हल्ली बातम्यांमध्ये रोज कोणी न कोणी आत्महत्या केल्याची बातमी असते.
त्यामागची करणे वेगवेगळी असतात पण निकाल मात्र एकाच असतो, मृत्यू!
यावर विचार करताना प्रश्न पडला कि सगळ्यात पहिली आत्महत्या कोणी केली असेल? आणि काय कारण असतील त्यामागे…
कोणीतरी हा पायंडा पडला असेल आणि मग बाकीच्या लोकांनाही विवंचनेतून सुटका होण्यासाठी आत्महत्येचा मार्ग पत्करला असेल.
अर्थात आत्महत्या हा कुठल्याही प्रश्नावरचा उपाय नाहीच! मग तरीही एवढा उन्नत विचारप्रणाली असलेला मनुष्यप्राणी का हा मार्ग पत्करत असेल?
का स्वतःचा विकास करण्याच्या प्रक्रियेमध्ये माणसांनी मोजलेली हि किंमत आहे?
मग अशी आत्महत्येची प्रवृत्ती बाकी प्राण्यांमध्ये आढळून येते का?
कुत्र्याच्या मालकाचा मृत्यू झाल्यानंतर कुत्रा depression मध्ये जाण्याचे किस्से आहेत ज्यामध्ये त्याच्याकडून अन्न-पाणी वर्ज्य केले जाते, पण या गोष्टीला आत्महत्या म्हणणे कठीण आहे. कारण त्याचा मृत्यू व्हावा या उद्दिष्टाने त्याने ते कृत्य केलेले नाही…
अशी काही उदाहरणे आपल्याला माहित आहेत का?
मिसळपाव
प्रतिक्रिया
करत असावेत, म्हणजे जाणुन बुजून नाही पण अजाणता मात्र नक्की.
म्हणतात की शिवाजी महाराज जेव्हा मृत्यु पावले त्यानंतर त्यांचे दहन केले गेले त्या चितेत त्यान्च्या पळिव कुत्र्याने उड़ी घेतलि.
म्हणजे जाणुन बुजून नाही पण
In reply to करत असावेत, म्हणजे जाणुन बुजून नाही पण अजाणता मात्र नक्की. by पद्मावति
म्हणजे जाणुन बुजून नाही पण अजाणता मात्र नक्की.अजाणता करतात त्याला आत्महत्या म्हणतात? तो अपघात असतो.
यसवायजी, बरोबर मुद्दा मांडलात तुम्ही.
In reply to म्हणजे जाणुन बुजून नाही पण by यसवायजी
ज़रा गोन्धळ झाला माझा.
कपोलकल्पित.....
In reply to करत असावेत, म्हणजे जाणुन बुजून नाही पण अजाणता मात्र नक्की. by पद्मावति
हा प्रसंग पोवाडे लिहिणार्या शाहिरांनी शिवचरित्रात घुसडलेला आहे. प्रत्यक्षात असे काहीही झालेले नाही. शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला होता आणि त्याने महाराजांच्या चितेत उडी घेतली वगैरे गोष्टी कपोलकल्पित आहेत. इतिहासात असा कुठलाही पुरावा नाही.
ते राजस्थानमधे एका काळविटानी
ते राजस्थानमधे एका काळविटानी आत्महत्या केलेली आणि त्याला वाचवायला दबंगसर गेलेले आणि चुकुन आरोपात अडकले म्हणे. त्या काळविटानी तर सुसाईड नोट सुद्धा सोडलेली मागे.
असेल...असेही असेल....
In reply to ते राजस्थानमधे एका काळविटानी by कॅप्टन जॅक स्पॅरो
आपल्या देशांत अशा घटना पण घडू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्राण्यांच माहित नाही पण
प्राण्यांच माहित नाही पण माझ्या नव्या lumia ने वरच्या खिशातुन उडी मारुन नाल्यात जिव दिलता.सहा महिने झाले तरी बॉडी नाय भेटली..
अजुन हळहळ वाटते.
वर्ष झालं की फ्लेक्स लावा -
In reply to प्राण्यांच माहित नाही पण by जेपी
वर्ष झालं की फ्लेक्स लावा - प्रथम पुण्यस्मरण - अजून तुझी आठवण येते - तू गेला आहेस असे वाटतच नाही. वैगेरे वैगेरे.
=))
In reply to वर्ष झालं की फ्लेक्स लावा - by संदीप डांगे
=))
हा हा हा .... लय भारी..
In reply to वर्ष झालं की फ्लेक्स लावा - by संदीप डांगे
सल्ला...
+१ +
In reply to वर्ष झालं की फ्लेक्स लावा - by संदीप डांगे
+१ +
इथे एक पुण्यस्मरणीय लेख लिहा. त्याच्या प्रतिसादाचे अर्धशतक झाले की "फोनचा निष्काळजीपणे अश्याप्रकारे वध केल्याबद्दल" आम्ही फोनच्या बाजूने अजून ५० प्रतिक्रिया लिहून तुमचा "सत्कार" करू. ;) :)
पण अगदी त्याने जीव देईपर्यंत
In reply to प्राण्यांच माहित नाही पण by जेपी
पण अगदी त्याने जीव देईपर्यंत कशाला छळ करायचा म्हणतो मी!
नशीब त्याने सुसाईड नोट ठेवली नाही, उगाच अडकला असतात! ;)
नवा होता हो ..छळ कसला ..लाड
In reply to पण अगदी त्याने जीव देईपर्यंत by शब्दबम्बाळ
नवा होता हो ..छळ कसला ..लाड चालु होते..नवा होता...
http://nchills.gov.in/NCHILLS
https://nchills.gov.in/NCHILLS-JATINGA.htm
http://nchills.gov.in/NCHILLS
https://nchills.gov.in/NCHILLS-JATINGA.htm
https://en.m.wikipedia.org
https://en.m.wikipedia.org/wiki/Jatinga
जातींगा हे पक्ष्यांसाठी
In reply to https://en.m.wikipedia.org by सुबोध खरे
जातींगा हे पक्ष्यांसाठी "अपघात प्रवण क्षेत्र" म्हणता येईल त्यापेक्षा जास्त नाही!
बाकी जातींगाबद्दल हे वाक्य बराच काही सांगून जाते " Conservation groups and wildlife officials in India have taken steps to prevent wanton killing of birds across India, creating awareness in the illiterate villagers. Since then, the amount of birds killed have decreased by about 40 percent."
तिथे पक्षी जखमी होऊन पडतात पण मारायच्या कामात गावकरीच पुढे असतात असे दिसते. म्हणजे ही आत्महत्या नक्कीच नाही!
त्या आत्महत्या नाहीतच पण
In reply to जातींगा हे पक्ष्यांसाठी by शब्दबम्बाळ
त्या आत्महत्या नाहीतच पण आत्महत्या आहेत असा आभास निर्माण केला होता म्हणून एक रोचक घटना म्हणून सर्वांसमोर आणण्याचा हेतू आहे. काल मोबाइलवरून टंकन केले असता फक्त दुवा देत आला. स्पष्टीकरण नाही.
जाता जाता -- आपला जीव वाचवावा अशी प्रत्येक सजीव प्राण्याची आंतरिक उर्मी( INSTINCT) असते. या उर्मी विरुद्ध जाऊन प्राणपणाने शत्रूशी लढणार्या सैनिकाचा त्याग म्हणूनच उच्च दर्जाचा मानला गेला आहे.
पण हीच वृत्ती भडकावून दहशतवादी- तरुण मुलांना आत्मघाती कृत्ये करायला उद्युक्त करतात हा दैवदुर्विलास आहे.
आपण दिलेल्या सैनिकाच्या
In reply to त्या आत्महत्या नाहीतच पण by सुबोध खरे
आपण दिलेल्या सैनिकाच्या उदाहरणावरून काही शोध घेतला आणि एक नवीनच माहिती सापडली.
Autothysis: is the process where an animal destroys itself via an internal rupturing or explosion of an organ which ruptures the skin
हा प्राण्यांचा Self-destruct मोड आहे! काही प्राणी एखाद्या धोकादायक प्राण्यापासून आपल्या बांधवांच्या रक्षणासाठी हि पद्धत वापरतात!
म्हणजे चक्क मानवी बॉम्ब सारखा हा प्रकार आहे.
ते स्वतः शहीद होतात आणि शत्रूला पण मारतात.
या प्रकाराला आत्महत्या म्हणायचे कि वीरमरण हा प्रश्न पडलाय आता!
आमच्या घरी करतात अधूनमधून
आमच्या घरी करतात अधूनमधून प्राणी आत्महत्या ! कधी माशी उडी मारते चहात , तर कधी मुंग्या खातात मुंग्या मारायचं पावडर ! कधी कधी तर डास पण गुड नाईटचा वास घेतात.
बाकी काही नाही. पण डास
In reply to आमच्या घरी करतात अधूनमधून by उगा काहितरीच
बाकी काही नाही. पण डास गुडनाईटचा वास मरण्यासाठी नाही तर 'किक बसण्यासाठी' घेत असावेत असा ठाम विश्वास आहे.
हहह्हाआअहाआहाअ्हाह्हह्ह
In reply to बाकी काही नाही. पण डास by संदीप डांगे
हहह्हाआअहाआहाअ्हाह्हह्ह
ठ्ठो =))
In reply to बाकी काही नाही. पण डास by संदीप डांगे
ठ्ठो =))
@डास गुडनाईटचा वास मरण्यासाठी
In reply to बाकी काही नाही. पण डास by संदीप डांगे
@डास गुडनाईटचा वास मरण्यासाठी नाही तर 'किक बसण्यासाठी' घेत असावेत असा ठाम विश्वास आहे.>> वारल्या गेलो आहे!
YOLO!!!
In reply to बाकी काही नाही. पण डास by संदीप डांगे
YOLO!!!
जतिंगाच्या पक्ष्यांप्रमाणेच
जतिंगाच्या पक्ष्यांप्रमाणेच लेमिंग्ज नावाचे उंदरासारखे प्राणी सामुहिक आत्महत्या करतात.
हा disney नि पसरवलेला गैरसमज
लेमिंग बद्दल आधीही वाचले आहे आणि लेमिंग आत्महत्या करतात हा disney नि पसरवलेला गैरसमज आहे.
केवळ त्यांच्या एका documentary ला रोचक बनवण्यासाठी त्यांनी लेमिन्ग्ज न कड्यावरून खाली ढकलले होते हा disney वरती आरोप आहे.
त्याबद्दलचा दुवा येथे आहे.
"the myth was perpetuated by a 1958 Disney documentary called White Wilderness, in which the filmmakers manually ran a pack of lemmings off of a cliff to make for good television."
हे आत्महत्या प्रकरात येते कि नाही
हे आत्महत्या प्रकरात येते कि नाही हे सांगू शकत नाही. डिस्कवरी वाहिनेवर एक माहितीपट बघितला होता. एका परजीवी जंतूला आपले जीवनचक्र पुर्ण होण्यासाठी उंदीर व मांजर हे वाहक आवश्यक असतात. सामान्य उंदीर मा़जराच्या वासाने सावध होतो परंतू ह्या परजीवीने बाधीत झालेला उंदीर मांजराच्या वासाने आकर्षित होतो व मांजराला शिकार करणे सोपे जाते त्यामूळे ह्या परजीवीचे जीवनचक्र पुर्ण होण्याची शक्यता वाढते. हा परजीवी उंदराला मांजरापासून नैसर्गीक बचाव विसरायला लावून एक प्रकारे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करतो.
"प्राणीसुद्धा पाशवी असतात" =)
"प्राणीसुद्धा पाशवी असतात" =))
खिक्क
In reply to "प्राणीसुद्धा पाशवी असतात" =) by बॅटमॅन
खिक्क
आत्महत्या...
आत्महत्या म्हणजे फक्त दु:खातिरेकानेच मृत्यूला कवटाळणे नाही. स्वतःच्या इच्छेने स्वतःचे आयुष्य संपविणे म्हणजे आत्महत्या. दिव्याच्या ज्योतीवर स्वतःला झोकून देणारी पाखरं असतात.
पण, प्राणी लग्न करीत नाहीत म्हणजे 'आत्महत्येची वृत्ती' नसावी असा तर्क लढविता येईल.
प्राणीसुद्धा आत्महत्या करतात का
In reply to आत्महत्या... by प्रभाकर पेठकर
लग्नचा सम्बन्ध जोदुन सुन्दर विनोद सधला आहे
@ 'आत्महत्येची वृत्ती' ...!
म्हणजे, काहींनी प्राण्यांचा हेवा करावा इतके ते सुदैवी दिसताहेत. (ह.घ्या.)
ते शमा-परवाना वगैरे काय
ते शमा-परवाना वगैरे काय म्हणाल मग?
फिचर फिल्म
Hachigo A Dog Story.. कोणी नाय पाह्यला काय?
विज्ञानात पाहीलं तर
काही अमीबासारखे सुक्ष्मजीव कोरम सेंसिंगसारख्या पद्धती वापरुन आपल्या काही बांधवांना वाचवण्यासाठी कुर्बानी देतात. जाणुन-बुजुन.
आपल्या स्वता:च्या जखमी पेशी सुद्धा Autolysis नं स्वता:चा जीव घेतात. इतर पेशींना इजा पोचु नये म्हणुन. (टोपलीतुन नासक्या आंब्यानं उडी मारावी असंय हे)
पाहिलेला आहे. एक अतिशय नितांत
In reply to फिचर फिल्म by गरजू पाटिल.
पाहिलेला आहे. एक अतिशय नितांत सुंदर चित्रपट !
प्राणी आत्महत्या करत नाहीत
याबाबत शास्त्रज्ञात एकमत नाही. तार्किक दृष्ट्या ते अशक्य आहे. भयगंड, आत्यंतिक दडपण अशासारख्या भावना आत्महत्येस कारणीभूत असतात. प्रण्याच्यात मरेपर्यंत संघर्ष हेच फक्त ठाऊक असते. कोबडी कापताना आपण पाहिली आहे काय ? शेवटपर्यंत सुटण्याची धडपड करते. सारांश प्राणी आत्महत्या करत नाहीत.
स्वेच्छा मरण.
In reply to प्राणी आत्महत्या करत नाहीत by संजय माळी
'आत्महत्या' म्हणजे स्वेच्छा मरण. कोंबड्यांचे उदाहरण चपखल बसत नाही.
दिपक-पतंगातली ओढ ही स्वेच्छा मरण म्हणजेच आत्महत्या म्हणता येईल.
माझ्या बॉसने ऑफिसमधे एका
माझ्या बॉसने ऑफिसमधे एका काचेच्या गोलामधे २-३ मासे ठेवले होते. रोज तो नित्यनेमाने त्यांना खाऊ टाकत असे पण पाणी न-बदल्यामुळे त्यातल्या माशांनी पाण्याबाहेर उडी मारून आत्महत्या केल्याची कथा नंतर आम्ही ऐकली!!