✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एम बी बी एस = बी ए एम एस ???

प
पगला गजोधर यांनी
Mon, 05/04/2015 - 13:51  ·  लेख
लेख
एका वृत्तपत्रीय बातमीनुसार शासनाने महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्‍टिशनल ऍक्‍ट संदर्भातील जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राज्यातील आयुर्वेदिक डॉक्‍टरांना ऍलोपॅथिक प्रॅक्‍टिस करण्याची मुभा मिळाली आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवेचा लाभही मिळणार आहे. राज्यात आयुर्वेदिक डॉक्‍टरांची संख्या 80 हजारांच्या घरात आहे. त्यातील बहुतांशी डॉक्‍टर हे ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देतात. या डॉक्‍टरांना ऍलोपॅथिक सेवा देण्याची मुभा कायद्याने प्राप्त नसल्याने त्यांना ही वैद्यकीय सेवा देता येत नव्हती. धावपळीच्या जगात "आजारावर त्वरित मात करणारेच उपचार करा‘, अशी मागणी वाढू लागली. अधिकृत परवानगी नसल्याने आयुर्वेदिक डॉक्‍टरांना ऍलोपॅथिक सेवा देता येत नव्हती. परिणामी रुग्णांना अशा वैद्यकीय सेवेसाठी शहराकडे यावे लागे. यात त्यांचे श्रम, वेळ व पैसा खर्च होत होता. म्हणजे ग्रामीण रुग्ण त्यांचा वेळ श्रम पैसा खर्च करून शहरात जावून ऍलोपॅथिक उपचार घ्यायचे ? गावात आयुर्वेदिक डॉक्‍टर असताना सुद्धा ? म्हणून हि अधिसूचना ????
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14386 वाचन

💬 प्रतिसाद (63)

प्रतिक्रिया

म्हणूनच......

पगला गजोधर
Mon, 05/04/2015 - 22:32 नवीन
ऍलोपॅथिक डॉक्‍टरांनी,आयुर्वेदिक प्रिशिप्शन देणे चूकच,..... म्हणूनच आयुर्वेदिक डॉक्‍टरांनी कार्मुकत्व, दोषाधिक्य, संधीगत वात/आमवात , लिव्ह ५२ / आरोग्यवर्धीनी/ अश्यासारख्या आयुर्वेदिक डोमेनमध्ये रुग्णसेवा करावी.......आंदोलने करून ऍलोपॅथिक प्रॅक्‍टिस करण्याची मुभा मागण्यापेक्षा, ऍलोपॅथिक डॉक्‍टरांनी आयुर्वेद औषधी प्रीस्क्राइब करण्यावर बंदीची मागणी करणारी आंदोलने करणे सयुक्तिक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

आय.टी.मधले उंटावरचे शहाणेही

कपिलमुनी
Tue, 05/05/2015 - 10:45 नवीन
फक्त बाकी आयटी वाले अशा शहाण्यांना मूर्ख म्हणतात . पण एका डॉक्टरला नावे ठेवली की गोपाळ धावून येतात. तुम्ही स्पष्टपणे अ‍ॅलोपथी असो की आयुर्वेद काही डॉक्टर चुकीची औषधे देतात हे प्रांजळपणे सांगितले. आपल्या व्यवसायक्षेत्रामधल्या अपप्रवृती सांगितल्याच पाहिजेत . अ‍ॅलोपथी , आयुर्वेद , आय टी , बिल्डर किम्वा वकिल कोणीही असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

+१

बॅटमॅन
Tue, 05/05/2015 - 18:32 नवीन
फक्त बाकी आयटी वाले अशा शहाण्यांना मूर्ख म्हणतात . पण एका डॉक्टरला नावे ठेवली की गोपाळ धावून येतात.
अगदी अगदी. सर्व डाक्तरांचे तारणहारच जणू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

केकवाला

अत्रन्गि पाउस
Tue, 05/05/2015 - 22:57 नवीन
काही केकवाल्यान्पायी सगळे शिव्या खायचे आणि काही गुंडान्पायी सगळे केकवाले सरसकट सगळ्या लोकांना जबाबदार धरून भ्रष्ट केकवाले अजूनच महाग / भेसळ वाले केक विकायचे ....चांगले केकवाले चांगले केक विकायचे ... ...गोंधळ सुरूच राहिला ..वाढतच राहीला आणि अजून बराच वेळ चालूच राहील असे वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

सहमत .

नूतन सावंत
Mon, 05/04/2015 - 20:56 नवीन
१००% सहमत .
  • Log in or register to post comments

हाफशेंच्युरी निमीत्त श्री

जेपी
Wed, 05/06/2015 - 11:23 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.आनंदी गोपाळ यांचा सत्कार एक अविपत्तिकर चुर्णाची बाटली देऊन करण्यात येत आहे.. शुभेच्छुक-जेपी आणी तमाम पॅथी(टीक्) कार्यकर्ते..
  • Log in or register to post comments

+१

अत्रन्गि पाउस
Tue, 05/05/2015 - 22:51 नवीन
फुटलोय हसून ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

थोडी दुरुस्ती केल्याने

नाखु
गुरुवार, 05/07/2015 - 16:29 नवीन
प्र्.का.टा.आ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस

दुरुस्ती केली आहे.

जेपी
Wed, 05/06/2015 - 11:25 नवीन
दुरुस्ती केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

आता बूच मारल्यानंतरही

मृत्युन्जय
Wed, 05/06/2015 - 11:27 नवीन
आता बूच मारल्यानंतरही दुरुस्ती करता येते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

नाही.

जेपी
Wed, 05/06/2015 - 16:29 नवीन
नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सब घोडे बारा टक्के

रमेश आठवले
Wed, 05/06/2015 - 09:12 नवीन
आलोपाथिक डॉक्टरांना आयुर्वेदा च्या डॉक्टरांपेक्षा प्रवेश मिळण्यासाठी खूप जास्त स्पर्धेतून जावे लागते, शिक्षण काल वर्षभराने तरी जास्त असतो आणि पदवी मिळेपर्यंत बराच जास्त खर्च करावा लागतो . असे असताना सरकारने केवळ लोकानुनयाचे धोरण ठेऊन असा फतवा काढणे हा आलोपाथिक डॉक्टरांवर अन्याय आहे. - हे काय फळ मम तपाला - असेच त्याना वाटणार. विंदा करंदीकर यांच्या ' सब घोडे बारा टक्के" या कवितेची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

ह्याचा काय सम्बन्ध ?

अत्रन्गि पाउस
Wed, 05/06/2015 - 11:17 नवीन
आलोपाथिक डॉक्टरांना आयुर्वेदा च्या डॉक्टरांपेक्षा प्रवेश मिळण्यासाठी खूप जास्त स्पर्धेतून जावे लागते, शिक्षण काल वर्षभराने तरी जास्त असतो आणि पदवी मिळेपर्यंत बराच जास्त खर्च करावा लागतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींच्या परताव्याची हमी सरकारने घ्यावी कि काय ?? कठीण आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा