शेजारच्या इमारतीच्या त्रासा बद्दल काय करायचे?
आमची इमारत मुख्य रस्याच्या १५ फूट आत आहे. रस्याला लागुन असलेल्या दोन इमारतींमधुन आमचा यायचा/ जायचा रस्ता आहे. त्यापैकी एका इमारतीचे रिप्लास्टरींगचे काम १० दिवसांपुर्वी चालु झाले. आणि आमची परवानगी न घेता त्यांच्या परांतीचे बांबु बांधताना त्यांनी आमच्या इमारतीच्या आवाराचा वापर केला. तेव्हा खाली पडणारे सगळ्या सिमेंट , विटा यांचे तुकडे (रॅबीट) आमच्या इमारतीच्या आवारत पडत होते. ज्याने आमचा पार्कींगमधल्या सर्व बाईक इतरत्र हलवाव्या लागल्या. आणि त्यातच काम चालु झाल्या पासुन ३ र्या दिवशी आम्हाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची पाईपलाईन रॅबीट पडल्यामुळे फुटली व त्या लाईनला असलेला एक नळही तुटला. तेव्हा त्या बिगारी कामगारांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या बांधुन नळाचे पाणी वहाण्याचे बंद केले. आणि खुप वेळा आम्ही सांगितल्यावर २ दिवसानंतर त्या काँन्ट्रॅक्टरने नविन ऩळ बसुवन दिला. पण पाईपलाईनला जी चिर गेली आहे त्यामधुन अजुन थोडे पाणी झिरपतेच आहे. पाणी वाहुन जातेच आहे.
हे काय कमी म्हणुन आता यायच्या जायाच्या वाटेवरच त्या इमारतीच्या एका बाजुचे सांडपाणी आणि संडासचे पाईप आहेत. त्यातील ३ र्या मजल्यावर एका सांडपाण्याचा पाईपची कॅप निघाली आणि अजुनच बिकट परिस्थीती झाली.
त्या पाईपमधुन (जो ४ इंचाचा आहे) आता येणार्या जाणार्या सगळ्यांवर सतत लोटा भरुन जसे आपण आंघोळ करतो तसे पाणी पडते आहे व तेच पाणी मुख्य रस्त्यावर साचुन राहिले आहे. सगळीकडे घाण आहे नुसती.
शिवाय डासांना अंडी घालायला चांगलीच सोय झालेली आहे.
आमच्या इमारतीतले लोक कोणीच लक्ष देत नाहीये. कारण सोसायटी नाही झाली आहे. मी धरुन ( मी २ वर्षे सेक्रेटरी होतो) मोजके २/४ लोकं आमच्या बिल्डींगच्या कामात लक्ष घालतात. आणि ज्या बिल्डींगचे काम चालु आहे त्यांचीही सोसायटी झालेली नाही. बिल्डींगच्या लोकांना काही सांगायला जावे तर सगळे एकमेकांवर ढकलतात. आम्ही त्यांच्या कॉंन्ट्रॅक्टरला फोन करावा म्हणुन आम्हालाच सांगतात. सरळ म्हणतात बिल्डींग धोकादायक आहे अशी तक्रार केलीत तरी चालेल. आता यातुन मार्ग कसा काढावा?
जो मनस्ताप आम्हाला होतो आहे त्यात ठाणे पालिका काही हस्तक्षेप करु शकते काय? कुठे तक्रार करावी. आता सर्व बाजुने इमारत तोडल्यानंतर तो कॉंन्ट्रॅक्टर प्लॅस्टरसाठी रेती मिळत नाही म्हणुन गायब झालाय.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पालिकेत काही सांगायला गेले तर
मला नाही वाटत. अशीच एक
लोकांची एकी नसेल तर एकुणच
बुलडोझर आणुन शेजारच्या
काँट्रॅक्टरची गचांडी
नाही रे. भलत्याच्या एवढा
बैलांचा अपमान केल्याबद्दल
काँट्रॅक्टरची गचांडी धरा >>>
याचा उपयोग करून पहा
शी बाई !
काय हो …. तुमचा कॉनट्रक्टर पण मिपावर आहे की काय ?
हाय हे मिपाप्रभावाबद्दलचे घोर
+१
चिमण हटेला =))
काही प्रश्न:
सोसायटी + सेक्रेटरी
ओके
+१११११११११११ रंगाशेठ..
असाच अनुभव
रंगाशेठशी सहमत. :)
कप्तानशी
कळव्यात कोणाचे राज्य आहे
थोडे इस्कटून सांगा..
आणखी काय इस्कटायचं बाकी आहे
येवडापण कळवा मागासलेला राहीला
कधी आहे कट्टा इक्सप्रेस?
अजुन एक काडी :)
बरोबर, पण आम्ही खारीगाव आणि
पालिकेत थोडे पैसे सरकवा
शरद पवाराना सांगा.काम होइल.