डान्या, तुझ्या विचारांशी संपूर्ण सहमत. माकडाच्या हातात कोलीत दिलं की काय होतं ते आपण बघितलंच आहे.
पानीपतच्या युद्धात बाजारबुणगे नसते तर कदाचित मराठे जिंकण्याची शक्यता वाढली असती ना?
सहमत आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
माझ्या मते त्यांना संपूर्ण चित्रीकरण करण्याचे हक्क असावेत. मात्र ते थेट प्रक्षेपित करण्यावर तसेच संवेदनशील दृश्ये दाखविण्यावर (चित्रीत करण्यावर नाहि) बंधन असावे.
प्रत्येक घटना थेट दाखवण्याची काहिच गरज नाहि. मात्र काय झाले हे जर जनतेला आहे तसे - काहिहि न लपवता कळणार असेल तर चांगलेच आहे. फक्त अशी संवेदनशील चित्रे/दृश्ये थेट दाखवू नयेत.. बातमी मात्र त्वरीत प्रसारीत करावी
या कारणाने माझे मत वरील दोन्ही पर्यायात न बसल्याने मत दिलेले नाहि.
-("यापैकी नाहि" मतदार) ऋषिकेश
जनतेला काय चालले आहे ते कळणे आवश्यकच आहे, पण त्या माहितीसाठी "सरकारी यंत्रणेकडुन वेळोवेळी उपलब्ध" होणारी माहिती आहेच ना ...
ती प्रसारीत करावी ...
आपल्या पदरचे काहीही "अतर्क्य / अवाजावी /अनावश्यक दावे" करु नयेत ...
मला वाटते की आपले जे काही मत आहे त्यासाठीच मी "पर्याय क्र. १" तयार केला आहे, त्याचा गर्भितार्थ तोच आहे.
बाकी आपली मर्जी, धन्यवाद !
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
३र्या पर्यायाबद्दल अनेक आभार.
खाली धमुने योग्य प्रतिसाद दिला आहेच त्यात थोडे ऍडीशनः
या चित्रीकरणातून महत्त्वाचा पुरावा देखील हाती लागु शकतो. जो पुढे कोर्टकचेर्यांच्यावेळी कामाला येतो. म्हणून म्हणतो चित्रीकरण हवे .. त्यांना काहि माफक मर्यादेत हवे ते दाखवूही द्यावे मात्र थेट नव्हे तर घटनेला काहि काळ लोटल्यानंतर..
घटना घडत असतेवेळी केवळ बातमी द्यावी, दृश्ये दाखवू नयेत
याच बरोबर "ग्रो अप मिडीया!! " हे १००% खरंय
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
त्यांना दुर ठेऊन फक्त जी "खात्रीशीर माहिती जी सरकारकडुन उपलब्ध होते" तीच प्रसारीत करण्याचा मापदंड घालुन द्यावा
कालपासुन विविध वाहिन्यांवर चाललेला आंखो देखा हाल पाहुन खरचं खुप 'अपसेट' झालोय!
- टिंग्या :(
एक छोटीसी सुचना ( लाल रंगातली ) टाकण्याच्या नादात मी "धागा संपादित " केला त्यामुळे आधी पडलेली सर्व मते बाद ठरुन पुन्हा गणना पहिल्यापासुन चालु झालेली आहे.
कॄअपया आधी मत दिलेल्यांनी "पुन्हा एकदा मतदान" करावे ...
आपलयाला झालेल्या तसदीसाठी क्षमस्व !!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
उपलब्ध पर्यायांपैकी मला योग्य वाटणारा पर्याय एकही नाही.
सरकारी माहिती प्रसारित करुन केवळ सरकारधार्जिणं वातावरण निर्माण होण्याचा धोका आहे.
तसेच, वाटेल तसं 'नंगानाच' करण्यानं काय होतं हे तर आपण अनुभवतो आहोतच.
माझं मत ह्या दोन्ही पर्यांयाच्या मध्ये कुठेतरी आहे.
प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य, मोकळीक जरुर हवी, मात्र त्याचा दुरुपयोग नको.
जिथे योग्य असेल तिथेच त्यांना परवानगी द्यावी. ताजवर होत असलेल्या चकमकीची बरोबरी जर हे अक्कलशुन्य मिडियावाले 'बाईट्स'च्या लोभाने करत, तडफडत त्याचं प्रक्षेपण करण्यासाठी वाटेल ते करत असतील तर हा केवळ तद्दन मुर्खपणा आहे.
५. पोलीसांबरोबर नेहमीच कॅमेरा असल्याने त्यांच्या हालचालींची सर्व खबर "आतल्या दहशतवाद्यांना / त्यांच्या बाहेरील साथिदारांना" मिळत होती व त्यानुसार ते कदाचित त्यांचा ऍक्शन प्लॅन बदलत नसतील कशावरुन ? कै. करकरेंचा बळी ह्याचमुळे पडाला अशी चर्चा आहे ...
अत्यंत महत्वाचा मुद्दा!
जर कोणि 'वेन्सडे' चित्रपट पाहिला असेल तर त्याला हे नक्की पटेल.
बाकीचे मुद्दे हे भारतीय प्रसारमाध्यमांना आलेलं गल्लाभरु धंद्याचं ओंगळ स्वरुप फक्त दाखवतात.
अजुनही ह्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये, त्यांच्या कार्यक्रम व्यवस्थापकांमध्ये असलेल्या अप्रगल्भतेचे दर्शन वर उल्लेखलेल्या बाबी करतात.
My dear media, please grow up... निदान आपल्या ह्या दिव्व्यांपायी मोजाव्या लागलेल्या किंमतीने तरी शहाणे व्हा रे!!!!!!
इथं कित्येकांच्या जिवनमरणाचा प्रश्न आहे, कोणा नेत्या-अभिनेत्याच्या पोरा-पोरीचं लग्न नाहीय्ये की उठलात आणि सुटलात कॅमेरे घेऊन गर्दीत धावत!
प्रसारमाध्यमांनी किमान अक्कल वापरावी ही अपेक्षा.
-(उद्विग्न) ध मा ल.
तुझ्या प्रत्येक वाक्याशी १००% सहमत.
जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...
आपले संकेतस्थळ
मी अंशतः सहमत आहे, "इतर" साठी तिसरा पर्याय बनवला आहे ...
पण त्यामुळे "आधीचा डेटा " उडाला, कॄपया पुन्हा मत द्यावे ...
योग्य सुचनेसाठी धन्यवाद
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
उपलब्ध पर्यायांपैकी मला योग्य वाटणारा पर्याय एकही नाही.
सरकारी माहिती प्रसारित करुन केवळ सरकारधार्जिणं वातावरण निर्माण होण्याचा धोका आहे.
माझं मत ह्या दोन्ही पर्यांयाच्या मध्ये कुठेतरी आहे.
प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य, मोकळीक जरुर हवी, मात्र त्याचा दुरुपयोग नको.
जिथे योग्य असेल तिथेच त्यांना परवानगी द्यावी. ताजवर होत असलेल्या चकमकीची बरोबरी जर हे अक्कलशुन्य मिडियावाले 'बाईट्स'च्या लोभाने करत, तडफडत त्याचं प्रक्षेपण करण्यासाठी वाटेल ते करत असतील तर हा केवळ तद्दन मुर्खपणा आहे.
+१
वृत्तनिवेदक / निवेदिकेने लाईव्ह कॉमेन्ट्री करताना जरा तारतम्य बाळगावे.
बर्याचदा ते काय बोलताएत त्यांचं त्यांना तरी कळतंय का असं वाटतं.
दाखविल्या जाणार्या प्रसंगांचं रक्तरंजित 'वर्णन' करायला ह्यांना काय ग्रेट वाटतं?
समोरच्या व्यक्तीचा हात / पाय तुटलाय / रक्तबंबाळ झालाय ते मालमसाला लावून सांगणे म्हणजे पत्रकारीता का?
कधी कधी बातम्या बघताना आपण डिटेक्टीव्ह सिरियल पाहत आहोत असे वाटते. ते स्वतःच तपास करतात असे दाखवतात.
सकाळी इंडिया टिव्हीचे अतिरेक्यांशी फोनवर बोलणे कसे जमले काय माहित... ?
डॉन भाऊ, खुप परफेक्ट मुद्दे आहेत. काल सगळे डिटेल्स पाहताना माझ्या बालमनात काही विचार आले. थोडे बालिश असतील की किती पोलिस आहेत, कुठे आहेत. कुठली कुमक येते आहे, काय तयारी आहे. ए टि एस कुठे पोचली आहे. एन एस जी कधि येणार. इतकी माहिती चोवीस तास बोंबलत राहिलं तर त्या पंचतारांकित हॉटेल्स मध्ये यांचे कोणी साथीदार यावर लक्ष ठेवून पुढचा विचार आणि व्युह रचना करणार नाहीत का?
करकरे पडल्यानंतर म्हणे या लोकांनी एकमेकांना मोबाइल वरुन अभिनंदन केलं. माझा बालिश विचार इतक्या वाइट तर्हेने प्रत्यक्षात येइल हे वाटलं नव्हतं.
मृतदेह, ती जिप्सी हे न दाखवण्याची समंजसता (मॅच्युरिटी ला ठीक आहे ना?) आपल्या टी आर पी आधारित मिडियाला बिलकूल नाही. गोळी लागलेल्या आणि फक्त एक काठी हातात असलेल्या कॉन्स्टेबलला चक्कर येत असताना लोक मदत करत होते आणि हे लोक शूटिंग. तो हातात गोळी लागलेला माणूस. एकदम बरोब्बर लिहिलं आहेस डॉन्या.
थोड्या प्रमाणात दाखवायलाही हवं कारण त्याशिवाय तिथून शेकडो मैल लांब असलेल्या तुला मला त्याची ग्रॅव्हिटी (मराठी - गंभीरता?) कळणार नाही आणि तिथल्या लोकांची अवस्था जाणवणार नाही.
पण ऑपरेशन चे प्रसारण आणि माहिती सांगण्यास पूर्ण बंदी असावी.
इतरत्र मी ज्या एन्टेबी ऑपरेशन बद्दल लिहिले त्यात त्यांनी एन्टेबी एअरपोर्ट चं लाइफ साइझ मॉडेल केलं आणि मिनिटा मिनिटा ची रिहर्सल केली. त्या सेट वर काम केलेल्या लोकांनाही कल्पना देण्यात आली नव्हती. आणि काम पूर्ण झाल्यावर ऑपरेशन पूर्ण होउन सर्व बंधक परत येइपर्यंत त्या सर्वांना बाहेर जाउ दिलं नाही. इतक्या प्रखर राष्ट्रवाद असलेल्या देशात सुद्धा आपल्याच लोकांना सरकारने स्थानबद्ध केलं माहिती चुकून सुद्धा फुटू नये म्हणून.
कुठे ही कमालीची गुप्तता आणि कुठे हे मरणार्या कोणाचा एक बाइट चॅनेलच्या लोकप्रियते साठी.
बातम्या प्रसारित करण्याची अमुक अमुक वृत्तसमुहाची लायकी आहे असे लायसन काढणे कंपल्सरी असावे, त्या लायसनच्या इलिजिबिलीटीसाठी मानके असावीत. अहो कोणीही थातुर मातुर नुकतेच मिसरूड फुटलेला कार्टा येतो अन अन सरळ एसीपी किंवा एटीएस च्या प्रमुखाला पकडुन प्रश्न विचारायला लागतो. बर त्याच्या खांद्यावरच्या प्रेस च्या टॅगमुळे तो अधिकारीही बांधील असतो उत्तरे द्यायला. त्याला महत्वाचे निर्णय बाजुला ठेवुन तिकडे भिडावे लागते.
बरं बाकी बातम्या पण इतक्या सवंग .. हात तुटलाय .. छाताडात गोळी लागलिये हे सगळे दाखवायची घाई .. अन त्यांच्या रिपोर्टरच्या त्यांच्या चॅनेलच्या हिमतीचे कौतुक .. अरे हलकटांनो कुठे फेडाल ही टाळुवरची लोणी खायची पापं .. पोलिस टाईम्स ओशाळेल इतकी सवंगता !!
छ्या बॉ .. साला हा स्वातंत्र्याचा गैरफायदा !!
आमचे उत्तर अर्थातच इतर ला.
मीडिया स्वतंत्र असावा असे माझे मत आहे.
मिडियाने तारतम्य कसे बाळगावे, कोणते प्रसंग कसे दाखवावेत, वार्ता देणार्यांनी भाषा कशी वापरावी, त्यांचा स्वर कधी कसा असावा, शब्द चपखल आणि योग्य असे कसे वापरावेत याबद्दल भारतातल्या विचारवंतांनी त्यांची 'शाळा' घ्यावी.
मिडिया पोक्त होण्याची गरज आहे.
-- लिखाळ.
टीआरपी सारखी पहाणी करणारी एखादी संस्था असावी जी वाहीनीची लोकप्रियता न पहाता तीच्या बद्दलची नावड नोंदवेल.
ह्या पहाणीचे निकष विश्वासर्ह्ता, भडकपणा, असंवेदनशीलता, रटाळपणा ईत्यादी असावेत. ही पहाणी नियमीत पणे प्रसीध्द व्हावी.
खरे म्हणजे पर्याय दोन हे माझे नैसर्गिक मत आहे. परंतु, भारतातील माध्यमे अद्याप परिपक्व झालेली नाहीत. त्याची कारणे काहीही असोत, पण ती जोवर जबाबदारणे वागत नाहीत तोवर त्यांच्यावर थोडे निर्बंध घातले जावेत असे वाटते.
९/११ च्या हल्ल्यातील मृतदेह दाखवले गेले नाहीत. अमेरिकेत असा नियम बहुधा नसावा पण त्यांच्या मिडियाने स्वतःवर घालून घेतलेले ते बंधन होते. तसे प्रौढत्व भारतीय प्रसारमाध्यमात येईल, तो सुदीन!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
वृत्तपत्रे व पत्रकार जर लोकशाहीचे आधारस्तंभ मानले जात असतील व आपण त्याच दृष्टीकोनातुन दुरचित्रवाणी माध्यमाकडे पाहीले तर केवळ निराशाच पदरी पडेल असे सखेद नमुद करुन त्यांचा कोणत्या शब्दात निषेध करावा हे कळत नसल्याचे हतबल होवुन सांगतो.
सध्या ज्या पद्धतीने कोणतीही बातमी देण्याची घिसाडघाई तसेच सत्यासत्यता न पडताळता केवळ आमचीच वाहीनी पहिले बातमी देते हे सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड ह्यातुन भारतातील लोकशाहीचा गळा घोटला जात आहे हे दुर्देवाने मेट्रोच्या बाहेर कधी न पडलेल्या उच्चविद्याभुषित मंडळीना जेव्हा कळेल तो दिवस सुवर्णाक्षरांनी नोंद करुन ठेवावा लागेल.
ह्या माध्यमांनी सध्या मांडलेला एक विकृत खेळ नुकताच मी कालच लेख लिहुन दाखवला होता
http://misalpav.com/node/4793
त्यामुळे ही माध्यमे अडचण आहेत असेच मी मानतो.
अवलिया (उर्फ नाना चेंगट)
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)गुरुवार, 27/11/2008
२६ आतंकवादी !
एक मुंबई !
शेकडो सेना जवान!
व फालुतुचे चॅनेल वाले !
त्यात भर नेते (रामदास पोहचले आहेत ) !
काय होणार ह्या देशाचं :?
जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...
आपले संकेतस्थळ
माध्यमांच्या माकडचाळ्यांमुळे ही प्रकरणे व्यवस्थित हाताळता येत नसावीत असे वाटते... फक्त भीतीचे वातावरण सर्वत्र पसरते... एकदा हे असे ऑपरेशन पूर्ण झाले की मग मीडियाला धिंगाणा घालू द्यावा.
सोनिया, प्रधानमंत्री व अमर सिंग तथा बाकी नेते.. दिल्ली हून मुंबई कडे कुच करत आहेत !
हसावे की रडावे हेच कळे ना झालं आहे !
जैनाचं कार्ट
देहि शिवा वर मोहि इहै...
शुभ करमन ते कबहूं न टरूं...
न डरूं अरि सौं जब जाई लरूं...
निसचै कर अपनी जीत करूं...
आपले संकेतस्थळ
कौल पुन्हा प्रकाशित केल्याबद्दल आभारी आहे.
"माफी मागायची" गरज नाहीच सरपंच, होते असे कधीकधी ...
आम्हाला काडीइतकासुद्धा राग नाही आला.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
सोनिया, प्रधानमंत्री व अमर सिंग तथा बाकी नेते.. दिल्ली हून मुंबई कडे कुच करत आहेत !
वाचुन वाटते की आता खरोखर ह्या टीव्ही वाल्यांवर बंदी घालावी. मुंबईत आल्यावर हेच साले मगरीचे अश्रु ढाळण्यात पुढे असतील व त्याच्या फुटकी थोंबाडे आपल्याला बघायला लागणार.
वेताळ
पर्याय १ आणि २ च्या मधला सुवर्णमध्य साधणं आवश्यक आहे असं मला वाटतं.
लोका पर्यंत महिती पोहोचणं तर जरूरी आहेच. पण कुठली महिती आणि कशा प्रकारे पोचवायची ह्याचे मात्र तार्तम्य बाळगणे आवश्यक आहे.
कालच बरखा दत्त ला असाच मुर्खपणा करताना बघत होतो.
ताज च्या बाहेर एक माणूस उभा होता. थोडासा वयस्क असावा. त्याचा भाउ आत अडकला होता.
हीज वॉइस वॉज लिटरली शेकीन्ग.
आणि ही गोष्ट ही बाई स्वतः बघत होती. आणि तरीही विचारते, whats going on in your mind sir. your brother is inside, how is he.
अशाच अर्थाचे एक दोन प्रश्न विचारून झाल्यावर पुन्हा कॅमेर्याकडे बघून म्हणते, "see hw was shaking. tears are coming but he is controlling them"
हे दिसतय न? मग मुद्दाम त्याचा इंटर्व्यू घ्यायची गरजच काय?
आज सकाळी मधेच मुख्यमंत्री आणि क्रुपा शंकर सिह येऊन पत्रकारांसमोर एक छोटीशी पत्रकार परिषद घेऊन गेले. आधीच परिस्थिती इतकी केऑटिक असताना, हे येणार म्हटल्यावर त्यांचे सिकयुरिटी गार्ड्स, गाड्या या सगळ्यानी केऑस अजून वाढतो.
मित्रांनो आणि मैत्रिणींनो
या बाबतीत मला जरासे वेगळे मत मांडायचे आहे. भारतातील प्रसारमाध्यमे (त्यातही वृत्तवाहिन्या) बेजबाबदारपणे वागतात असा एकंदर सूर दिसतो आहे. आपल्या मताशी मी १०० टक्के सहमत आहे. मात्र त्यांच्या प्रक्षेपणावर निर्बंध घालावेत असे जरी आपण आता या क्षणी वैतागून म्हणत असलो तरी ते परवडणारे नाही. आणिबाणीच्या काळात प्रसारमाध्यमांवर निर्बंध घातले गेले होते ते आठवा. अशा काळात प्रसारमाध्यमेच जनतेचा आवाज म्हणून काम करीत असतात, शासनकर्त्यांच्या हुकूमशाही, दंडेली विरुद्ध लढत असतात. अन्यायाविरुद्ध लोकांना चेतवित असतात.त्यामुळे प्रसारमाध्यमांवर निर्बंध घालण्यास पाठिंबा देणे म्हणजे मुजोर शासनकर्त्यांना मनमानी करण्यास मुक्त परवाना देणे असा याचा अर्थ होईल. तेव्हा तसे करणे या घडीला तरी मला पटत नाही.
मात्र आजकाल प्रसारमाध्यमे (त्यातही वृत्तवाहिन्याच) बेजबाबदारपणे वागू लागल्याचे दिसत आहे. आपण बातमी देण्यात सर्वात पुढे आहोत हे दाखविण्यासाठी वृत्तवाहिन्या वाट्टेल त्या थराला जाताना दिसतात. हे अगदीच चुकीचे आहे यात कोणतेही दुमत नाही.वृत्तपत्रांनीही वाहिन्यांना या बाबत अनेकदा फटकारले आहे. अपरिपक्व, परिस्थितीची जाण नसणारे तरुण केवळ आकर्षक चेहर्याच्या भांडवलावर बातमीदारी करू लागतात तेव्हा असेच घडते, मात्र तरीही त्यासाठी प्रसारमाध्यमांवर निर्बंध घालू नयेत तर त्या ऐवजी या प्रसारमाध्यमांनीच स्वतःहून एक आचारसंहिता अमलात आणून तिचे पालन करावे, यासाठी प्रेक्षकांनी आग्रही रहावे.
तरीही त्यासाठी प्रसारमाध्यमांवर निर्बंध घालू नयेत तर त्या ऐवजी या प्रसारमाध्यमांनीच स्वतःहून एक आचारसंहिता अमलात आणून तिचे पालन करावे,
नाही, आम्ही प्रसारमाध्यमांवर बंदी घालावी ह्या मताचे नाही आहोत पण त्याचबरोबर ह्यांना "रेस्क्यु / मिलीटरी / कोंबिंग ऑपरेशन्स" पासुन दुरे ठेवावे ह्या आग्रही मताचे आहोत.
कारण अशा वेळेस हे लोक आपल्या अतिउत्साहाने व अंमळ मुर्खपणाने परिस्थीती बिघडवण्यास ( कधीकधी) कारणीभुत ठरतात ...
इतर वेळी आमचा काहीही आक्षेप नाही, पण "ऑपरेशन्स" च्या वेळी तिथे बहादुर जवानांच्या प्राणांची बाजी लागली असते.
ह्या परिस्थीतीत त्यांना दुर ठेवणे असा सुर आहे आमचा, काय मत आहे तुमचे यावर ?
बाकी इतर प्रसंगी ह्यांचे चालु द्यात, आम्ही पहातही नाही व किंमतही देत नाही ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
गेले चाळीस तास या मिडियावाल्यांचा मूर्खपणा चालू आहे. प्रत्येक गोष्टीचं लाईव्ह कव्हरेज दिल्याने बाहेर काय चाललेय याची आयती डिटेल्स आत दहशतवाद्यांना मिळतायत. आजसकाळपासून जरा लाईव्ह प्रक्षेपण कमी केलंय. पण मग इकडे बाँबस्फोट, तिकडे गोळीबार अशा अफवा हे लोक पसरवू लागलेत.खरं तर अशा महत्त्वाच्या ऑपरेशनच्यावेळी पूर्ण गोपनियता बाळगायला हवी.
साती
मी अजून सर्वांची मते वाचली नाही आहेत. पुनराव्रुत्ती झाल्यास क्षमस्व.
माझ्या मते पत्रकाराना शूटींग करू द्यावे, जे घटनेनंतर प्रसारीत करता येईल. यामुळे,
१. पोलिसांची व्युहरचना, त्यांचे निर्णय हे बर्याच प्रमाणात गुप्त राखले जातील.
२. लाईव्ह टेलिकास्ट नसल्यामुळे पत्रकारांचे तेथील अधिकार्यांच्या मागे बाईट साथी धावणे आपोआप कमी होईल व पर्यायाने अडथळा कमी होईल.
३. या दरम्यान अगदी मोजक्या बातम्या म्हणजे जसे की अमूक एवढे मारले गेले, अमूक एवढे मुक्त केले वगैरे देता येतील. ( मुळात सामान्य माणसाला तरी आणखी काय हवे असते. )
४. शूटीन्ग केलेले असल्यामुळे सरकार ला खोट्या बातम्या प्रसारीत करून जनतेची दिशाभूल ही करता येणार नाही. ( फक्त सरकारी आकडेच प्रसिद्ध करायचे ठरवले तर आधीच भ्रश्ट सरकार ला आणखीनच मोकळे रान मिळेल.
सर्वात आधी माध्यमांसमोर जाऊन बोलायला मंत्र्यांना आणि पोलीस अधिकार्यांना बंदी घालावी..."मुंबईतील ताज, ओबेरॉय या हॉटेलांतील दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी एनएसजीचे २०० कमांडो दिल्लीहून निघाले आहेत, अशी माहिती गृहमंत्री शिवराज पाटील यांनी वाहिन्यांना मुलाखत देताना बिनदिक्कतपणे दिली." असे म.टा. मध्ये आले आहे. वास्तवीक एन एस जींची संख्या, ते कधी येणार वगैरे जाहीर करायच्या गोष्टी नसतात. पण कदाचीत कपडे बदलण्याच्या नादात गृहमंत्री विसरले असावेत...
त्यातच पुढे असे ही म्हणले आहे की, "... कमांडो हेलिकॉप्टरने उतरवले जात असल्याचे चित्रण वाहिन्यांवर दाखविले गेले आणि एका वाहिनीने तर या इमारतीच्या परिसरात चाललेला गोळीबार हा हेलिकॉप्टरमधून कमांडो उतरवण्याच्या कारवाईवरून दहशतवाद्यांचे दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी केला जात आहे, असे तारेही तोडले."
आता ताजच्या संदर्भात माध्यमांसमोर पोलीस म्हणत आहेत की कारवाई पूर्ण तर एनएसजी म्हणतात की अजून संपलेली नाही...
वास्तवीक एन एस जींची संख्या, ते कधी येणार वगैरे जाहीर करायच्या गोष्टी नसतात. पण कदाचीत कपडे बदलण्याच्या नादात गृहमंत्री विसरले असावेत...
सहमत आहे! ही माहिती अत्यंत गुप्त ठेवायची असते. इन फॅक्ट, कमांडोजचा हल्ला अचानक कधी अन् कसा झाला, ते संख्येने नेमके किती आहेत, हेदेखील ताज-ओबेऱोयच्या अतिरेक्यांना कळायला नको होतं इतकी कमालीची गुप्तता पाळायला हवी होती..!
परंतु पाटीलसाहेब सगळी जाहिरात करून मोकळे..!
तात्या.
अशा वाहिन्यांवरुन प्रसारित होत असलेल्या "अनावश्यक बातम्यांना" आवर घातलाच पाहिजे, आता ह्या बातम्यांचा फायदा डायरेक्ट अतिरेक्यांना होत आहे असा एक कल दिसत आहे, सबब ह्यांना त्वरित ऑपरेशन पासुन दुर ठेवावे ...
नेत्यांचा तर फार मोठ्ठा प्रॉब्लेम आहे, त्यांना समजत नाही कसे वागावे ते.
१ जण येतो आणि अख्खी रणनिती सांगुन जातो ....
१ जण येतो आणि थरथर कापत कशीबशी माहिती देतो, अशा वेळेस आमच्या "नेत्यांना" धीर सोडायचा नसतो, जनता त्यांच्याकडे अपेक्षेने पहात असते तर उलट ह्यांनाच धीर द्यावा लागतो की घाबरु नका म्हणुन ....
१ जण काही गरज नसताना अनावश्यक स्टंटबाजी करुन सगळीकडे फिरत बसतो ...
१ जण अजुन स्वतः काय करायचे आहे याचे भान न ठेवता दुसर्याने कसे वागावे याचा सल्ला देत फिरत असतो ....
बाकीचे आरोप - प्रत्यारोपाच्या घाणेरड्या राजकारणात मग्न आहेत ...
देवा, वाचव रे देशाला ह्यांच्यापासुन !!!!
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
जेव्हा देशावर हल्ला होतो, युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते... जशी मुंबईत झाली होती
त्यावेळी वॄत्तपत्र स्वातंत्र्य आणि चौथा स्तंभ वगैरे गेले तेल लावत. वाहिन्या सरळ ब्लॉक कराव्यात. अरे आम्हाला माहिती मिळाली नाही तरी चालेल. पण ह्या ह**** अतिरेक्यांना तरी नको मिळायला.
प्रतिक्रिया
डान्या,
+१
In reply to डान्या, by ३_१४ विक्षिप्त अदिती
बंदि घालावी
बंदि घालावी
मत दिलेले नाहि.
बरोबर ...
In reply to मत दिलेले नाहि. by ऋषिकेश
तिसर्या पर्यायाला मत दिले आहे
In reply to बरोबर ... by छोटा डॉन
पर्याय क्रमांक १
माफी द्यावी ... पुन्हा मतदान करा !!!
मत दिले नाही...
तुझ्या
In reply to मत दिले नाही... by धमाल मुलगा
सहमत आहे ...
In reply to मत दिले नाही... by धमाल मुलगा
वृत्तनिवेदन
मिडिया
पूर्ण सहमत
लायसन / मानके
मीडिया
सहमत..
In reply to मीडिया by लिखाळ
सहमत..
In reply to मीडिया by लिखाळ
लिखाळ
टीआरपी
इतर..
वृत्तपत्र
२६
दूर ठेवावे
सहमत!
In reply to दूर ठेवावे by आजानुकर्ण
सोनिया,
In reply to सहमत! by ब्रिटिश टिंग्या
अरे वा
In reply to सोनिया, by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
कदाचित
In reply to सोनिया, by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
काल
धन्यवाद सरपंच ...
In reply to काल by विसोबा खेचर
आता खर तर
सुवर्णमध्य
जरासे वेगळे
थोडी गडबड आहे ...
In reply to जरासे वेगळे by अनंत छंदी
मूर्खपणा
१००% सहमत
दोन्ही मते टोकाची
सर्वात आधी...
वास्तवीक
In reply to सर्वात आधी... by विकास
विकासराव आणि तात्यांशी सहमत ...
In reply to वास्तवीक by विसोबा खेचर
जेव्हा