✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रडू

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Mon, 05/18/2015 - 23:21  ·  लेख
लेख
शनिवार भारतातील आपल्या क्षेत्रात एक मोठे ब्रॅंडनेम असलेल्या एका मोठ्या कंपनीच्या लंचरूममध्ये हा जेवायला बसलाय. टेबलवर समोरच्या खुर्चीत त्या कंपनीचा एक उच्चपदस्थ बसलाय. गप्पा चालू आहेत. उशिर झालाय. दोघेच उरलेत. त्याची सुबत्ता याच्या सुबत्तेपेक्षा कमीत कमी दसपट तरी असेल. जास्तच पण कमी नाही. माणुस तसा भला. पण सतत काळजीच्या छटा घेऊन वावरत असतो. ओळख होऊन दहा एक दिवस झालेत. त्यामुळे आता हळू हळू गाडी व्यक्तिगत आयुष्य, आवडीनिवडी वगैरेंवर येत आहे. गप्पा चालू आहेतच. गाडी डाएट, फ़िटनेस, हार्ट वगैरे रूळांवर धावतीये आता. एकंदरीतच धावपळीचं आयुष्य, करिअरचे ताणतणाव, आधुनिक आयुष्यातले ताणतणाव असं संभाषण चालू आहे. एकाएकी त्याला काय झालं काय माहित... "सरजी, आज मेरे पास सब कुछ है. बिवीबच्चों के लिये बहुत कुछ बनाके रखा है. लेकिन पता नही, बहुत चिंतित रहता हूं. किस बात की चिंता है ये भी समझ मे नही आता. असल मे ना, मै रोना चाहता हूं. बहुत रोना चाहता हूं. कभी लभी लगता है की किसी के कांधे पर सर रख कर जी भर रो लूं! पर किस के कांधे पर सर रखूं? कोई नही है ऐसा!" तो एवढं बोलून गप्प बसला. प्लेटमधलं अन्न शांतपणे खात राहिला. हा मात्र अवाक झाला. काय बोलावं, कसा प्रतिसाद द्यावा हे कळेना याला म्हणून मग हा ही शांतपणे समोरचं अन्न पोटात ढकलत राहिला. तो क्षण इतका भारलेला होता की आपण काही अजून बोललो तर हा आपल्याच खांद्यावर डोकं ठेवून रडेल की काय असं याला वाटून गेलं. हा अजूनच आक्रसला. *** रविवार याला दिवसभर काहीच काम नव्हतं. सोबतीच्या सहकार्‍यांसोबत भटकायचा बेत ठरला मग याचा. जवळच एक तिर्थक्षेत्र आहे. सगळ्यांचा आग्रह म्हणून हा ही गेला. देवळं, तलाव, गर्दी, ऊन, धूळमाती सोडून माणसं बघत बसला. या गावातली सरोवरं पुण्यदायक म्हणून प्रसिद्ध. सुंदर घाट बांधलेले. पाणीसुद्धा त्या मानाने बरंच बरं होतं. सगळीकडे भाविकांची गर्दी. एका सरोवराच्या काठावर प्रचंड गर्दी. तिथे पूर्वजांच्या नावाने विधी वगैरे होतात. त्याच बाजूला बायकांचे काही वेगवेगळे घोळके मोठमोठ्याने रडत होते. अगदी हमसून हमसून रडत होत्या. नंतर कळलं की काही श्राध्द वगैरे चालू होतं. आणि बहुधा आपल्या मृत आप्तांच्या नावाने तिथे रडायची पद्धत आहे म्हणे. हा लक्ष देऊन बघत होता. बायका खरंच रडत होत्या. खोटं नव्हतं वाटत काही. बघत असताना एकदम विचार आला याच्या मनात... ’खरंच फक्त मेलेल्या माणसाकरता रडताहेत, का अजून काही असेल? बायकांच्या वाट्याला येणारी घुसमट तर नसेल अशी बाहेर पडत? हा मोकळं व्हायचा तर मार्ग नव्हे? मेलेले आप्त फक्त निमित्त असतील. ही तर सगळी स्वत:ला जिवंत ठेवायची धडपड!’ हा परत अवाक! *** सोमवार रोजच्या जॉगिंगच्या वेळी कानात गाणी ऐकणे चालू असते याचे. आज कानात शेवंतीचे बन होते. त्यात एका गाण्यात ओळ आली ... लेकीचा गं जलम, घातला कुण्या येड्याने, माझे सखे मैनाबाई, बैल राबती भाड्याने! क्षणभर चमकला खरा, पण मग हा शांतपणे चालत राहिला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
समाज
प्रवास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
15930 वाचन

💬 प्रतिसाद (69)

प्रतिक्रिया

खास बिका-टच.

एस
Tue, 05/19/2015 - 00:18 नवीन
खास बिका-टच. बर्‍याच दिवसांनी. आवडले हेवेसांनल.
  • Log in or register to post comments

बिकाशेट लिहत जा की राव असं

आनन्दिता
Tue, 05/19/2015 - 01:27 नवीन
बिकाशेट लिहत जा की राव असं नेहमी.. !! लेख खुप आवडला.
बायकांच्या वाट्याला येणारी घुसमट तर नसेल अशी बाहेर पडत? हा मोकळं व्हायचा तर मार्ग नव्हे? मेलेले आप्त फक्त निमित्त असतील. ही तर सगळी स्वत:ला जिवंत ठेवायची धडपड!’
__/\__
  • Log in or register to post comments

देर आये, दुरुस्त आये!

बहुगुणी
Tue, 05/19/2015 - 02:01 नवीन
बिकाशेट लिहत जा की राव असं नेहमी.. !! +१
  • Log in or register to post comments

अतिशय आवडला!

चुकलामाकला
Tue, 05/19/2015 - 08:03 नवीन
अतिशय आवडला!
  • Log in or register to post comments

फार आवडला लेख.थोडक्यात सगळं

अजया
Tue, 05/19/2015 - 08:14 नवीन
फार आवडला लेख.थोडक्यात सगळं सांगुन जाणारा.
  • Log in or register to post comments

!

खेडूत
Tue, 05/19/2015 - 08:38 नवीन
आवडला लेख...
  • Log in or register to post comments

+१

नाखु
Tue, 05/19/2015 - 08:39 नवीन
खास बिका ष्टाइल. "अच्च्छे दिन आ रहे है" मिपा वाचकांसाठी
  • Log in or register to post comments

लेख आवडला बिपिनदा. हे पूर्ण

किसन शिंदे
Tue, 05/19/2015 - 08:43 नवीन
लेख आवडला बिपिनदा. हे पूर्ण गाणे मिळेल काय?
  • Log in or register to post comments

शेवंतीचे बन नावाचा कार्यक्रम

बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/19/2015 - 08:55 नवीन
शेवंतीचे बन नावाचा कार्यक्रम होत असे पूर्वी. त्यात आहे. एम्पी३ कशी देतायेईल ते बघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

_/\_

पैसा
Tue, 05/19/2015 - 08:46 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments

सर्वांना धन्यवाद! लिहायचं

बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/19/2015 - 08:54 नवीन
सर्वांना धन्यवाद! लिहायचं असतंच. जमेल तेव्हा लिहित जाईन.
  • Log in or register to post comments

अरे, अरे,

सस्नेह
Tue, 05/19/2015 - 09:18 नवीन
धन्यवादाची इतकी गडबड ? आम्हाला पहिले दाद तर देऊ द्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

=))

बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/19/2015 - 15:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

सहज जाता जाता काळजाची तार

सस्नेह
Tue, 05/19/2015 - 09:20 नवीन
सहज जाता जाता काळजाची तार छेडलीत बाॅ !
  • Log in or register to post comments

मस्त लिहीले आहे

ज्ञानोबाचे पैजार
Tue, 05/19/2015 - 09:53 नवीन
खरच बायकांना मिळालेले हे एक वरदानच आहे. बर्‍याच वेळेला रडावेसे वाटते पण रडता येत नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

मी रडतो!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/19/2015 - 10:39 नवीन
मी रडतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

वाह क्या बात हे बिका सेठ

स्पा
Tue, 05/19/2015 - 10:02 नवीन
वाह क्या बात हे बिका सेठ
  • Log in or register to post comments

जबरी!

आदूबाळ
Tue, 05/19/2015 - 10:02 नवीन
जबरी!
  • Log in or register to post comments

+++१११ टू आदू. जबरीच!

अत्रुप्त आत्मा
Tue, 05/19/2015 - 10:40 नवीन
+++१११ टू आदू. जबरीच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

बिप्स मस्तच

पर्नल नेने मराठे
Tue, 05/19/2015 - 10:14 नवीन
बिप्स मस्तच
  • Log in or register to post comments

बिपिनदा

समिर२०
Tue, 05/19/2015 - 10:25 नवीन
बिपिनदा तुझ्या वाढदिवसाची भेट आवडली
  • Log in or register to post comments

अरे!

राही
Tue, 05/19/2015 - 10:27 नवीन
अरे! किती दिवसांनी? देर है लेकिन अंधेर नहीं किंवा देर आये, दुरुस्त आये असं काहीतरी सुचत होतं. पण नको. लेख छान आहे त्यावर कुठलेच शेरे, विनोदी का होईनात, नकोत.
  • Log in or register to post comments

बिपीनदाला वाढदिवसाच्या

समिर२०
Tue, 05/19/2015 - 10:27 नवीन
बिपीनदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मालक! :)

बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/19/2015 - 10:45 नवीन
धन्यवाद मालक! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: समिर२०

लेख आवडला

कविता१९७८
Tue, 05/19/2015 - 10:41 नवीन
लेख आवडला
  • Log in or register to post comments

आवडलं!

अनुप ढेरे
Tue, 05/19/2015 - 10:46 नवीन
आवडलं!
  • Log in or register to post comments

जबरी!

माम्लेदारचा पन्खा
Tue, 05/19/2015 - 13:05 नवीन
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

नि:शब्द

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/19/2015 - 13:12 नवीन
नि:शब्द
  • Log in or register to post comments

नि:शब्द

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/19/2015 - 13:13 नवीन
नि:शब्द
  • Log in or register to post comments

एकदम छान..

गणेशा
Tue, 05/19/2015 - 13:45 नवीन
एकदम छान..
  • Log in or register to post comments

छान

तिमा
Tue, 05/19/2015 - 14:24 नवीन
आवडला लेख . रडण्याने मन हलकं होतं. हंसण्याच्या क्लबपेक्षा एकांतात मनसोक्त रडावे. फायदा होतो.
  • Log in or register to post comments

मस्त!!

सूड
Tue, 05/19/2015 - 15:35 नवीन
मस्त!! वरती पैजारबुवांच्या प्रतिसादाशी सहमत!!
  • Log in or register to post comments

अं हं बिक्स्!

स्पंदना
Tue, 05/19/2015 - 15:41 नवीन
अं हं बिक्स्! एकेका ओळीला एकेक सलाम! असेच लिहिते रहा.
  • Log in or register to post comments

_/\_

बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/19/2015 - 15:54 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

आणि हो तीर्थ क्षेत्री माणस

स्पंदना
Tue, 05/19/2015 - 15:44 नवीन
आणि हो तीर्थ क्षेत्री माणस पाहन आपल् तुपल सेम सेम.
  • Log in or register to post comments

वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

नीलमोहर
Tue, 05/19/2015 - 16:20 नवीन
"ही तर सगळी स्वत:ला जिवंत ठेवायची धडपड!" छानच..
  • Log in or register to post comments

वा!!

मोहनराव
Tue, 05/19/2015 - 17:00 नवीन
मस्तच... खुप आवडलं
  • Log in or register to post comments

सुरेख

सविता००१
Tue, 05/19/2015 - 17:13 नवीन
खूप आवडलं.
  • Log in or register to post comments

आमचा बिट्टू भुभु माझ्या

प्रकाश घाटपांडे
Tue, 05/19/2015 - 19:43 नवीन
आमचा बिट्टू भुभु माझ्या मांडीवर गेला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिले व शांतपणे गेला.स्पर्श लाकडा सारखा झाला काही क्षणात. मला हुंदका आवरला नाही. खर तर खूप रडायच होत.पण व्यक्तिमत्व आड आल. कंठात दाटलेपण होत.त्याची कळही जाणवली. आजही एकटा असलो की हुंदकतो.
  • Log in or register to post comments

काका...

पैसा
Tue, 05/19/2015 - 19:50 नवीन
काका... मी पण... :( गेलेल्यांची आठवण पण काढायला नको वाटते. काही करा... ती येतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

:( _/\_

बिपिन कार्यकर्ते
Tue, 05/19/2015 - 21:22 नवीन
:( _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

!

प्रदीप
Mon, 05/25/2015 - 12:34 नवीन
काय लिहीणार ह्यावर? अजून एक पाश आपल्याभोवती नको, म्हणूनच खूप आवड असूनही कटाक्षाने कुत्रा पाळणे टाळत आलेलो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

अगदी अगदी

अत्रन्गि पाउस
गुरुवार, 07/14/2016 - 08:42 नवीन
हेच म्हणजे हेच म्हणतो ....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

बिकाशेट..._/\_

भाग्यश्री कुलकर्णी
Tue, 05/19/2015 - 23:27 नवीन
बिकाशेट..._/\_
  • Log in or register to post comments

निस्पृह अलिप्तपण

चित्रगुप्त
Wed, 05/20/2015 - 00:31 नवीन
बहुत दिवसांनी वाचायला मिळालं मालक तुमचं काही. 'ह्या' चं निस्पृह अलिप्तपण भावलं.
  • Log in or register to post comments

++१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 05/20/2015 - 03:14 नवीन
मालक तुमचं काही. 'ह्या' चं निस्पृह अलिप्तपण भावलं. -दिलीप बिरुटे (अलिप्त)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

लेखन भावलं

श्रीरंग_जोशी
Wed, 05/20/2015 - 10:12 नवीन
लेखन भावलं विशेषकरून दुसरा प्रसंग. परवाच एक सत्यघटनेवरचा चित्रपट पाहिला - The Prize Winner of Defiance, Ohio. या चित्रपटामध्ये अमेरिकेतील निम्न मध्यमवर्गातील एका जोडप्याची कहाणी आहे ज्यांना १० मुलं असतात. बायको गृहिणी असते अन नवरा फार पगार नसणारी नोकरी करत असतो. ते घर व्यवस्थितपणे चालत असतं केवळ त्या घरातल्या स्त्रीच्या कल्पकता, सहनशीलता या गुणांमुळे. त्यात तो नवरा, अधून मधून तापट पणे वागणार, घरात तोडफोड करणार. संपूर्ण चित्रपटात त्या कुटूंबातली आई अभावानेच रडताना दाखवली आहे. त्या चित्रपटातील प्रसंग पाहताना प्रत्यक्षात माझे मन लहानपणापासून पाहत आलेल्या असंख्य उदाहरणांमध्ये घुटमळत होते. कधी जवळच्या नातेवाईकांमध्ये, कधी शेजारी राहणार्‍यांंमध्ये, कधी घरी कामाला येणार्‍या मोलकरणींमध्ये तापट नवरा अन सहनशील बायको. अक्षरशः मुलांच्या १० वीच्या फॉर्मसाठी राखून ठेवलेले पैसे ही बाप मंडळी दारूमध्ये उडवणार. प्रत्येक रडू समोरच्यांना दिसेलच असं नाही :-( .
  • Log in or register to post comments

मस्स्त!!

तुषार काळभोर
Wed, 05/20/2015 - 13:48 नवीन
मिपावरची जुनी माणसं आजकाल फारशी लिहितच नाहीत. प्रतिसादात कधीतरी येतात, लेख तर दुर्मिळच!! सर्व जुन्या-जाणत्यांना विनंती: प्लीज, लिहिते व्हा!!
  • Log in or register to post comments

बिका ..... 'मेलेले आप्त फक्त

शिव कन्या
Wed, 05/20/2015 - 17:35 नवीन
बिका ..... 'मेलेले आप्त फक्त निमित्त असतील. ही तर सगळी स्वत:ला जिवंत ठेवायची धडपड!’ हे खरेच आहे. प्रत्येक प्रसंगाला सेप्रेट रडत बसण्या इतका वेळ आणि स्पेस नसते. छान लिहिलेय.
  • Log in or register to post comments

पुरुष

gogglya
Wed, 05/20/2015 - 23:32 नवीन
आणी रडणे या विरुद्ध गोष्टी आहेत अशी आपली शिकवण असते सहसा त्यामुळे रडु आले तरी आवेग आवरता येणे असेच शिकवले जाते. [ पु ल - रावसाहेब ] मी पण intoxicate एखादे सुन्दर गाणे मनपासुन रडुन घेतो...
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा