मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मन करा रे प्रसन्न

जागु · · मिपा कलादालन
कुठेही फुल दिसले त्या ऐवजी मी असे म्हणेन की कुठेही गेले की मी फुले शोधत असते. असेच शोध घेता घेता तर काही सहज दिसलेली कॅमेर्‍यात टिपलेली ही फुले. ही फुले पाहून तुम्हीही फुलांसारखे प्रसन्न व्हावे ही सदिच्छा. १) पिवळ्या हळदीत रंगलेली नवरीच जणू अशी ही पिवळी अबोली. २) अडेनियम ३) ४) राणीच्या बागेतील गायत्रीची फुले ५) हळद-कुंकूची फुले (राणीचा बाग) ६) स्प्रिंग सारखी दिसणारी फुले ७) तामण ८) पिवळा एक्झोरा ९) पांढरा गुलाब १०) शिवण ११) कृष्ण्कमळ १२) चाफा १३) सीता अशोक १४) हि आमची पेरूची फुले १५) कांचन १६) कुडा १७) पीतमोहोर १८) १९) बिट्टी २०) पांढरा बहावा

वाचने 7083 वाचनखूण प्रतिक्रिया 28

मदनबाण गुरुवार, 05/14/2015 - 14:54

एस गुरुवार, 05/14/2015 - 15:14
वाह, एकदम प्रसन्न झाले मन! तुमच्या धाग्यात फुलांची नावे समजतात ते फार आवडतं. अडेनियम तर चाफ्याचा एक प्रकार वाटतेय. गायत्री, शिवण ही नावे माहिती नव्हती. किती सुंदर फुले आहेत सगळी! विशेषतः ते बिट्टीचे फूल पाहून मन एकदम बालपणात गेले. याच्या बिट्ट्या गोळा करून खूप खेळत असू. जास्त बिट्ट्या कोण गोळा करतो यावर अहमहमिका चालायची!

In reply to by एस

श्रीरंग_जोशी Fri, 05/15/2015 - 08:03
स्वॅप्स यांनी मांडलेल्या भावनेशी सहमत. मी लहान असताना घरमालकांच्या बंगल्याच्या एका कोपर्‍यात बिट्ट्यांचे मोठे झाड होते. आज अनेक वर्षांनी ती आठवण वर आली. मनःपूर्वक धन्यवाद, जागुतै.

जागु गुरुवार, 05/14/2015 - 15:38
मदनबाण,मृत्युंजय धन्यवाद. स्वॅप्स अडेनियमला वाळवंटातील गुलाबही म्हणतात. सूड नाही कळलावी वेगळी. कळलावीचा वेल असतो व त्याचे फुल अर्धे पिवळे व अर्धे लाल असते.

जागु गुरुवार, 05/14/2015 - 16:06
भिंगरी तुम्ही म्हणताय ते नोनी उर्फ बारतोंडी. त्याचे फुलही साधारण असेच पण थोडे लहान असते. हा कुडा आहे. ह्या फुलांची भाजी करतात. अत्रुप्त धन्यवाद.

रेवती गुरुवार, 05/14/2015 - 22:02
फोटू आवडले. हळदी कुंकवाची फुले एकाच झाडाला येतात की दोन झाडे वेगळी असतात?

स्रुजा गुरुवार, 05/14/2015 - 22:08
काय अप्रतिम फोटो आहेत. पिवळी अबोली पण असते हे तर पहिल्यादाच पाहिलं. तुम्हाला एवढी नावं कशी माहिती आहेत? यातली बरीच फुलं मी पाहिली आहेत पण आज तुमच्यामुळे पहिल्यांदा नावं कळली. सुंदर आले आहेत एकुण एक फोटोज.

नंदन Fri, 05/15/2015 - 10:24
फोटो आवडले, खरोखरच मन प्रसन्न करणारे आहेत!

कविता१९७८ Tue, 05/19/2015 - 11:00
वाह जागु, सुगरण तर तु आहेच पण बागकामाचीही तुला विशेष आवड आहे, सर्व प्रकारच्या झाडांची , फुलांची माहीती तुला असते आणि तुझ्या निमित्ताने ती आम्हालाही मिळते.