नमस्कारम, मागच्या आठवड्यात दरवर्षीप्रमाणे कोकण दौरा झाला, यावर्षी उकाडा प्रचंड असल्याने ठरलेल्या प्लान मध्ये बरेच बदल झाले.मालवण /तारकर्ली करणार होतो, पण आयत्यावेळी ते रद्द केले. पर्यायी मार्ग मुंबई-पनवेल-टोळफाटा-मंडणगड-दापोली-दाभोळ बंदर –धोपावे(जेट्टी )- गुहागर(मुक्काम)- हेदवी-तवसाळ(जेट्टी)-जयगड-रीळ-मालगुंड-गणपतीपुळे- आरेवारे- रत्नागिरी- पावस –आडिवरे असा ठरला.
सकाळी नेहमीप्रमाणे ५ लाच सगळी तयारी करून बाहेर पडलो. वातावरणात अजिबात गारवा नव्हता. पनवेल सोडून मुंबई-गोवा महामार्गाला लागलो, रस्त्याची इतकी वाईट अवस्था कधीही पाहिलेली नव्हती, जी परिस्थिती २ वर्षांपूर्वी होती, तीच आजही होती. पनवेल –महाड पट्टा अतिशय भयाण अवस्थेत होता, सिंगल लेन सुरु होती, तीही खड्ड्यांनी भरलेली
सूर्योदय
माझी ब्याग मध्येच निघाली ती बांधताना सौरभ
नागोठण्याला नाश्त्याला थांबलो, अतिशय जळजळीत वडा उसळ कशीबशी पोटात ढकलली आणि सटकलो. टोळ फाट्याला, गोवा हायवेला बाय बाय करून आत वळलो, तिथेही तीच परिस्थिती. मंडणगड मार्गे दापोली गाठायला अडीज तास लागले. (६५ किमी) वाटेत हे फणस लगडलेले झाड दिसले
दापोलीतून दाभोळ कडे निघालो. इथे रस्ता जरा तरी बरा होता. दाभोळ ला एक चंडिका देवीचे देऊळ पहिले. भुयारात आत जायचे होते, वाटेत मस्त समया ठेवलेल्या होत्या, त्यांच्या मंद प्रकाशात चंडिकेची उग्र मूर्ती सुरेखच उजळून निघालेली होती. तिथून निघालो सुदैवाने दाभोळ बंदरात लगेचच जेट्टी मिळाली.
सुवर्णदुर्ग शिपिंग कंपनी हि जेट्टी सेवा पुरवते, हि त्यांची साईट
http://carferry.in/
धोपावे ला उतरलो आणि निघालो. सारखे घाट, उतार चढण, अचानक तीव्र वळण याने खूपच वेळ जात होता.रस्ते असून नसल्यासारखे होते.त्याशिवाय वाटेत काही अप्रतिम नजारे दिसत होते, मग सारखे थांबा , क्यामेरा बाहेर काढा यातही वेळ जायचा.
सेल्फी :)
गुहागरला पोचेस्तोवर दुपारचा १ वाजलेला होता. (२७० किमी) किसन ने “परमेश्वरी देवी” भक्त निवासाचा नंबर दिलेला होता त्यांना सांगून एक रूम बुक केलेली होती.
सामान टाकून जेवायला बाहेर पडलो. अन्नपूर्णा नावाचे अतिशय उत्तम हॉटेल म्हणून बर्याच जणांनी सांगितले होते. पण प्रत्यक्षात अतिशय टुकार निघाले.कसेबसे जेऊन परतलो. संध्याकाळी गुहागर बीचवर गेलो. रात्रीचे जेवण जेवण भक्त निवासातच झाले.
सकाळी व्याडेश्वरचे दर्शन घेतले गुहागरात बघण्यासारखे अजून भरपूर होते, पण रूम आज सोडायची असल्याने जाता जाता फक्त हेदवी, बामनघळ करू असे ठरले. नाश्ता आटपून परत सगळे समान बाईक वर बांधले आणि निघालो. उन्ह सॉलिडच होते. हेद्विला बामन घळ पाहिली, सुंदर जागा आहे, समुद्राचे पाणी पण एकदम निळेशार!
रस्त्यातले बरेच लोकं “MH०५” आणि आमचा अवतार बघून काय पोर उन्हात उद्योग करतायेत असले लुक देत होते, काही आपुलकीने चौकशी करत होते. , रोलर कोस्टर सारख्या रस्त्यांवरून कसे बसे तवसाळ बंदरावर पोहोचलो. परत १५ मिनिटे जेट्टी प्रवास करून जयगड ला उतरलो.आता कधी एकदा आडीवर्याला पोचतो असे झालेले.गणपतीपुळ्यात घुसलो आणि एकदम मुंबईत असल्याचा फील आला, हे भयंकर ट्रॅफिकज्याम झालेले , सगळ्या मुंबई, पुण्याच्या गाड्या , देवळाकडे जाणारे रस्ते बंद केलेले, एकूण भर उन्हात भयंकर गोंधळ, या परिस्थितीत देवळात जाणे अशक्य होते. इथून पुढे दोन फाटे फुटतात एक निवळी मार्गे (५२ किमी) रत्नागिरी आणि एक आरे वारे मार्गे (२८ किमी). अर्थात आरे वारे चा रस्ता प्रेक्षणीय होता, कारण अथांग पसरलेला समुद्र सतत साथ देत होता.
(- श्रेय-सौरभ उप्स )
(- श्रेय-सौरभ उप्स )
घाटांचे भयंकर उतार असलेले रस्ते उतरून एकदाचे रत्नागिरीत पोहोचलो. एवढे ७७ किमी पार करायला आम्हाला चक्क ४ तास लागलेले होते, अर्थात हेदवी ला एक तास गेलेला होता. भिडे उपहार गृहात तडस लागेपर्यंत जेवलो, वर प्रत्येकी ३ ग्लास ताक ढोस्ल्यावर जीवात जीव आला. तरी अजूनही ३५ किमी चा प्रवास बाकी होता. चांदण्यातून तो कसा बसा पार पडला . आणि एकदाचे घरी पोहोचलो. महाकालीचे दर्शन घेतले
गेल्या गेल्या काकाने चहा दिला आणि तो पिऊन आंबे काढायला चला असा आदेशही सोडला. झक मारत कोकणी गड्याच्या वेशात बाहेर पडलो.
सहा च्या सुमारास साधारण तीनेकशे आंबे काढले,आणि परतलो.आता काहीही करायची इच्छा नव्हती मस्त अंघोळ केली, आणि बाहेर खुर्च्या टाकून रातकिड्यांचा आवाज ऐकत निवांत बसलो.
आमचे घर
नंतरचा दोन दिवसांचा कार्येक्रम साधारण असा असायचा सकाळी ७ वाजता उठायचे , चा पिऊन काकुस सोबत जांभीत काजूच्या बिया गोळा करायला जायचे, किंवा इतर छोटी मोठी कामे करावीत. दुपारी जेऊन वर सड्यावर जायचे, करवंदानी लगडलेल्या जाळ्या हेर्याव्या आणि मुकाट पुढील एक दोन तास पोटाला तडस लागेपर्यंत करवंद खावीत.
-श्रेय सौरभ उप्स
खाली एक रायवळ आंब्यांनी लगडलेले झाड होते. त्याच्या आंब्यांचा खाली खच पडलेला असायचा, छोट्याश्या चेंडू सारखे दिसणारे ते आंबे, पण चव मात्र कहर, तेही चरायचे. संध्याकाळी वेत्त्ये किंवा गावखडी च्या समुद्रावर जायचे.येताना पेठेतल्या एकुलत्या एक कळकट हाटेलात निवांतपणे चहा घ्यावा आणि डुलत डुलत घरी यावे.रात्री काका तबला काढायचा मग मस्त गाण्यांची मैफिल जमवायची .
वेत्त्याचा समुद्र
निघायचा दिवस आला तसा अचानक एकदम कंटाळाच आला, परत मुंबईत परतायचे,रोजचे लोकलचे धक्के, तीच टुकार नोकरी , आता जायचे तेही आता मुंबई गोवा हायवे ने. काका म्हणाला तुम्ही होतात ते ४ दिवस मजेत गेले, आता परत मी एकटाच...
गड्याने रात्री आमच्या गाड्यांवर सर्व समान कचकून बांधून दिले. त्यावर आम्ही सोबत आणलेल्या बंजी रोप लावल्या. भल्या पहाटे बरोब्बर ५ ला परतीच्या प्रवासाला निघालो, साधारण ६:३० रत्नागिरी सोडून हायवेला लागलो, महाड येईपर्यंत आता काळजी नव्हती, रस्ता एकदम मक्खन होता. आणि चक्क पूर्ण रस्ता रिकामा होता, मधलाच दिवस असल्याने कदाचित वाहतूक नव्हती.पहिल्यांदाच मनासारखी बाईक पळवायला मिळाली. ९ वाजता खेड ला पोचलो पण, कशेडी पण त्याच वेगात ओलांडून खाली आलो. पोलादपूर महाड ओलांडले आणि परत तो घाणेरडा रस्ता सुरु झाला. अपोआप वेग कमी झाला आणि साधारण २ च्या सुमारास रडत रडत घरी पोचलो.
टिपा : इतके भयंकर घाट रस्ते असूनही १५० सीसी च्या बाईक ने ५० चे माईलेज दिले, (२ वर्षांपूर्वी जेमतेम ४० दिलेला होता )
ज्यांना लेह लदाख ला जायचा सराव करायचा आहे त्यांनी पनवेल-महाड-मंडणगड-दापोली असा रूट करावा
कार साठी जेट्टी प्रकार जाम डेंजर वाटला, जे कार चालवण्यात प्रो आहेत त्यांनीचे तो प्रकार करावा, जेट्टीत कार चढवणे आणि उतरवणे महाभयंकर काम आहे.
आमची मालगाडी

वाचने
16855
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
तो निळा समुद्र कुठे आहे नक्की
दापोली पासून पार रत्नागिरी
In reply to तो निळा समुद्र कुठे आहे नक्की by टवाळ कार्टा
झकास्स रे ! समुद्राचे सगळेच
In reply to दापोली पासून पार रत्नागिरी by स्पा
वाह!!!
सुंदर !
बाकी
In reply to सुंदर ! by प्रसाद गोडबोले
नेहमीप्रमाणे सुंदर फोटो ...
खूप छान
मस्तच, प्रवास वर्णन आणि
फार भाग्यवान आहात हो.. (आहेस
जबराट
धन्यवाद.
ओके!!
गाववाले मस्त लिहिलेत.. घरची
एखाद्याचा हेवा वाटूनच जीव
भारी आहे वृत्तान्त.
झक्कास. तुझे घर एकदम झक्कास
लई भारी
फोटो नं ९ अप्रतीम. कॅमेरा
निकॉन डी ३१०० १८-५५ मिमी
In reply to फोटो नं ९ अप्रतीम. कॅमेरा by काळा पहाड
फारच आवडले.दुचाकी सर्व खड्डे
मस्तं!
अरे व्हाट फोटो, व्हाट फोटो...
मस्त
हुच्च हुच्च हुच्च!!!
दाभोळ ला एक चंडिका देवीचे
मस्त रे स्पावड्या!
कोकणातले घर काय मस्तं आहे आणि
सुंदर
एक नंबर फोटो आहेत
@दुपारी जेऊन वर सड्यावर जायचे
अप्रतिम फोटोज.
लै भारी वर्नन आणि फोटो !
स्पा आणि सौरभ उप्स चे फ़ोटो
तुम्ही कोकणाचा आनंद
त्यांना दोन्ही करायचं असेल.
In reply to तुम्ही कोकणाचा आनंद by सतिश गावडे
काही प्रश्न
हेदवी
In reply to काही प्रश्न by नाखु
रत्नांग्री
अतिशय सुंदर फोटो आणि तितकेच
अतिशय सुंदर फोटोज!!
खुप मस्त
लै भारी रं बाला!
कडक फोटो !!!!!
महेल, पुन:प्रत्ययाचा आनंद
खुप खुप मस्त फोटो.
फोटो अप्रतिम. सुंदर! वर्णन
झक्कास ट्रिप झाली आहे. फोटो
खूप छान फोटो आणि व्रुत्तांत..
कोकणातील भटकंती आवडली.
फोटो
फोटो अप्रतीम!
सुंदर फोटोज आणि मस्त वर्णन
सर्व फोटोज आवडले
+१
In reply to सर्व फोटोज आवडले by ज्ञानोबाचे पैजार
@बहिनीच्या अजोळी >>> हे
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
मस्त प्रवासवर्णन.....
दीपक चा पत्ता मिळू शकेल काय?
In reply to मस्त प्रवासवर्णन..... by मुक्त विहारि
दीपकचा पत्ता....
In reply to दीपक चा पत्ता मिळू शकेल काय? by स्पा
सुरेख
स्पा
वाह.....मस्तं!!!
झक्कास!
त्यालाही फोन लावत होतोच,
In reply to झक्कास! by पैसा
स्पा अरे तुला लिस्टमध्ये
जलन...
वा, रत्नागिरीत येऊन गेलात...
फोटो बघुन डोळे निवले.