घरासमोर मोठ्ठी गच्ची होती. वाड्यातल्या बर्याच बिर्हाडांतल्या काकवा, मावश्या, आज्ज्या उन्हाळ्यात वाळवणं घालायला यायच्या. माझी आज्जीही वाळवणं घालायची. पापड, कुरडया, भरल्या मिरच्या. एका कोपर्यांत मलमली कापडांत पडदानशीन केलेले सांडगे.
मला मोठं काम असायचं. सकाळ-संध्याकाळ गच्चीत वावर असला, तरी दुपारी एक ते चारच्या वामकुक्षीच्या वेळेत सामसूम असायची. कावळे-चिमण्यांसारख्या पक्ष्यांपासून आणि खालच्या मजल्यावरच्या बिर्हाडातल्या बारक्या पशूंपासून त्या वेळात संरक्षण मिळत नसे. मग माझी नेमणूक सावलीतल्या गव्हाच्या पोत्यांवर होई. उन्हाच्या झळा अंगावर घेत तीन तास चिंतनस्वामी पोजमध्ये बसून वाळवणाचं संरक्षण करत असे.
मेहेनताना म्हणून आज्जी कधीतरी सांडग्यांची आमटी करे. एरवी खायचेप्यायचे हजार नखरे असत, पण सांडग्यांची आमटी उरली आहे असं कधी झालं नाही.
जग बदललं. मी पोत्यांवर मावेनासा झालो. वाडा गेला, गच्ची गेली. आज्जी गेली. सांडगे दुकानांत मिळायला लागले.
आईने आठवणीने एका पार्सलमधून सांडगे पाठवले. आमटीच्या एका रौंडमध्येच त्यांचा काळ झाला.
मन काही भर्या नहीं. सांडग्यांसाठी पुढच्या पार्सलची वाट पहाणं काही जमेना. मग ठरवलं आपणच करून पाहू.
मुख्य अडचण वाळवायची. इथल्या उन्हांत सांडगे सोडाच, ओलं अंगही वाळणार नाही. मग ओव्हन आठवला.
तर ही पाकृ:
साहित्य
- हरबरा डाळ (१ माप)
- उडीद डाळ (⅓ माप)
- मूग डाळ (⅓ माप)
- मटकी (⅓ माप)
- जिरे
- हळद
- हिंग
- लोणचे मसाला
- मीठ
कृती
- सर्व डाळी दोन तास भिजत घालाव्यात. (मूगडाळ चट्कन भिजते. हरबरा डाळ भिजायला वेळ लागतो. हरबरा डाळ भिजण्याची टेस्टः एक दाणा चावून पहावा. विशेष प्रयत्न न करता चावला गेल्यास भिजली आहे असं समजावं.)
- डाळी भिजल्यावर त्या रोवळीत टाकून डाळींचं पाणी वेगळं काढावं. (तेच नंतर आमटीसाठी वापरता येतं.)
- डाळींमध्ये जिरे घालून मिक्सरमधून भरड वाटून घ्यावेत.
- त्यात हळद, हिंग, लोणचे मसाला आणि मीठ घालून मळावं. (लोणचे मसाला तिखटाला पर्यायी म्हणून वापरला आहे. पांढर्या मिठाऐवजी शेंदेलोण घातल्यास झकास चव येते.)
- छोटे छोटे मोदक करून ओव्हनच्या ट्रेमध्ये ओळीने मांडावेत. (रहाडे करायची इच्छा/परवानगी असल्यास ते मोदक करण्यासाठी उदबत्तीच्या घराचा साच्यासारखा उपयोग करता येईल.)
- २५०℃ वर २० मिनिटं ठेवावेत.
या पायरीचा मला बिलकुल आत्मविश्वास नाही. मी अगदी घाबरत घाबरत ओव्हन वापरतो. दर पाच-दहा मिनिटांनी उघडून बघतो.
- सांडगे वाळून "यलो ऑकर" रंगाचे आणि कॅच कॅच खेळता येण्याइतपत कडक झाले की ओव्हन बंद करून बाहेर काढावेत.
- तळून आमटीत घालावेत.

वाचने
14063
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास!
तुमच्या संशोधनाचे कौतुक करावे
केकचा. मायक्रोवेव्हमध्ये
In reply to तुमच्या संशोधनाचे कौतुक करावे by कंजूस
इले० बिल - सांडग्यांसाठी कायपण.....
In reply to केकचा. मायक्रोवेव्हमध्ये by आदूबाळ
@ सांडगे वाळून "यलो ऑकर"
भारीच प्रयोग केला आहे. मस्त.
धन्यवाद.....
झकास दिसताएत!
फारच सोपे आहे.मस्त आयडिया
माझी माय..
अफलातून कल्पना
मी या समरला केले.
भारी आयडिया !! नक्की करुन
ठ्ठो =))
अरे वाह...मस्त रेसेपी.
ओव्हनची कल्पना आवडली. तेवढे
मस्तच
In reply to ओव्हनची कल्पना आवडली. तेवढे by मधुरा देशपांडे
लै भारी!
ओव्हन ची ...
झकास!
पाकृ व बाकीचे वर्णनही आवडले.
पाकृ आवडली
एक नंबर!!
वाहवा!
येक नंबरी काम केलं राव तुम्ही
नक्की करून बघेन. मस्त पाकृ.
जियो बेटा आदूबाळ,खरा खवैय्या
ज्यांनी ज्यांनी करुन पाहणार
सांडगे
छान रेसीपी! ओवनची आयडीया भारी
काय डोकॅलिटी आहे, वाह ! पहिला