Skip to main content

सल्ला पाहीजे

लेखक जयंत माळी यांनी मंगळवार, 09/06/2015 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझी 12 वी 2013 ला झाली नंतर मी ENGINEERING ला प्रवेश घेतला पण प्रथम वर्षात नापास झालो. मी ENGINEERING सोडतोय कृपया इतर काही संधीचे मार्गदर्शन करावे

वाचने 18773
प्रतिक्रिया 92

प्रतिक्रिया

In reply to by भीमराव

विंजनेरींग वाले वन नाइट ला सेम भर पुस्तक न ऊघडता पेपराच्या आदल्या रात्री जागुन अभ्यास करुन पेपर काढने (मिशन ४०) असाच अर्थ घेत्यात.
असेच्च वागायचे असेल तर नक्को करू इंजिनीअरींग...पुर्ण करायला खूप त्रास सुध्धा होईल आणि डोक्यात सुध्धा काहीही जाणार नाही...नावापुरते इंजिनीअर होशील
आन जो मास्तर मंडळाबरोबर वाकड्यात चालतो तो लय भारी आन सगळी लेक्चर करनारा, सबमीशन वेळेत पुर्ण करनारा, मास्तरांना डाऊट्स इचारनारा तो मात्र चाटु आसला ट्रेंड आजकाल जोरातय, त्यामुळच बाकी काय नाय बगा
लोक काय बोलतात याला फाट्यावर मारायचे...सबमिशन वेळेत पूर्ण करण्यासारखे नाही दुसरे...जेव्हा दुसरे रात्र रात्र जागून सबमिशन पूर्ण करत असतात तेव्हा आपण तंगड्या पसरून लोळत पडलेलो असतो...इंटर्नल मध्ये कमी लागते तो बोनस

In reply to by टवाळ कार्टा

तो "खाटुक कमॉन" चा अपभ्रंश आहे !!!!! सरावाने दोन्ही क मधील एका क (चा) मोड ऊडाला !!! हा का ना का !! बॅट्या दुखावला नाहीस ना रे ! आजकाल दुखावण्याची साथ आली आहे रे म्हणून विचार ना ! आला पावसाळा ! आरोग्य संभाळा !! घोष वाक्य नाखुस

In reply to by नाखु

ठ्ठो =)) =)) =)) नाखुस, तुमच्यावर रागवून चालेल कसं? रहायचंय म्हटलं आम्हांला इथं!

In reply to by बॅटमॅन

काळजी नसावी मी स्वघोषीत प्रवक्ता * नाही त्या मुळे माझ्याकडून तुला कसलाही धोका+मोका नाही. धन्यवाद चिर्कुट नाखुस
*याचा सोदाहरण अर्थ गावडेसर लिखित "मिपा अर्थ्-अनर्थ मीमांसा आणि पदरमोड" या थोर ग्रंथात पान क्रं ५६ वर आहे

घाबरले की काय एव्हढे सल्ले पाहून? ़ की डायरेक्ट पुढच्या वर्षी पेढेच घेऊन येणारेत मिपाकरांना वाटायला?

In reply to by टवाळ कार्टा

हो, पण तुमची शंका व्हॅलीड आहे. एका माहीतीतल्या पंटरचे इंजिनीयरींगचे इयर डाऊन मुलीत गुंतल्यामुळेच झाले आहे. आता "गुंतल्यामुळे" या शब्दावर कोटी करायचा मोह टाळा . :-)

In reply to by टवाळ कार्टा

पण त्यांनी खरे कारण कुठे सांगितलेय कशामुळे नापास झालेत म्हणून !

धन्यवाद आपल्या चांगल्या-वाईट सल्ल्यांचा विचार नक्कीच करेन.

In reply to by असंका

स्टीव्ह जाॅब्ज चं उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याआधी एकदा त्याचं अधिकृत चरित्र वाचावं. ते वाचल्यानंतर वाचणार्‍याचं मत बदलण्याची खुप शक्यता असते.

मिपाकर मृत्युन्जय यांच्या मला आलेल्या खरडीमुळे हे विचार मनात आले. ते इथे मांडावेसे वाटले. मिपावर कुणी माहिती, मार्गदर्शन, मदत मागितली तर प्रतिसाद देणारे केवळ त्या व्यक्तिला केंद्रस्थानी ठेवूनच उत्तरे देतात असे नाही. याच धाग्यावर मी अन अनेकांनी लिहिलेले प्रतिसाद शिक्षण प्रवासात धक्के खाणार्‍या प्रत्येकाला प्रेरणा देऊ शकतात. एखाद्याला जेव्हा ठेच लागते तेव्हा आपल्या पूर्वीही इतरांना अशाच ठेचा लागल्या आहेत अन त्यातून ते शहाणे होवून निघाले आहेत ही बाब नक्कीच हिंमत वाढवणारी ठरते. मिपाचे मिपाकर असलेले अन नसलेले वाचक पाहता अशा चर्चा किमान शेकडो किंवा कधी कधी हजारो लोक वाचत असतात. माझ्या ओळखीचे अनेक लोक बर्‍याच वर्षांपासून मिपा वाचतात आवडलेलं इतरांना सूचवतात. कदाचित त्यांनी आजवर मराठीतून एक वाक्यही टंकलं नसेल पण वाचनखंड मात्र पडत नसतो. परंतु बहुधा काही जण केवळ धागाकर्त्याला डोळ्यासमोर ठेवून प्रतिक्रिया देतात असेही दिसते. मी नवा असताना माझा तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता? हा अन काही महिन्यांपूर्वीचा मी उपवर तरुण असतो तर या काथ्याकुटांवरील काही प्रतिसाद वाचून असे वाटते की त्या प्रतिसादकांचे असे मत आहे की केवळ धागाकर्त्यालाच उर्जाबचत करायची आहे अन स्वतःचा विवाह जुळवायचा आहे :-) .

आम्हाला अकरावीच्या इंग्रजीसाठी युवकभारती या पाठ्यपुस्तकात स्व. खुशवंतसिंह यांचा टेकिंग स्टडिज सिरियसली हा पाठ होता. आपल्या नर्मविनोदी शैलीने त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गांभीर्य वाढवण्याचा सल्ला दिला होता. त्यात त्यांच्या आजीचे त्यांच्याबद्दलचे इंग्लंडवरून शिकून परत आल्यानंतरचे हिंदीतले वाक्य होते.
क्या पास करके आया पता नही पर टाइम बहुत पास करके आया है!