Skip to main content

पुण्यनगरी बद्दल माहिती हवी

बुधवार, 06/05/2015 या दिवशी प्रकाशित केले.
पुढच्या बुधवारी वडोदराहून काढता पाय. गुरुवारी सकाळी पुण्यनगरीस आगमन. गुरुवार आणी शुक्रवारी कामं उरकून जवळजवळ शुक्रवारी दुपारी मोकळा होइन, ते रवीवार रात्र पर्यंत. आता हे दोन ते अडीच दिवस कसून उपयोगात घ्यायचे.आणी पूर्ण 'पुणे' पाहायचे. पुण्यात मी दुसर्यांदा-असं म्हटलं तर पहिल्यांद्याच- कारण पहिल्यांदा जवळजवळ तीस वर्षां पूर्वी आलो होतो. त्या वेळी काही पाहणं जमलं नाही म्हणून- पहिल्यांदाच येत आहे. तरी मान्य पुणेकरांनी शहरा बद्दल तपशीलवार माहिती द्यावी. अगदी वेळपत्रकासह माहिती दिल्यास कमी वेळात जास्त पहाणी होउ शकेल. कट्टा प्रकार त्या दरम्यानास कुठे जमणार आहे का ..? मिपाकरांची प्रत्यक्ष भेट शक्य आहे की काय...? हा फायदा मी मिळवू शकणार का..! कळवावे.

वाचने 12348
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

पुण्यात फिरण्यासारखे आहे काय? खाण्याच्या ठिकाणांबद्दल माहिती हवी असल्यास देउ शकतो. राहणार कुठे आहात त्याप्रमाणे देतो. बाकी बराच विचार केल्यानंतर पुण्यात फिरण्यासारखी ४ च ठिकाणे आठवली: १. राज दिनकर केळकर संग्रहालय २. सिंहगड (सकाळी ८ च्या आत जाउन परत येणार असाल तर. नंतर उन खुप वाढते) ३. पडका शनिवारवाडा आणी ४. जोशी यांचे रेल्वे संग्रहालय. वाटल्यास पु ल देश्पांडे उद्यान बघा. एकदम मस्त. पाषाण भागात कुठेसे एक ग्रामसृष्टी उद्यान पण सुरु होते आहे म्हणे आजपासुन. कसे आहे ते माहिती नाही. सकाळी ६ च्या आत पोचणार असाल (सध्या तर ५.३० च) तर पीकॉक बे ला जा. मोर दिसतील बरेच. परिसर देखील सुंदर आहे. येणारच आहात तर चतुशृंगी मंदिरात जा. देहू रोड चे अय्यप्पा मंदिर (हे सुंदर आहे), मारुती मंदिर वगैरेही चांगली आहेत. देवळात जायचे असल्यास. पुण्याच्या आजुबाजुला बरीच मंदिरे आहेत तशी. प्रति शिर्डी, हडशी, प्रती बालाजी (नारायणपूर) वगैरे. तिथे जायचे असेल तर अर्धा दिवस तरी किमान हवा (प्रत्येकी). कात्रज कोंढवा भागात इस्कॉन पण आहे म्हणे. कसे आहे ते माहिती नाही. पुण्यातल्या लोकांची सारसबागेतल्या गणपतीवर भारी भक्ती. बघा जायचे असेल तर. बाकी पुणेकर इतर कुठे जाता येत नसल्याने कात्रज प्राणीसंग्रहालय, सारसबाग, खडकवासला, फिनिक्स मॉल, अमानॉरा मॉल, इशान्य मॉल अस्ल्या ठिकाणी जात असतात. होइतो टाळाच ही ठिकाणे. बाकी तसे पुण्यात बघण्यासारखे काहिच नाही. हॉटेलात बसून निवांत रहा नाहितर एफ सी रोड वर फेरफटका मारा.हिरवळ बघुन चेहरा टवटवीत होइल.

In reply to by मृत्युन्जय

किल्ले- राजगड, तोरणा, लोहगड, विसापुर, पुरंदर, शिवनेरी मंदिर - दगडुशेठ हलवाई, पर्वती, बनेश्वर, भुलेश्वर, भीमाशंकर, रांजणगाव, थेउर, लेण्याद्री, निळकंठेश्वर, नारायणपुर, देहु, आळंदी लेणी- कार्ला, भाजे, बेडसे इतर- आगाखान पॅलेस, एनडीए, लवासा, अॅम्बी व्हॅली, PMT च्या पुणेदर्शनने फिरा त्यापेक्षा.

तुम्हाला १.सहकारनगरचेब्लेड्स ऑफ ग्लोरी हे क्रिकेट संग्रहालय बघता येइल. २. एंम्प्रेस गार्डन आहे. ३. महादजी शिंदे छत्री - वानवडी बघता येइल : ( दुवा मायबोली या संकेतस्थळावरील असून रंगासेठ या आयडीचे लेखन आहे ) ४.जंगली महारज रस्त्यावर पाताळेश्वर बघा ५. दगडूशेठ गणपती मंदीर ६. महात्मा फुले संग्रहालय ७. पेठेमध्ये एखाद्या वाड्याच्या गेटसमोर गाडी पार्क करून अस्सल पुणेरीपणा बघा आणि जाताना चितळेंच्या बाकरवड्या घ्या ( हे म्हणजे अगदी मस्ट हं). बाकी आठवेल तसे टंकतो

In reply to by कपिलमुनी

सहकारनगरला बराच काळ घालवला पण हे संग्रहालय तेथे आहे ते माहीत नव्हते.. अरे रे.. त्यावेळेस जेंव्हा डांबरी रोड नव्हता तळजाई ला वर पर्यंत आणि स्पोर्ट्स का काय साठी एक बिल्डिंग नव्हती तेंव्हा गर्द झाडीत फिरायला आवडायचे.. न चुकता रोज जायचो चालत (जॉब नसल्यामुळे) हे आठवले.. आठवलेच आहे.. तर तळजाई अ‍ॅड करु शकता सहज फेरफटका मारण्यासाठी.. कृष्णा वडा पन आवडायचा खुप (सारंग जवळ) म्हतारा मात्र लय खडुस होता तो. पुण्यात २-३ दिवस टाईम असेल तर पुण्याच्या आजुबाजुला सुद्धा फिरा मस्त वाटेल.

In reply to by कपिलमुनी

आयला, हे संग्रहालय आहे हे माहितीच नव्हते!!!!!!!!! रच्याकने, पुण्यात लहानमोठी अनेक संग्रहालये आहेत असे दिसते. फक्त या संग्रहालयांसाठी एखादा वेगळा धागा कुणीतरी काढला तर मजा येऊन जाईल.

In reply to by बॅटमॅन

अरे पुरातत्वशास्त्राचे एक वर्कशॉप होते तेव्हा पाहिले हे सर्व. बघायला मिळेल पण वीकडेज ला जायला पाहिजे.

In reply to by बॅटमॅन

१०:३० ते ५ पण तिथे फोन करून एकदा आधी कन्फर्म करतो. तिथल्या चाल्कोलिथिक आणि इनामगाव ह्या दोन विथिका विशेष बघणीय आहेत.

In reply to by प्रचेतस

अच्छा. पण तू पूर्वपरवानगी घेतली होतीस का? अन पूर्वपरवानगी लेखी घ्यावी लागते का? त्यासाठी त्रास देतात का?

In reply to by प्रचेतस

तिथे एक कट्टा करू. म्हणजे चर्चासत्र होइल :)

In reply to by कपिलमुनी

वा वल्लीसा-बॅटमेनसा तुमच्या चर्चेतुन एक बघेबल स्थळ लाभलं सा मला.. बघण्याचा आणी समजण्याचा प्रयत्न करण्यात येईल. 'शक्य असल्यास.'

पुणेरी पाहुणचार - या स्थळाला नक्की भेट द्या कुठेतरी जमुन आलं तर! जन्मभर लक्षात राहण्यासारखे स्थळ!! ;) ह. घ्या.

In reply to by मोहनराव

"चहा घेणार का?" हा प्रश्न पाहुण्याने 'चहा नको' म्हणावे अशा पद्धतीने आंबट सुरात विचारला जातो असा आमचा अनुभव आहे.असो.सगळीकडे थोड्याफार फरकाने माणसे अशी असतातच. बाकरवडी,आंबाबर्फी मुद्दाम घेऊन जा रे संतोषा.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

नक्कीच माई, आंबाबर्फी घेवून जाइन. अगं,पण बाकरवडी कशाला...? ती तर इथलीच जगप्रसिध्ध आहे की...! बडोद्याची...!

In reply to by संतोषएकांडे

बाकरवडी मुळची गुजरातची असे ह्यांनीही पूर्वी म्हंटले होते.बडोद्याहूनच मग बाकरवडी घेऊन ये हो,पुण्यातील मिपाकर मग तुझे आवडीने स्वागत करायला स्टेशन्वर वा विमानतळावर येतील.!!

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

माई, तुच ठरव न गं कोणत्या मिपाकराला द्यायची बाकरवडी-बडोद्याची.. आणतो मी तिथे एक पाकीट बाकरवडी आणी तुझ्याच हातानी देवूया प्रत्येक मिपाकराला एक एक वडी बाकरवडी.. प्रसाद म्हणून..(:

पर्वती आगाखान पॅलेस कात्रज सर्पोद्यान तुमचे वय समजले तर अजुन काही सजेशन्स देऊ शकतो ;)

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

तुमचे वय समजले तर अजुन काही सजेशन्स देऊ शकतो ;)
अग्गाग्गा...आधी त्यांना पुण्यात तर येउदे...मग पोचवा की जिथे कुठे पोचवायचे तीथे =)) तुम्ही पुण्यातलेच दिसताय ;)

In reply to by टवाळ कार्टा

तुम्ही पुण्यातलेच दिसताय
नाय ब्वा आम्ही वल्ली मास्तरांचे शेजारी

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

वयात काय आहे दादु, तरी एक अवघड कोडं देतो त्या वरून वय नक्की करा. १९व्या वर्षी सरकारी हापीसात नोकरी लागली. सध्या ३३ वर्षाची झाली.बघा उलगडत असलं तर बाकी देशाची आझादी आमच्याहून तब्बल १६ वर्ष मोठी...

In reply to by संतोषएकांडे

वोक्के काका मग तुम्ही सारसबाग, लाल महाल, केळकर संग्रहालय बघा, बरोबर कोणी पत्नी/मुलगी वगैर स्त्रीवर्ग असेल तर तुळशीबागेत जा सायंकाळी / रात्री एखादे चांगले नाटक जर त्या दिवसात असेल तर जरुर बघा.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळ्या आता त्या वयाला उलटव..म्हणजे येईल माझं खरं वय...हा..हा..हा..

सर्व प्रतिसादकांचा धन्यवाद

तुम्ही २-३ दिवसच आहात म्हणून पहिल्यांदा सिंहगड पहा. सकाळी सात वाजता जा. आठला परत या. पहाण्यासारखं काही राहिलेलं नसलं तरी. तानाजीची समाधी आहे तिथे. त्यापुढे नतमस्तक होता येईल. दुसरं म्हणजे सारसबाग, तुळशीबाग, शनिवार वाडा, लालमहाल, कसबा गणपती, मंडई, टिळकवाडा (की केसरीवाडा?), दगडूशेठ इत्यादी तिसरं कँपमध्ये एक फेरफटका मारा, मार्झोरीन ची सँडविचेस आणि बघायची तर संग्रहालये, पुल्देश्पांडे उद्यान इत्यादी.

एक लाईट अँड साऊंड शो आहे म्हणजे मी ८-१० वर्षांमागे पाहिला आहे .( दोन्ही भाषांमध्ये निवेदन) आत्ता चालू आहे का ते माहीत नाही. चालू म्हणजे शनिवारवाडा नाही तर लाईट अँड साऊंड शो चालू आहे का ते नक्की माहीत नाही.

In reply to by नाखु

बघितलाय तो, अत्यंत कंटाळवाणा प्रकार असतो. एकदा ह्या झाडामागे, मग त्या झाडामागे नुस्ते लाईट्स चम्कत असतात. एक बाबाजी मराठी वाटावी अशा भाषेत बोलत असतो. दिलेले पैसे वाया जातील म्हणून मित्राने बळंच बसायला लावून तो जो काही शो होता तो वीसेक मिनीटं पाहायला लावला.