हिंसाचाराला घाबरण्यापेक्षा ४-५ दिवस स्वाभिमानाने जगेन हे पुस्तकात शोभणारे बाळबोध वाक्य आहे. पूर्णपणे impractical आणि अभिनिवेशयुक्त विधान आहे. पुढच्या पिढीचा विचार करा. मी स्वाभिमानाने ४-५ दिवस जगेन... माझ्या शेजाऱ्यानेही तसेच वागावे... प्रत्येकाच्या मुलाबाळानेही तसेच वागावे हे होणे बिलकुल शक्य नाही.
हिंसाचाराला घाबरण्यापेक्षा ४-५ दिवस स्वाभिमानाने जगेन हे पुस्तकात शोभणारे बाळबोध वाक्य आहे. पूर्णपणे impractical आणि अभिनिवेशयुक्त विधान आहे. पुढच्या पिढीचा विचार करा. मी स्वाभिमानाने ४-५ दिवस जगेन... माझ्या शेजाऱ्यानेही तसेच वागावे... प्रत्येकाच्या मुलाबाळानेही तसेच वागावे हे होणे बिलकुल शक्य नाही.
कुठल्याही वाक्याचा बाळबोध अर्थ काढणे सहज शक्य असते जर कृती करायची नसेल तर. स्वतः काही न करता माझ्या शेजार्याला आणि त्याच्या मुलाबाळांना जाऊन हे सांगायला मी काही विचारवंत किंवा लेखक (काही अपवाद वगळता)नाही. बाकी ज्याने त्याने काय करावे ज्याचे त्याने ठरवावे. मुख्य मुद्दा हा की इस्रायल सारखा मार्ग अमलात आणणारा कोणीही खंबीर नेता मला पंतप्रधान म्हणून चालेल.
पुण्याचे पेशवे
कृती म्हणजे नक्की काय करायचे आहे. रोज आपण जगतो - सकाळी उठून प्रातर्विधी करणे, चहा पिणे, ऑफिसात जाणे वगैरे वगैरे, कटाक्षाने सिग्नल वगैरे कायदे पाळणे, - त्यापेक्षा आपण वेगळे काय करु शकतो? आणि काय करणे अपेक्षित आहे.
इस्रायलने तरी काय वेगळे दिवे लावले आहेत. एवढा खंबीर वगैरे पंतप्रधान असूनही त्यांच्याकडे हे रोजतेत प्रकार आहेत सुदैवाने इस्रायलसारखा पंतप्रधान भारतात होणे कधीच शक्य नाही.
कृती म्हणजे नक्की काय करायचे आहे. रोज आपण जगतो - सकाळी उठून प्रातर्विधी करणे, चहा पिणे, ऑफिसात जाणे वगैरे वगैरे, कटाक्षाने सिग्नल वगैरे कायदे पाळणे, - त्यापेक्षा आपण वेगळे काय करु शकतो? आणि काय करणे अपेक्षित आहे.
त्यासाठी खंबीर नेता अगदी मोदी असले तरी त्याना निवडून देऊन इस्रायल सारखी कृती आरंभायला भाग पाडणे. अगदी त्यामुळे उठता बसता अगदी कधीही आपल्यावर हल्ला होऊ शकतो याची जाणीव माणसाला असते पण ते मरण लादलेले न वाटता स्विकारलेलेही वाटू शकेल.
अ)आता मुंबईत एक हल्ला झाला त्यात मी वाचलो न जाणो काही दिवसानी दुसरा हल्ला परत होईल त्यात मी मरेन, म्हणजे 'सकाळी उठून प्रातर्विधी करणे, चहा पिणे, ऑफिसात जाणे वगैरे वगैरे, कटाक्षाने सिग्नल वगैरे कायदे पाळणे' हे करून जीवनाची शाश्वती काहीच नाही.
ब)किंवा मुंबईच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मिरातले व ईतर पाकीस्तानी भागातले दहशवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. त्याचे प्रत्युत्तर म्हणून परत मुंबईवर हल्ला झाला त्यात मी मारला गेलो.
वरील दोन्ही घटना शक्य आहेत. परत प्रश्न आहे चॉईस(निवडीचा) दुसरी निवड ही कृतीपूर्ण आहे. कारण मरणाचे अपरीहार्य सावट निडरपणे मान्य केलं आहे आतासारखे संवेदनाशून्य होऊन नव्हे.
पुण्याचे पेशवे
ह्याच खंबीर मोदींच्या गुजरातेतील पोरबंदरमधून अतिरेकी आले अशी प्राथमिक माहिती आहे... असो.
इस्रायल सारखी कारवाई म्हणजे काय? त्यांनी जसे सगळ्या स्थानिक रहिवाश्यांना एका झटक्यात देशातून हाकलून लावले तसे? भारतात आज १५ कोटी मुसलमान आहेत. त्यांना हाकलून लावायचे? शाहरूख खान, सलमान खान, इरफान पठाण, एपीजे अब्दुल कलाम यांच्यासकट? ज्या मुसलमानांनी फाळणीनंतर हाच आपला देश आहे असे समजून इथेच राहण्याचे ठरवले त्यांनाही?
हा इस्रायली उपाय अभिप्रेत असल्यास तो मान्य होणे फार अवघड आहे. देशात यादवी माजेल.
राहता राहिला प्रश्न मुंबई आणि इस्रायलच्या तुलनेचा. सुदैवाने मुंबईतील परिस्थिती इस्रायलसारखी नाही. सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटी काढल्यास इतकी गंभीर परिस्थिती पुन्हा येऊ नये.
ह्याच खंबीर मोदींच्या गुजरातेतील पोरबंदरमधून अतिरेकी आले अशी प्राथमिक माहिती आहे... असो.
ते आपल्या मुंबईत आले... असो..
इस्रायल सारखी कारवाई म्हणजे काय? त्यांनी जसे सगळ्या स्थानिक रहिवाश्यांना एका झटक्यात देशातून हाकलून लावले तसे? शाहरूख खान, सलमान खान, इरफान पठाण, एपीजे अब्दुल कलाम यांच्यासकट? ज्या मुसलमानांनी फाळ णीनंतर हाच आपला देश आहे असे समजून इथेच राहण्याचे ठरवले त्यांनाही?
अब्दुलकलाम, इरफान सोडले तर बाकीच्यांचे देशासाठी भरीव योगदान काय. सलमान खान - चिंकारा हत्या प्रकरण, मद्यधुंद राहून गाडी चालवणे. आणि जसे आपण त्याना इथे राहू देतो यात उपकार करतो असे आम्ही समजत नाही तसे त्यानीही आम्ही शांतपणे राहतोय म्हणजे उपकार करतोय असे समजू नये. देशाचा गाडा उपरोल्लेखीत असलेले लोक असले किंवा नसले चालणारच आहे. 'जन पळभर म्हणतील हाय हाय'.
भारतात आज १५ कोटी मुसलमान आहेत. त्यांना हाकलून लावायचे? हे वाक्य तर तुम्हीच माझ्या तोंडी घालता आहात. वाचा वरील प्रतिसादातील ब) वाचा.
हा इस्रायली उपाय अभिप्रेत असल्यास तो मान्य होणे फार अवघड आहे. देशात यादवी माजेल.
यादवी आत्ता नाहीच आहे असेही म्हणता येणार नाही.
राहता राहिला प्रश्न मुंबई आणि इस्रायलच्या तुलनेचा. सुदैवाने मुंबईतील परिस्थिती इस्रायलसारखी नाही. सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटी काढल्यास इतकी गंभीर परिस्थिती पुन्हा येऊ नये.
त्यासाठीच इच्छाशक्ती पाहीजे इस्रायल सारखी.
पुण्याचे पेशवे
इस्रायलने दहशतवादाचा प्रश्न त्यांच्या इच्छाशक्तीने किंवा त्यांच्या पद्धतीने सोडवला आहे असे आपण कुठे वाचले?
http://www.johnstonsarchive.net/terrorism/terrisraelsum.html येथे वेगळेच चित्र दिसत आहे.
अवांतरः
आणि मागे भारताने अणुसज्जतेची बोंब मारण्याकरता केलेल्या अणुचाचण्यांमुळे नंतर पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या आणि तेदेखील आपल्यासारखेच अण्वस्रसज्ज आहेत हे माहीत आहे का? तसे इस्रायलचे कोणते शेजारी अण्वस्रसज्ज आहेत?
तिथे दिसणारे चित्र फक्त इस्रायलच्या बाजूचे आकडे दाखवतात पॅलेस्टाईनच्या बाजूचे आकडे दाखवतात का? तसा काही विदा असेत तर तो ही दाखवा की.
अवांतरः अण्वस्त्रे असली तरी ती वापरायची सिध्दता आहे का? हा ही प्रश्न महत्वाचा. आणि भारताने अण्वस्त्रे वापरली तर क्षेत्रफळाचा विचार करता भारतापेक्षा पाकिस्तान फारच लवकर संपेल. परिणाम फार भयंकर असतील हे नक्की पण आताच्या हल्ल्याचे परिणामही भयंकर आहेतच.
आणि भारताच्या धोरणानुसार भारत कधीच प्रथम अण्वस्त्रांचा वापर करणार नाही पण पाकीस्तानने केला तरी त्याला उत्तर देण्याची क्षमता भारतात नक्कीच आहे. आठवा जनरल पद्मनाभन यांचे उद्गार. 'पाकीस्तानने भारतावर अण्वस्त्रांनी प्रहार केला तर त्यांचे जगाच्या नकाशावरून अस्तित्व पुसून टाकण्यात येईल अशी क्षमता आम्ही राखून आहोत'.
पुण्याचे पेशवे
इस्रायलला दहशतवादाचे उत्तर सापडले आहे की नाही हे सिद्ध करायला त्यांना मोजावी लागणारी ही किंमत पुरेशी आहे. पॅलेस्टाईनचे अमुक लोक मेलेत हे दाखवल्याने काहीच सिद्ध होत नाही.
आताच्या हल्ल्याचे परिणाम भयंकर आहेतच पण उपाय हा रोगापेक्षा भयंकर होऊ नये आणि रोगाचा समूळ नाश व्हावा हे पाहणे आवश्यक आहे. पाकिस्तान या हल्ल्यांसाठी जबाबदार असेल तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे याविषयी कोणाचेही दुमत नाही. किंबहुना भारताने अशी पद्धत यापूर्वीही अवलंबली आहेच. मात्र इस्रायलने या प्रश्नासंबंधात काही नेत्रदीपक केले आहे असे वाटले नाही म्हणून वरची आकडेवारी दिली.
इस्रायलला दहशतवादाचे उत्तर सापडले आहे की नाही हे सिद्ध करायला त्यांना मोजावी लागणारी ही किंमत पुरेशी आहे. पॅलेस्टाईनचे अमुक लोक मेलेत हे दाखवल्याने काहीच सिद्ध होत नाही.
दुसर्या बाजूच्या आकड्यांची गरज कशी नाही. अर्थातच आहे. त्यावरून तर प्रमाण ठरवता येते ना! अन्यथा अर्धवट पुराव्याच आधारे इस्रायलच्या हातात काहीच लागले नाही असे कसे म्हणता येईल. भारताने यापूर्वी अशी पध्दत अवलंबिल्याचे माझ्या तरी पाहण्यात नाही. मात्र इस्रायलने एका अधिकार्याला सोडवण्यासाठी गाझापट्टीत रणगाडे घुसविल्याचे नक्की आठवते आहे.माझ्या विधानांचा स्वैर अर्थ काढून तुम्हीच त्याचा अनर्थ करीत आहात.
दहशतवादाच्या प्रश्नावर कोणालाच उत्तर सापडलेले नाही. सापडणारही नाही. जोपर्यंत इस्लामचा मूळापासून विचार कोणी करत नाही तोपर्यंत सार्या गोष्टी वरवरच्या आहेत. मूळात जिहाद पुकारायला इस्लामच शिकवतो. त्यावर जोपर्यंत कोणी कणखर भूमिका घेऊन विचार करत नाही तो पर्यंत हे चालूच राहणार आहे. इस्लामी दहशतवादाचा सर्व जगाकडून गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.
पुण्याचे पेशवे
माझा मुद्दा इतकाच आहे की इस्रायलला त्यांच्या पद्धती वापरूनही हा प्रश्न सोडवता आला नाही. त्यामुळे आपणही तीच चूक करण्यात अर्थ नाही. त्यासाठी पुरेशी आकडेवारी उपलब्ध आहे.
मात्र तरीही २००८ मधील इस्रायल-पॅलेस्टिन दोघांची मिळून आकडेवारी येथे पाहा. त्यावरून अंदाज येईल
http://en.wikipedia.org/wiki/Violence_in_the_Israeli-Palestinian_conflict_2008
त्यावरून तर प्रमाण ठरवता येते ना!
मात्र कसले प्रमाण ठरवायचे आहे हे समजले नाही. समजा पॅलेस्टिनचे/इस्रायलचे जास्त लोक मेले असतील तर तो इस्रायलचा/पॅलेस्टिनचा नैतिक(!) विजय वगैरे मानायचा का?
[काल २०-२५ अतिरेक्यांनी २०० भारतीयांना मारले यावरून कसले प्रमाण ठरवायचे?]
अजानु!
तुमची जर काँग्रेसला अथवा रा कॉ ला लक्ष केल म्हणुन तगमग होत असेल तर माझी देखिल उलट कारणास्तव तशीच तगमग होण स्वाभाविक नाही का?
आबांची पोपट्पंची कायमच चालु असते.एरवी ठिक आहे पण जरा वेळ काळाच भान ठेवायला हव कि नको ?.इथे त्यांचे गायकवाड ,भाजपाचे साळुंखे इतर पक्षांचे खासदार वाचले .वाचवले गेले.(जिव मुठीत धरुन बसल्यावर अजुन काय करु शकणार म्हणा?)
जी मृत पावली ,अतिरेक्यांच्या अमानुष गोळीबाराला बळी पडली ती सर्वसामान्य माणसच. ताज ,ओबेरॉय ,सिएसटि येथे पडला तो सामान्य माणसाच्या रक्तामासाचा सडा ,चिखल म्हणा हवा तर?मोदींच्या भेटिने त्रागा करणारे मुख्यमंत्री जेंव्हा अश्या प्रकारच्या घोषणा करतात http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3773280.cms तेंव्हा खालच्या पातळीवरच राजकारण ठरत नाहि वाटत? करकरे यांच्या पत्नीने मोदींनी देऊ केलेली मदत नाकारली ते योग्यच केल आणि मला ते अपेक्षितच होत.
मी कधी म्हणाले की अतिरेक्यांशी लढले ते काँग्रेस अथवा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते?असले बाष्कळ व मुर्ख विधान मी अजिबात करणार नाही................... आणि तुम्ही जी वर यादी दिलीत भाजपाचे शासन असलेल्या राज्यात आजतागायत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची .ते सत्य मी तरी कुठे आणि कधी नाकारतेय ?...............
मुंबईवर ओढवलेल्या अशा आपादपरिस्थितीत मोदींनीच काय इतर ज्यांनी ज्यांनी भेटि दिल्या मुंबईला, त्या सगळ्याच भेटि देण्यार्यांनी काळाचे भान ठेवायला हवेच होते. अगदि मान्य..........
पण म्हणुन काय मोकाट सोडल्यासारख आपली जबाबदारी विसरुन असले फिल्मी डायलॉग मारण्याची मुभा दिली आहे का आबांना?...........बोलताना विचार करा की तुम्ही कोणता पदभार सांभाळत आहात याचा?या कारणास्तव उद्या लोकांनी दगड नाही घातले डोक्यात म्हणजे मिळवले? फिल्मी अंदाज मधे भारतमाता की जय म्हणण सोप आहे हो ! तश्याच प्रकारची कृती पण करुन दाखवा मग बघु...............! प्रत्येक वेळेस आबांना अशा प्रकारची वक्तव्य केल्या नंतर माफी मागुन अथवा स्पष्टिकरण देवुन नामुष्की ओढवुन घ्यावी लागते...............त्या पेक्षा जरा काळजी घ्या कायम उचलली जिभ लावली टाळ्याला करायच ते!
आणि हा हल्ला मुंबईवर नाही तर हिंदुस्थानवर आहे असे मी न समजण्याचे अथवा मानण्याचे कारणच काय?मी सुद्धा एक हिंदुस्थानीच आहे आणि त्याचा मला अतिशय अभिमान आहे..................मुंबई हा हिंदुस्थानचा भाग आहे आणि महाराष्ट्राचा तर अविभाज्य भाग आहे.या दहशतवादी हल्ल्याच्या निमित्ताने मुंबईला वेगळ पाडण्याच कारस्थान आता सुरु झालय ,लवकरच कळेल कोण करतय ते?
आणि मी कोण विद्वेषाच राजकारण करणारी ?
विद्वेषाच राजकारण करायला आणि राजकीय पोळी भाजुन घ्यायला मी कुणी राजकारणी नाही .
"घाण साफ करावीशी वाटत असेल तर त्या गटारात हात घालुनच ती घाण साफ करावी लागते " उद्या मनात आल तर ते करायची माझी तयारी आहे.
उगाच अपमान करु नका पशुपालनाचा
विप्र तुमच्याशी सहमत मला अनुभव आहे या गोष्टीचा.
चु भु द्या घ्या
"अनामिका"
तुमची जर काँग्रेसला अथवा रा कॉ ला लक्ष केल म्हणुन तगमग होत असेल तर माझी देखिल उलट कारणास्तव तशीच तगमग होण स्वाभाविक नाही का?
अजिबात नाही. तुमची भाजपा विषयी होणारी तगमग स्पष्ट दिसत आहे. पण काँग्रेस आणि राकॉची बाजू इथे कुणीही घेतलेली दिसली नाही. उलट सगळे राजकारणी सारखेच असाच सूर दिसत आहे.
"बाकी विलासराव आणि मोदींबद्दल काय बोलणार..."
अजानुकर्ण ह्यांच्या प्रतिसादातील हे वाक्य दिसले नाही तुम्हाला बहुदा! इथं पक्षाचं राजकारण करताना (मलातरी)तुम्हीच दिसत आहात.
आज नरेंद्र मोदी किंवा त्यासदृश निर्भय , रोखठोख, क्रियाशील पंतप्रधान हवे होते की नाही ??
अहमदाबादला बोम्ब् स्पोट झाले तेन्व्हा बघितली कि त्यान्ची निर्भयता!!!!!!! स्वत: पोलिस घेवुन फिरत होते जनतेला मरायला सोडुन.
फक्त आणि फक्त सरदार वल्लभ भाई पटेल हवेत कोणताहि इतर आण्डु पाण्डु नाय चालत..........
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
प्रतिक्रिया
बाळबोध
हिंसाचारा
कृती
कृती
मोदींचा खंबीरपणा
ह्याच
इस्रायल
दोन्ही कडचे आकडे द्या साहेब.
दोन्हीकडच्या आकड्यांची गरजच नाही
इस्रायलला
कसले प्रमाण
अजानु! तुमच
तुमची जर
तुम्ही
आतातरी एकत्र व्हा रे!
सरदार वल्लभ भाई पटेल हवेत कोणताहि इतर आण्डु पाण्डु नाय चालत....