भाग -१, भाग -२
आज आमच्या सहलीचा दुसरा दिवस.इथुन पुढचे दोन दिवस आम्ही नेपल्समध्ये असणार होतो.आज जाताना आधी पाॅम्पे मग सोरेंतो करुन नेपल्सला हाॅटेलला मुक्काम असणार होता.
रोम नेपल्स साधारण तीन तासाचं अंतर आहे बसने.सगळा ग्रुप अगदी वेळेत ब्रेकफास्ट करुन हजर होता.या हाॅटेलच्या ब्रेकफास्ट मेनुमध्ये मस्त केक्स होते.चीज केक,आॅरेंज अपसाइड डाऊन,काॅफी केक,पायनॅपल सिरप टाकलेला केक,चाॅकलेट केक बर्याच व्हरायटी होत्या.शिवाय फ्रेशली बेक्ड गरम गरम क्राॅसाँ! सर्व गोष्टींची चव घेऊनच पोट भरलं!आणि भरल्या पोटी बसमध्ये विराजमान झालो.
बराच वेळ प्रवास होणार असल्याने आमच्या टुर लिडरने सर्वाना एक एक करुन ओळख करुन घ्यायला बोलावलं.ओळखी सुरु झाल्या आणि कळालं की ग्रुपमध्ये सर्वात जास्त डाॅक्टर्स आहेत! सुरुवातीला प्रत्येक डाॅक्टर अभिमानाने आपली स्पेशालिटी, आवडी इ. सांगत होते.हळुहळु दहा एक डाॅक्टर होऊन गेल्यावर उलट सुरु झालं.गेल्या जन्मीच्या पापाची कबुली दिल्यासारखे एकएक जण ओशाळुन मीही डाॅक्टर आहे सांगु लागले आणि त्यांनी मी डाॅक्टर आहे सांगीतले की बसमध्ये एकच हशा पिकु लागला! आणि अडाॅक्टर लोक पुढे होऊन अभिमानाने मी डाॅक्टर नाही आधीच सांगतो म्हणून क्लिअर करायला लागले!!मग मस्त अंताक्षरी सुरु झाली.आमच्या बरोबरचे सर्वात सिनियर 75 वर्षाचे आजोबा दणक्यात नवी जुनी गाणी म्हणायला लागले! भेंड्या लावुन भांडाभांडी करत असताना खिडकीतुन बाहेर एक त्रिकोणी दोन शिखराचा डोंगर जवळ येताना दिसु लागला.त्याचा भोवताल हिरवागार आणि डोंगर मात्र बोडका.एकदम ट्युब पेटली ,अरे! हा तर व्हेसुव्हियस आला! पाॅम्पेचा सर्वनाश करणारा तेव्हाचा खलनायक. ढगांची खोळ पांघरुन शांत दिसणार्या या ज्वालामुखीने तिसरा डोळा उघडुन हाहाःकार उडवला होता हे पाहुन वाटतच नाही!
(बसच्या काचेतून काढलेला फोटो आहे हा!)
बघता बघता बस पाॅम्पेच्या पार्किंगला आली.आम्ही नेपल्समध्ये आल्याने आता पुढचे दोन दिवस निओपोलिटन जेवण मिळणार होते.आधी जेवुन मग पाॅम्पेवर स्वारी करायची होती.जेवणाचा ठराविक मेन्यु होता.आधी व्हेज सुप मग पिझ्झा ,पास्ता मग आईसक्रिम.जोडीला हवी असल्यास वाईन किंवा साॅफ्ट ड्रिंक्स.व्हेसुव्हियसचा हा भाग उत्तम वाईनसाठी प्रसिध्द आहे!या भागत मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड होते.प्रसिद्ध लॅक्रिमा क्रिस्ती डेल व्हेसुवियो वाईन इथली.लॅक्रिमा क्रिस्ती म्हणजे ख्रिस्ताचे अश्रू !!(साहजिकच आहे म्हणा.वाईनला नाव दिल्यावर आले असतील ;))इटालिअन पिझ्जावर कुठेच टाॅपिंग नसते हे ज्ञान तिथे मिळाले! ती म्हणे अमेरिकनांनी बिघडवलेली पध्दत.इथे पिझ्झावर साॅस ,चीझ,आॅलिव्ह आॅइलची धार.बेस मात्र खरपूस भाजलेला भट्टीमध्ये.पास्तामध्ये देखिल पास्ता साॅस, बेसिल लिव्ह्ज आणि इटालियन हर्ब्ज.वरुन पार्मेसान चीजची पावडर घालुन घ्यायची.पिझ्झाचा जन्मच नेपल्सचा असल्याने नेपल्सवासी आपण करतो तोच पिझ्झा सर्वश्रेष्ठ मानतात!! (नेपल्स इटलीचे पुणे तर नाही!) मांसाहारी लोक कालवं आवडीने खात होते.तो माझा प्रांत नसल्याने मी काही नीट बघितलं नाही! आजुबाजुला गिटार घेउन लोक गात फिरत होते.समोरच्या अमेरिकन ग्रुपने अनेक युरोची टीप देऊन त्यांना खूश करून टाकले.आम्ही भारतीय बाण्याने त्यांच्याकडे निटस दुर्लक्ष केले!
मला मात्र तो पिझ्झाही आवडेना आणि पास्ता घशाखाली उतरेना!वाईन तेवढी छान होती पण तिने पोट नाही भरता येत ना! मोठ्या कष्टाने मी पोटभरीसाठी त्या पिझ्झाचे तुकडे मोडले! (गाढवाला गुळाची चव काय म्हणले तरी चालेल पण मला पिझ्झा आणि पास्ता खायला अजिबात आवडत नाही!!)
तर असे जेवण करुन बाहेर आल्यावर सर्वाना आॅडिओ गाईड दिले गेले.त्याचा माईक आमचा गाईड मार्कोकडे असणार होता.त्याने सांगायचे आम्ही ऐकत कळपाने त्याच्या मागे फिरायचे अशी योजना होती.
मार्को!! एक अलिखित सत्य असं आहे की बायकांची टकळी त्यांच्या नवर्यापेक्षा हॅन्डसम माणसापुढे बंद होते आणि बायकोपेक्षा सुंदर स्त्री असेल तर अबोल पुरुष अचानक बोलु लागतात ;)
इथे हा आमचा मार्को तर साक्षात ग्रीक गाॅड दिसत होता! त्यामुळे शांतता पसरली एकदम!! त्याचा आवाजही सुरेख होता आणि सांगायची आवड.त्यामुळे त्याने पाॅम्पेची पूर्वपिठिका जाता जाता रस्त्यात सांगायला सुरुवात केली.
पाॅम्पे हे समुद्राकाठचं गाव.गावाचं बंदर व्यापारीदृष्टीने महत्त्वाचं.त्यामुळे समृध्द.त्यात व्हेसुव्हियसच्या सान्निध्यामुळे अतिशय सुपिक जमिन.त्यामुळे इथे रोमन सम्राटांपासुन अनेक धनिकांची घरं.मोठी बाजारपेठ असणारं टुमदार गाव.इ स 79मध्ये अचानक आले व्हेसुव्हियसच्या मना,त्यातुन मोठे स्फोट होऊ लागले.विवरातुन मोठ्या प्रमाणात राख उडु लागली.या राखेचा थर 20 फुट! त्याखाली आख्खं शहर त्यातल्या माणसा प्राण्या व्यापारउदिमांसह चिणलं गेलं.त्यानंतर अनेक शतकं हे असंच झाकलेलं राहिलं.ते एकोणिसाव्या शतकात केल्या गेलेल्या उत्खननात उघडकीला आलं त्याकाळातली संस्कृती अक्षरशः राखेखाली गोठलेली मिळाली. या तांडवातुन वाचलेले लोक अगदी कमी.गावच्या गाव मरणोन्मुखी पडलेलं.त्यात प्राण्यांपासुन सर्वांची शवं सापडली.ती राखेत दबली गेली असल्याने त्यात पोकळ्या तयार झालेल्या. संशोधकांनी त्यात प्लॅस्टर ओतुन त्याच्या प्रतिकृती जमवल्या आणि नजरेसमोर आली भयानक वेदनादायक मृत्युला सामोरी गेलेली आख्खी संस्कृती.तिथल्या म्युझियममध्ये यातल्या काही गोष्टी बघायला मिळतात.पाय बांधल्याने जागच्या जागी होरपळलेलं कुत्रं शहारा आणुन गेलं .पुढच्या रकान्यात तर पोट जिवाच्या आकांताने धरुन ठेवलेली गरोदर स्त्री तर हात बांधुन बसल्या अवस्थेत मरुन गेलेल्या माणसांची प्लास्टर कास्ट . मरणाच्या तांडवाची ती दाहकता बघवत नाही.त्याचबरोबर तिथे त्याकाळात वापरले जाणारे अनेक रांजण,चुली,संगमरवरी आसनं,स्वैपाकाची मातीची भांडी अशा बर्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत.त्या काळातल्या जीवनमानाची नीट कल्पना येते.
(जालावरून साभार)
येतानाच्या मार्गावर प्रथम लागते ते तिथले अॅम्फिथिएटर.रोमन संस्कृती जिथे आहे तिथे अॅम्फिथिएटर असतेच.सम्राटाचा वेगळा कक्ष अाणि उघडलेल्या जपानी पंख्याच्या आकारात पायर्यांची उतरंड अशी रचना आहे.इथे नाटकांचे प्रयोग होत.राजवाड्याचा देखावा तर दोन मजली असे.त्याभोवती सुंदर पुतळे ठेवलेले असत.हे अजूनही चांगल्या अवस्थेत टिकलेले आहे.इथे दर वर्षी पॉम्पेचा संगीत महोत्सव होतो.
(जालावरून साभार)
त्याच्या आधी तिथली व्यायामशाळा दिसते.रोमन बलोपासना करणारे असल्याने तीही आवश्यक असे.मार्को हे सर्व पूर्वी कसे दिसत असेल हे चित्र दाखवत छान समजावुन सांगत होता.
पुढे चालत आलो,बाजारपेठेत रायगडावरच्या बाजारपेठेसारखीच जरा उंचावर दुकानं.
अजुनही पूर्वीचाच दगडी रस्ता वापरात आहे.त्यावर रथांच्या चाकाच्या खुणा दिसतात.
प्रथम लागला तेव्हाचा पिझ्झेरिया! गोल पाव भाजायची भट्टी शिल्लक आहे.बाकीचे तपशिल मनाने रंगवायचे आणि चित्रं पहायची!
.
रस्त्यात चौक येई तिथे असे दगडी स्पिडब्रेकर दिसतात,रथांना आवर घालणारे!
(आंतरजालावरून साभार)
एका दुकानात रांजण दिसतात भिंतींच्या आत घातलेले.इथे त्या काळातली सर्वात महाग गोष्ट मीठ विकले जायचे.कारण बर्फ ,मांस टिकवायला मीठ सर्वांनाच लागे.सॅलॅरियम या लॅटिन शब्दावरुन सॉल्ट हा शब्द आलाय.पुर्वी रोमन सैनिकांना त्यांचा पगार हा मीठ विकत घेण्यासाठी दिलेली रक्कम म्हणजे आजची सॅलरी असा मिळत असे!
इथुन पुढे वळण घेऊन रस्ता आला हमामखान्यापाशी.इथे स्त्रीया पुरुषांचे वेगवेगळे हमाम आहेत.त्यात गार पाण्याचे हौद,वाफ घेण्यासाठी(सौना बाथ) लाकडी फळी असणार्या खोल्या,गरम पाण्याचे हौद असणार्या खोल्या आहेत.त्यावर सुंदर चित्र म्हणजेच फ्रिस्कोज आहेत.मस्त सौना घेऊन संगीताच्या साथीवर सुस्नात होणारे रोमन्स होते खरे रसिक!फ्रिस्को म्हणजे ओल्या प्लास्टरवर केलेले रंगकाम.इथे फ्लॅश वापरता येत नसल्याने जमतील तसे फोटो काढले आहेत.

हाच रस्ता पुढे फोरमला जाऊन मिळतो.इथे मोठा चौक लागतो.त्या काळात तो पुर्णतः संगमरवरी फरशांनी आच्छादलेला असे.समोर व्हेसुवियस.त्याच्या पार्श्वभूमीवर ज्युपिटरचे मंदिर.इथल्या तळघरात त्यांचा खजिना असे.एका बाजूला इथली बॅसिलिका,न्यायालय आदी महत्वाच्या इमारती.दुसर्या बाजूला अपोलोच्या मंदिराचे शुभ्र खांब उभे आहेत.
असं हे नांदतं गाजतं गाव ऐन वैभवाच्या शिखरावर असताना त्यावर काळाचा घाला पडला.दोन हजार वर्षापूर्वीची ती संस्कृती बघताना सतत हुरहुर वाटत राहाते.अचानक असे संकट आल्यावर काय झालं असेल त्यांचं.आयुष्य क्षणभंगूर आहे का म्हणतात ते इथे येऊन पटतं.क्षणात होत्याचं नव्हतं होउन गेलं.मात्र इथल्या भित्तीचित्रांचं आणि कोरीवकामाचं फारसं कौतुक वाटलं नाही.कारण या काळात भारतात अत्यंत सुंदर चित्र आणि शिल्प निर्मिती होत होती.भारतातून सोन्याचा धूर निघण्याचे दिवस ते!
रमतगमत पॉम्पे बघत बसकडे परतलो.परतताना स्मरण वस्तूंची दुकानं दिसली आणि इतका वेळ तोंडाला कुलूप घालून फिरणार्या, इटलीला आलो हे सांगण्यासाठीच फक्त आलेली काही मंडळी, शॉपिंगचा विरह सहन न झाल्यासारखी त्या दुकानांकडे धावली!! आम्ही पुढे जायचे असणारे सोरेंतो कसंय त्याचा विचार करत बसकडे आलो.एकदाची मंडळी ग्रूप लिडरने पकडून आणली आणि बस व्हेसुवियसला वळसा घालत सोरेंतोकडे निघाली.कसं आहे सोरेंतो पाहिलच नव्हतं नेटवर,इथे येण्याआधी!अचानक समोर समुद्र ,मागे व्हेसुवियस आणि एक अप्रतिम सुंदर देखावा नजरेसमोर आला.सोरेंतो! पुढच्या भागात...
माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग ४ -सोरेंतो,काप्री-ब्लू ग्रोटो

वाचने
24810
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहाहा
+1
In reply to अहाहा by श्रीरंग_जोशी
अगदी अगदी! जियो अजया ताई.
In reply to अहाहा by श्रीरंग_जोशी
+१११
In reply to अहाहा by श्रीरंग_जोशी
+९९९
In reply to अहाहा by श्रीरंग_जोशी
+११
In reply to अहाहा by श्रीरंग_जोशी
मीठाची गोष्ट भारी वाटली.
माहिती व फोटू आवडले. आजकाल
छान.
माहिती आवडली!
सुंदर!
विनोदी निरीक्षणासह गमतीदार
लय भारी!
डिट्टॅलवार वर्णन अगदी आवडलेले
मस्त! खुसखुशीत!
एकदम जबराट लेख.
भारतात सापडणारी राख इ स ७९
In reply to एकदम जबराट लेख. by प्रचेतस
नविनच माहिती मिळाली ही.
In reply to भारतात सापडणारी राख इ स ७९ by डॉ सुहास म्हात्रे
तोबा

बापरे! काय उद्रेक असेल,
In reply to भारतात सापडणारी राख इ स ७९ by डॉ सुहास म्हात्रे
बहुधा हा तोच उद्रेक होता
In reply to बापरे! काय उद्रेक असेल, by रेवती
बापरे!पाॅम्पेची राख
होवू शकते
In reply to बापरे!पाॅम्पेची राख by अजया
रच्याकने, अधिक शोध घेता घेता
In reply to होवू शकते by श्रीरंग_जोशी
अप्रतिम लेख आणि त्याच्याहुन
वाह मस्तच
सुरेख्,मी शाळेत असताना सहावीत
मस्त चालली आहे सफर !
जियो
वाह! क्या बात है !
फिरायला जावं तर असं जावं.
वाह ! तुझे कौतुक करायला शब्द
धागा वर आणतोय.
त्सुनामीतुन धागा वर काढणारे
आठवणी जागवल्या
सुरेख अजया.पोम्पेइ बद्दल
पोम्पई बद्द्ल खुप
Pompeii चित्रपट पहा. भयानक
ग्रीक गॉड मार्को
:)
भाग २ व ३ वाचले. लेखनशैली छान
प्रवास वर्णन आणि इतिहास याचा
तुमची लिहिण्याची शैली फारच छान आहे...
मस्त भाग ताई..आमचे वेळेअभावी
हा भागही खुप छान जमलाय..आता
सुंदर
पाँपेई....
वाह
In reply to पाँपेई.... by प्रभाकर पेठकर
+१
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
सुंदर माहितीपूर्ण प्रतिसाद !
In reply to पाँपेई.... by प्रभाकर पेठकर
उत्तम.
_/\_पेठकर काका.
वाचतोय..., पेठकर काकांचा
लेख व प्रतिसाद वाचनीय...
मस्त जमला आहे हा भाग पण.