सुचना : धाग्यात फोटो खुप जास्त आहेत, पूर्ण उघडण्यास वेळ लागू शकतो
भारतातील सर्वात मोठा नंदी, लटकणारा खांब, मुरल पेंटिंग आणि सुंदर शिल्पकाम इतक्या सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी पाहायची संधि मिळते लेपाक्षीला. लेपाक्षी हे आंध्रातील अनंतपूर जिल्ह्यातील एक गाव. बेंगलोरपासून जवळपास १५० किमी अंतरावर. ह्या गावात विजयनगर काळातील विरभद्राचे मंदिर आहे.
लेपाक्षीचे पौराणिक महत्व असे सांगितले जाते की, रावण ज्यावेळी सीतेचे हरन करून नेत होता तेंव्हा जटायूने त्याच्याशी युद्ध केले. रावणाने जटायुचे दोन्ही पंख कापून टाकले आणि जटायु जमिनीवर कोसळला. आणि ती जागा लेपाक्षी. पुढे राम सितेच्या शोधात इथे आले आणि त्यांना जखमी अवस्थेतील जटायुने सर्व व्रुतांत सांगितला. रामाच्या आशीर्वादाने त्याला इथे मुक्ती मिळाली. सती आणि महादेवाचा विवाह इथेच झाला. आणि अगत्स्या मुनींनी इथे वीरभद्राची स्थापना केली.
मंदिराचा इतिहास. विरुपन्ना आणि विरान्ना नायक हे दोघे भाऊ विजय नगर साम्राज्याचे खजिनदार होते. त्यांनी विरभद्र स्वामींची मूर्ती सापडल्यावर त्यांनी मंदिराचे निर्माण करायचे ठरवले. आणि त्यासाठी राज्याचा खजिना राजाची परवानगी ने घेता वापरला. मंदिराचे बांधकाम अर्ध्याहून अधिक पूर्ण झाल्यावर राजाला ही बातमी समजली. चिडलेल्या राजाने विरुपन्नाचे डोळे फोडण्याची सजा सुनावाली. विरुपन्नला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला आणि त्याने स्वत:च चाकून आपले डोळे काढले. मंदिराचा निर्माण अर्ध्यावरच थांबला. मंदिराचे तीन मुख्य भाग आहेत. गर्भगृह, नाट्य मंडप आणि कल्याणमंडप. कल्याणमंडपाचे बांधकाम पूर्ण झाले नाही.
मंदिर एका उंच चबुर्यावर बांधले आहे.
थोड्या पायर्या चढून वर गेल्यावर मंदिराचे प्रवेशद्वार दिसते
आत गेल्यावर मुख्य मंदिर
प्रवेशद्वारावरील अप्सरांचे फोटो.
प्रवेशद्वारातून आतील नजारा
नाट्यमंडप
नाट्यमंडपातील सर्व खांबांवर विविध मूर्त्या कोरल्या आहेत. आणि इथच दडलं आहे एक आश्चर्य. हँगिंग पिलर अर्थात छतातून लटकनार एक खांब. त्याचा थोडासा इतिहास पाहूया. ह्या मंदिराचे रचनाकार होते विश्वकर्मा ब्राह्मण. विजयनगर साम्राज्यातील बर्याच मंदिरांचा निर्माण विश्वकर्मा ब्राह्मण करत. ह्या मंदिरात प्रत्येक खांबावर विविध मूर्त्या कोरल्यामुळे निर्माण मंदिराचा समतोल बिघड्ला. तो पूर्ववत करण्यासाठी हा खांब छतामधून लटकवण्यात आला. हा खांब पूर्वी सरळ होता. इंग्रजांच्या काळात कुण्या एका इंजिनियर अधिकार्याने मंदिरा भेट दिली, हा लटकता खांब काय त्याला पटेना. त्याने अव़जड यंत्रे वापरून खांब हलवण्याचा प्रयत्न केला. त्याबरोबर मंदिरातील इतर खांब हलू लागले. काहि तिरपे झाले तर काही जागच्या जागी फिरले. खालच्या फोटोतील हाच तो मधला खांब. आजही कापड किंवा कागद खांबाखालून आरपार नेता येते.
मंदिरच्या बाजूला असणारा अर्धवट राहिला कल्याण मंडप. इथे शिव-सतीच्या विवाह सोहळा उभारण्यात येणार होता.
मंदिराच्या मागे एक भव्य नाग आणि शिवलिंग आहे. हे कामगारांनी त्यांच्या फावल्या वेळेत बनवले होते.
आणि मंदिराबाहेर असलेला प्रचंड मोठ नंदि.
आता मंदिरातील इतर फोटो
पुन्हा एकदा नागलिंगेश्वर
मंदिराचे भव्य पटांगण
अर्धवट बांधकाम
मंदिराचा कळस
कार्तिकेय
मंडपातील खांबावर कोरलेले देव
लक्ष्मीची मूर्ती
लक्ष्मीचा क्लोज अप
नागलिंगेश्वराच्या मागे असलेला मोठा गणपती
मंदिराचा आवार
अर्धवट मंडप
आता मंदिराच्या आतील फोटो
नर्तिका
तीन पायांचा भृंगी. हा देवांचा नृत्य शिक्षक.
किती मस्त पोझ आहे पाहा
बाजूने फोटो
महादेव भिक्षुकाच्या वेषात.
चंद्रदेव
सती महादेवाला भिक्षा देताना
मंदिराच्या आवाराचे फोटो
मंदिराच्या छतावरील रंगकाम
लेपाक्षी फारच छोटं गाव आहे. जेवणाची फारशी सोय इथं नाही. बेंगलोर हैद्रबाद हायवेवर जेवण करणे जास्त सोईस्कर राहील.

वाचने
9485
प्रतिक्रिया
32
मिसळपाव
प्रतिक्रिया
अतिभव्य आणि अतिसुंदर !
+१
In reply to अतिभव्य आणि अतिसुंदर ! by सस्नेह
हे ठिकाण माहितच नव्हते.खूप
धागा
सुदैवाने दक्षिणेत हे खुळ
In reply to धागा by नाखु
किती सुंदर मुर्त्या आहेत?
एकदा सत्ता हातून गेलीकी, असा
In reply to किती सुंदर मुर्त्या आहेत? by स्पंदना
फोटो सुंदर आलेत.
नंदी आणि नागोबा ए वन!
आहाहा !!! सुंदर !!!!
अप्रतिम
अप्रतिम!!!आणि धन्यवाद!!!
सुंदरच आहे मंदिर.
प्रवेशद्वारावरील मूर्ती
In reply to सुंदरच आहे मंदिर. by प्रचेतस
अप्रतिम
बरोबर आहे तुमचं. पुढल्या
In reply to अप्रतिम by कपिलमुनी
बस्स एकच शब्द....
भव्य!
नजरेस आणून दिल्याबद्दल
In reply to भव्य! by जुइ
फारच सुंदर आहे हे मंदीर.
पाच सात फोटो इथे देऊन बाकीचे
अप्रतिम
तुमच्या "हित यादीत"
In reply to अप्रतिम by चौकटराजा
भन्नाट
अप्रतिम ....
फारच सुरेख.
रंगवलेली चित्रं आवडली.
अप्रतिम आहे, चित्रे फार आवडली
अप्रतिम लेख आणि वर्णन.
अप्रतीम. नागलिंगेश्वर आणि
फिरूनच आलो की !
खूप सुंदर!