वन लायनर्स
कधी काळी लिहिलेले माझे वन लायनर्स येथे देत आहे. आज काळ थोडा टाईम मिळत आहे मिपा वरती वाचन आणि लिखानासाठी त्यामुळे छान वाटत आहे.
कधी काळी एक कादंबरी लिहित होतो, परंतु ती कादंबरी अपुर्ण राहिली ती राहिली.. कादंबरी लिहिणे आपल्याला अशक्य असे वाटते आहे..तो आपला प्रांत नाही उगाच २-३ भाग लिहिले आणि मिपावर वर पण दिले होते .
असो एखादे वाक्य आवडले तर जरुर सांगा
वन लायनर्स :
१. "समर्थन हे चुकीच्या गोष्टींना लागते, जे बरोबर असते ते शास्वत असते त्याला आधाराची गरज नसते."
२. मिळालेल्या सुखापेक्षा त्या पलिकडील न मिळालेल्या सुखाकडे मन धावत असते आणि या अस्थिरतेचे रुपांतर होते असमाधाना मध्ये, माणुस असाच जीवनाचा प्रवास करतो आणि मनाच्या सुखासाठी यशाचे डोंगर तयार करतो . पण जेंव्हा जेंव्हा तो शिखरावर आरुढ होतो त्याला दिसते फक्त दरी आत्म्याच्या दबलेल्या स्वरांची दरी "
३. "आपण आपल्या माणसांशी आणि मनाशी प्रामाणिक रहायचे बस्स.. या सारखे सुख जगात दूसरे कुठलेच नाही "
४ "शब्दांना चेहरा नसतो.. तो असतो स्वच्छ आरसा मनाचा ...जेंव्हा या आरश्यास चेहरा चिकटतो..तेंव्हा समजावे शब्दरुपी आरश्यावरती मानवी अहंकाराचे प्रतिबींब उमटले ते"
५. कलाकारास वय नसते .. आणि त्याच्या कलाकृतीस कुठलेही बंधन.. लहान-मोठे पणाचे नाते एकदा का कलाकाराशी जोडले की उरतो फ़क्त आभास..बस्स.. कलाकृतीवरील निस्सीम प्रेमा ऐवजी राहतो फ़क्त एक क्रुत्रिम देखावा..
६. "अखंड दु:ख भोगणार्यांना ही दूसर्यास दु:ख देवूनच आनंद उपभोगता येतो "
७. "परीवर्तन .. परीसा प्रमाणे राहुन येणार्या प्रत्येक गोष्टीचे सोने केल्यास मिळणार्या यशास परीवर्तन म्हणतात "
८. "हातात असलेले फुलपाखरू उडाले की मागे उरतात ते रंग,फक्त रंग आणि ते ही फिकट , तसाच हा काळ .. तो ही असाच पटकन निघून जातो आठवणींचे रंग मागे ठेवून "
९. " काळाच्या प्रवाहात आयुष्य वाहत जात अण् या प्रवाहात शरीर रुपी अंगरख्याची लक्तरं होतात .. म्हातारपण हे आत्म्याच्या उच्छादी पणाला शाप असतं "
१०. " मन हे एक वृक्ष असते अन आठवणी त्या वृक्षाची पाने, ओळखीच्या दृष्यांची झुळूक एकदा का आली की ही पाने सळतात.. पूर्ण वृक्ष शहारून जातो अन कधी कधी तर नयनांवाटे गालावर अश्रू फुलांची ओघळण होते."
११. "शिखरावरती पोहचण्यासाठी प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात आणि दृष्टिकोन भिन्न, फक्त शिखरावरती पोहचल्यावर प्रत्येकाने निर्मायची असते ताकद आपल्या पायात शिखरावरती ठाम उभे रहाण्यासाठी ... "
१२. "ambulance वरील अक्षरे उलटी असतात कारण प्रत्येक जीविताचा प्रवास हा जीवनाकडून मरणाकडे चालू असतो, फक्त ambulance मधील व्यक्तीचा प्रवास हा उलटा मरणाकडून जीवनाकडे चालु असतो"
1३. "नातं कीतीही सुंदर असले ना तरी त्यातील बंध कोठे सैल आहेत आणि कोठे घट्ट हे नातं निभावणार्यालाच माहीत असते, म्हणुन त्या अनुशंघाने आपण नातं निभवत रहायच.. बस्स.. नात्याला मायेचा ओलावा आपोआप मिळतो"
१४. " आयुष्यामध्ये धडपड नसेल तर मिळालेल्या यशास ही काही अर्थ आणि आनंद नसतो "
१५. "यशाच्या वाटेवर जाण्यासाठी फक्त नविन मार्गाची इच्छा असणे गरजेचे नाही तर परिचित रस्ते सोडण्याचे धेर्य बाळगणे गरजेचे असते"
१६. "लिहिण्याला प्रामाणिकतेची जोड मिळाली की फक्त लिखाण होत नाही तर तो आयुष्याचा शिलालेख बनतो"
१७. "राजकारण हे प्रत्येक माणसाच्या मनात दडलेले असते .. माणुस जितका शांत तितका त्याचा रंग गडद"
१८. " अनुभव हा सुद्धा खुप वाईट मित्र असु शकतो"
१९. " प्रतिष्टावंतानी विचार करावा .. आपली जी प्रतिष्टा आहे ती समाजामध्ये आहे की मनामध्ये कारण या जगात प्रतिष्टा मिळवण्यासाठी बर्याचदा मनाला गहान ठेवावे लागते"
२०. " आपल्या विचारांशी प्रामाणिक रहाणे, हेच या जगातील सर्वश्रेष्ट कर्तव्य आहे "
२१. "सुख आणि दु;ख हे एकटेपणाच्याच दोन समान बाजू आहेत. माणसाचे दु:ख हे धृव तार्यासम असते.. अटळ आणि एकटे.. सुखा मध्ये माणुस अविरत आनंदी असतो, सूर्यासम.. अविरत.. स्वयंप्रकाशित..
पण सुर्यासही शाप असतो एकटेपणाचा म्हणुनच कदाचीत सुर्यासोबत कोणीच तारा नसतो सोबतीला"
२२. "चांगल काय आणि वाईट काय यांची सिमा जशी ठरलेली , तसेच गुरु आणि शिष्य
यांचे नाते असते.. अबाधीत ..समांतर"
२३ .एकटेपणा हाच आयुष्याचा एकुलता एक निरंतर सोबती आहे ..
२४. "काही प्रश्न असे असतात की त्यांची उत्तरे शोधली नाहीत तर जीवनाची असाध्य उत्तरे आपणास मिळतात"
२५ ." या जगात मैत्रीला स्थर नसतो , पण जर माणुस आपल्याच विचारांच्या टेकडीवरून मैत्रीकडे पहात असेल तर त्याला ती ठेंगणीच वाटणार.... अस्थीर विचार मैत्रीचा स्थर ठरवू शकतात, पण मैत्री विचारांचे स्थित्यंतरे पेलुन आपल्या जाग्यावर सदैव स्थिर असते "
२६. "जोपर्यंत पुरुष तन सोडून मनाकडे वळत नाही, तो पर्यंत मुलींनी आपणास मन नाही असेच समजून वागावे, मुली एकदा का मनाच्या चक्रात अडकल्या की समोरच्याची दृष्टी त्यांना अस्पष्ट दिसते .. आणि या चक्रात त्या स्वताला परावलंबी समजतात आणि मनाच्या गुरुत्वीय शक्तीभोवती फ़िरताना त्या कधी दूर फ़ेकल्या जातात त्यांनाच कळत नाही "
२७ "मन आणि विचार यात काहीच फरक नसतो, आपल्या विचरांना एक रुप देण्यासाठीच माणसाने मनाचे अस्तित्व निर्माण केले.. पण आता माणुसच विचार करतोय मनाचे स्थान कोठे आहे ..
पण तो विसरलाय विचार हाच मनाचा जन्मदाता आहे "
२८ ."वय वाढते शरीराचे .. मन तरुण असते ..भावनांना चिरतारुण्याचे वरदान लाभलेले असते..म्हणुन कुठलाही कलाकार वयस्कर नसतो, त्याच्या नजरेत सदा तारुण्य असते.. "
२९. आपल्या कलाकृतीच्या निर्मितीचा अहम नसलेला एकमेव कलाकार म्हणजे निसर्ग.
३०. "अस्थिर जीवन झाले की जगणे व्यर्थ वाटते माणसाला, आणि मग मनाच्या धुसर खिडकीतुन दिसतो फक्त एक मार्ग.. शेवटाचा.., भाबडे पणा हा अस्थिरतेची पहीली शिकार असतो त्यामुळे विचारांची ढाल हाती घेवुन अस्थिरतेचा सामना करावा प्रत्येकाने "
३१. relations हे माणसांसाठी असतात .. माणसे relations साठी नसतात ..
३२. "कुठल्याही कलाकारास त्यानी केलेल्या विविध कलाकृतींच्या निर्मितीमध्ये कधीच फ़रक जानवत नसतो त्याला दिसतो तो फ़क्त आनंद.. एक निस्सीम कलाकृतीच्या निर्मितीचा आनंद" ..
३३ " स्वप्न आणि अस्तित्व यांचा मेळ घालण्यासाठी सत्याच्या वाटेवर चालत रहावे .. तेंव्हाच माणसास मिळते एक स्वप्नवत अस्तित्व .. सत्य हाच जीवनात यशस्वी होण्याचा एकमात्र महामार्ग आहे" ..
३४."आपण काय आहोत आणि कोण आहोत हे समाजाला दाखवताना दुसर्यास तुच्छ लेखुन वक्तव्य करणे म्हणजे आपल्याच विचारांवर आपणच केलेला निर्घुन बलात्कार असतो" ----
३५ लादलेली नातीं न मानता मानुसकीच्या नात्यांनी समाजात वावरणे हेच आपण आपल्याशी निभावलेले सर्वस्रेष्ट नातं आहे ..
३६. "ज्यांना स्वताचे मत नसते, कींवा ते व्यक्त करता येत नाही, त्या व्यक्तिंस दूसर्यास मत विचारण्याचा अधिकार नसतो..."
३७. " जेंव्हा माणुस स्वताचा अहम बाजुला ठेवुन सारासार विचार करतो, तेंव्हाच त्याला स्वताचे आणि इतरांचे खरे रुप स्पष्ट दिसते.."
३८. "इतिहास हा वर्तमानावर अवलंबुन असतो ना की वर्तमान इतिहासावर"
३९. "कलाकार हा त्याच्यावर झालेले वार सहन करु शकतो, परंतु त्याच्या कलेवर झालेले वार त्याच्या ह्रद्याच्या ठिकर्या उडवून जातात.."
४०. संस्कृती आणि आपले विचार यात तफ़ावत आली तरी चालते ..पण आपले विचार, जर विचार करण्यास लावत असले तर आपण तरी त्या विचारांचा रीस्पेक्ट केला तरी बस्स ..बाकी संस्कृती ही विचारांच्या अस्तित्वावर तर टीकुन आहे
४१. " 'माझा' हा मनातील भावच 'परके'पणाचा जन्मदाता असतो, कुठल्याही वस्तुविषयी 'माझा' हा भाव निर्माण झाला की इतर जे ' आपले' या संज्ञेत बसतात, त्याविषयी ही आपोआप परकेपणाची जाणीव निर्मान होते."
४२. " 'शुभविवाह' ह्या शब्दाविषयी जरी वलय असले, तरी शुभविवाह हा नविन जोडप्यासाठी मंदिराबाहेरील पायरीसमानच असतो,'संसार' हेच खरे मंदिर.. आणि शुभसंसार हाच खरा भक्तीमार्ग"
४३. "creativity आणि त्यातुन मिळणारा आनंद हीच जीवनाची खरी संपत्ती असते.."
४४.. विचार हे प्रत्येकाच्या मनात असतात .. आणि प्रत्येकाच्या विचारांचा आदर करणे हे आपल्या मनावर असते
४५. मैत्रीमध्ये आपला फ़्रेंड मित्र आहे की मैत्रीण असा जेंव्हा विचार केला जातो तेंव्हाच त्यातिल निखळता निखळली जाते ... आणि मग उरते ती फ़क्त अस्तित्वाची आणि समाजकारणाची एक रेघ, उरतो फ़क्त एक पशुतुल्य माणुस आणि स्त्री ...
४६. " गगनभेदी इमारती बांधुन स्व:तावरच खुष असणारा माणुस, आकाशाच्या ईवल्याश्या तुकड्यावरही आपला हक्क प्रस्थापित करु शकत नाही. म्हणुनच आनंदाचे परिमान उंची न मानता, काही क्षणांचे खोल समाधान मानावे .."
४७. " समाधान आणि सुख यात फ़रक आहे .. समाधान हे आत्मिक असते, सुख हे सार्वभौम असते.
माणसाचा प्रवास सार्वभौमतेकडुन आत्मिकतेकडे जेंव्हा होतो तेंव्हा जीवनास पुर्णत्व लाभते"
४८. समाज म्हणजे काय ?
विशिष्ट चालीरीती आणि रुढींवर जातीची पगडी घेवून स्वार झालेले लोक म्हणजे समाज
४९ एकजुट ह्या शब्दातुनच फ़ुट आहे हे अधोरेखीत करुन आपला असणारा मराठी माणुस आपल्या तुकड्यांवर प्रेम करु लागला की एकजुट हे एक स्वप्न वाटते.. दुभंगलेले स्वप्न "
५०. यशस्वीतेचे कोठलेही परिमान न मानुन, येणारा प्रत्येक क्षण सुखाचा असो वा दुखाचा योग्य पद्धतीने जगणे म्हणजेच कदाचीत यशस्वी आयुष्य असेन
५१. "प्रेम हे प्रखर असते, त्यामुळे कधी कधी त्याची प्रखरता डोळ्यासमोर धुसरता निर्माण करते"
५२. "माणसाचे विचार मनातुन येतात, भाषेतुन येते ते फ़क्त त्या विचारांचे प्रतिबिंब"
५३. "घडलेल्या वाईट गोष्टींकडे जग जागरुकतेने पहात असते, आणि चांगल्या गोष्टींकडे एक अपवाद म्हणुन,
त्यामुळे आपण आपल्या गोष्टी आपल्या मनाने करत जायचे"
५४. "आघात हा मनावर होतो, शरीरावर होते ती जखम. जखम कालांतराने बरी होते, परंतु आघाताचे तरंग आयुष्यभर मनात संचार करत असतात."
५५. "इतिहास हा कागदाच्या पानावर नाही तर मनावर कोरला गेला पाहिजे "
५६. "प्रत्येक वर्तमान हा कालांतराने भुतकाळ होत जातो, परंतु त्याचा इतिहास बनवणे हे प्रत्येकाच्या मनगटात असते."
५७. तन हे विहिर माणले तरी मन हे पाणी असते हे जाणावे.
प्रेम विहिरिवर करायचे की पाण्यावर हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.
५८. प्रेमाचा रंग जरी दिसत नसला तरी आयुष्य रंगीत करण्याची ताकद प्रेमा मध्येच असते.
५९. "प्रेमाला व्याख्येत लिहिणे जरी सोपे असले तरी प्रेमाला जीवनात अखंडपणे बसवने तितकेच अवघड असते, हे ज्याला जमते तो माणुस."
६०. जोड मिळाल्यानेच अखंड अशी निर्मिती होते. तशेच अपुर्णत्वाचे सैल बंध ही, पुर्णत्वाचे आकाश विणत असतात...
६१. शुन्य भावनेच्या पाठीमागे, विचारांची एक शलाखा असते .. एक रेघ असते , जेव्हड्या शुन्य भावना जास्त तेव्हडी विचारांची रेघ मोठी
६२. "यशाच्या मार्गावरील अमुर्त अपयश हे आनंद देण्याचे कारंजे असते"
६३. "मुर्ख लोकांची परिसिमा दाखवताना .. त्यांच्या रेषेला आपला स्पर्ष होणे सहाजीकच असते .. त्या रेषेलाच बांध म्हणु शकतो आपण .. कधी तरी आपले एखादे विचारांचे पान घोंगावत तो बांध ओलांडतोच .. म्हणुन काही आपल्या हद्दीतील विचारांचा वृक्ष जागा बदलत नसतो..."
६४. " माणुस सवईचा गुलाम झाला की ती सवयच माणसाची ओळख बनते .. आणी कधी कधी त्याचे आयुष्य ह्याच सवईने अधोरेखीत होते "
------------ शब्दमेघ
याद्या
10684
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
वन लायनर्स चा भुकंप.कादंबरी।
रोज एकेक वाचणेत येईल.
एक ठिगळ माझ्याकडून
_/\_
In reply to एक ठिगळ माझ्याकडून by मिसळलेला काव्यप्रेमी
सगळे वनलायनर आवडले...
पैजारबुवा, असहमताशी काही
In reply to सगळे वनलायनर आवडले... by ज्ञानोबाचे पैजार
उत्तम !
गणेशा.. वपुंचा फॅन आहेस का..?
अगदी हेच म्हणायला आलो होतो
In reply to गणेशा.. वपुंचा फॅन आहेस का..? by मोदक
लेखक बरेचसे आवडतात.. त्यात
In reply to गणेशा.. वपुंचा फॅन आहेस का..? by मोदक
शोधून देतो.. वपुर्झा मध्ये
In reply to लेखक बरेचसे आवडतात.. त्यात by गणेशा
नक्कीच देवु शकतो ... तु
In reply to शोधून देतो.. वपुर्झा मध्ये by मोदक
तु शोध पण सापडेपर्यंत विश्वास
In reply to नक्कीच देवु शकतो ... तु by गणेशा
तु शोध पण सापडेपर्यंत विश्वास ठेवावा.कारण मी प्रामाणिक आहे.गणेशा.. लै विचार करून राहिलास बे.. :))अरे मोदका.. मला वाटले.. मित्र
In reply to तु शोध पण सापडेपर्यंत विश्वास by मोदक
वपुंचे पाल्हाळिक लेखन कसे काय
In reply to नक्कीच देवु शकतो ... तु by गणेशा
माझ्या वाचणाची खरी सुरुवातच
In reply to वपुंचे पाल्हाळिक लेखन कसे काय by प्रचेतस
ब्लॉग पाहेन रे पण वपुंचे
In reply to माझ्या वाचणाची खरी सुरुवातच by गणेशा
कोणाचे लेखन आवडत नाही असे असु
In reply to ब्लॉग पाहेन रे पण वपुंचे by प्रचेतस
वाक्य सुंदर आहेच पण अशी
In reply to कोणाचे लेखन आवडत नाही असे असु by गणेशा
सुंदर बिंदर कै नै
In reply to वाक्य सुंदर आहेच पण अशी by प्रचेतस
प्रचंड सहमत
In reply to सुंदर बिंदर कै नै by अत्रन्गि पाउस
हल्ली काहीवेळा त्यांना
In reply to सुंदर बिंदर कै नै by अत्रन्गि पाउस
हे खांडेकरांचे वाक्य आहे नं
In reply to कोणाचे लेखन आवडत नाही असे असु by गणेशा
.
In reply to हे खांडेकरांचे वाक्य आहे नं by अत्रन्गि पाउस
वपुर्झा (भाग १ व २) पान
In reply to हे खांडेकरांचे वाक्य आहे नं by अत्रन्गि पाउस
तुला भेटलेलो नसतो तर श्री.रंग
In reply to वपुर्झा (भाग १ व २) पान by मोदक
असहमत
In reply to तुला भेटलेलो नसतो तर श्री.रंग by कॅप्टन जॅक स्पॅरो
=))
In reply to असहमत by श्रीरंग_जोशी
खपलो. वयं झालं?? खरं वाटेल
In reply to असहमत by श्रीरंग_जोशी
अल्केमिस्ट जब्राट पुस्तक आहे.
In reply to कोणाचे लेखन आवडत नाही असे असु by गणेशा
मैने एक बार कमिटमेंट करली तो
बा द वे. हल्ली एक गोष्ट
एग्झाकटली
In reply to बा द वे. हल्ली एक गोष्ट by कॅप्टन जॅक स्पॅरो
जगायचा आनंद घ्यायचा असेल तर
चक्क सहमत आहे
In reply to जगायचा आनंद घ्यायचा असेल तर by विवेकपटाईत
वपुंबद्दल कुठेतरी वाचलेला एक
अवांतरः गोजिरीवरुन आठवलं,
In reply to वपुंबद्दल कुठेतरी वाचलेला एक by आदूबाळ
ढापलेला आहे तो...आणि अतिशय
In reply to अवांतरः गोजिरीवरुन आठवलं, by सतिश गावडे
50 First Dates
In reply to ढापलेला आहे तो...आणि अतिशय by टवाळ कार्टा
drew barrymore ;)
In reply to 50 First Dates by गणेशा
नमस्कार
३८. "इतिहास हा वर्तमानावर
In reply to नमस्कार by लालगरूड
वा!!!!
In reply to ३८. "इतिहास हा वर्तमानावर by गणेशा
हातात असलेले फुलपाखरू उडाले
वाह
धन्यवाद मित्रा....
In reply to वाह by श्रीरंग_जोशी
साहित्यात पुढे जायचे असेल तर
In reply to धन्यवाद मित्रा.... by गणेशा
साहित्य म्हणजे मी गाणे/कविता
In reply to साहित्यात पुढे जायचे असेल तर by आदूबाळ
आपला वन लाईनर
लायनर.... छे... मस्कारा आहे चांगला
धन्यवाद !
In reply to लायनर.... छे... मस्कारा आहे चांगला by गरजू पाटिल.
गणेशा.. वपुर्झामध्ये हे वाक्य
In reply to धन्यवाद ! by गणेशा
त्या निमित्ताने बोलणे झाले
In reply to गणेशा.. वपुर्झामध्ये हे वाक्य by मोदक
धन्यवाद.
In reply to त्या निमित्ताने बोलणे झाले by गणेशा
सध्या प्रचलित असणारे ३
तो तुमचा समज आहे
.चालु द्या तुमचे निरर्थक अत्मरंजन
.ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूल्ल्ल्ल्ल्ल्ल्लऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
त्याच्या आधीचे
In reply to सध्या प्रचलित असणारे ३ by प्रसाद गोडबोले
हायला हे विसरलोच होतो की =))
In reply to त्याच्या आधीचे by टवाळ कार्टा
=))
In reply to सध्या प्रचलित असणारे ३ by प्रसाद गोडबोले
नुकताच वाचलेला वन लायनर...
In reply to =)) by बॅटमॅन
पण किती काही म्हणा...
In reply to नुकताच वाचलेला वन लायनर... by सतिश गावडे
येथील ९ नंबरचे वाक्य बर्याच
गणेशा म्हणजे प्रतिक्रियेचा
धन्यवाद,
In reply to गणेशा म्हणजे प्रतिक्रियेचा by निनाद मुक्काम …
अहाहा !!
In reply to गणेशा म्हणजे प्रतिक्रियेचा by निनाद मुक्काम …
नवा है यह.....
एकदम मस्त
In reply to नवा है यह..... by गरजू पाटिल.