Skip to main content

(कधीच का नाही?)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 27/11/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
जयश्री ताइंची कधीच नाही वाचुन आमची झोप उडाली आणि काय म्हणतात ते एक विडंबन पाडले (एक प्रयत्न) http://misalpav.com/node/4738 का बंध रेशमाशी जुळले कधीच नाही गात्रात कंप माझ्या भरले कधीच नाही त्या सॉवळ्याच होत्या रात्री जागून माझ्या वाह्यात वागणे मज जमले कधीच नाही सलवार ही फुलांची मद झुलवीत येते मज त्या लयीत झुलणे जमले कधीच नाही डोळ्यात मोजलेल्या रात्री कितीक माझ्या सत्यात भेटणे तुज जमले कधीच नाही जखमा दिल्या नखाने, जपल्या बर्‍याच सार्‍या का भाव तू दिलेले वठले कधीच नाही पद सोडले सदा मी, सोडेन मी पुन्हा ते का सोडणे तुला मज जमले कधीच नाही चेतन
लेखनविषय:

वाचने 1300
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

डोळ्यात मोजलेल्या रात्री कितीक माझ्या सत्यात भेटणे तुज जमले कधीच नाही व्वा..मस्तच.. मदनबाण..... हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर. बॅ.वि.दा.सावरकर