Skip to main content

अर्जंट माहिती हवी आहे .

शुक्रवार, 01/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई अबुधाबी म्युनिक मार्गावर चेक्ड इन लगेज मध्ये एव्हरेस्ट मसाले सीलबंद पाकिटे टाकली आणि त्या मसाल्यातला एक घटक खसखस असेल तर काही झोल होतील का नाही ?? कृपया लौकर सांगा

वाचने 5921
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

म्युनिक कस्टम्सवाल्यांना काही आक्षेप नसल्यास काळजीचे काहीच कारण नाही. बाकी ज्या गोष्टी परदेशातील भारतीय दुकानात सहजपणे मिळतात त्या सामानाबरोबर नेऊ नये. माझ्या बॅगांचे वजन भारतातून परतताना मर्यादेच्या निम्मेही भरत नाही बरेचदा.

In reply to by उगा काहितरीच

वाटण्याचा वा नशेचा प्रश्न नाहिये. खसखस म्हणजे अफू चे बी. ती पेरून अफूची झाडे उगवू शकतात. तेव्हा नुसती खसखस न्यायला, बाळगायला अनेक ठिकाणी परवानगी नसते. लीगल मार्गांनी आयात केली असेल, तर ती खसखस रेडिएशन वगैरे करून पेरल्यावर उगवणार नाही अशी करून मगच नेली जात असावी.

Checked in baggage मध्ये काही समस्या येणार नाही. कारण ते अबुधाबीला एका विमानाच्या पोटातून दुसऱ्यात जाईल, अबुधाबीच्या भूमीला टेकणार नाही.

अनुभवी लोकानी कृपया खाण्याचे पदार्थ काय काय नेता येतात हे अनुभवावर आधारित सांगावे तसेच नियम काय आहे हे ही सांगावे. शस्त्रे वगैरे काय नेता येत नाही याचा उल्लेख विमान कंपनीच्या वेबसाईटवर दोन्ही प्रकारच्या बॅगांसाठी तपशीलवार दिले आहे. पण खादाडीचे काय बुवा ....?

प्रत्येक वर्षी भारतातुन यु.के. मधे येताना...घरचा मसाला (२ की), घरची भाजाणी (२की) घेउन येते... मागच्या वर्षी तर आमराळे चा खवा(३की) फ्रोजन करुन आणला होता... अजुनी मला कोणी अडवले नाही... होप इथुन पुढे पण अडवणार नाहीत...अशी आशा करते... :)

In reply to by स्वाती राजेश

अजुनी मला कोणी अडवले नाही... होप इथुन पुढे पण अडवणार नाहीत...अशी आशा करते... :)
अगदे हेच ! मला ही कधीच काही प्रॉब्लेम आला नाही. तुप, लोणची, चटण्या, कडधान्य, मसाले, भाजणी शिवाय किचन फॉईल मध्ये गुंडाळून, वर्तमानपत्रात पॅक करुन सुकी मच्छी ही आणते ;)

अनुभवी लोकानी कृपया खाण्याचे पदार्थ काय काय नेता येतात हे अनुभवावर आधारित सांगावे तसेच नियम काय आहे हे ही सांगावे.

कच्च्या बीया नेता येत नाहीत म्हणून एकदा माझ्या सामानतले शेंगदाणे कच्चे काढून टाकलेवते. पण आमच्याइथे काळे वाटाणे मिळत नाहीत म्हणून मी कडधान्य आणले तर ते चालले. पूर्वी लोणची चालत नसत असे ऐकले होते, पण माझ्याबरोबर अनेक नातेवाईकांनी दिलेली नमून्याची लोणची असतात त्याला आक्षेप घेतला गेला नाही. हे खूप नाहे पण थोडेफार बदलत असते. कैरी आणत्याचे एका काकूंनी अभिमानाने सांगितले. दुसर्‍यांनी उंधियुसाठी जी अमूक प्रकारची पापडी लागते ती साडीत लपवून आणली म्हणाल्या. यावर आपण काय बोलणार? पण एक विद्यार्थी पहिल्यांदाच येत असताना त्याने त्याचे घर रिकामे करताना दोन अंडी, एक कांदा, एक टोमॅटो आणला होता. अंडी न फुटता पोहोचली ती अधिकार्‍याने काढून टाकली. सहा वर्षांपूर्वी एकदा माझ्याकडील ज्वारीचे पीठ हे ज्वारीचेच आहे याची चव घेत दोन तीन जण बसले होते. शेवटी तो पुडा फस्सक्न फुटला व माझ्या काळ्या कपड्यावर सांडला. त्यांनी लगेच पटापट पुडा गुंडाळला व जावा म्हणाले.

सूकट नेली होती ऑस्ट्रेलियाला आणि मसाले ,डाळीत्यात वेल्चीही होती.प्रत्येक वेलची दाबून पाहिली.सुक्या कार्दीचे पाकीट फोडल्यावर आलेल्या सुवासाला अॅऽक असा रेस्पोन्स मिळाला.मी सांगितलं, THIS DISHTESTY AND YOU WILL NOT EVEN SMELL LIKE THIS,त्यवर ऑफिसरची प्रतिक्रिया होती,IS IT सो? आणि त्याने पुन्हा नाक खुपसले आणि तळमळून बाहेर काढले. मी पण जोरात, YES,एस, YOU ARE INVITED. SUKAT ROCKS N OFFICER SHOCKS.

अरबी देशातील इमिग्रेशन चे अनेक नियम अक्कलशून्य पणे बनवलेले असुन ते अतिशय वायझेड पणे राबवले जातात ,असे खेदाने म्हणावे लागते .... असो तुम्ही पूर्ण चौकशी केल्याखेरीज खसखस असलेले काहीही नेऊ नये असे सुचवावेसे वाटते !

शक्यतो जिथे जाल तिथे ईंडियन स्टोर शोधून काढा (आज्काल सगळीकडे असते...गुगलला विचारा)...तिकडे घेणे थोडे महागात पडेल पण जर चूकून एअरपोर्टला शिकूरिटीमध्ये अडकलात तर डोक्याची पार आयमाय होईल...असा घोर घेउन प्रवास करण्यापेक्षा महाग घेतलेले कधीही चांगले

अमेरिकेत काही (बहुतेक मोठी शहरे) आंतरराष्ट्रीय विमानतळांवर कस्टम्स अधिकारी प्रत्यक्ष बॅग्ज उघडून बघत नाहीत. हे वर्षानुवर्षे चालत असल्यामुळे बरेच भारतीय लोक यशस्वीपणे हवे ते आणतात. तुलनेत लहान शहरांतील कस्टम्स अधिकारी मात्र अत्यंत काळजीपूर्वक बॅग्जची तपासणी करतात. जे पदार्थ त्यांना पटत नाहीत ते विमानतळावरच टाकून द्यायला लावतात. कुणी खूपच प्रमाणात असे आक्षेपार्ह पदार्थ आणले असतील त्यांना काही वेळा आर्थिक दंडही केला जातो. काही वेळा केवळ इशारा देऊन सोडून दिले जाते. या दोन्ही प्रकारांत त्यांच्या रेकॉर्डमध्ये या गोष्टीची नोंद केली जाते. सदर प्रवाशाचे पुढल्या वेळी अमेरिकेतील कुठल्याही विमानतळावर आगमन होते तेव्हा तेथील कस्टम्स अधिकार्‍यांना त्या व्यक्तिविषयी त्यांच्या डोळ्यांपुढील स्क्रीनवर अलर्ट येतो. गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेतील लहानसहान शहरांमधील भारतीय वाणसामानाच्या दुकानात अगदी सहजपणे विविध प्रकारचे, ब्रॅन्ड्सचे भारतीय जिन्नस, मसाले वगैरे मिळतात. आमच्या येथे तर एव्हरेस्ट, एमडीएच, बादशाह पासून केप्रचे मसाले, उपासाची भाजणी, चितळेंची बाकरवडी (सौम्य निर्यात आवृत्ती), लक्ष्मीनारायण चिवडा पासून सर्व मिळते. एवढ्या सोयी उपलब्ध असताना, २२ किलो प्रति चेक इन बॅगचा इंच इंच अन ग्रॅम ग्रॅम लढवून लोक खाद्यपदार्थ ठूसतात. माझ्यासोबत काम करणारे दक्षिणी सहकारी तर मुद्दाम शिकागो पोर्ट ऑफ एन्ट्री असेल असे विमान तिकिट काढून अक्षरशः एक बॅग पूर्ण खाद्यपदार्थांनी भरून त्यात त्यांच्या स्थानिक कोंबडीचे लोणचे, उन्हात सुकवलेले दह्याचे विरजण अशा गोष्टीसुद्धा आणतात. खाण्यापिण्याबाबत इतक्या तीव्र भावना असणारे लोक स्वतःचा देश तरी कशाला सोडतात देव जाणे. मी स्वतः भारतातून परततो तेव्हा माझ्या बॅगांचे वजन १२-१३ किलोंच्या वर भरत नाही. भारतातल्या घरून निघून अमेरिकेतल्या घरी पोचेपर्यंत अनेकदा त्या उचलाव्या लागत असल्याने वजन कमी असल्याने श्रम कमी होतात.