भारतातील केंद्र व राज्य सरकारी वास्तूमध्ये सहजपणे प्रवेश मिळणे नक्कीच सोपे नसते. संसदेच्या किंवा विधिमंडळांच्या अधिवेशनात प्रेक्षक गॅलरीमध्ये बसता येते पण निवांतपणे वास्तूचे निरीक्षण करायला मिळणे तर अशक्यच. तेथे जाऊन फोटो काढण्याबद्दल तर आजकाल विचारही केला जाऊ शकत नाही.
अशा सरकारी संस्कृतीचा अनुभव घेतलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला अमेरिकेतील अशा वास्तूंना भेट देणे हा खूप सुखद अनुभव असतो. माझा असाच एक अनुभव म्हणजे आम्ही अमेरिकेत ज्या राज्यात राहतो त्याची राजधानी सेंट पॉल येथील स्टेट कॅपिटॉलला दिलेली भेट. कुठलीही अपॉइंटमेंट घेणे नाही, गेल्यावर नावनोंदणी व सुरक्षा तपासणीही नाही. मिनेसोटा हिस्टॉरिकल सोसायटीच्या स्वयंसेवकांकडून गायडेड टूर घेऊन कॅपिटॉल विषयी रोचक माहिती मिळवावी अन सोबत स्थापत्यसौंदर्याचा आस्वाद घ्यावा.

कॅपिटॉलची सध्या वापरात असलेली इमारत ही तिसरी इमारत आहे. पहिली इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. दुसऱ्या इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच तिच्यात गंभीर त्रुटी निर्माण झालेल्या होत्या व तिचे क्षेत्रफळ कॅपिटॉलच्या गरजांसाठी फारच तोकडे होते. सध्याच्या इमारतीचे बांधकाम १८९६ साली सुरू झाले व १९०५ मध्ये संपले. ही इमारत बांधताना तत्कालीन धोरणकर्त्यांचा उद्देश होता की पूर्वेकडील श्रीमंत राज्यांना दाखवून द्यायचे की संपन्नतेच्या बाबतीत मिनेसोटाही काही कमी नाही.

त्या काळात कॅपिटॉलची इमारत बांधण्यास ४.५ दक्षलक्ष डॉलर्स खर्च आला. आजची किंमत ४०० दशलक्ष डॉलर्सच्या घरात आहे. कॅपिटॉलचे वास्तूरचनाकार आहेत कास गिल्बर्ट. मिनेसोटाखेरीज त्यांनी अर्कान्सास व वेस्ट व्हर्जिनिया या राज्यांच्या कॅपिटॉल्सची वास्तुरचना केली आहे. या इमारतीचे डिझाइन रोममधील सेंट पीटर्स बॅसिलिकाप्रमाणे आहे. कुठलाही आधार नसणारा या इमारतीचा संगमरवरी घुमट आकारमानाच्या बाबतीत (संगमरवरी व आधार नसलेल्या घुमटांच्या यादीत) सेंट पीटर्सनंतर जगात द्वितीय क्रमांकावर आहे.

कॅपिटॉलच्या बाह्य दर्शनी भागात घुमटाशेजारी रथाचे सोनेरी शिल्प आहे. रथाचे चार अश्व निसर्गाच्या चार घटकांचे प्रतिनिधित्व करतात. ते घटक म्हणजे पृथ्वी, वायू, अग्नी व जल. आपल्या पंचमहाभूतांपैकी केवळ आकाश नाही. रथावरील स्वार माणूस संपन्नतेचे प्रतिनिधित्व करतो. घोड्यांशेजारील स्त्रिया नागर संस्कृती दर्शवतात. आपण जर हिवाळ्याखेरीज इतर काळात कॅपिटॉलला भेट दिली तर गायडेड टूरदरम्यान इमारतीच्या टेरेसवर जाऊन या रथाचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळते. यावेळी भोवताली असलेले डाऊनटाऊन सेंट पॉल व कॅथेड्रलची भव्य इमारत दिसते. तसेच जरा लांब असलेले डाऊनटाऊन मिनियापोलिसही दिसते.
कॅपिटॉलमधली मध्यवर्ती जागा.
कॅपिटॉलच्या इमारतीमध्ये गवर्नर ऑफ मिनेसोटा यांचे कार्यालय, लेजिस्लेटिव ऑफिसेस, मिनेसोटाचे सुप्रीम कोर्ट, सिनेट व राज्य प्रतिनिधिगृह ही सभागृहे आहेत.

मिनेसोटा सुप्रिम कोर्टाचे कक्ष.
त्या कक्षाच्या छताचा हा फोटो. Lex हा कायद्यासाठी वापरला जाणारा लॅटिन शब्द आहे.

कॅपिटॉलमध्ये जागोजाग दिसणारी अप्रतिम कलाकुसर व पेंटिग्ज डोळ्यांचे पारणे फेडतात.
ऑफिस ऑफ गवर्नर बाहेरील चेंबर्समध्ये जुन्या काळातल्या युद्धांची मोठाली पेंटिंग्ज लावली आहे. तत्कालीन सरकारने नेटिव्जबरोबर केलेल्या कराराचेही भव्य पेंटिंग आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की त्या करारानुसार ठरलेली रक्कम नेटिव्जला कधीही दिली गेली नाही. हा अप्रिय इतिहासही टूर गाइडस आपल्यापासून लपवत नाहीत.

या फोटोत दिसणारे स्तंभ बांधकामाच्या वेळी उलटे लावले गेले. ती चूक वेळेत लक्षात आल्याने सुधारली गेली.

रात्रीच्या वेळी लांबून दिसणारे कॅपिटॉल.
आणखी एक विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे स्थानिक भारतीय समुदायातर्फे भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी कॅपिटॉलच्या प्रांगणात साजरा केला जातो. मिनेसोटाचे गवर्नर गेल्या वर्षीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. या प्रसंगी भारतीय सांस्कृतिक कार्यक्रम व भारतीय खाद्यपदार्थांची रेलचेल असते.

कॅपिटॉलला केवळ एकदा भेट देऊन समाधान होणे अवघड आहे. एवढेच नव्हे तर इतर राज्यांच्या कॅपिटॉल्सलाही भेट देण्याची इच्छा निर्माण होते.
माहितीचे स्रोत - कॅपिटॉलची गायडेड टूर व विकी. टीपः मोठ्या आकारमानात फोटोज पाहायचे असल्यास त्यांवर क्लिक करावे.

वाचने
25123
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त वर्णन....
बहुतेक
In reply to मस्त वर्णन.... by मुक्त विहारि
वा वा वा वा श्रीरंगभाऊ
मस्त !!!
चौरामबो खुश हुवा
अगदी झटपट आणि सुटसुटीत ,मस्तच
आवडेश
झक्कास फ़ोटो आणि लेखनंहि.
मस्त माहिती आणि फोटो.आतुनही
अवांतरः उगाच तुलना
छान लेख. सुंदर इमारत. फोटो
मस्त...
मस्त!
सेंट पॉल कॅथीड्रल (लंडन)
+११११११११
In reply to सेंट पॉल कॅथीड्रल (लंडन) by सानिकास्वप्निल
कुतूहल शमवणारा आणि वाढवणाराही
अतिशय हटके पर्यटन-स्थळ. सुरेख वर्णन आणि फोटो.
उत्तम लेख. फोटो अप्रतिम.
वाह रंगा काका
लै भारी.
उत्तम लेख आणि सुंदर फोटो !
१००% सहमत..
In reply to उत्तम लेख आणि सुंदर फोटो ! by डॉ सुहास म्हात्रे
मस्त
वाट बघा!!!
In reply to मस्त by विकास
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद
सासं
In reply to सर्व प्रतिसादकांना धन्यवाद by श्रीरंग_जोशी
हो
In reply to सासं by मिहिर
लाईक
In reply to हो by श्रीरंग_जोशी
+११११
In reply to हो by श्रीरंग_जोशी
धन्यवाद सरजी! किमान संगमरवरी
In reply to सर्व प्रतिसादकांना धन्यवाद by श्रीरंग_जोशी
सेंट पॉल कॅथेड्रल
माहिती व फोटू आवडले.
+१
In reply to माहिती व फोटू आवडले. by रेवती
उत्तम माहिती
मस्त ओळख
मस्त माहिती जोशी साहेब.
वावा..
फोटो हाफीसात दीसत नाहीत
छान
धन्यवाद
In reply to छान by कपिलमुनी
सेंट लूईस येथील जगप्रसीद्ध
हे कॅपीटॉल नाही
In reply to सेंट लूईस येथील जगप्रसीद्ध by खटपट्या
फटू छान आहेत, फक्त पोज़ जरा
In reply to हे कॅपीटॉल नाही by श्रीरंग_जोशी
:-) हा चालेल का
In reply to फटू छान आहेत, फक्त पोज़ जरा by बॅटमॅन
आर्कमध्ये जाण्याच्या लिफ्टा
In reply to सेंट लूईस येथील जगप्रसीद्ध by खटपट्या
हो आठवतात
In reply to आर्कमध्ये जाण्याच्या लिफ्टा by रेवती
म्हणूनच
In reply to हो आठवतात by श्रीरंग_जोशी
क्या बात है
In reply to म्हणूनच by विकास
लेख आवडला
कॅपिटल नाही कॅपिटॉल
In reply to लेख आवडला by राघवेंद्र
अप्रतिम ...
एकदम मस्त
जूनी याद
मनःपूर्वक धन्यवाद
In reply to जूनी याद by श्रीकृष्ण सामंत
बर्फाळ आठवणी
In reply to मनःपूर्वक धन्यवाद by श्रीरंग_जोशी
अरे वा
In reply to बर्फाळ आठवणी by सुनील
आयेंगे .. हम जरुर आयेंगे.. एक
In reply to अरे वा by श्रीरंग_जोशी
जरुर या
In reply to आयेंगे .. हम जरुर आयेंगे.. एक by गणेशा
+१
In reply to जरुर या by श्रीरंग_जोशी
सुरेख फोटो ! :)
सुरेख
छान
धन्यवाद
In reply to छान by पुण्याचे वटवाघूळ
मस्तय!
अप्रतिम.