Skip to main content

भटकंती - हरिहरेश्वर (१)

लेखक मिंटी यांनी सोमवार, 24/11/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या पावसाळ्यात हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला होता.अगदी अचानकपणे एका शनिवारी आपण हरिहरेश्वरला जाऊया असं ठरलं.मग फटाफट सगळ्या गरजेच्या वस्तु प्रामुख्यानं कॅमेरा घेऊन आम्ही भटकंतीला निघालो. जाताना ताम्हिणी घाटातुन जायचं होतं. ताम्हिणी घाटातच पावसाळ्यातलं सौंदर्य तर अप्रतिम असतं.तसं हरिहरेश्वर पुण्यापासुन १३०कि. मी आहे. मुंबईहुन साधारण २२० कि. मी आहे हरिहरेश्वर. रेल्वेनी जायचं असल्यास कोकण रेल्वेनी माणगावला उतरुन मग एस. टी बस घेऊन पुढे हरिहरेश्वरला जाता येतं. साधारणपणे पुण्याहुन ३तास लागतात. आम्ही वाटेत थांबता यावं या उद्देशानं कार घेऊन निघालो. सकाळी लौकर निघाल्यानी संपुर्ण ताम्हिणी घाटानी धुक्याची चादर ओढलेली होती.... ताम्हिणी घाटाचं आकर्षण म्हणजे निसर्गानी मुक्तहस्ताने केलेली उधळण. वाटेत दिसलेली फुलं - वाटेत एका ठिकाणी थांबलो होतो त्यावेळी तिथे या अगदी मनसोक्तपणे डुंबत होत्या - वाटेत थांबुन नाश्ता करुन फिरत फिरत हरिहरेश्वरला पोचलो त्यावेळी दुपारचे १२.३० वाजले होते. फ्रेश होऊन फिरायला बाहेर पडलो आणि पहिलं दर्शन दिलं ते एका सरड्यानी - नंतर एक छोटा बेडुक दिसला. निवांत एका फळकुट्यावर बसलेला - नंतर मग आमचे पाय वळले ते त्या रम्य अशा समुद्र किनारी. (क्रमशः )
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 12310
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

शेवटची चित्रे छान आलीत. पहिले चित्रे बरीच काळ्पट आहेत.

सुंदर छायाचित्रे... ढगात वेढलेले डोंगर तर केवळ अप्रतिम. आपला ऑल टाईम फेवरिट माहौल आहे तो. धबधब्यांखाली गेलात की नाही? आणि डुंबणार्‍या म्हशी पाहून तर केवळ मत्सर वाटला. साला काय मस्त लाईफ आहे... :) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

आणि डुंबणार्‍या म्हशी पाहून तर केवळ मत्सर वाटला. साला काय मस्त लाईफ आहे... पुढच्या जन्मात तुमची ही इच्छा पुरी होवो ... तेंव्हा मात्र दुबईमधल्या बिकिनीधारक म्हशींचा हेवा वाटू देउ नका मालक. ! तथास्तु ! अवांतर : डुंबताना फक्त म्हशी दाखवल्यात ... याचा मी अखिल भारतिय रेडा संघटणे तर्फे णिशेध णोंदवतो. अतिअवांतर : हरिहरेश्वर उत्तम आहे, मिंटे तुझे फोटू (म्हंजे तु काढलेले) उत्तम ... और भी आणे दो .. जरा क्लोरमिंट खा मिंटे .. फोटूंवर अंमळ प्रकाश पडेल - टारझन

फोटोबद्दल क्रमशः धन्यवाद !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मिंटे, पावसाळ्यात ताम्हिणी घाटातून जायला सॉल्लिड मजा येते ना? मस्त आहेत फोटो. > क्रमशः भरपूर फोटो काढले असतील ना? ग्रेट.

In reply to by मनस्वी

खरचं गं....फाआआआआर मज्जा येते....धबधब्यात भिजण्याचा तर आनंद शब्दात व्यक्त नाही करता येणार.... :) फोटो खरच खुप काढले आहेत म्हणुनच तर क्रमशः

मस्त ! हा घाट पहाण्याची खुप इच्छा आहे ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आपले संकेतस्थळ

मिंटे, खुप छान आहेत गं फोटो'ज........ काही पहिले फोटो, धुक्यामुळे अंमळ धुरकटल्यासारखे वाटतात... पण ते धबधबे आणि फुलं पाहिल्यावर सगळं धुकं निवळ्ल्यासारखं झालं.... डुम्बणार्या... म्हशी.... तर केवळ सुन्दर वाटताहेत.... क्षणभर का होईना... पण हेवा वाटला..... :) आणि तो सरडा कोणत्या प्रजातीतला आहे गं? ( माहित नसेल तर जाउ देत...) :-? समुद्र ही छान आहे... सूर्य-बिम्ब दिसले असते, तर अजून सुन्दर दिसला असता.... आणि सगळ्यात आवडला, तो म्हणजे "बेडूक"..... कसला अल्टी दिसतोय... तो.... रेड कलरमुळे प्रचंड "रॉयल" दिसतोय... असं वाटतं.... असा उचलावा, आणि धरी ठेवावा, दक्षिण कोपर्‍यात.. (फेन्ग शुइ नुसार....) मस्त!.... सूर्य आणि समुद्राचे एकत्र फोटो असतील, तर नक्की लाव... :)

In reply to by मृगनयनी

आणि तो सरडा कोणत्या प्रजातीतला आहे गं? ( माहित नसेल तर जाउ देत...) आमसे मतलब, गुठलीसे क्या लेना? असो, फोटो बाजी झकास. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

In reply to by मृगनयनी

डुम्बणार्या... म्हशी.... तर केवळ सुन्दर वाटताहेत.... क्षणभर का होईना... पण हेवा वाटला..... हेवा का बरं ? तुझ्या घरापाशी कुठे णाही पाणवठा ? आणि तो सरडा कोणत्या प्रजातीतला आहे गं? ( माहित नसेल तर जाउ देत...) तो सरडा देशस्थ आहे, आणि भारतमॅट्रिमोनीवर पण रजिश्टर्ड आहे. आपला काय विचार ? - (अफ्रिकन रेडा) टारझन

मस्त आहेत फोटो ... फोटोवरुन तर तिथले वातावरण लै भारी होते असे दिसत आहे. तो "वाटेतल्या फुलांचा फोटो" तर अप्रतिम ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सुंदर छायाचित्रे... ढगात वेढलेले डोंगर तर केवळ अप्रतिम. आपला ऑल टाईम फेवरिट माहौल आहे तो. धबधब्यांखाली गेलात की नाही? बिपिन भो शी सहमत मागोवा - आमच्या काही उचापत्याचा...

सुरेख फोटो आहेत सगळे !!

ताम्हिणीतला प्रवास म्हणजे मनाला ताजातवाना करणारा अनुभव. मे महिन्यात कुटूंबासमवेत ह्याच रस्त्याने हरिहरेश्वर ला गेलो होतो. वाटेत करवंदे खात खात. छाताडावर येणारे प्रचंड कातळ हे ह्या मार्गावरच एक आणखी आकर्षण. पावसाळ्यात तर ताम्हिणीचा प्रवास केवळ स्वर्गीय. हिरवाईने नटलेले काळे कातळ खोल दर्‍या - त्यातुन घोंगावत वाहणारा थंडगार वारा. चित्त स्थिर करणारी शांतता. अहाहा. शब्दात पकडणे केवळ अशक्य. मंडळी हा अनुभव एकदआ घेउनच बघा. इथे छायाचित्रे टाकल्याबद्दल अनेक धन्यवाद! आणखी येउद्या!! (सह्याद्रिच्या कुशीत रमणारा) पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

अरे वा ! ताम्हिणीचा घाट मलासुद्धा फारच आवडतो..फरच सुंदर.. चित्रे छान आहेत. बेडकाचे चित्र विशेष आवडले. असा बेडुक दिसणे दुर्लभच वाटते. पश्चिम घाट जैववैविध्याने किती समृद्ध आहे ते पाहून आनंद होतो. तो बेडुक फंगॉईड फ्रॉग या गटातील असावा. येथे माहिती आहे. जालावर त्याचा अजून एक चांगला फोटो मिळाला. -- लिखाळ.

मिंटे, नेहमी प्रमाणे सुंदर छायाचित्र टिपली आहेस :) ताम्हणी घाट पावसाळ्यात केवळ अप्रतिम असतो. मला बेडुक खुपच आवडला. कसला सुंदर दिसतो आहे. :) प्रॅक्टीकल लॅब मध्ये नेहमीचे ते बेडुक पाहुन /फाडुन बेडुक ह्या प्राण्याची शिरशिरी आली होती, हा बेडुक मला समोर आला असतात तर मी त्याला घरी घेऊन आले असते. ;)

In reply to by शितल

हा बेडुक मला समोर आला असतात तर मी त्याला घरी घेऊन आले असते. अगं शितल बेडकाचा राजकुमार फक्त परिकथांमधे होतो... हा बेडूक जरी सुंदर असला तरी त्याचा राजकुमार होणार नाही (तू १००००००००० वेळ चुंबन घेतलस तरी) ह. घे. बाकी, फोटो खासच सगळेच.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

राजकुमार्‍यांसाठी वैधानिक इशारा : भडक रंगाचे आकर्षक वाटणारे राजकुमार सॉरी ... बेडूक फारच विषारी असतात. तेंव्हा एक टेस्ट चुंबन घ्यावं, जर काही झालं नाही तर फुडले ९९९९९९९९९ चुंबनं घ्यावीत. सौजन्यः डिस्कव्हरी चॅनल - टारझन

In reply to by प्राजु

>>अगं शितल बेडकाचा राजकुमार फक्त परिकथांमधे होतो... हा बेडूक जरी सुंदर असला तरी त्याचा राजकुमार होणार नाही (तू १००००००००० वेळ चुंबन घेतलस तरी) ह. घे. बेडकाचा राजकुमार.... हे हे हे... दुर्दैवाने ह्या परिकथा चिन मध्ये नाहीत, आणि नशिब मी चीनी नाही नाही तर चुंबनात वेळ न घालवता सरळ पोट पुजा केली असती. :) (ह.घे.)

मिंटे, सगळे फोटो मस्त आलेत, आवडले. स्वाती

होतोय मला मस्त फोटू पाहून. कधी जायला मिळणार हरीहरेश्वरला? फोटू बघूनच निवांत, शांत वाटतय. रेवती

बेडुक आणि धबधबा तर मस्तच... अजुन भारि चित्रे येउ द्या.. ७ वर्षांपुर्वी हरिहरेश्वरला गेलो होतो... जुन्या आठवनि जाग्या झाल्या.. च्यामारी कलादालनात क्रमशः लय त्रास देतं बुवा.. ...बाबा..

>>हा बेडूक जरी सुंदर असला तरी त्याचा राजकुमार होणार नाही(तू १००००००००० वेळ चुंबन घेतलस तरी) .... काय प्राजू, स्वानुभव वाट्ट?? :D ह. घे. हे. वे. सां न. ल. :) मिंटी, मस्तच आलेत गं फोटो!

छायाचित्रे मस्त आहेत. धबधबा.. फुलं.. बेडूक... खास. अभिनंदन. ताम्हिणीच्या घाटातून एकदाच प्रवास केला होता. मिट्ट काळोख- त्यात आभाळ फाटल्यासारखा पाऊस - गाडीच्या शीर्षदिव्यांमध्ये फक्त ३ फुटांपर्यंतच दिसत होते. डोगराची दिसणारी (?) कड बघत-बघत, गाडीने सरपटत सरपटत, घाट उतरलो होतो. उफ् .. तो प्रसंग. आजही भीतीने अंगावर काटा येतो. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

In reply to by प्रभाकर पेठकर

भर पावसात रात्री मालवणाहून पुण्याला आलो होतो. येताना नेहेमीचा रस्ता न घेता मुंबई-गोवा महामार्गाने माणगाव-निजामपूर-ताम्हिणीमार्गे आलो. मस्त मजा आली ड्रायव्हिंगला. खरंच घाटात ३-४ फुटापलीकडचं काहीही दिसत नाही. वेगळा अनुभव होता. (आई-वडिल मात्र जरा काळजीत होते, ती वेगळी गोष्ट)

एकदम झकास फोटो. बेडकावरील प्रतिक्रिया वाचून हेवा वाटला. ......बेडूक नशीबवान आहे!!!!!!!!!!!!!! अर्चिस

हम्म..... परत एकदा गेल्यासारखं वाट्टं नाही का ग?????? फोटो बघुन सगळा कंटाळा पळुन गेला बघ माझा.... :) पण क्रमशः चं वारं तुला पण लागलेलं दिसतय ? ;)

In reply to by श्रीमंत दामोदर पंत

दाम्या, प्रतिसाद वाढवायची अजुन एक ट्रिक सापडली रे ... चालू दे भो - टारझन

छान आहेत चित्र.. येऊ द्या अजून.. तात्या.