साहित्यः
ब्रॉकोलीच्या एका गड्ड्याचे तुरे काढून रफली चिरुन घेणे
१ अंडे
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरूम
२-३ लसूण बारीक चिरलेले
१/२ टीस्पून काळी-मिरीपूड
१ टीस्पून मिक्स ड्राईड हर्ब्स
मीठ
१/२ वाटी चीझ
(कुठलेही चालेल, आवडीप्रमाणे घ्यावे)
मैदा बाईंडिंगसाठी
पाकृ:
ब्रॉकोलीला वाफवून घेणे किंवा मायक्रोवेव्ह-सेफ भांड्यात थोडे पाणी स्प्रे करुन हाय पॉवरवर ३-४ मिनिटॅ वाफवून घ्या.
वाफवलेल्या ब्रॉकोलीला मॅशरने मॅश करुन घ्या.
दुसर्या भांड्यात अंडे फोडून घ्या, त्यात चिरलेला लसूण, चिरलेली मिरची, हर्ब्स, काळी-मिरीपूड व मीठ घालून फेटॄन घ्या.
हे अंड्याचे मिश्रण, चीझ व थोडा मैदा ब्रॉकोलीच्या मिश्रणात घालून चांगले एकजीव करा.
तळहातावर छोटा गोळा घेउन त्याचे पॅटिस तयार करा.
नॉन-स्टीक तव्यावर थोडे तेल गरम करून तयार पॅटिस दोन्ही बाजूंनी खमंग शॅलो फ्राय करावे.

हे ब्रॉकोली फ्रिटर्स तुम्ही मिंट-योगर्ट डिप आणि टोमॅटो सॉससोबत गरमचं सर्व्ह करा.
नोटः
ह्यात जर अंडे घालायचे नसेल तर तुम्ही दुधाचा हबका मारून ही इतर जिन्नस मिक्स करु शकता.
ब्रॉकोलीच्या देठाचा भाग जाडसर असल्यामुळे तो कीसून घ्यावा जेणेकरुन वाफवल्यावर मॅश होईल, नुसते तुरे घेतले तरी चालतील.
मैद्याऐवजी बेसन ही बाईंडिंगसाठी वापरु शकता.
प्रतिक्रिया
_/\_
माते दंडवत घे. लगेच करणार आहे
.. !!
नवीन शब्द काही सुचत नाहीत
अहाहा
अमेझिंग...
लगोरी
झककास!!
वा!
काय भारी फोटू आलाय. नवीन
ब्रोकोली यापुर्वी एकदाच
पदार्थाचे नाव आवडले नाही पण
मी नाही ठेवले नाव ताई :)
In reply to पदार्थाचे नाव आवडले नाही पण by सस्नेह
आयला
हहपुवा!!!
In reply to आयला by इरसाल
आली आली सानिकातै आली!!
मस्त
वा मस्तच... तसेही ब्रोकोली
आई गं
孫大信 जापानी मध्ये तारीफ केली
जापानी नव्हे
In reply to 孫大信 जापानी मध्ये तारीफ केली by पियुशा
वाह मस्तच
फारच छान सादरीकरण .....
ब्रोकोली खुप आवडते. करुन
मस्त रेसिपी आणि अफाट सादरीकरण !!
फ्लाॅवर वापरूत करता येईल.
In reply to मस्त रेसिपी आणि अफाट सादरीकरण !! by नीलमोहर
मस्त!! बाकी अंड्याशिवाय काय
मस्तच...
(No subject)
नेहमीप्रमाणेच अप्रतिम !!!!!!
मी पा.क्रु. वाचलीच नाही....
हे ब्रॉकोली फ्रिटर्स तुम्ही
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachiथोडा कुस्करलेला बटाटा
नाव, पाकृ, फोटो सगळं tempting
खायला बोलवा
वा.....ब्रोकोलीचा ईतका छान उपयोग....!!!
नेहमीप्रमाणेच ! अजून काय ?!
आपले चरण स्पर्श करावा म्हणतो माते