मानवस्वरूपाभिमानी, दबंगोत्तम, वाण्टेडनामधारी युगपुरुष श्री सलमानानंद यांच्यावर येऊ घातलेल्या कारावासरूपी अग्निदिव्यामुळे सकल भूतलतारामंडलात होहो हाहाकार होऊ घातला आहे. पैकी काहीजण जालीय गुंजारवाद्वारे पदपथशयनाच्या प्रसाराबद्दल आपल्या रोषयुक्त भावना दाहक शब्दात प्रकट करीत आहेत.
तसेच काही स्वघोषित विवेकाधिपती याउलट भूमिका घेऊन सदर तारे-तारकांचा उद्धार करीत आहेत.
या दोहोंना विचारले जावेत असे काही प्रश्न:
१. पदपथ हा झोपण्यासाठी नसतो. पण गाडी चढवण्यासाठीही नसतो. या मुद्द्यावर मौनव्रत बाळगण्याचे काय कारण असेल?
२. पदपथ जसा झोपण्यासाठी नसतो, तसाच सामान्य रस्ता हा वाहने उभी करून ठेवण्यासाठी नसतो. मग रात्री (आणि दिवसाही) नागरी रस्त्यांच्या दोतरफा उभी करून ठेवलेली वाहने कोठून येतात?
३. गृहहीन निष्कांचन लोकांना आपण रोज रात्रीपुरते आपल्या घरासमोर पायरीवर अथवा सहकारी गृहनिर्माणाच्या प्रवेशद्वाराशी झोपू देऊ काय?
वाचने
4049
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या परीने उत्तरे
झोपाळलेल्या वैमानिकाकडून
In reply to माझ्या परीने उत्तरे by हुप्प्या
करुन पहायला पाहिजे राव
२. पदपथ जसा झोपण्यासाठी नसतो,
जिथे "नो पार्कींग" बोर्ड नाही
In reply to २. पदपथ जसा झोपण्यासाठी नसतो, by काळा पहाड
मी गाडी पर्मनंट (रात्री घरी
In reply to जिथे "नो पार्कींग" बोर्ड नाही by बाळ सप्रे
स्वतःचे पार्कींग नसताना गाडी
In reply to मी गाडी पर्मनंट (रात्री घरी by काळा पहाड
पदपथ हा मोटार चालवण्याकरता