Skip to main content

आंतरजातीय/धर्मिय विवाह ,एक जनुकीय (genetic) गरज!!!

लेखक ग्रेटथिंकर यांनी गुरुवार, 04/06/2015 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजातीय विवाहांचे प्रमाण सध्या भारतात वाढत आहे ,मात्र अजूनही आंतरजातीय विवाहांकडे बघण्याचा दृष्टीकोन पुर्वग्रहदुषीत आहे. आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे.परंतु जनुकीय विज्ञान झालेल्या नवीन संशोधनानुसार आंतर जातीय/धर्मीय विवाहातून जन्माला येणारी अपत्ये ही जनुकीयदृष्ट्या सशक्त(Genetically fit) असतात.या पाठीमागच्या जनुकीय विज्ञानाचा अर्थ समजावून घेतला तर अडचण येणार नाही . मनुष्याकडे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्या(pair)असतात,पैकी सेक्स क्रोमोझोमची तेविसावी जोडी फक्त विभिन्न असते, बाकीच्या जोड्या या सारख्या असतात(Identical).मनुष्याच्या DNAमध्ये अनेक जनुकं ही बाधीत असतात (Deleterious mutations).अशी म्युटेशन्स सर्व समाज आणि वंशात आहेत .यातील बहुतांश बाधीत जीन म्युटेशन्स ही रिसेसीव्ह पॅटर्नची आहेत. रिसेसीव्ह गुणधर्म(trait) तेव्हाच मनुष्यामध्ये व्यक्त/एक्स्प्रेस होतात जेव्हा बाधीत जनुके ही जोडीत (pair) असतात. याचा अर्थ एखाद्या फॉल्टी जनुकाच्या दोन कॉपीज जर एकत्र आल्या तर तो जनुक आपला प्रभाव दाखवु शकतो. वरती लिहल्याप्रमाणे गुणसुत्रांच्या तेवीस जोड्यामध्ये जनुकांच्या दोन प्रती (Copies)असतात, जर दोन वेगवेगळ्या जनुकांची जोडी जर गुणसुत्रात जमली तर तो जेनेटीक अँडव्हांटेज समजला जातो व होणारे अपत्य सुदृढ जन्माला येते . आता या सर्व विज्ञानाचा जातीव्यवस्थेशी काय संबंध असा प्रश्न पडणे साहजीक आहे.आपल्या कडे जातीव्यवस्था असल्याने आपला जैविक साठा(Gene pool)मर्यादीत होतो.यासाठी एक उदाहरण बघु, मनुष्यात उंची ठरवणारी 150 पेक्षा जास्त जनुके आहेत, आपल्याकडच्या जाती/ धर्म प्रकाराने कुठल्याही जातीत ही सर्व आवश्यक जनुके सापडणार नाहीत, प्रत्येक जातीत ती विभागली गेली असणार. याचाच अर्थ प्रत्येक जातीत उंची हा गुणधर्म ठरवणारी जनुकं वेगवेगळी व मर्यादीत आहेत व एकाच जातीतल्या विवाहाच्या प्रथेमुळे तीच तीच जनुकं पुढच्या पीढीत पास होत आहेत.यामुळे जेनेटीक फिटनेसला मर्यादा पडतात. उंची हा फक्त उदाहरणाचा भाग झाला ईम्युनीटी ,बुद्धीमत्ता,शाररीक सदृढता ईत्यादी अनेक मानवी गुणधर्मांना अनेक जनुकं कारणीभूत असतात जी आपल्या जातीव्यवस्थेने आपण सिमीत करुन ठेवली आहेत.इम्युनीटी ठरवणारी जनुकं जर एखाद्या जातीत मर्यादीत असतील, तर त्या जातीत जन्माला येणार्याँची रोगप्रतिकारक शक्तीदेखील ठराविक पातळीवरच मर्यादीत राहते. ,कारण इम्युनीटी ठरवणार्या अनेकाविध जनुकांचा अभाव असणे.तेच बुद्धीमत्ता व इतर शारीरीक लक्षणांना लागू होते. परत एकाच जातीत बाधित जनुकं असतील तर ती व्यक्त होण्याचा संभव जास्त असतो,एकाच जातीतल्या जोडप्यांना होणार्‍या अपत्यात बाधीत जनुकाच्या दोन प्रती एकत्र येऊन बाधीत गुणधर्म व्यक्त होण्याची शक्यता जास्त असते, कारण आपली जनुकीय विविधता जातींमुळे मर्यादीत झालेली आहे. जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे. आंतरजातिय विवाहांमुळे मिळणारे फायदे हे जनुकीय विज्ञानाच्या अनुषंगाने खुप जास्त आहेत. आंतरजातीय विवाह झाल्यास आपल्या भारतीय समाजाची जनुकीय विविधता वाढेल, भारतीय समाजाचा जनुकीय साठा(diverse gene pool) मोठ्या प्रमाणात वाढेल. आंतरजातिय/वंशिय विवाहाचे खालील फायदे होऊ शकतात. 1.diverse gene pool मुळे जनुकीय सदृढता वाढीस लागेल. 2.विविध गुणधर्मासाठी अनेकविध जनुके उपलब्ध झाल्याने,रिसेसीव व डॉमिनंट पॅटर्नने इनहेरिट होणार्या जेनेटीक डीसॉर्डर कमी होतील व एक सुदृढ समाज तयार होईल 3.भारतीय समाज विविधांगी गुणधर्माचा एकजिनसी समाज होईल. 4.जनुकीय विविधता असलेला सदृढ समाज हा मानव वंशास फायद्याचाच ठरेल. आंतरजातीय /वंशीय विवाहाचे विज्ञानाच्या अनुषंगाने केलेले हे चिंतन आहे. काही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी लिंक दिलेल्या आहेत . तर आंतरजातिय व आंतरधर्मिय विवाहाला खुल्या मनाने मान्यता देणारा समाज निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे व त्याला वैज्ञानिक आधारही आहे .धन्यवाद http://www.bionews.org.uk/page_51579.asp http://assoc.garden.org/courseweb/course2/week2/page18.htm

वाचने 58128
प्रतिक्रिया 243

प्रतिक्रिया

In reply to by Hrushikesh Marathe

मराठेसाहेब - शक्य असेल तर प्रतिसादही देवनागरीतच द्यावा ही विनंती. मोबाईलवरून लिहीत असाल तर गूगल इंडिक कीबोर्ड वगैरे वापरून सहज शक्य आहे.

बर्‍याच वर्षांपूर्वी काही सहकार्‍यांबरोबर झालेली जातिव्यवस्थेवरील चर्चा आठवली. त्यात गुणसूत्रांच्या वैविध्यास जातिसंस्थेच्या अडथळ्याबद्दल बरीच सकारात्मक चर्चा झाली होती. अर्थात तुम्ही मांडलेला मुद्दा वैज्ञानिकदृष्ट्या बरोबर असला तरी त्याची अंमलबजावणी करणे हे सामाजिक रूढीवादी मानसिकतेमुळे जरा कठीणच आहे. पूर्वीच्या काळी अनुलोम विवाह एकवेळ चालत, पण तथाकथित उच्च जातीच्या पुरुषाने तथाकथित खालच्या जातीतील स्त्रीशी विवाह करणे अनुचित मानले जाई. आता हे प्रतिलोम विवाह तितके नवीन राहिले नाहीत. उलट खालावणार्‍या लिंगगुणोत्तरामुळे ते वाढीस लागले आहेत हे लेवा पाटील या जातीतील पुरुषांनी आदिवासी मुलींशी लग्न करण्याच्या वाढत्या प्रथेवरून दिसून येते. (हे केवळ उदाहरणार्थ.) पण त्याउलट दलित मुलाने उच्चवर्णीय मुलीशी विवाह केल्यास त्या दलित घराची राखरांगोळी केली जाते. यात दोन प्रकारच्या अनिष्ट प्रवृत्ती दिसतात. एक म्हणजे इतर जातींना आपल्या जातीपेक्षा कमी दर्जाच्या मानणे आणि स्त्रियांना भोगवस्तू असल्याप्रमाणे वागणूक देणे. या दोन्ही प्रवृत्ती दुर्दैवाने कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे आंतरजातीय विवाहांची वाट कठीण आहे. (आमच्या घरात आणि नातेवाईकांमध्ये अनेक आंतरजातीय विवाह झाले आहेत. एवढेच नव्हे तर अगदी आंतरधर्मीय विवाहही झाले आहेत.) स्वतःबरोबर इतर सर्वांनाच फक्त माणूस मानणारा - स्वॅप्स.

In reply to by एस

सहमत, फक्त ते अनुलोम-प्रतिलोमचा तपशील अंमळ चुकलाय. पुरुष उच्चजातीचा अन स्त्री नीचजातीची = अनुलोम. पुरुष नीचजातीचा अन स्त्री उच्चजातीची = प्रतिलोम. लेवा पाटील समाजातील पुरुषांनी आदिवासी मुलींशी लग्न करणे हे तस्मात अनुलोम विवाहाचेच उदाहरण आहे. अन प्रतिलोम विवाहाप्रति समाज अर्थातच अजूनही खूप संवेदनशील आहे.

विषय शेवटी जातीव्यवस्थेवर जाईल म्हणून जास्त खोलात जात नाही उदाहरणार्थ कोकणस्थ आणी देशस्थ ब्राम्हण या दोन पोटजातीतच इतके जनुकीय वैविध्य आहे कि त्यांचा संकर हा खूप फायदेशीर आहे. अशाच तर्हेने सर्व जातींचे जनुकीय पृथक्करण झाले पाहिजे आणी ज्या जातींची जनुके भिन्न आहेत त्यात विवाह असावा आणी ज्यात साम्य आहे त्यात विवाह टाळावा. हे शास्त्राला धरून होईल. परंतु काही जातींमध्ये असलेली विशिष्ठ गुणाची जनुके विरलतेतून( DILUTION) लुप्त होऊ शकतील. उदा. उत्तर भारतात काही जातीत उंची खूप जास्त आहे. अशा लोकांनी बुटक्या जातीत लग्न केले तर उंचीचे सरासरीकरण( AVERAGING) होऊन उंची कमी होऊ शकेल. तेंव्हा सर्वच आंतर जातीय विवाह फायदेशीर ठरतील असेही नाही. आंतरधर्मीय विवाहात असे नक्की सांगता येणार नाही. गोव्यात बरेच GSB लोक ख्रिश्चन झाले आहेत( बाटवले गेल्या मुळे) तेथे विवाह मंडळाच्या जाहिराती सुद्धा RCB (ROMAN CATHOLIC BRAMHIN) वर/ वाढू पाहिजे अशा येतात. कोकणी मुसलमानात कोकणस्थ ब्राम्हणांची आडनावे डिन्गणकर, पाटणकर इ आणी गुण (घारे डोळे ई ) दिसून येतात. तेंव्हा धर्माधारीत विवाह हे जनुकीय संशोधन केल्याशिवाय करावे हे म्हणणे कठीण आहे. ( तशी माहिती उपलब्ध असेलही. मला माहित नाही) मूळ ठरवून कोणी आंतर जातीय विवाह करीत नाहीत. त्यातून आपल्याकडे राखीव जागांमुळे हा प्रश्न ज्वलंत आणी गुंतागुंतीचा झाला आहे. यामुळे मी यावर भाष्य करीत नाही.

जनुकं बिनुकं शरीरात असतात. शरीराबाहेरचं एक जनुक असतं ज्याचं नाव असतं लोक. ते जनुक काय म्हणतं यावर बरंच अवलंबून असतं. शिवाय जनुकं 'विचारांवर' परिणाम करत नाहीत ना ! ते विचार कसे बदलणार?

थोडक्यात सांगायचे तर ५ + ७ ची सरासरी ६ होइल आणी विविधता वाढेल असेच ना? याला दुसरा प्रतिवाद असा होइल की ७+ ७ ची सरासरी ७ च राहिल. म्हणजे ७ ला या सगळ्या प्रकारामुळे काहिच फरक पडणार नाही आहे. ५ च्या भल्यासाठी ७ ने बलिदान देउन ७ पेक्षा कमी प्रतीचे प्रॉडक्ट तयार करणे कदाचित ७ ला आवडणार नाही. त्यामुळे या जनुकीय गुंतागुंतीला केवळ शास्त्रीय दृष्टीकोनातुन बघणे योग्य होणार नाही. ७ ला ५ आणि ५ ला ७ आवडत असेल तर प्रश्नच मिटला.

In reply to by मृत्युन्जय

७ ने स्वत:ला ०(शुन्य) समजावे म्हणजे ० + ०=० आणि ० X ० = ० किंवा ० / ० = ० च, मग ते ५ चं भलं देखील म्हणता येणार नाही कारण ५ देखील तेव्हा ० च आणि ७ चं ते बलिदान होणार नाही. त्रास आहे तो ७ ने स्वत:ला ७ आणि समोरच्याला नेहेमी २ ने कमी समजण्याचा.

In reply to by म्हया बिलंदर

प्रश्न समजण्याचा नाही. असण्याचा आहे. ७ स्वतःला ७ च समजेल ना? तो ७ नसेल तर तो स्वतःला ७ नाही समजु शकणार. ५ स्वतःला ७ समजायला लागला मह्णुन तो ७ थोडीच होणार आहे. आणि ७ ने स्वत:ला आणी इतरांनी त्याला ० समजणे हे ७ चे अवमूल्यन आहेच. अजुन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की समाजात फकत ७ नसतात. ८, ९, ५ आणि २ देखील असतात. ७ ने स्वतःला ७ समजणे (किंवा असणे) सोडले तरी ८ तसे करेल असे नाही आणि कदाचित असेही असेल की २ ला देखील स्वतःच्या २ असण्यातच जास्त आनंद आहे / असेल. २ असण्याने कदाचित त्याला काही जनुकीय फायदे म्मिळत असतील जे ७ असण्याने मिळणार नाहित. त्यामुळे कदाचित २ च २ राहण्यात समाधान मानेल. शिवाय ७ ने दुसर्‍याला ५ समजण्याचा देखील प्रश्न नाही. ५ हा ५ च असतो. ७ ने त्याला काहिही समजले तरी त्यात फरक पडत नाही. शिवाय ७ समोरच्याला २ ने कमी समजण्याचा त्रासही असु शकत नाही. खासकरुन हे कमी समजणे म्हणजे असणे असेल तर प्रश्नच नाही. शिवाय मी अजुन एक गोष्ट म्हटली ती तुम्ही लक्षात घेतलेली नाही. ७ ला ५ आणि ५ ला ७ आवडत असतील आणी त्यासाठी तडजोडी करायची त्यांची तयारी असेल तर प्रश्नच मिटला की असो महत्वाचा मुद्दा हा की समजणे महत्वाचे नसुन असणे महत्वाचे आहे. जे आहे ते आहेच. ते नाकारता कसे येइल?

In reply to by मृत्युन्जय

धागाकर्ताच
जातीव्यवस्थेतुन /धर्मातून आलेल्या या जनुकीय दुर्बलतेवर मात करण्याचा एक सोपा उपाय म्हणजे आंतारजातिय विवाहांना चालना देणे.
असं म्हणत आहे. शिवाय
आपल्या जातीत वा धर्म पंथात विवाह केल्याने रक्त शुद्ध राहते ,अशी खुळचट कल्पना अजूनही आपल्या समाजात घट्ट आहे
असंही तेच म्हणतात. मुळात ० ते ९ हि विभागणीच चुकिची नाही का? आवडीचं म्हणाल तर ते पटलंच पण एक गोष्ट आणखी अशी की ही आवड निवड ते दोघे करायला तयार असतात पण घरचे, भावकीतले, समाज, ई. तयार नसतात व त्यामुळे थिंकर साहेबांची प्रमेय आणखी मागे पडत जातात/जातील. मी ७ म्हणून दुसर्‍या ७ बरोबर उभा असेल तर कोणाला काही वाटणार नाही पण मी ५ आहे असं कळलं तर बर्‍याच भुवया तानल्या जातात. आजपर्यंत असंच चालत आलंय म्हणुन तेच बरोबर आहे हा आग्रह देखील चुकीचा. शिवाय थिंकर यांची प्रमेय पचणी पडायला बराच वेळ जाणार हे देखील तितकंच खरं.

In reply to by म्हया बिलंदर

० ते ९ ही विभागणी मुळीच चुकीची नाही. कारण ती मुलात जनुकीय रचनेवर अधारित आहे असे धागाकर्‍त्याचे म्हणणे आहे. मी तो धागा पकडुनच पुढे लिहिले आहे. जर मुळात ० ते ९ नसेलच तर या जनुकीय कॉम्बिनेशनची गरजही नाही,

In reply to by म्हया बिलंदर

० / ० = ०
हे चुकलंय. कॅल्क्युलेशन 'अनंत' होतं. बाकी १) ५ ला ७ नं ० असावं असंच आत्तापर्यंत वाटत आलंय. २) ५ ची १,२,३,४ बरोबर ची वागणूक बघता ५ वर विश्वास ठेवण्याचं कारणच नाही. ३) आधी १,२,३,४ आणि ५ यांनी सलोख्यानं वागून दाखवावं, मग ७ ला उपदेश करावा. थोडक्यात, १,२,३,४,५ आणि ७ यांना तसं एकमेकाबद्दल काहीच प्रेम नाहीये. तेव्हा हे बिनकामाचे उद्योग कोण सांगितलेत? १,२,३,४ आणि ५ यांनी एकत्र किंवा वेगवेगळं सुखानं नांदावं. ७ ला रहायचंय तर राहू द्यावं एकटं. होईल ७ ला जनुकीय प्रॉब्लेम तर ७ बघून घेईल.

In reply to by काळा पहाड

अहो अगदीच याच तर भावनेने सगळा प्रॉब्लेम वाढवलाय ना? ० ते पुढे हे एका ओळीत नाहीत ना, ते खालुन वर या क्रमाने करुन ठेवलेले आहेत शिवाय आलाच एखादा ज्ञान शिकवायला तर तात्पुरते व सोयीनुसार हे अर्ध्याने किंवा खुप झालेच तर एकाने वर खाली होतात पण तात्पुरतेच.

In reply to by म्हया बिलंदर

बरं मग उलट करूया. ७=१ समजा आणि मी वापरलेली १,२,३,४,५ ही रचना ही ३,४,५,६,७ अशी आहे असं समजा (किंवा अ,ब,क,ड,इ घेवूया. अ स्वतःला अ समजतो, ब स्वतःला ब समजतो हे तरी खरं आहे की नाही?) दुसर्‍या शब्दात सांगायचं तर २ ला तो २ आहे ही जाणीव आहे, तशीच १ ला तो १ असल्याची जाणीव आहेच. आणि १ ला इतकं इतकं डिवचलं गेलंय (तुमच्या बापजाद्यांनी ७ ला शिकू दिलेलं नाही इत्यादी) आणि सरकारी नोकर्‍या वगैरे मधून, शिक्षणातल्या संधी मधून अशा प्रकारे दूर केलं गेलंय की आता १ ला तो १ आहे ही जाणीव पक्की झाली आहे. आता स्वतःच्या पायावर (जबरदस्तीनं उभं रहायला लागलेल्या) १ ला या सामाजिक समरसते मध्ये ईंटरेस्ट असेल असं वाटत नाही. त्याला त्याची गरजही नसेल. या अ‍ॅन्टी-१ प्रकारामुळे १ मधले काही स्वप्नांच्य जगात जगणारे सोडले तर १ ला एकत्र यायला २ ते ७ नी भाग पाडलंय. तेव्हा हा प्रकार कितीही आयडियल वगैरे असला तरी १ च्या पूर्वजांच्या पेक्षा १ च्या मनात २ ते ७ बद्दल जास्त अढी असणार. एखादा शत्रू सैनिक सामोपचाराची बोलणी करायला आलेला दिसला तरी या बाजूचा सैनिक जसा बंदूक रोखूनच सावधगिरीनं त्याच्याशी बोलेल, वागेल तसाच १ वागणार.

In reply to by काळा पहाड

>>> हे चुकलंय. कॅल्क्युलेशन 'अनंत' होतं. किरकोळ दुरूस्ती - गणितात '०/०' किंवा कोणतीही 'अशून्य संख्या/०' म्हणजे 'अनंत' नाही. गणितात असे भागाकार निरर्थक किंवा Undefined समजले जातात. अवांतर - नाना आणि माईंचा विवाह हा सजातीय का आंतरजातीय का आंतरपोटजातीय का आंतरउपजातीय का आंतरपंथीय का आंतरधर्मीय का आंतरराष्ट्रीय आहे याचा ग्रेटथिंकरांनी खुलासा करावा अशी विनंती आहे. माईंच्या आयडीने (म्हणजे आईने नव्हे तर आयडी वापरून) खुलासा केला तरी चालेल.

शाळेच्या दाखल्यावरचा धर्म आणी जातीचा उल्लेख काढुन टाका,आज हे केले तर २० वर्षानंतर त्याचे परिणाम नक्की चांगले होतिल.

In reply to by बाबा पाटील

नुस्तं तेवढ्यानं काय होणार? समजा जातधर्म हा निकष हद्दपार झाला असे समजू (जे मुळात कधीही होणे अशक्य), तरीही नवनवीन निकष येतच राहणार.

In reply to by बाबा पाटील

सहमत. च्यामारी त्या सरकारी व्यवस्थेच्या. रेडक्रॉसमधे नव्या बाळाला लस द्यायला घेऊन गेलो. नावनोंदणी करतांना तुमची जात काय सांगा, म्हणाल्या बाई. डोक्यात तिडीक गेली. म्हटले बाई याचा काय संबंध इथे? तर ती सद्ग्रहणी उच्चारती झाली. "अहो, आमच्या मनाने नाही विचारत, इथे फॉर्ममधे लिहून सरकारला द्यावं लागतं आम्हाला." माझा प्रॉब्लेम असा आहे की चारचौघात जात विचारली की तळपायाची मस्तकात जाते. हे सरकार काही पिच्छा सोडत नाही. मुलांच्या दाखल्यावर जात-धर्म लिहायचाच नाही अशी नागरिकांना सूट नाही आहे का?

In reply to by संदीप डांगे

अहो पण एक गोष्ट लक्षात घ्या. ज्यांना चार चौघात जात सांगायला लाज वाटते. तेच लोक आरक्षणाचा गैरफायदा अगदी खुलेआम घेताना दिसतात. हि समाजाची खूप मोठी विडंबना आहे. म्हणजे आरक्षण असेल तेथे स्वत: जात सांगायला काही प्रोब्लेम नाही आणि जर त्याच जातीचा दुसऱ्या कोणी उल्लेख केला कि atrocity लागू. हे कधी थांबणार (व री न घे )

In reply to by कहर

देशाचे अजुन एक दुर्दैव म्हणजे जातीपातीविरोधात आंदोलने करणारे स्वतःच मोठ्या प्रमाणावर जातपात मानतात. महाराच्या पोराने (इथे जातदर्शक उल्लेख हा तुच्छतापुर्ण अथवा द्वेषमूलक नाही हे लक्षात घ्यावे) उच्चवर्णीय मुलीबरोबर लग्न करण्यास विरोध केल्यावर त्यांना शिव्या घालणारे महार स्वतः जातपात मानतात. त्यांच्यातही पोटजाती आहेत आणी त्यांमध्ये रोटीबेटी व्यवहार चालत नाहित के खोटे आहे काय?

थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय स्त्रियांनी वाट वाकडी करावी असेच ना? कारण अशा बहुतेक धाग्यांचा उद्देश तोच असतो. बाकी जाईना का कुठे. बाकी असे ओरडणार्‍यांनी अगोदर तथाकथित नीचजातीयांचे वर्तन तपासून पाहणे उद्बोधक ठरेल. अन असे धागे अन प्रतिसाद असाईड, आंतरजातीय विवाह होतच राहतात. कमी प्रमाणात का होईना.

In reply to by बॅटमॅन

सहमत. खरेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे ठरवून असे विवाह अशक्यच. प्रेमविवाहामधे जे होतं त्याला तरी समाजाने पाठिंबा द्यावा अशीही अपेक्षा करू शकत नाही.

In reply to by संदीप डांगे

अशी जाहीर धोतरफेड बरी नव्हे.. बरं दिसत नाही चार चौघात. आता त्यांनी इतकं थिंकून ग्रेट लिहिलय तर नीट लिसनना जरा, तू म्हणजे कुठे न्यायच्या लायकीचा नाहीस. तोच तुझा प्रोब्लेम (नोट शब्द नीट टाईपला आहे) आहे. तेव्हा गुरुजींकडे शिकवणी लावणे. काळजीवाहू नाखु.

In reply to by बॅटमॅन

थोडक्यात प्रिफरेबली उच्चजातीय स्त्रियांनी वाट वाकडी करावी असेच ना?
बॅट्या अरे असे कुठे कोणी लिहिलंय रे ? मी शोधतोय पण मला उल्लेख अथवा तसे सजेशन नाही आढळत आहे म्हणून विचारतोय.
अन असे धागे अन प्रतिसाद असाईड, आंतरजातीय विवाह होतच राहतात. कमी प्रमाणात का होईना.
हे मान्य..

In reply to by हाडक्या

बॅट्या अरे असे कुठे कोणी लिहिलंय रे ? मी शोधतोय पण मला उल्लेख अथवा तसे सजेशन नाही आढळत आहे म्हणून विचारतोय.
कैकदा आडून आडून सजेशन तेच असते. अशाच एका कार्यक्रमात एका साहेबांनी 'मग ब्राह्मण पोरी आम्हांलाही मिळाल्याच पाहिजेत' असे जाहीर विधान केलेले अजून लक्षात आहे, तस्मात यांचा मुख्य रोख कुठे असतो हे सांगणे तसे अवघड नसावे. भलेही ग्रेटथिंकरसाहेबांना मी बेनिफिट ऑफ डौट द्यायला तयार आहे.

In reply to by बॅटमॅन

मी कुठल्याही ब्रिगेड वा बामसेफी दृष्टीकोनातून हा लेख लिहलेला नाही. ब्राह्मणांचा तर यात उल्लेखही नाही. उच्च नीच जातीय विवाह असाही विषय नाही. विषय आहे भारतीय समाजाचा जीन पूल वाढवुन एकजीनसी समाज तयार करणे. मग असे विवाह कुठल्याही स्तरातील जातींजातीमध्ये होऊ शकतात. जेणेकरुन Inbreeding depresion कमी होईल. फक्त उच्च व नीच जाती हा मुद्दा गौण ठरावा. http://www.wikipedia.org/wiki/Inbreeding_depression

In reply to by ग्रेटथिंकर

तुम्हांला बेनिफिट ऑफ डौट दिलाय असे अगोदरच म्हटलेले आहे, सबब तो विषय नाहीच... बाकी या अनुषंगाने अजूनेक प्रश्न, दक्षिण भारतात ब्राह्मणांपासून दलितांपर्यंत सर्व जातींत कझिन म्यारेज असते. हे इनब्रीडिंग नव्हे काय? अन त्याचा त्यांना तोटा झाल्याचा काही विदा आहे का?

In reply to by बॅटमॅन

कॉंन्सॅग्विनस मॅरिजमुळे प्रोजेनी डिफेक्टीव निघण्याचा अतिप्रचंड विदा उपलब्ध आहे. पिडिएट्रिक्स हा विषय शिकताना एक अख्खा सेक्शनच याप्रकारच्या विवाहांनी होणार्‍या लहान मुलांतील आजारांविषयी आहे. दक्षिण भारतात गंमत म्हणजे मामा आणि भाच्यांचीही लग्ने होतात. असाच एक विदा- http://www.ias.ac.in/jgenet/Vol81No3/91.pdf या लिंकवरून पुढेपुढे सर्च करत गेल्यास या संदर्भात प्रचंड विदा मिळू शकेल.

In reply to by साती

पण मग जनरल सौथ इंड्यन पब्लिक डिफेक्टिव्ह असतं का अ‍ॅज़ कंपेअर्ड टु नॉर्थ इंड्यन्स? शिवाय नक्की कसं काय कोरिलेशन वा कॉजेशन आहे ते बघायला आवडेल. हे लै वेळेस ऐकलं आहे पण मग जनरल सौथ इंड्यन पब्लिक असं डिफॉर्म्ड, रोगट दिसत नाही ते कसं काय???? या प्रश्नाचे उत्तर मात्र कोणीच देऊ शकलेले नाही. ते कृपया द्यावे ही विनंती. कारण कझिन म्यारेजला सौथमध्ये अमुकच एका जातीचे असे बंधन नाही.

In reply to by बॅटमॅन

डिसॅबिलिटी सर्टिफिकेट बनवायच्या कर्नाटक सरकारच्या प्रकल्पात सहभागी झाल्याने इथल्या भागात किती प्रचंड शारिरीक आणि मानसिक विकलांगता आहे याचा विदा आहे. मात्रं उत्तर भारतीय राज्यांची क्रॉस सेक्शनल डाटा माझ्याकडे तरी नाही. मात्रं कॉनसँग्विनिटी यातल्या किती विकलांगतेकरिता जबाबदार आहे याचा प्रत्यक्ष आकडा सध्या हातात नाही. ते मोजण्याचे काम चालू आहे. अर्थात असा प्रायमरी अवस्थेतला डाटा मला सध्यातरी इथे उघड करता येणार नाही.

In reply to by साती

क्या बात है, एकदम नेमके काम आहे हे. जितके शक्य असेल तितके आणि तेव्हा अवश्य माहिती शेअर करावी, ही विनंती. जमल्यास रिसर्च पेपरही अवश्यमेव पाठवणेचे करावे हे विज्ञापना.

In reply to by बॅटमॅन

साहेब प्रिफरेबली उच्चजातीय
म्हणजे
ब्राह्मण पोरी
किंवा
ब्राह्मण "च" पोरी
असं का वाटतं?? अहो जातीय व्यवस्थेने(व्यवस्था??) उच्च आणी निच अशा अनेक ब्राहमणेतर जातींमधे देखील सोय करुन ठेवलेली आहेच की. उगाच का स्वतःला
प्रिफरेबली उच्चजातीय
मानीत "च" रहायचं??

In reply to by म्हया बिलंदर

हे आम्ही मानण्या न मानण्यावर नाही, तर अनेकांचा जो रोख असतो तो पाहिल्यावर त्यातून आलेलं आहे.

आंतरजातीय की आंतरधर्मिय विवाहांना अनुदान वगैरे मिळतं असं मी ऐकलंय. त्यावर कुणी काही प्रकाश टाकू शकेल काय?

In reply to by बॅटमॅन

तसे अनुदान आहेच. पण ते इतके कमी आहे ते पाहते ते दलित जातीत आंतर जातीय (महार + चांभार, महार + ढोर)किंवा वनवासी लोकांमधे असे विवाह प्रमोट करण्यासाठी असावे. पूर्वी युपीए च्या काळात त्याची जाहीरात ढँण ढँण वाजत असायची रेडीओवर. हल्ली रेडीओ ऐकायला वेळ मिळत नाही. असो. ते अनुदान अजूनही असावे असे वाटते.

होय. आंतरजातीय व आंतरधर्मिय विवाहांना महाराष्ट्र शासनाकडुन रु. ५००००/- (पन्नास हझार) इतक अनुदान मिळतं. पुर्वि हे अनुदान रु. १५००० त्यमधे रु. ७५०० चि किसान विकास पत्र व ७५०० चि भान्डि असे होते. मात्र २०१० च्या शासन निर्णयानुसार हि रक्कम आता रु. ५००००/- इतके करण्यात आलेले आहे. आंतरजातीय विवाहामध्ये वर व वधुपैकि एक जण खुल्या प्रवर्गातिल व दुसरा मागासवर्गिय असणे अभिप्रेत आहे. व हे सर्व जिल्हा परिषद मधिल समाजकल्याण विभागाच्या अखत्यारित येते.

एकंदर समाज व्यवस्था बघता हा द्राविडी प्राणायाम करण्यापेक्षा सरसकट सगळ्या मुलांना पैष्टीक आहार, उत्तम शिक्षण आणि भरपूर व्यायाम दिला की आपोआप सगळे काही वर्षात एका पातळीवर येतील.

मला असे वाटते की असा संकुचित विचार करणे बरे नव्हे. जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे. म्हणजे संपुर्ण जगाचे जनुक बदकुन जाइल आणि समस्त जगतातल्या मानव वंशास त्याचा फायदा होइल. तोवर इतर कुठल्या ग्रहात जीवसृष्टी आहे असे आढळुन आल्यास आणि संकरातुन जीवनिर्मिती शक्य आहे असे आढळल्यास तसेही प्रयत्न करुन बघावेत म्हणजे समस्त ब्रह्मांडातील जीवसृष्टीला त्याचा फायदा होइल. विज्ञान इतके प्रगत झालेच आहे तर मानव आणी इतर प्राण्यांच्या संबंधाने जीवनिर्मिती शक्य आहे का ते देखील बघावे आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करावे. असे झाल्यास संपुर्ण प्राणीजगताची जनुकीय संरचना बदलुन जीवसृष्टीला त्याचा खुपच मोठा फायदा होइल.

In reply to by बॅटमॅन

योग्य विचार. सध्या म्युटंट्स फक्त अमेरिकेत तयार होतात मग संपुर्ण ब्रह्मांडात तयार व्हायला लागतील. त्यांच्या सुपर्नॅचरल पॉवर्समुळे जगाचे कल्याण होइल. अर्रे देवा मनुष्याला हे आधी का नाही सुचले रे.

In reply to by मृत्युन्जय

मला असे वाटते की असा संकुचित विचार करणे बरे नव्हे. जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे. म्हणजे संपुर्ण जगाचे जनुक बदकुन जाइल आणि समस्त जगतातल्या मानव वंशास त्याचा फायदा होइल. तोवर इतर कुठल्या ग्रहात जीवसृष्टी आहे असे आढळुन आल्यास आणि संकरातुन जीवनिर्मिती शक्य आहे असे आढळल्यास तसेही प्रयत्न करुन बघावेत म्हणजे समस्त ब्रह्मांडातील जीवसृष्टीला त्याचा फायदा होइल.
+१०*n रच्याकने, आपल्या देशाची सद्य लोकसंख्या, पोरांच्या शाळेच्या/कॉलेजांच्या फिया, वाढती स्पर्धा येवढे उपद्व्याप असूनही लोकांना अजूनही पोरेबाळे हवी असल्याचं वाचून हसावं की रडावं ते कळत नाही.

In reply to by मृत्युन्जय

जगातल्या सर्व लोकांनी एकत्र येउन एकदा आंतर्देशीय विवाह करणे सुरु करावे. जगातले सर्व लोक एकत्र आले आणि एखादा निर्णय अंमलात आणला गेला असं होत नसतं. आपण म्हणता तसे आंतर्देशीय विवाहही सुरु होतीलच ते आंतरधर्मीय विवाह म्हणुन आता मान्यता पावत आहेत आणि आजच्या जालीय युगात अधुन मधुन अशा बातम्या वाचायला मिळतातही. अशा गोष्टींसाठी चळवळ गरजेची असते. अशी चळवळ मग जातीभेद दुर व्हावेत म्हणुन सावरकरांनी लावलेले आंतरजातीय विवाह असतील किंवा ‘आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाची चळवळीस प्रोत्साहन देणारे अंनिस‘चे संस्थापक-अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर असतील अशा आधुनिक विचारांशी बांधलेल्या गेलेल्या लोकांनी सतत काम सुरु ठेवले लोकांमधे जागृती केली आणि एक निकोप दृष्टी आता वाढू लागलेली दिसते, असे अनेक लोकनेते जन्माला येतील, काही लोकांना विचार पटू लागेल आणि असे विवाह पुढे वाढीस लागतील. संपुर्ण जगाचे जनुक बदकुन जाइल आणि समस्त जगतातल्या मानव वंशास त्याचा फायदा होइल. मानव वंशास फायदा होईल अशा गोष्टी भविष्यात होतच राहतील. कोणती जनुके मानवाच्या फायद्याची आहेत त्याचा विचार भविष्यात येईलच. मानवी शरीरातील पस्तीस हजार जनुकीय गोष्टी आहेत असे म्हणतात त्यातील काही मेंदु चेतसंस्था यासाठी कार्यरत असतात. मानवांच्या डोळ्यांसाठी, कानाने कितीतरी दुरवरचा आवाज ऐकु यावासाठी, पोक काढुन बसणा-यांसाठी भविष्यात विज्ञानाला जनुकीय बदल करावेच लागतील आंतरजातीय विवाहामुळे सहज काही जनुकीय बदल होणार असतील तर असे बदल होण्यासाठी आपल्याला काही विचार करायची आणि विरोध करायची गरज नसेल लोकच स्वत: अशा गोष्टीला तयार होतील, असे वाटते. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जगातले सर्व लोक एकत्र आले आणि एखादा निर्णय अंमलात आणला गेला असं होत नसतं. तुमच्या प्रतिसादाच्या अनुषंगाने हा धागा या वाक्यातच बाद करुयात असे नमूद करु इच्छितो. कारण जसे जगातले येउ शकत नाहित तसे भारतातलेही येउ शकत नाहित मग तर. आपण असा निराशावादी सूर आळवण्याची काहिच गरज नाही. आपण आपले ध्येय मोठे आणि सुस्पष्ट ठेउयात. जागतिक जनुकीय बदलाची ही नांदी ठरु देत. टांझानियाची अबेदा आणि कवठे महांकाळचे पाटील यांच्या संबंधातुन जनुकीय क्रांती घडवुन अवघे विश्व समृद्ध करणारी संतती निर्माण व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहुन मानवजातीला प्रोत्साहन देत राहुयात हीच प्रभूचरणी प्रार्थना ( वैज्ञानिक दृष्टीकोनातुन जनुकीय क्रांती घडवुन आणली जात असताना प्रभूची प्रार्थना केलेली चालेला ना?). आमेन.

In reply to by मृत्युन्जय

जगातील सर्व लोकांनी एकत्र येउन काही केलं जाउ शकतं का की नाही हे माहीत नाही. पण माझ्या चार ते पाच वर्षाच्या परदेशातील वास्तव्यात मला काही गोष्टी कटाक्षाने जाणवल्या. १. गोरे लोक भारतीय मुलींशी लग्न करायला खूप उत्सुक असतात. माझ्या दोन सहकार्‍यांनी तेलगू मुलींशी लग्न केले होते. कारण विचारता "घटस्फोटाची शक्यता खूप कमी आणि भारतीय मुली नवर्‍याला मान देतात आणि त्यांची काळजी घेतात" असे त्यांचे मत २. काही वयाने जास्त असलेल्या मुली/बायका भारतीय पुरषांशी लग्न करायला उत्सुक असतात. कारण विचारता "घटस्फोटाने कंटाळलेल्या असतात." अर्थात हे माझे मत, निरीक्षण आणि अनुभव आहे. ईतर लोकांचे निरीक्षण/मत वेगळे असू शकते.

In reply to by खटपट्या

"घटस्फोटाची शक्यता खूप कमी आणि भारतीय मुली नवर्‍याला मान देतात आणि त्यांची काळजी घेतात"
नॉट एनीमोर, अप्यारंटलि.

In reply to by बॅटमॅन

खिक्क...भारतीय मुली एक घाव दोन तुकडे करून संपवण्यापेक्षा टोचून टोचून स्लो डेथवर जास्त विश्वास ठेवतात ;)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयला अजाणतेपणी आम्ही ह्या महान कार्यात आपला खारीचा वाटा उचलला हे पाहून आमचे उर भरून आले.

In reply to by मृत्युन्जय

@मृत्युंजय साहेब, तुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया उपहासात्मक वाटली. आपल्याबद्दल मला माहिती नाही पण तरीही आपण जर बाहेर फिरला असाल तर हे पाहिलच असेल कि आंतरदेशीय विवाह हे होतच असतात आणि ज्यांना त्याचा फायदा होणार आहे, त्यांना होईलच! इथे लेख भारताबद्दल आहे आणि त्यामुळे तुमची प्रतिक्रिया संयुक्तिक वाटत नाही.

In reply to by शब्दबम्बाळ

ते आंतर्देशीय "अरेंज्ड मॅरेज" बद्दल बोलतायत. लव्ह मॅरेज बद्दल नव्हे. म्हणजे बघा, पाकिस्तान मधले हाफीझ मसूद सईद यांची कन्या आणि अमेरिकेतले श्री. जेब बुश यांचे भाऊ यांचं लग्न केवळ जनुकीय गरजेसाठी करण्याबद्दल विचार करूया. किंवा सोमालियायाचे अब्दुल मोम्बासा (अतिशय गाजलेले माजी समुद्री चाचे) यांच्या कन्येचा विवाह श्री. शब्दबंबाळ यांच्या पुत्राशी ५० बकर्‍या आणि ५ म्हशी घेवून विवाह. फक्त जनुकीय गरजेसाठी हं. किती रोमांचक कल्पना ना?

In reply to by काळा पहाड

तुमचा मुद्दा : "ते आंतर्देशीय "अरेंज्ड मॅरेज" बद्दल बोलतायत. लव्ह मॅरेज बद्दल नव्हे" त्यांच्या पूर्ण प्रतिक्रियेत अरेंज्ड किंवा लव्ह मॅरेजबद्दल एकही शब्द नाहीये. हा अर्थ आपण "सोयीस्कर"रित्या काढलेला दिसतोय. तुमची इतकी जळजळ का झाली हे कळाले नाही पण खाली मी लेखावर दिलेली प्रतिक्रिया वाचायचे कष्ट घेतले असते तर मी हि जनुकीय कारणासाठी लग्नाच्या कल्पनेला विरोधच दर्शवला आहे हे समजले असते तुम्हाला! आणि पुन्हा, इथे लेख भारताबद्दल आहे आणि त्यामुळे उगाच भरकटू नका!

In reply to by शब्दबम्बाळ

माझ्या पहिल्या प्रतिक्रियेत लव्ह मॅरिज असेल तर प्रश्नच मिटला अश्या आशयाला एक उल्लेख होता. तो काप नी वाचलेला असावा. कदाचित आपण वाचलेला नाही.

In reply to by शब्दबम्बाळ

मी आपल्याइतका जग फिरलेलो नसेन कदाचित पण इतके माहिती आहे की भारतीय लोकांचे परदेशी लोकांबरोबर फार कमी विवाह होतात. आंतरजातीय विवाहांपेक्षा हे प्रमाण कमीच असेल. आता केवळ माझे मत खोडण्यासाठी एखादा निनाद मुकाम पोस्ट जर्मनीचे उदाहरण देइल पण ते अपवादात्मक उदाहरणच आहे. एकुण लोकसंख्येचा विचार करता अशी उदाहरणे कमीच. शिवाय आपण नीट लेख वाचला असता आपल्याला कळेल की लेख भारताबद्दल नसुन जनुकीय विकासाबद्दल आहे. त्यामुळे मी संकुचित विचार बाजूला ठेवायचा सल्ला देउन व्यापक दृष्टीकोन समजावुन सांगितला. आंतरदेशीय विवाहांचे देखील तेच फायदे असु शकतील जे आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे आहेत. शिवाय माणसाने फक्त माणसापुरता विचार का करायचा? त्याने आधिक व्यापक विचार केला तर संपुर्ण सृष्टीच जनुकीय दृष्ट्या समृद्ध होणार नाही का? आज तुम्हाला असले विचार टॅबू वाटतीलही कदाचित पण व्यापका हिताच्या दृष्टीकोनातुन हा विचार देखील झालाच पाहिजे. खासकरुन यामुळे जनुकीय क्रांती होणार असेल तर नक्की. तुम्ही विचार करा टांझानियाची लुलु आणि कवठे महांकाळचे पाटील (इथे नावे केवळ वानगी दाखल आहेत) यांच्या संबंधांनी एक अतिशय समृद्ध जनुकीय संतती निर्माण होणार असेल तर अश्या विवाहांना प्रोत्साहन द्यायला नको?