्रभाकर पेठकर
पा कृ
In reply to भाजीत तेल आणि बायकोला मस्का जरा जास्तच वाटतो आहे..... by मुक्त विहारि
ता क: ग्रंथाचे काही खंड वाचावयास मिळाले तर
In reply to पा कृ by नाखु
वाह..
खरंच सलाम! फारच भारी लेखनशैली
पाकृबद्दल धन्यवाद मुवि!
मी हे मसाले ऐन-वेळी करतो.....
In reply to पाकृबद्दल धन्यवाद मुवि! by रेवती
ओक्के.
In reply to मी हे मसाले ऐन-वेळी करतो..... by मुक्त विहारि
वा!!
रेवाककाला तुम्ही ज्या क्षणी
जब्राट लेखन! आमच्याकडे याला
कलाकार सलाम!!!
ही माझी अत्यंत आवडीची भाजी.
तुमच्या दिल्लीतच ही भाजी
In reply to ही माझी अत्यंत आवडीची भाजी. by विवेकपटाईत
वा!
कधि येऊ जेवायला काका?
कधीपण....
In reply to कधि येऊ जेवायला काका? by स्पा
लै भारी लिहिलंय.
वा!मूवि वा!क्या बात है.मजा
भाजीपेक्षा पाकृ-लेखन खमंग !
आहा.. ढेमश्याचि भाजी......
हा .... हे ढेमसे म्हणजे
सुरेख..
मस्त!
पाकृ मस्त.
जरूर....
In reply to पाकृ मस्त. by प्यारे१
ढेमश्याची भाजी अजून खाल्ली
गेल्या आठवड्यातच
धन्यवाद मुवि,
ढेमशाची भाजी
सुरेख !
मस्तच... आमच्या घरी ढेमसे
मी अजून कधी खाली नाहिये पण
ाहा ाहा हा
येतोच आता तुमच्याकडे... तसाही
ढेमसे कधी खाल्ले नाही पण
जरा आधी मिपा उघडून बघायला हवं
ही पण कला आहे का अंगात. :)
आज मुहूर्त सापडला.
वाह