सोमवार आणि मंगळवार झालेल्या प्रचंड पाउस आणि विजांमुळे हापिसातच २ दिवस वस्तीला होतो . बरेचसे नेटवर्क इक्विपमेंट जळाले होते . त्यामुळे मिपा वर येणं जमलेलं नाही . आणि त्यामुळेच वृत्तांत पोस्ट करण्यास उशीर झाला
----------------------------------------------------------------------------------------
स्थळ : राजारामपुरीतली एक खोली . . वेळ :- १०.५५
तरीही वेळ काळ आपल्यासाठी नाहीतच . . या अविर्भावात नाश्ता करत बसलेला तो . आणि यात मधेच फोन वाजतो
" हेल्लो ? मी काशीकर बोलतोय !! "
" काशीकर?? समजलं नाही . "
"अहो मी ' अकौंटंट ' "
"हो हो . बोला . काय म्हणताय?? "
" अहो काय म्हणतोय काय . ११ वाजता भेटणार होतो ना सगळे आपण ? "
"अं . . हो . पोचलात का तुम्ही ? "
"हो . . अगदी वेळेवर . पण इथे कोणीच नाही . येताय ना?"
"हो . पोचतोच . ५ मिनटात "
असं म्हणून त्याने फोन ठेवला . आणि परत समोर असलेल्या ७-८ इडल्या आणि २-३ वड्यांनी भरलेल्या प्लेट वर ताव मारायला सुरुवात केली . . आणि परत फोन . .
"हेल्लो . पोचलास का? "
"कोण बोलतंय ?? "
"मी रे स्नेहांकिता ताई . . कधी पोचतोस . . मी समोरच आहे हॉल च्या . लग्गेच ये "
"हो . हे काय , निघालोच "
परत इड्ल्यांची चिरफाड सुरु . . आणि एकदम आठवून तोच फोन लावतो . .
"वल्लिशेट . कधी येताय? कुठे आहात ? सगळे पोचलेत . तुमची वाट बघ्ताएत . . "
"हो रे, फडतरे ला आहे . . १५ मिनिटात पोचतो . '
"बरं या लवकर . "
"हो अर्ध्या तासात येतो "
१० सेकंदा पूर्वी १५ मिनिटात पोचतो म्हणून आता लगेच अर्धा तास . . मिसळ आली असावी समोर . असं म्हणत तो कसाबसा तयार होत , सुसाट गाडी चालवत पोचतो हॉल ला . . आणि मग त्याच्या लक्षात येतं . . मांडे घरीच राहिले . . मग गाडी आणि गडी जरी कर्नाटकचा असला आणि रस्त्याचे नियम पाळायची सवय असली . तरी टिपिकल कोल्हापुरी ष्टैल ने सिग्नल / वन वे सारख्या क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करीत तो घरी जाऊन मांडे घेऊन परत येतो . .
आणि राव साहेब असं भारदस्त नाव असलेला हा कसा बसा ६५ किलो चा चालता फिरता हाडांचा सापळा भारतीय प्रमाण वेळेनुसार ११ वाजता सुरु होणाऱ्या कट्ट्याला पावणे बारा ला पोचतो . .
हॉल मध्ये जवळपास सगळी मंडळी जमली होती . . अन्या कुठे तरी पाळण्याच्या तयारीत होता . . आणि मग सगळ्यांनी आपापल्या आयडी चं नाव सांगितलं . . तिथे "नाद खुळा " असं नाव ऐकल्यावर जसा माणूस समोर येईल तसाच दंगा ते करत होते . प्रगो शांतपणे सगळं ऐकत हळूच पिन टोचत होते . . हळू हळू सगळ्यांनी आपापले अनुभव मांडायला सुरुवात केली . नाखू काकांनी डबल डेकर यष्टी पण होती हे सांगून जवळपास सगळ्यांची यष्टी उडवून दिली . . ह्या सगळ्या गप्पा चालू असताना 'वेताळ ' नि प्रवेश केला . . त्यांचे पाय सरळच आहेत हे पाहून मी मनातल्या मनात हुश्श केलं . . मधेच स्नेहांकिता ताइनि भिंगरी ताई आणि अनन्या ताईंचा फोन आला आणि त्या त्यांना घेऊन आल्या . .
थोड्या वेळात यमगर्निकर , जिनेन्द्र वगेरा मंडळी हि आली . . . ७ वाजता सुटलेला सूड १ वाजता पोचला कसाबसा आणि त्याने आणलेले रसगुल्ले सदृश बासुंदी / मलई चा जेवणात स्वीट डिश म्हणून देण्यात येईल असं जाहीर केलं . .
कट्ट्यात खरी जान आणली ती शाह काकांनी . . पुण्यात राहणारे शाह बरेच दिवस मिपा फॉलो करतात . त्यांनी स्वतःचा आयडी नाही बनवला . पण रोज इथे दंगा मस्ती करणाऱ्या सगळ्या आयडीना ते ओळखतात . .
अनन्या ताई आणि भिंगरी ताई आल्यावर आम्हा गरीब बिचाऱ्या भोळ्या भाबड्या सालस निरागस गुणी आणि कर्तव्यदक्ष मुलांवर कंपू करून अनाहीतांना त्रास देण्याचा आरोप करण्याचा प्रयत्न केला . पण नाखू काकांनी लग्गेच तो प्रयत्न हाणून पाडला . . (मेलो आता . पळा )
वल्ली , प्रगो , वेताळ , आणि नाखू यांनी मिळून गणपती उचलणे आणि तो विसर्जित करण्या दरम्यान गणपती आणि त्याला उचलणारे , या दोघांच्याही मनात चालणारे विचार बोलून दाखवले . . (याचा संदर्भ नाखू काकांच्या वृतांतात आलाय ) .
याच दरम्यान आलेला सूड . . साडे सहाची गाडी सात ला आली , आणि साताऱ्यापर्यंत त्याने ती बस नसून बैलगाडी आहे या समजात अन त्याच वेगात मारली . आणि पुढे कोल्हापूर कमानी पासून बस स्टेन्ड ला हि त्याच वेगात आला . आणि आधी मला त्याला घेऊन येताना रस्त्यात आणि मग हॉल मध्ये आल्यावर प्रत्येकाला एकदा सांगून घेतलं . .
पण नंतर "साय" वाचून त्याने या सगळ्याची भरपाई हि केली .
हे सगळं होई पर्यंत दीड वाजत आलेच होते . हॉल पासून जवळच असलेल्या ' श्रीकृष्ण ' हॉटेल मध्ये स्नेहांकिता ताइनि जेवणाची व्यवस्था केली होती . आणि तिथली स्पेशालिटी म्हणजे मुंडी आणि पाया थाळी .
तिथे आधी अनन्या ताईंनी आणलेल्या फणसाच्या चिवड्यावर सर्वांनी ताव मारला . याच दरम्यान यमगार्निकरांनी लिव इन रिलेशन बद्दल आपला अनुभव सांगितला . .
आम्हा सगळ्या लहान मुलांच्या दंग्याला न जुमानता ' श्री कृष्ण ' वाल्यांनी अगदी शांतपणे सगळ्यांना जेवण वाढलं आणि जीभ आणि पोट तृप्त अगदी केलं .
या कट्ट्या दरम्यान झालेले काही ठराव : -
१ ) यमगर्निकर आपले लिव इन रिलेशन चे अनुभव लेख स्वरूपात इथे लवकरच मांडतील आणि आम्हा शिंगल मुलांना उपकृत करतील ( आणि त्या पुढचे प्रगो सांगतील ).
२) शाह काका स्वतःचा आयडी घेतीलच, त्यांच्या बोलण्यावरून प्रेम पुजारी असा काहीसा आयडी त्यांना हवा होता . संपादक मंडळाने या कडे लक्ष घालणे .
३ ) सूड ने डब्यातून आणलेला पदार्थ नक्की काय आहे याचा पुरावा म्हणून फोटो अडकवणे.
आणि सर्वात महत्वाचा भाग . .
कट्ट्याच्या दरम्यान काही कमी जास्त झालं असल्यास लहान समजून विसरून जावं . आणि पुढे हि नक्कीच भेटूच . . माझा हा पहिलाच कट्टा . त्यामुळे मनात थोडी भीती होती . पण सगळ्यांनीच वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारखं अगदी आपल्यात सामावून घेतलं . सगळ्यांचेच पाय कायम जमिनीला टेकलेले आहेत . सर्वांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा .
मोबाइल गंडलाय . त्यामुळे माझ्याकडे फोटो नाहीत . अन्या , वल्ली , प्रगो , यस वाय जी , यांनी फोटो धाग्यात टाकावेत . .
वाचने
20649
प्रतिक्रिया
72
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला झालाय कट्टा (मळमळ,
छान वृत्तांत