रसमलाईची पहिली ओळख झाली ती १९९४ च्या पहिल्या कोलकाता भेटीत. ईडन गार्डन स्टेडीयम जवळ के सी दास नावाचे मिठाईचे प्रसिद्ध दुकान आहे. रोज सकाळी तिथे एकदोन प्रकारच्या वेगळ्या मिठाया आणि त्यावर मिष्टी दोही असा ब्रेकफास्ट करून मग कामाला बाहेर पडायचे असा तिथला अलिखित नियम आहे. तिथल्या लक्षात राहिलेल्या मिठायांपैकी सर्वात वरती आहे रोसमलाई! त्याकाळी महाराष्ट्रात ही आताच्या इतकी रुळली नव्हती. चौधरी आणि बिकानेर नामक दुकाने अजून आली नव्हती.
दुकानातून नेहमी आणली जाणारी अंगूरी बासुंदी एकदा घरी करून पहावी असं बरेच दिवस मनात होतं. गेल्या वर्षी दिवाळीला परदेशात असल्याने 'करून तर बघू' म्हणून केली आणि जमली पण झकास! मुळात चवीनं खाण्याची आवड असेल पदार्थ करायला जमतोच, असा निष्कर्ष काढला. पाक चुकेल याची धास्ती होती पण सौ. खेडूत यांनी सांगितलेले साखर-पाणी प्रमाण वापरले. नेटावर जरा शोधले आणि कृती समजली . . ! मिपावरसुद्धा सापडली. एक नाही तर दोन तीन ! पण फोटू नुसतेच टाकण्याऐवजी थोडी कृती पण लिहीली आहे. गोड मानून घ्यालच!
साहित्य:
दूध, साखर, लिंबू, बदाम, केशर, वेलची, गाळणी, कढई , पातेले, मोठा बाउल, पंचाचे कापड,
कृती:
प्रथम दोन लिटर दूध उकळून घ्यावे, गरम असतानाच त्यात अर्धे लिंबू पिळावे. ढवळावे. दोन-तीन मिनिटांत दूध चांगले नासल्यावर खळखळ उकळू द्यावे. नंतर दूध उतरवून थोडे थंड होऊ द्यावे. आता गाळणीने गाळून पाणी काढून टाकावे. आता ही पनीरसदृश मलाई स्वच्छ कापडातून दाबून काढली आणि त्यातले पाणी पूर्ण निघून गेल्यावर आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे गोळे केले. त्यानुसार त्याला अंगूरी बासुंदी म्हणायचे का रसमलाई (काय फरक पडतो? ) हे ठरवता येते. मी अंगूरीच बरी असे म्हणून छोटे गोळे केले.
नंतर हे गोळे उकळण्यासाठी साधारण ७५० मि. लि. (तीन कप किंवा कॉफी मग्ज असतील तर दोनच ) पाण्यात दीडशे ग्रॅम साखरेचे मिश्रण करावे. ते उकळायला लागल्यावर आधी केलेले अंगूर त्यात उकळायला टाकावेत. झाकण ठेवून ३० मिनिटे वाट पहायची. हे सुरु असतांना एकीकडे मोबाइल अथवा अन्य कशावर तरी सुंदर गाणी लावावीत!
हो, पण त्या तीस मिनिटांत अजून एक लिटर दूध घेऊन आटवायला ठेवावं. कारण शेवटी बासुंदीच तर लागणार आहे!
तर असे तीस मिनिटे हे गोळे पाकात ठेवले, की साखर त्यात मस्त मुरते. मग हे गोळे काढून तयार झालेल्या बासुंदीत अलगद सोडावेत. मग त्यात वेलदोडे आणि बदामाचे काप, केशर टाकले, की झाली आपली डिश तयार ! !
फ्रीज मध्ये ठेवली तर तीन-चार दिवस टिकते म्हणे! पण छान झाल्यामुळे त्याच दिवशी संपली!
प्रकाशचित्रांमध्ये पाककृतीच्या विविध पायऱ्या कृतीच्याच क्रमाने :
१.
२.
३.
४.
५.
६.
७.
८.
९.
मग काय ! अजून करून पहिली नसेल तर करा सुरुवात ! :)
वाचने
18266
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त , पा.क्रु.
माझा आवडता पदार्थ
मस्तच
तयार झालेल्या बासुंदीत अलगद सोडावेत
आआआ.........................
कसलं सुंदर आहे!
तुम्ही स्वत: घरी केली आहे
+++++११११११ अत्यंत सहमत !
In reply to तुम्ही स्वत: घरी केली आहे by कंजूस
अग्ग्गग्ग! काय वर्णन!
In reply to +++++११११११ अत्यंत सहमत ! by अत्रुप्त आत्मा
=)) खर्रच! मेस मधला सोडा
In reply to अग्ग्गग्ग! काय वर्णन! by रेवती
मस्तं दिसतेय अंगुर रासमलाई,
छान!
खल्लास... मस्तच पाककृती :)
छान दिसतायत बासुंदी गोळे!
एक सिक्रेट:पनीरचे गोळे
रसगुल्ले , रसमलाइ ,छेनापुरी
In reply to एक सिक्रेट:पनीरचे गोळे by कंजूस
मस्त दिसतेय रसमलई!
मस्त दिसतेय रसमलई!
सुरेख. मीही सानिकासारखेच करते
यम्मी....
छान दिसतेय अंगूर बासुंदी!
दोन्हीचेही उत्तर हो.
In reply to छान दिसतेय अंगूर बासुंदी! by हसरी
पाकात गोळे खळाखळा उकळणे
In reply to दोन्हीचेही उत्तर हो. by रेवती
मस्तच ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Internet of Things The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 1} The Internet of Things Is Far Bigger Than Anyone Realizes { Part 2} What does Verizon's AOL buy have to do with the internet of things? Samsung takes another step into Internet of Things Samsung's Artik platform aims to jump-start the Internet of Thingsआइ ग्ग कसला भारी दिसतय, करुन
वा एका लेखात २ गोड पदार्थ.
शेवटचे ३ फोटो तर क्लासिक आले
मस्त ओ खेडुत काका,
अप्रतिम
३००+ चे पोटेन्शियल नसल्यामुळे
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे
खडीसाखरेचा
In reply to सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे by खेडूत
पावडर नाही खडीसाखर अख्खी
In reply to सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे by खेडूत
सुंद दिसत आहेत गोळे
माझी फेव्हरेट स्वीट डीश
खलास!
अशी मिठाई खायची असेल तर
मस्तच!
दूध फाडून केलेल्या छान्याचे