Skip to main content

कृष्णधवल छायाचित्रे......मिपा स्पर्धा-१०

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 06/05/2015 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा कृष्णधवल छायाचित्र स्पर्धा. Simple, Free Image and File Hosting at MediaFire १९३० साली रंगीत फिल्म्स कोडॅकने व इतर कंपन्यांनी बाजारात आणल्या आणि छायाचित्रांच्या जगात खळबळ माजली. शेवटी शेवटी १९७० साली तर कृष्णधवल छायाचित्रे का काढावीत असाही प्रश्न विचारला जाऊ लागला. कृष्णधवल हा इतिहास आहे. निसर्गात काळ्या पांढऱ्यात काहीही नसते. मग रंगाची दुनिया मला चित्रित करता येत असेल तर मी कृष्णधवल चित्रणात का रमायचे असे प्रश्न विचारले जाऊ लागले. १९३० नंतर जेव्हा रंगीत फिल्म उपलब्ध झाली तेव्हा त्याची प्रत एवढी चांगली नसायची. दिसणारे रंग व छायाचित्रात येणाऱ्या रंगात बराच फरक पडत असे. शिवाय डार्करुममधे जे घोळ व्हायचे ते वेगळेच.... नंतर नंतर जेव्हा रंगीत फिल्मची प्रत अतोनात सुधारली तेव्हा मात्र सगळे छायाचित्रकार या माध्यमात छायाचित्रण करु लागले. शिवाय आठवणी साठवून ठेवण्यासाठी छायाचित्रण करतात त्यांना तर ही पर्वणीच होती. काहीच काळातच कृष्णधवल फिल्म मिळते का नाही अशी चौकशी लोक करु लागले. पण ॲन्सेल ॲडॅम्स सारख्या अनेक छायाचित्रकारांनी कृष्णधवल छायाचित्रांची ताकद व परिणामकारीकता ओळखली होती. त्यामुळे रंगीत दुनियाची छायाचित्रे कितीही रंगीत झाली तरीही या छायाचित्रकारांची छायाचित्रे पाहिल्यावर लोकांच्या तोंडातून प्रशंसोद्गार बाहेर पडत व अजूनही पडतात. ‘ब्लॅक अँड व्हाईटची मजा काही औरच’ हे त्यातील एक नेहमी कानावर पडणारे वाक्य. असो. Simple, Free Image and File Hosting at MediaFire रंगीत छायाचित्रणाचा सामान्य जनतेत होणारा वापर इतका वाढला की कृष्णधवल चित्रे ही जुन्या जमान्याचीच असा विचार करण्याचा पायंडाच पडून गेला. मला वाटते फार पूर्वी एखादे छायाचित्र काढल्यावर ते हातात पडेपर्यंत इतका वेळ जायचा की ते छायाचित्र कालचे हो़ऊन जायचे. त्यामुळे की काय चित्रपटसृष्टीमधे भुतकाळ दाखविताना तो सेपिया किंवा कृष्णधवल छटेमधे दाखविण्याची पद्धत पडली असावी. Simple, Free Image and File Hosting at MediaFire मग कृष्णधवल छायाचित्रे अजुनही जनमानसांवर गारुड करतात याचे काय कारण असावे बरं ? खर तर तुम्ही त्या छायाचित्रातील एक अत्यंत महत्वाचा घटक ‘रंग’ हा काढून टाकता. पण त्यामुळे एक लक्षात घ्या त्या छायाचित्रातील इतर अत्यंत महत्वाचे लपलेले घटक आपल्या दृष्टीस पडतात. यात तर कृष्णधवल छायाचित्रणाचे यश सामावलेले नाही ना? विचार केल्यावर मला तरी हे पटले. ज्या छायाचित्राचा विषय हा रंग नाही त्यात रंगाची गिचमीड रसभंग करु शकते हे मी माझ्या अनेक छायाचित्रांमधे स्वत: अनुभवले आहे. याचा उलट अर्थ असाही होतो की महत्वाचा व्यापून टाकणारा घटक "रंग' गेल्यामुळे छायाचित्रकाराला इतर घटकांकडे जास्त लक्ष पुरवावे लागेल..... (जे तुम्हाला तुमच्या छायाचित्रात करायचे आहे.) Simple, Free Image and File Hosting at MediaFire यात कृष्णधवल चित्रे कशी काढावीत किंवा त्यामागे कुठला दृष्टीकोन असावा, कुठली छायाचित्रे कृष्णधवल करावीत हे लिहिण्याचा माझा मुळीच मानस नाही. आपल्याला ते माहीत आहेच... आपल्या उत्कृष्ट छायाचित्रांपैकी योग्य अशा एकाचे कृष्णधवलमधे रुपांतर करुन आपण येथे टाकावे...त्या अगोदर खालील माहिती वाचल्यास आपल्याला मदत होईल असा विश्र्वास वाटतो. कृष्णधवल छायाचित्र काढण्यासाठी आपल्याला विषय पूर्णकृष्ण ते पूर्णधवल या दोन छटांमधे पडणार्‍या अनेक छ्टांमधे पाहता येणे अत्यंत आवश्यक आहे. यात अवघड काही नाही, सरावाने ते सहज जमते. जर तुम्ही पूर्वी कधी ब्लॅक अँड व्हाईट फिल्म डेव्हलप केली असेल तर तुम्हाला हे लगेचच समजेल. ... हे रंग कृष्णधवलच्या अनेक छटांमधे पहाण्याने ते छायाचित्रात कसे दिसतील हे आपल्याला समजते. आता हल्लीच्या डिजिटल डार्करुममधे ही छटा तुम्ही बदलू शकता पण कुठली किती बदलायची यासाठी हे मुलभूत ज्ञान आवश्यक आहे असे मला वाटते. आता खालील आकृतीमधे प्रत्येक रंगाची छटा कृष्णधवलमधे कशी दिसते हे बघा. Simple, Free Image and File Hosting at MediaFire आता जेव्हा तुम्ही दोन निराळे रंग बघता तेव्हा कदाचित कृष्णधवल चित्रामधे त्याची एकच छटा असू शकते किंवा त्यांमधे अगदी थोडा फरक असू शकतो. या छायाचित्रांतील गंमत त्यामुळे निघून जाते. उदा. खाली एका पुस्तकातील तीन छायाचित्रे दाखविली आहेत. १ रंगीत....मोटारींचा रंग आपल्या डोळ्याला भावतोय कारण ते रंग गडद व वेगळे आहेत्.. Simple, Free Image and File Hosting at MediaFire २ कृष्णधवल... यात हे छायाचित्र किती मद्दड झाले आहे ते बघा. कारण रंगीत चित्रामधे जरी ते रंग वेगवेगळे दिसत असले तरी कृष्णधवलमधे त्याची छटा एकच आहे. Simple, Free Image and File Hosting at MediaFire ३ एकाचा टोन बदलल्यावर ..... Simple, Free Image and File Hosting at MediaFire मित्रहो.... या धाग्यावर आपली (प्रत्येकी एक) कृष्णधवल चित्रे टाका..... अवधी : २० दिवस. जास्त टाकलीत तर कृपया जी स्पर्धेसाठी नाहीत त्यावर तसे स्पष्ट लिहा. पहिले तीन क्रमांक काढण्यासाठी पुढे १० दिवस. शेवटी, मी काढलेली छायाचित्रे ही सजावट म्हणून टाकलेली आहेत....त्याला दुसरा अर्थ नाही.... आपण अधिक चांगली टाकाल याची खात्री आहे.... Simple, Free Image and File Hosting at MediaFire शेवटी छायाचित्र एडिट करा, करु नका....ते पाहिल्यावर... भावले पाहिजे, आवडले पाहिजे हे महत्वाचे... स्पर्धेसाठी शुभेच्छा ! जयंत कुलकर्णी संपादकांना: यात हवा तो बदल करण्याचा आपला अधिकार मान्य करीत आहे.... :-)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 87825
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

अप्रतिम, माहितीपूर्ण आणि छान उदाहरणे आलेला लेख! या धाग्यावर उत्तमोत्तम छायाचित्रे बघायला मिळतील याची खात्री आहे! सर्व स्पर्धकांना शुभेच्छा!

In reply to by पैसा

अप्रतिम, माहितीपूर्ण आणि छान उदाहरणे आलेला लेख!

In reply to by टवाळ कार्टा

काहीही करा...... फक्त फोटो स्वतः काढलेला असला म्हणजे झाले.....

मोबल्यावरुन काढलेले सेपिया प्रकारातले चित्र चालेल काय? उदा. खालील फोटो (हे स्पर्धेसाठी नाही). हा रंगीत फोटु 1 आणि तोच फोटु सेपिय मोडमध्ये. 1

In reply to by प्रमोद देर्देकर

दोन्ही फोटो वेगळे आहेत की =)) आज सकाळीच? ;)

In reply to by टवाळ कार्टा

वेगळे नाहीत रे पार्किग लॉट मधल्या झाडांचे आहेत. दुसरा घेताना विरुध्द बाजुने काढला आहे एवढंच पण झाडे तिच आहेत. आणि (आज सकाळीच? ;) याचा अर्थ काय घ्यायचा? नही हम कुछ लेते नही है इसलिये बोल्ता है| क्या झमझे?

In reply to by प्रमोद देर्देकर

सेपिया ह ब्लॅक अँड व्हाईअतचा एक टोन मानल्यामुळे जरुर चालेल.......

In reply to by प्रभो

श्री. प्रभो. पोस्ट प्रोसेसिंग केलेले नसल्यास, जास्त झुकते माप नाही. त्यामुळे तुम्हाला जर करायचे असल्यास जरुर करा...क्रॉप करा. ब्राईट करा, डार्क करा...... परत टाकला तरी चालेले फोटो....अर्थात टाकायचा असल्यास.....

In reply to by जयंत कुलकर्णी

धन्यवाद काका. फोटो आहे तसाच बरा आहे. :D मला कळतही नाही पोस्ट प्रोसेसिंग चे. :)

In reply to by प्रभो

छान फोटो .. माझे पण असेच आहे. पोस्ट प्रोसेस काही कळत नाही.. म्हणु न्येथे स्पर्धेत फोटो दिले नव्हते.. यावेळेस देतो मात्र

In reply to by प्रभो

श्री. प्रभो, शक्यतो फोटोचे दोन भाग होउ देऊ नयेत. त्यात फोटोवर नजर रेंगाळत नाही. यात समुद्र व आकाशा जेथे मिळते त्या रेषेने फोटोचे दोन भाग केले आहेत. आपल्याला पटेल अशी आशा आहे.....

आमच्या घराशेजारी या पिल्लाविरुद्ध श्वानांनी युद्ध पुकारले होते तेव्हा त्याचे बावरलेले भाव टिपले आहेत...

In reply to by शब्दानुज

फोटो पिकासा, गूगल, फेसबुक, फ्लिकर कुठेतरी टाका आणि मग इकडे आणा.

In reply to by शब्दानुज

शब्दानुज, फोटो चांगला आहे पण पिल्लाच्या डोक्यावरची ती वर्तूळे काढावयास हवी होती. ती फोटो ब्लॅक/व्हाईट करतानाच आली आहेत.. तसेच काही ठिकाणी जे ओव्हर एक्स्पोज झाले आहे ते आपण फोटोशॉपमधे दुरुस्त केले असतेत तर बरे झाले असते.

काही गोष्टीत मिसळपाव फारच त्र्ास देते आता फेसबुक सारखे इथेही फोटो का अपलोड होत नाहीत ? फोटो चढवा परत युआरएल द्या हे किचकट वाटत नाही का? सवयीच म्हणाल तर इतरही वेब पेजेस मी वापरतो पण कोणतेही इतके क्लिष्ट नाही सुरुवातीपासुनच्या संकेताक्षर मिळण्यापासुन असला ताप चालु आह

In reply to by शब्दानुज

माफ करा पण तुम्ही व्यक्त केलेल्या भावना जरा अतिरेकीच वाटतात. मिपावर फोटो थेट अपलोड करू दिल्यास (आजकाल ६-७ एमबी किंवा त्यापेक्षाही अधिक मोठे फोटो असू शकतात) भरपूर सर्वरस्पेस लागेल (कधी कुणी कायदेशीर कारवाई होईल असे फोटो टाकल्यास नव्या समस्याही उद्भवतील). मिपा हे वर्गणीविरहीत व जाहिरात विरहित संस्थळ आहे. फ्लिकर, पिकासा अन अजून कितीतरी फुकट हि सुविधा उपलब्ध करून देतात. तेथे आपला फोटो पब्लिकली शेअर करून व इमेज फाइलचा युआरएल इथे वापरण्यात त्रास कसला. तुम्ही १३ महिन्यांपासून मिपावर आहात तरी देखील अशी भावना व्यक्त केली म्हणून आवर्जून लिहावेसे वाटले. बाकी वर मदत पान हा दुवा आहेच. तसेच खाली 'मिपा बद्दल' व 'सदस्य मदत केंद्र' या विभागांत चार चार दुवे आहेत. त्या पेजेसला पूर्वी भेट दिली नसल्यास किमान एकदा नजर टाका. इतर कुठलीही तांत्रिक समस्या आल्यास खरडफळ्यावर लिहा. हजर सदस्यांपैकी कुणी ना कुणी उत्तर देतंच याची खात्री देतो.

In reply to by स्पा

माफी असावी 'स्पा'जी, पण हा फोटो ब्ल्याक अँड व्हाईट केलेला नाय आवडला. उलट हा रंगीत असता तर सोनं आणि मेंदी यांचा रंग बेष्ट जमून आला असता असं वाटतय.

In reply to by अनुप ढेरे

__/\__ मी हि तोच विचार करत होतो :) असो हा स्पर्धे साठी पकडू नये अशी मी ज.कुंना विनंती करतो :)

In reply to by चौकटराजा

फडके रोडवर, हातात अंगठ्या घेऊन फोटो काढेस्तवर त्या हातात राह्यल्या असत्या का?

रंगीत छायाचित्रणाच्या जन्मानंतर कृष्णधवल छायाचित्रणाच्या प्रवासाविषयी उत्तम विवेचन केले आहे. लेखामध्ये उदाहरण म्हणून दिलेली चित्रेही आवडली. कॄष्णधवल छायाचित्रे म्हणताच माझ्या डोळ्यांसमोर स्व.गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेली पोर्ट्रेट छायाचित्रे येतात. हे अन हे राजाध्यक्षांनी काढलं असावं असा अंदाज आहे.

In reply to by सर्वसाक्षी

श्री. सर्वसाक्षी, अभिनंदन ! पण चेहर्‍यावरच्या चष्म्याच्या सावल्या अजून गडद केल्या असत्या तर मला जास्त आवडल्या असत्या. फोटो योग्यप्रकारे क्रॉप केला आहे.

In reply to by जयंत कुलकर्णी

मी आपल्या मार्गदर्शनाची वाट पाहत होतो. मी तीन चित्रे ठरवली होती, माझ्या पत्नीने हेच चित्र देण्याचा आग्रह धरला. पोस्ट प्रोसेसिंग शिकणे फार आवश्यक आहे. पुन्हा एकदा आभार साक्षी

In reply to by कंस

कृपया एक कुठलातरी सांगावा.... :-) व जो घ्यायचा नाही त्यावर तसे स्पष्ट लिहावे...

In reply to by कंस

श्री कंस, मला वाटते फोटो जरा वेगळ्या अँगलने काढला असता तर विसयाला काही तरी न्याय मिळाला असता. तसेच हिस्टोग्रॅम पाहिला असता तर बरे झाले असते.

In reply to by अत्रुप्त आत्मा

अतृप्तमहाराज, पक्षांचे फोटो काढताना झाडांच्या पानाची गर्दी ही एक नेहमीचा प्रॉब्लेम असतो. हा कसा दूर करावा ? एक तर तुम्ही फोटोशॉपमधे ती गर्दी जरा ब्लर करावी किंवा फोटो वेगळ्या सिझनमधे घ्यावेत (अर्थात नशिबात असेल तर) जेव्हा पतझड होत असते तो सिझन पक्षांच्या फोटोसाठी उत्तम समजावा.

In reply to by स्पा

श्री. स्पा, तुमच्याकडून या चित्राची स्पर्धेसाठी अपेक्षा नव्हती. पण गणपतीची मुर्ती हा जर सब्जेक्ट धरला तर तो गर्दीत हरविला आहे हे आपल्यालाही पटेल असे वाटते.... स्पर्धेसाठी आपला दरवाजाचा फोटो घेतला आहे.

In reply to by नीर

श्री नीर, वरच्या बाजूला फोटोतील सर्व डिटेल्स हरवले आहेत. तेथे थोडे exposure वाढवले असते तर चित्र वेगळे दिसले असते निश्चित....

In reply to by मिनियन

श्री मिनियन, एवढा चांगला फोटो पण वॉटरमार्कच्या जागेने विचार करता आला नाही. फोटोवर जे काही लिहायचे असते त्याने फोटोचा तोल जाता कामा नये. शिवाय आपला वॉटरमार्क हा काही चित्राचा विषय नाही (हे गृहीत धरले आहे) डाव्या कोपर्‍यात फोटो ओवेर एक्ष्पोसे झाला आहे. तो दुरुस्त करता आला असता.

In reply to by विनोद१८

श्री विनोद, वर एका फोटोमधे म्हटल्याप्रमाणे, फोटोचे दोन सारखे भाग शक्यतो होउन देऊ नयेत या मताचा मी आहे. या फोटोवर नजर रेंगाळत नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

काका एक प्रश्न आहे. क्षितीज नेहमी समुद्र आणि आकाशाला वेगळे करते. दोन भाग न करता त्याचा फोटो कसा घ्यावा. उदाहरणासाठी एक-दोन फोटो पहावयास मिळाले तर आनंद होईल

In reply to by कहर

दोन सारखे भाग करु नयेत....असे म्हटले आहे मी....एक आकाशाला जास्त प्राधान्य द्यावे किंवा पाण्याला....

In reply to by वेल्लाभट

श्री वेल्लाभट, पणती आणि त्याचा ब्लर होत गेलेला मागील भाग असा इफेक्ट तुम्हाला अपेक्षित असावा. तसे असेल तर पुढचा भाग अजोन्न शार्प हवा होता असे मला वाटते. पण तो शार्प येणार नाही कारण तुम्ही बहुदा पणतीवर फोकस केलेले असणार जेथे कॉन्ट्रास्ट कमी आहे. त्यासाठी पणतीवर एक काळ्याकागदाचा तुकडा ठेवावा व त्याच्या कडेवर फोकस केली तर मला वाटते फोटो जास्त शार्प आला असता. अर्थात ही माझी आपली आयडिया आहे. मला ही प्रॉब्लेम देवळांचे फोटो काढताना येतो. भिंतीवर कॉन्ट्रास्ट नसल्यामुळे फोटो शार्प येत नाहीत त्यावेळी मी ३एम चा नोटस चा कागद तेथे चिटकवतो व त्याचची कड फोकससाठी वापरतो.

In reply to by कविता१९७८

कविता१९७८, फोटो जर व्यवस्थीत क्रॉप केला असता तर एक चांगला फोटो होता. विशेषतः कपातील कॉफीमधील प्रतिबींब.....

In reply to by Keanu

श्री. चिंटू, आडव्या गेलेल्या लाकडामुळे एक बंदीस्त जागा तयार झाली आहे हे मान्य पण मग अँटिक दृष्टिकोन कळण्यासाठी त्या टेलिफोनचे अजून डिटेल्स यायला हवे होते. तसेच लॅपच्या खालच्या भागातील डिटेल्स हरविलेले आहेत. फोटो अजून शर्प यायला हवा होता असे मला वाटते.... कंपोझिशन चांगले आहे....