Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by उगा काहितरीच on Fri, 05/22/2015 - 18:30
आपल्यापैकी कितीजण मराठीत अंक व्यवस्थीत लिहु शकतात ? असतील थोडेफार सन्माननिय अपवाद. पण बहुतेक जण तर नाही लिहु शकणार. आपली मराठीत अंक वगैरे लिहीण्याची सवयच मोडली असे नाही का वाटत ? मराठी ५ व्या इयत्तेत असल्या पासुनच आपण इंग्रजीतच अंक लिहीत आलोय. बहुतेक लोकांच्या ऑफिसमध्येही आकडेमोड इंग्रजीतच होते. त्यामुळे साहजीकच आपली मराठीतुन अंक लिहीन्याची सवय मोडली. द्या सोडुन ! whatsapp , facebook, किंवा इतर कुठल्याही messenger वर चॅटींग करताना किती जण मराठीत करतात ? उगा इंप्रेशन मारायला नाही , कामासाठी आवश्यक असनारी चॅटींग जसेकी कुठ आहेस, कधी येतोय वगैरे. असतील थोडेफार महाभाग पण बहुतेक जण तर kuthay ? kadhi yenar ? असंच करत असतात. आहे सोपं इंग्रजीत लिहीनं , बहुतेक सर्व अ‍ॅप करतात मस्त सपोर्ट इंग्रजीला. म्हणुन पडली सवय. द्याना सोडुन ! खरंच हे सोडुन देणं म्हणजे आपल्या लिपीला सोडुन देणं नाही का ? मी भाषा नाही म्हणत - बोलतो आपण पूष्कळ मराठी. पण लिपीच काय ? ती टिकेल का ? ती टिकन्यासाठी काय करता येईल असे तुम्हाला वाटते ? का कुठे लावुन ठेवावा एखादा रोझेटा स्टोन? :( डिसक्लेमर... माझा इंग्रजी ला विरोध नाही . इंग्रजीची अनिवार्यता मला माहीत आहे. इंग्रजी न शिकणे म्हणजे काळाच्या किमान १०० वर्षे मागे जाणे . इंग्रजी न वापरणे म्हणजे सहजासहजी उपलब्ध असणारे ज्ञानसाठे नाकारणे. ढिगाने उपलब्ध असणारे चित्रपट, संगीत, साहित्य व तंत्रज्ञान नाकारणे. रोझेटा स्टोन
  • Log in or register to post comments
  • 7505 views

प्रतिक्रिया

Submitted by आजानुकर्ण on Fri, 05/22/2015 - 18:39

Permalink

अंकांबाबत

इंग्रजी आकडेमोड म्हणजे काय हे नक्की कळले नाही. इंग्रजी अंक म्हणजे रोमन अंक. (I II III IV V वगैरे) मी कधीही इंग्रजीतून आकडेमोड केली नाही. माझ्या माहितीतील कोणीही या अंकांचा वापर करुन आकडेमोड करत नाही. तुम्ही ज्याला इंग्रजी अंक म्हणताय (1 2 3 4 5 वगैरे) ते हिंदू-अरेबिक अंक आहेत. हिंदुस्तानातून (मुस्लिम जगामार्गे) पाश्चात्य जगात पोचलेले अंक. आता तुम्हाला हिंदू अंक टिकावे वाटताहेत की मराठी अंक टिकावे वाटताहेत हे आधी ठरवावे लागेल असे वाटते. ;) मराठीतून अंक लिहिल्याने नक्की काय साध्य होईल तेही सांगा.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 05/22/2015 - 18:54

In reply to अंकांबाबत by आजानुकर्ण

Permalink

सॉरी माहीत नव्हतं...

इंग्रजी अंक म्हणजे रोमन अंक. (I II III IV V वगैरे) मी कधीही इंग्रजीतून आकडेमोड केली नाही. माझ्या माहितीतील कोणीही या अंकांचा वापर करुन आकडेमोड करत नाही. तुम्ही ज्याला इंग्रजी अंक म्हणताय (1 2 3 4 5 वगैरे) ते हिंदू-अरेबिक अंक आहेत. हिंदुस्तानातून (मुस्लिम जगामार्गे) पाश्चात्य जगात पोचलेले अंक.
हे माहित नव्हतं ! धन्यवाद नवीन माहितीबद्दल.
मराठीतून अंक लिहिल्याने नक्की काय साध्य होईल तेही सांगा.
मी आग्रह नाही करत आहे. केवळ उदाहरण दिले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 05/22/2015 - 21:05

In reply to सॉरी माहीत नव्हतं... by उगा काहितरीच

Permalink

रोमन आकडे माहित नाहित???

रोमन आकडे माहित नाहित???
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 05/22/2015 - 23:14

In reply to रोमन आकडे माहित नाहित??? by टवाळ कार्टा

Permalink

ओ साहेब , ते अरेबिक वगैरे

ओ साहेब , ते अरेबिक वगैरे नव्हतं माहीत . आम्ही समजायचो १ २ ३ ४ म्हणजे मराठी आणि 1 2 3 4 म्हणजे इंग्रजी . रच्याकने तुम्ही रोमन अंकानी आकडेमोड करता का ?
  • Log in or register to post comments

Submitted by स्वप्नांची राणी on Mon, 05/25/2015 - 00:20

In reply to ओ साहेब , ते अरेबिक वगैरे by उगा काहितरीच

Permalink

ओ साहेब, तुम्ही उगा काहितरीच

ओ साहेब, तुम्ही उगा काहितरीच च्यालेंज देऊ नका हां टकाला...
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 05/22/2015 - 18:46

Permalink

ढिगाने उपलब्ध असणारे चित्रपट,

ढिगाने उपलब्ध असणारे चित्रपट, संगीत, साहित्य नाकारणे >> हितेश मोड ऑनः नाकारल्याने काही फरक पडत नाही. हितेश मोड ऑफ.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 18:48

Permalink

च्यायला, हा लेख देवनागरीत

च्यायला, हा लेख देवनागरीत लिहून एकप्रकारे तुम्हीच लेखातल्या भावनेच्या विरुद्ध बोलताहात असं वाटत नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 05/22/2015 - 20:23

In reply to च्यायला, हा लेख देवनागरीत by बॅटमॅन

Permalink

मोडी

पुन्हा एकदा मोडीलिपीत लिहायची वेळ येणार रे बॅटमना.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 20:28

In reply to मोडी by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

आयला मज्जाच की हो मग माई. मग

आयला मज्जाच की हो मग माई. मग पुन्हा एकदा ध चा मा होणार. ध चा मा कशाला, लो चा के सुद्धा होईल. कारण मोडी लिपी ही लिहायला जितकी सोप्पी तितकीच वाचायला अवघड आहे. =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 05/22/2015 - 20:30

In reply to आयला मज्जाच की हो मग माई. मग by बॅटमॅन

Permalink

उदा.

"ते समयी बाजीरावसाहेबांसमवेत २०० लोक होते" ऐवजी "ते समयी बाजीरावसाहेबांसमवेत २०० केक होते" असं वाचता येतं. त्यामुळे केकचा शोध गोर्‍यांच्या अगोदर खुद्द पेशवाईतच लागलेला आहे असे नवीन संशोधनही येऊ शकते. =))
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Sat, 05/23/2015 - 21:16

In reply to उदा. by बॅटमॅन

Permalink

बेकार हसलो ; )

बेकार हसलो ; )
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 05/22/2015 - 21:24

Permalink

मी व्हत्सप्प्स वर मराठीत

मी व्हत्सप्प्स वर मराठीत लीहीतो. कोणाला अँड्रॉईड्वर मराठीत टंकायचे असेल तर मदत करायला तयार आहे. मराठीत लीहील्याने वाचायलाही सोपे जाते (हा माझा अनुभव आहे) मोठ्मोठे मराठी लेख जर रोमन लिपी वापरून लीहीले असतील तर वाचायला बराच वेळ लागतो.
  • Log in or register to post comments

Submitted by सामान्यनागरिक on Fri, 05/22/2015 - 21:57

In reply to मी व्हत्सप्प्स वर मराठीत by खटपट्या

Permalink

मराठीत लिहीण्यासाठी अॅन्ड्राॅईड मधे काही सोपी प्रणाली आहे का?

जशी विन्डोज मधे 'बरह'आहे तसे काही अॅन्ड्राॅईड मधे आहे का? भ्रमणध्वनीमधुन टंकन करतांना खुपच अडचणीचे होते.....
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Fri, 05/22/2015 - 22:05

In reply to मराठीत लिहीण्यासाठी अॅन्ड्राॅईड मधे काही सोपी प्रणाली आहे का? by सामान्यनागरिक

Permalink

खालील साईटवर जाउन विडीओ पहा.

खालील साईटवर जाउन विडीओ पहा. मी विडीओ पाहुन गुगल हिंदी इनपुट कीबोर्ड डाउनलोड केला. कॉनफीगर केला. मराठी टाईप करायला मजा येते. https://play.google.com/store/apps/details?id=com.google.android.apps.inputmethod.hindi&hl=en
  • Log in or register to post comments

Submitted by विलासराव on Sat, 05/23/2015 - 12:21

In reply to खालील साईटवर जाउन विडीओ पहा. by खटपट्या

Permalink

अनेक आभार!

अनेक आभार! यानिमित्ताने आम्ही मराठी लिहायला सुरवात केली.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Fri, 05/22/2015 - 23:18

In reply to मराठीत लिहीण्यासाठी अॅन्ड्राॅईड मधे काही सोपी प्रणाली आहे का? by सामान्यनागरिक

Permalink

स्पर्श मराठी किबोर्ड वापरून

स्पर्श मराठी किबोर्ड वापरून लिहीत असतो मी.
  • Log in or register to post comments

Submitted by रामपुरी on Fri, 05/22/2015 - 21:46

Permalink

हो टिकेल

हो टिकेल
  • Log in or register to post comments

Submitted by लालगरूड on Fri, 05/22/2015 - 21:47

Permalink

:)

आम्ही मराठी जपणार.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Sat, 05/23/2015 - 12:43

Permalink

उगा काहितरीच काय ?! नक्की

उगा काहितरीच काय ?! नक्की टिकेल मराठीची देवनागरी लिपी !
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sat, 05/23/2015 - 17:37

Permalink

मोडी लिपी टिकवायची आहे की

मोडी लिपी टिकवायची आहे की देवनागरी हे एकदा ठरवूया बुवा. मधूनच कोणीतरी उठतो आणि मोडीच्या र्‍हासाबद्दल अश्रू ढाळतो.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 05/24/2015 - 15:49

In reply to मोडी लिपी टिकवायची आहे की by नितिन थत्ते

Permalink

मोडीचा र्‍हास कै इतक्या लौकर

मोडीचा र्‍हास कै इतक्या लौकर होत नाही. अलीकडे जागोजागी मोडी वर्गांचे मोड उठलेत. जालावरून आणि ऑफजाल अशा दोन्ही सोर्सेसकडून हे समजलेलं आहे. सांगलीच्या मथुबाई गरवारे गर्ल्स कॉलेजात तर यूजीसी अप्रूव्ह्ड १ वर्षाचा मोडी सर्टिफिकेट कोर्सही सुरू झालाय आता. महाराष्ट्र शासनाचे वर्गही दरवर्षी सुरू असतातच, पण डिमांड वाढली आहे. कैक शहरांत मोडीचे प्रायव्हेट क्लासेस सुरू झालेले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sun, 05/24/2015 - 16:55

In reply to मोडीचा र्‍हास कै इतक्या लौकर by बॅटमॅन

Permalink

लिहिणे नसून वाचणे, हा हेतू

बरोबर आहे पण ते नवीन काही लिहिणे ह्या उद्देशासाठी नसून जुनी कागदपत्रे वाचण्यासाठी असावे. (जे योग्यदेखिल आहे कारण हजारो मोडी लिपीतील कागदपत्रे अद्याप वाचली गेली नसल्याचे समजते. न जाणो इतिहासावर काही नवा प्रकाश पडू शकतो.)
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sun, 05/24/2015 - 17:31

In reply to लिहिणे नसून वाचणे, हा हेतू by सुनील

Permalink

नाही हो, आत्ताच कोणीतरी

नाही हो, आत्ताच कोणीतरी सावरकरांवरचे एक पुस्तक मोडी लीपीत अनुवादीत केले आहे. थांबा, लिंक मिळाली की डकवतो..
  • Log in or register to post comments

Submitted by चिमिचांगा on Sun, 05/24/2015 - 20:28

In reply to लिहिणे नसून वाचणे, हा हेतू by सुनील

Permalink

(जे योग्यदेखिल आहे कारण हजारो

(जे योग्यदेखिल आहे कारण हजारो मोडी लिपीतील कागदपत्रे अद्याप वाचली गेली नसल्याचे समजते. न जाणो इतिहासावर काही नवा प्रकाश पडू शकतो.)
खि खि खि! त्यासाठी मोडी लिपी यायची काय गरज आहे? ते ब्रिगेडी पहा, त्यांना मोडीच काय, काहीच वाचता यायची मारामार असताना केवढाली इतिहास'निर्मिती' करतायत.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 05/25/2015 - 07:37

In reply to लिहिणे नसून वाचणे, हा हेतू by सुनील

Permalink

हो अर्थात त्यासाठीच आहे. तरी

हो अर्थात त्यासाठीच आहे. तरी त्यासोबत मोडीतील मासिके, मोडी लेखन, इ. देखील सुरू आहे, तस्मात मॉडेस्ट रिव्ह्यव्हल चालू आहे असे म्हणायला हरकत नसावीसे वाटते.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sun, 05/24/2015 - 22:20

In reply to मोडीचा र्‍हास कै इतक्या लौकर by बॅटमॅन

Permalink

जालावरून आणि ऑफजाल.....

जालावरून आणि ऑफजाल..... ऑफजाल हे अफजल सारखे वाटते. 'जालातीत' कसे वाटते ?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 05/25/2015 - 07:38

In reply to जालावरून आणि ऑफजाल..... by चित्रगुप्त

Permalink

हाहा, अगदी अगदी. बंगाली

हाहा, अगदी अगदी. बंगाली उच्चार वाटतो. बाकी जालातीत पेक्षा जालबाह्य असे म्हटलेले बरे, कारण जे सध्या जालावर नाहीत ते जालावर कधी येऊच शकत नाहीत असे नाही, म्हणजे त्या अर्थाने ते जालातीत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Sat, 05/23/2015 - 21:07

Permalink

शक्यता बरीच आहे.

आपल्या पिढीपर्यंत देवनागरी टिकून असली तरी पुढल्या-पुढल्या पिढ्यांमधे देवनागरीचा उपयोग कमी कमी होत जाण्याची शक्यता बरीच आहे. माझे वडील व त्यांचे भाऊ आपसात मोडीतच पत्रव्यवहार करायचे, परंतु आम्हा भावंडांना मोडी येतच नाही. माझी मुले देवनागरी वाचू शकतात, पण लिहीत नाहीत, नातवंडांना कदाचित अशी काही लिपी असते, हेही ठाऊक असणार नाही...
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Sun, 05/24/2015 - 14:04

Permalink

आपल्या भाषेच्या लिपीला

आपल्या भाषेच्या लिपीला देवनगरी लिपी म्हणतात. सुदैवाने तीच लिपी आपल्या राष्ट्र भाषेची आहे जी विंग्रजी शाळेत अजूनपर्यंत शिकवली जाते. पुढील काही पिढ्या ही लिपी अस्तित्वात राहीन मात्र ह्या लिपीच्या माध्यमातून मराठीतून अभिव्यक्त होणे कमी कमी होत जाईल.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sun, 05/24/2015 - 17:02

Permalink

तंत्रज्ञान

आणखी काही पिढ्यांनंतर मराठी ही रोमन लिपीतूनच लिहिली गेली तर आश्चर्य वाटणार नाही. मुळात मोडीतून देवनागरीत येण्याचे मुख्य कारण छपाई हे नवे तंत्रज्ञान होते. आणि अगदी याच कारणामुळे आता देवनागरीतून रोमन असा प्रवास होण्याची शक्यता खूपच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by उगा काहितरीच on Sun, 05/24/2015 - 20:07

In reply to तंत्रज्ञान by सुनील

Permalink

सुनीलराल एकदम बैलाच्या

सुनीलराल एकदम बैलाच्या डोळ्यात मारला कि! पण असे होऊ नये यासाठी काय करता येईल ?
  • Log in or register to post comments

Submitted by हुप्प्या on Mon, 05/25/2015 - 07:16

In reply to तंत्रज्ञान by सुनील

Permalink

उलट

संगणक, त्यातील अक्षरे साठवायची युनिकोडसारखी सर्वमान्य (स्टँडर्ड) पद्धती यामुळे देवनागरीच काय, मोडीही संगणकावर लिहिणे शक्य आहे. आजचे आधुनिक तंत्रज्ञान तडजोडी करायला भाग पाडत नाही. वापरणार्‍याला जे हवे ते तसेच्या तसे देण्याकडे त्याचा कल असतो. कमी खर्चात, निर्दोष व चोख काम करणे हे ह्या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. अरबी, उर्दू, पर्शियन अशा अनेक लिप्यांमधे किचकट नियम आहेत. अक्षरांच्या स्थानावर त्याचे वळण ठरते. आकडे एका दिशेने लिहिणार तर अक्षरे दुसर्‍या दिशेने वगैरे. चिनी लिपीतही हाच प्रकार. ती लिपी वापरणारे पुरेशा संख्येने असतील तर आधुनिक काळात देवनागरी टिकायला काही अडचण नाही. अर्थात हा संघर्ष असणार आहे. फक्त रोमन लिपीच बरी असे म्हणणारे आळशी, देवनागरी प्रतिगामी आहे, मोडी ब्राह्मणी आहे ती संपलेलीच बरी म्हणणारे तथाकथित पुरोगामी ह्यांना पुरून उरणारे देवनागरी प्रेमी असतील तर ह्या लिप्या अनेक शतके टिकून रहातील. चांगले साहित्य, लेख, कविता पुस्तकी स्वरुपात वा ब्लॉगच्या रुपात देवनागरीत उपलब्ध होत असतील तर लोक ती लिपी वाचण्याचे कष्ट घेतीलच. मराठी, हिंदी, नेपाळी, कोकणी अशा अनेक भाषा देवनागरी वापरतात. त्यामुळे ही लिपी जाणणारे, वापरणारे भरपूर आहेत. काही बाबतीत ह्या भाषेत लिहिणे हे इंग्रजीपेक्षा जास्त सोपे आहे. मी तरी ह्या विषयात आशावादी आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सांगलीचा भडंग on Mon, 05/25/2015 - 02:40

Permalink

नाही टिकली तर दुसरी शिकू

नाही टिकली तर दुसरी शिकू . लिपी चा जाज्वल्य अभिमान नसल्यामुळे फार विचार केला नाही
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Mon, 05/25/2015 - 08:24

Permalink

माझा उत्तरभारतीय रुम पार्ट्नर

माझा उत्तरभारतीय रुम पार्ट्नर मराठी भाषेला हींदीची स्लँग म्हणतो. त्याचा युक्तीवाद असा की मराठी ही सुद्धा हींदी प्रमाणे देवनागरीत लीहीली जाते. जर दोन भाषा एकाच लीपीत लीहील्या जात असतील तर त्या एकमेकांच्या बोलीभाषा म्हणणे योग्य आहे का? मला नक्की माहीत नाही पण कोकणी भाषा सुध्दा देवनागरीत लीहीली जाते बहुदा. तसेच नेपाळीसुध्दा. (चू.भू.दे.घे.) म्हणून त्यांना हींदीच्या बोलीभाषा बोलणे योग्य होणार नाही. कोकणी तर माझ्या उत्तरभारतीय मित्राला सौद ईंडीयन भाषा वाटते. :)
  • Log in or register to post comments

Submitted by राही on Mon, 05/25/2015 - 13:11

In reply to माझा उत्तरभारतीय रुम पार्ट्नर by खटपट्या

Permalink

अशा वेळी

अशा वेळी आपण सांगू शकतो की जगातल्या कितीतरी भाषा रोमन लिपीत (थोडा-फार फरक करून) लिहिल्या जातात. पण म्हणून त्या एकमेकांच्या बोली-भाषा ठरत नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 05/26/2015 - 08:19

In reply to अशा वेळी by राही

Permalink

बरोबर...

बरोबर...
  • Log in or register to post comments

Submitted by सौन्दर्य on Tue, 05/26/2015 - 03:30

Permalink

अजून तरी टिकली आहे .............!

देवनागरी लिपीत लिहिलेली मराठी भाषा, लिपी स्वरूपात अजून तरी टिकून आहे. जिथे नवीन पिढी शिक्षणच इंग्लिश माध्यमातून घेते आहे तिथे देवनागरी लिपीत स्वताला व्यक्त करणे नक्कीच कठीण जाणार आहे. नवीन पिढी मराठी बोलेल, समजेल फार फार तर वाचूही शकेल परंतु लिहिणे थोडे अवघड होणार आहे. मी स्वता कॉम्प्युटरवर गुगल इनपुट टूल्स वापरून देवनागरीत लिहितो. इतकेच कशाला मायक्रोसोफ्ट ऑफिसच्या विविध सुटसमध्ये देखील देवनागरीत लिहितो. whatsappवर देखील देवनागरीत लिहितो जे मराठी आणि हिंदी भाषिक, इंग्रजी नीट न समजणाऱ्या व्यक्तींना फार सोयीचे पडते. माझ्या ७५ वर्षे वयाच्या सासूबाई देखील देवनागरी लिपी वापरून स्मार्टफोन वरून मेसेज पाठवतात.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 05/26/2015 - 07:23

Permalink

लिहली गेली तर नक्कीच टिकेल !

लिहली गेली तर नक्कीच टिकेल ! ;)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;) Ellie Goulding
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com