ग्वाटेमालात घडलेली एक दुर्दैवी घटना
एखाद्या गोष्टीवर काय मत द्यावं मला खरंच कळत नाही, खासकरुन अशावेळी ज्यावेळी ती घटना अख्ख्या मानवजातीला काळीमा फासणारी असते!
असं काही ऐकल्यावर बघितल्यावर- माणसाला कधी, माणूस म्हणून जगताच आलं नाही असं वाटतं. अनेक शतके उलटली प्राणी आपली हिंसक वृत्ती सोडून प्रेम करायला शिकले, पण माणूस मात्र रानटी तो रानटीच राहीला; किंबहुना त्याच्याही पलिकडे जाऊन निर्दयी आणि पाषाणहृदयी होत गेला. असं नसतं, तर अशा घटना वारंवार घडल्याच नसत्या.
अलिकडेच व्हॉट्स-अॅप वर एक व्हिडीओ आला होता. म्हणजे अजुनही तो मोबाईलवर फिरतोय. मागच्याच महीन्यात मलेशियामध्ये एका सोळा वर्षाच्या तरुणीला जमावातल्या काही जणांनी अमानुषपणे मारहाण केल्याचा तो व्हिडीओ होता. कारण काय तर- एका 68 वर्षाच्या टॅक्सी ड्रायव्हरच्या खूनाशी तिचा संबंध होता. खरं म्हणजे खून करणारे ते दोघे वेगळेच होते. पण ऐन वेळी ते तिथून निसटले. आणि ती मात्र लोकांच्या हातात सापडली.
अर्थात त्यांच्या मारण्याबद्दल काही नाही पण त्या मारण्याचीही काही सीमा? अक्षरश: सैतानासारखं तिला तिथे मारण्यात आलं. चेहरा सुजून, अगदी नाकातोंडातून रक्त येईपर्यंत तिला, लाथा-बुक्क्यांनी तुडवण्यात आलं. केसांना धरुन कशाहीप्रकारे फरफटण्यात आलं. अशा वेळी एखादं जनावर बरं अशी तिची हालत त्या लोकांनी केली. आश्चर्याची गोष्ट अशी कि तिथे हजारोंच्या संख्येनं लोक उभे होते! पण कोणीही तिला वाचवायला किंवा मदत करायला पुढे आला नाही. निर्लज्जासारखे ते फोनमध्ये हे सर्व रेकॉर्ड करण्यात गुंतले होते! किती हीन आणि सडलेली मनोवृत्ती इथे दिसून येतेय? अशा प्रकारे मारताना- आणि ते नामर्दासारखं बघताना काहीच कसं वाटलं नसेल त्यांना?
अर्थात हे इथेच संपत नाही. तिला मारुन झाल्यावर तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला नंतर सर्वांदेखत जिवंत जाळण्यात येतं! आणि षंड वृत्तीचे लोक आपापले फोन पुढे करुन ते रेकॉर्ड करायला लागतात! शेवटपर्यंत ती किंचाळत राहते- तडफडत राहते. पण कोणापर्यंतही तिच्या वेदना पोहोचत नाहीत! कोणीही तिला मदत करायला धावत नाही. कि हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. उलट जाळ कमी झाल्यावर त्यातलाच एक तिच्या अंगावर आणखी पेट्रोल ओतून तिला पुर्णपणे जाळतो!
किती निंदनीय घटना आहे ही! एका अपराधाबद्दल अशी भयानक शिक्षा?
छे! डोकंच बधीर होतं ते बघितल्यावर. शेवटी एवढंच म्हणेन कि, एखाद्या शत्रुवरही असली वेळ कधी येऊ नये! :( :(
हा व्हिडीओ कदाचित तुमच्याही व्हॉट्स-अॅपवर आला असेल, किंवा नसेलही. पण तो न बघणंच बरं. कारण त्याची भयानकता ही तितकीच जास्त आहे.
ही बातमी तुंम्हाला या लिंकवर वाचायला मिळेल.
*************************
सूचना : लेखातली घटना मलेशिया या आशियाई देशात नाही तर ग्वाटेमाला या दक्षिण अमेरिकेतल्या देशात घडली असल्याने गैरसमज टाळण्यासाठी लेखाच्या शिर्षकात योग्य ती सुधारणा केली आहे.
*************************
प्रतिक्रिया
भयानक!!!
दुर्दैव म्हणजे
हो
मला वाटते कित्येक लोकांनी
सुन्न करणारी घटना. ऑफिसच्या
आप्ल्या मते , प्रतिक्रिया
भयानक!!!
बाकी काहीही प्रतीक्रिया नाही,
इथे किंवा ग्रुप मधे
असेच म्हणतो
असे आणि अनेक व्हिडीयो पाहुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chand Tu Nabhatla... :- संदूकती घटना मलेशियामधली नाही....
अतिशय भयानक.
बघवत नाही.
मलाही ही क्लीप आली होती. मी
मलाही ही क्लीप आली होती. मी
विषयांतराबद्दल क्षमस्व-
ह्या व्हिडिओत
..मलेशिया नव्हे.मध्य अमेरिका
..
..अधिकार प्राप्त होत नाही.
..काहीच जस्टिफायेबल नाही.
भयंकर आहे
मलेशियातही नुकतीच बॉर्डरवर