मुंबई प्रमाणेच बंगलोर च्या पोटात लालबाग आहे. कोणेएके काळी ही बाग समस्त बेंगळूरुकरांचे ‘पर्वती’ सारखे विश्रांती विरंगुळ्याचे स्थान होते. तशी ही बाग Botanical Garden म्हणून ओळखली जाते. १९८० पूर्वी पर्यटनाला / हनिमूनला येणार्यांचे ‘लालबाग’ हे खास आकर्षण असे. आता बंगलोर अफाट वाढले आहे आणि लालबागेचे महत्व ओसरले.
माझ्या पत्रिकेत काय ग्रह आहेत माहिती नाही २००६ सालापासून जी देशविदेशात भ्रमंतीला सुरवात झाली आहे ती अजून सुरूच आहे. सध्या बेंगळूरु मध्ये मुक्काम आहे. कुटुंबापासून लांब असल्यावर वीकांताचा विरंगुळा ही एक मोठी जटील समस्या असते. प्रसिद्ध बासरी वादक श्री. अवधूत फडके यांच्या सुरेल मैफिलीने मागचा रविवार फक्कड गेला. सकाळी सकाळी भिन्न षड्जाने त्यांनी मैफिल मारून नेली. सुरुवात तर छान झाली. आता ह्या आठवड्याची ‘भैरवी” कशाने करायची ह्याचा विचार सुरु होता. कार्यालयातील एका सहकाऱ्याकडून ‘लालबाग’ मधील आंबा मोहोत्सावाची माहिती समजली. येस – आंबा मोहोत्सव – जायलाच हवे.
कोकणात दापोली तालुक्यात ‘मुरुड’ नावाचे नितांत सुंदर समुद्र किनार्यामुळे अलीकडे प्रसिद्धीस आलेले खेडेगाव आहे. शेतात भरपूर भात आणि बागेत भरपूर नारळ , सुपारी आणि आंबे पिकवणारे ते एक चिमुकले खेडे होते. ह्या गावी माझा जन्म आणि दहावी पर्यंत शिक्षण झाले. हिंदुत्वाचे विचार , नाटक –संगीताची आवड आणि आंब्यांचे व्यसन हे वारश्याने आले. घरी आणि गावात भरपूर आंबे होते. थंडी पडू लागली की आंबे मोहरू लागत. ( बोली भाषेत आंबा फुटला ) आणि वाढत्या उन्हाळासोबत आंबे आकार घेत. वार्षिक परीक्षा आणि कैर्या ह्यांचे समीकरण सुटले कि आंबे पिकायला सुरवात ! मग दोन अडीच महिने दिवस रात्र आंबे , आंबे आणि आंबे. सकाळी सकाळी आंबे काढायचे ( उतरवायचे) दुपारी आडी लावायची , आमरस काढायचा , साठे ( आंबापोळी) घालायची ,परत संध्याकाळी आंबे काढायचे आणि दिवसभरात २५ /३० आंबे चोखायचे , ५/१० वाट्या रस ओरपायचा ! चांगल्या गाण्याच्या मैफलीचे पचन अंतर्मुख होवून आणि मौन पाळून होते तर भरपूर आंब्यांचा खुमार सुपारीचा तोबरा आणि यथेच्छ झोपेमुळे वाढतो. मुंबई-पुण्यात आंबा म्हणजे हापूसआंबा असा एक समज आहे. पण आमच्यासाठी तो फक्त व्यापार –व्यवसायाचा भाग होता. आपले प्रेम हापूस व्यतिरिक्त इतर आंब्यांवर , ज्याची संभावना ‘रायवळ’ अशी उपहासाने केली जाते त्यांच्यावर अधिक – अनवट रागाप्रमाणे त्यामध्ये अनोळखी असण्याचे मुग्ध सौंदर्य असते ! तर अशी ही ह्या फळांच्या राजाशी आपली बालमैत्री !! त्यामुळे विचार पक्का आणि लालबाग कडे कूच !
दक्षिण भारतात कमानीला महत्व फार ! तशाच एका कर्नाटक राज्याच्या कामानीने ‘मोहोत्सवात’ दाखल झालो.
बागेच्या मध्यभागी प्रशस्त जागेत आंबा विक्रेत्यांचे जवळपास १०० दुकाने होती. प्रथम नुसतीच एक चक्कर मारली आणि फळांच्या जाती आणि भाव यांचा अंदाज घेतला.
दक्षिणेत पिकणारी आणि मुंबईमध्ये सहज मिळणारी तोतापुरी , केसर , मलगोबा ही काही ओळखीची फळे दिसली , तर खास कर्नाटकी ढंगाची बैनगांपल्ली , इमाम पसंद , रुमानी , काला-पहाड ह्या अनोळखी नावानी उत्सुकता वाढवली.
टेबल टेनिस च्या चेंडू एवढ्या छोट्या आंब्यांना आम्ही लिटी ( लिटील ? ) म्हणतो. अस्सल आंबे खाणारा दर्दी हा पूर्ण आंबा तोंडात घेवून मिनिटभरात पिवळी असलेली बाठ पांढरी करून बाहेर काढतो. त्या लिटी ला इकडे शक्कर-गुटी म्हणतात. लिटी सराईत पाने चोखून मी हात आणि तोंड रसाने बरबटवण्यास सुरवात केली. थोडासाच पण उगाळलेल्या गंधा सारखा घट्ट आणि मधुर रसाने नांदी झाली.
एका खोक्यावर चांगले टोकदार आंबे रचलेले होते आणि नाव लिहिले होते – रसपुरी ! जवळ जवळ आपल्या कडील पायरी सारखा पण किंचित अगोड असा रस. पायरीच्या तुलनेत अंमळ बेताचाच !
रुमानी , नावाप्रमाणेच निघाला. अतिशय पातळ सालीच्या आंब्याचा गर खाताना – साल तुटत होती. शेवटी न राहून त्याला सालासकट त्याला सद्गती दिली. रसपुरीने कलेली निराशा रुमानी ने नाहीशी केली.
मग ‘काळा-पहाड’ हा बाबुराव अर्नाळकर ह्यांच्या व्यक्तीरेखेचे नाव धारण केलेला आंबा कापला – काळा-पहाड अति गोड , रसाळ आंबा ! खुप आवडला म्हणून अजून एक मागून घेतला. भरपूर रेषा असलेल्या ह्या आंब्याने मजा आणली !
बैनगांपल्लीला बेनिषा असे उपनाव आहे. पण त्याने साफ निराशा केली. आकाराने मोठा , अगोड , पांचट आणि पिका पिवळा आंबा – हाच तो फ्रुट सलाड मध्ये घालत असावेत !
खुडूस च्या चवीने परत सुखद धक्का दिला – दुधासारखा स्वाद असलेला आणि घट्ट गराचे फळ नावात गेले.
एवाना पोट चांगले भरत आले होते आणि म्हणून मरे-गौडा हे एखाद्या नेत्याचे नाव असलेला ‘टग्या’ आंबा खाण्याचा मोह टाळला.एका दुकानदराने सिंदुराची केलेल्या स्तुतीने भाळलो आणि रुमानी प्रमानेचे सिंदुरा आवडून गेला. मल्लिका मुंबई सहज मिळतो आणि नावाप्रमाणे चांगला असतो म्हणून तोही खाल्ला ! नीलम आणि केसर मात्र टाळले. वाढत्या वयाबरोबर १०-१२ आंबे खाणेही कठीण जाते आहे याची चांगली जाणीव झाली आणि आता निघायला हवे असे वाटू लागले.
हा मोहोत्सव २७ जून पर्यंत सुरु आहे . कोणी बंगलोर निवासी उत्सुक असतील तर कट्टा करू २७ जून ला लालबागेत !

वाचने
6861
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त व्रुत्तांत...
फोटो चढवणे जमत नाही....
फोटो चढवण्यासाठी.....
In reply to फोटो चढवणे जमत नाही.... by मनोज श्रीनिवास जोशी
वा!!
मस्त फोटो....
क्या बात है!
मज्जा मज्जा आली,फोटू बघत बघत
मस्त!
वजन कमी करत असल्यानी यंदा
In reply to मस्त! by पैसा
आंब्यांनी सरसकट वजन वाढत नाही
In reply to वजन कमी करत असल्यानी यंदा by कॅप्टन जॅक स्पॅरो
नाही माझं वजन फटाफट वाढतं
In reply to आंब्यांनी सरसकट वजन वाढत नाही by गिरकी
चिमण्या
In reply to नाही माझं वजन फटाफट वाढतं by कॅप्टन जॅक स्पॅरो
अजून घे
In reply to वजन कमी करत असल्यानी यंदा by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी काही वाचलचं नाही. जळजळ
In reply to अजून घे by पैसा
लेखन आवडले
कोणी बंगलोर निवासी उत्सुक
मस्त लिहिलेय. लालबागला आंबा
लालबाग ही कोणे एके काळी सुंदर
In reply to मस्त लिहिलेय. लालबागला आंबा by यशोधरा
हो,ते आहेच, पण ती चाफ्यांची
In reply to लालबाग ही कोणे एके काळी सुंदर by एस
बेंगळूरूचा आंबा मोहोत्सव
मी
वा, अब आया मझा !
नक्कि जाणार
छान
रस पुरीत तोतापुरीची भर……
वा! मस्त!
जय अंबे ! ;) फोटो आणि माहिती
प्रतिसाद कर्त्यांचे आभार