Skip to main content

निरागस

लेखक अनुप७१८१ यांनी शुक्रवार, 12/06/2015 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
निरागसता : परवाच ऑफिस च्या कामासाठी चेन्नईला जाव लागले, सकाळचे ( ६.५० चे ) विमान होते, घाई गडबडीत विमानतळावर पोचलो! वेब-चेक-इन न केल्यामुळे, मुकाट्याने लाईनीत उभा होतो, बोर्डिंग पास मिळाला. नंतर bag स्क्रीनिंग, security चेकिंग इ. formalities झाल्या, त्या नंतर ज्या गेट चा नंबर दिलेला होता त्या समोर बसून प्रतीक्षा करत होतो. माझ्या पुढे एक त्रिकोणी कुटुंब बसले होते, मुलगा लहान होता फारतर ४-४.५ वर्षाचा असेल, एक तर पहाटे उठवल्या मुले चुलबुल- चिडचिड चालू होतीच, त्यात हे नको करू, ते नको करू, शांत बस इ. चा डोस आई बाबा त्याला देतच होते... काही वेळाने आमच्या विमानाची घोषणा झाली व आम्ही सर्व प्रवाशी एका लाईनीत, गेट मधून बाहेर आलो व बसमध्ये जाउन बसलो, जी बस आम्हाला आमच्या विमान पर्यंत पोचवणार होती. ते त्रिकोणी कुटुंब पण चढले, कदाचित मुलाचा पहिला प्रवास असावा तो, साहजिकच तो FEELING excited होता... पण गेट मधून बाहेर आल्यावर त्याला त्याचे विमान कुठेच दिसले नाही, व आई बाबांबरोबर तो पण बस मध्ये चढला....एक सेकंद शांत होता, पण बस चालू झाल्यावर भोकाड पसरले.... बाबा, स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स खोतं बोललात, विमानात जाणार होतो- तुम्ही बस मधून नेताय इ. इ. बस मध्ये जे मराठी प्रवाशी होते त्यांनी हे ऐकल्या वर एकच हशा पिकला..... बस जेव्हा विमान समोर आली- तेवा सर्वांनी त्या छोटू ला आधी उतरून विमानात पहिले जाऊ दिले :) :).
लेखनविषय:

वाचने 3502
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

:-)

@ बाबा, स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स खोत बोललात, विमान जाणार होतो- तुम्ही बस मधून नेताय> http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing005.gif

:-)

हाहाहा …. मस्त … एकदम भारी किस्सा …

वा!! शिर्षकही एकदम टकाटक!! मजा आली... धन्यवाद.

हेहे. लहान पोरं निरागसतेनी कुठे आणि कधी थोरामोठ्यांच्या धोतराला हात घालतील ह्याचा भरवसा नाही. ह्यामुळेचं लहान मुलं जब्राट आवडतात.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅप्टनने मांडलेल्या विचाराशी सहमत. निरागस अनुभवकथन भावले. बाळ व्हिडीओंचा पंखा - रंगा

खरे निरागस कोण ? भोकाड पसरणारे मूल [अ ] हसणारे मराठी प्रवासी [ब ] न हसलेले , अ मराठी प्रवासी [क ] न हसलेले मराठी प्रवासी [ड ]