जय महाराष्ट्र!!
काही दिवसांपूर्वी मी ओमान मधल्या शिक्षण खात्याच्या एका बैठकीला उपस्थिती लावली. विषय शैक्षणिकच होते. त्या बैठकीला मस्कत मधल्या सर्व खाजगी आणि आंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम चालवणाऱ्या शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
नेहमीचे शैक्षणिक विषय चर्चिले गेल्यावर शंका समाधान आणि समस्या निवारणाचा कार्यक्रम पार पडला. जे काही अमेरिकन आणि ब्रिटीश शाळांचे प्रतिनिधी होते त्यांनी अशी समस्या उपस्थित केली कि शिक्षण खात्याची जी परिपत्रके असतात ती अरेबिक मधून पाठवली जातात. आम्हाला ती इंग्रजीत भाषांतरित करून घ्यावी लागतात. हा द्राविडी प्राणायाम टाळण्यासाठी शिक्षण खात्याची परिपत्रके हि इंग्रजीतून पाठवण्याची सोय करावी. सरकारी शिक्षण खात्याकडे भाषांतर करण्यासाठी दुभाष्याची सोय नसेल तर शहरात जे भाषांतर करणारे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडून भाषांतर करून परिपत्रके पाठवावीत. त्यावर शिक्षण खात्याच्या ज्या सरसंचालिका महोदया होत्या ( ज्या स्वतः उत्कृष्ट इंग्रजी बोलत होत्या) त्यांनी सांगितले कि “अरेबिक” हि ओमान ची राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे बैठकीचे कामकाज हे सुरुवातीला अरेबिक मधूनच सुरु होईल आणि नंतर लगेच त्याचा अनुवाद सर्वांसाठी इंग्रजीतून केला जाईल. तसेच केवळ शिक्षण खात्याचीच नव्हेत तर सर्व सरकारी खात्याची अधिकृत पत्रके अरेबिक मधेच प्रसृत होतील. शिक्षण संस्थाना त्यांच्याकडे दुभाषक नेमून ति भाषांतरित करून घ्यावी लागतील.त्याच प्रमाणे शिक्षण खात्याशी करावा लागणारा पत्रव्यवहार हासुद्धा अरेबिक मधेच करावा लागेल. हे सर्व संस्थांसाठी अनिवार्य आहे! इंग्रजीतून येणारे कोणतेही पत्र स्वीकारले जाणार नाही किंवा त्याला प्रतिसाद सुद्धा दिला जाणार नाही.
एवढेच नव्हे तर ओमान ची संस्कृती जपण्यासाठी प्रत्येक संस्थेच्या स्वागत कक्षात “ओमानी कॉफी (खास अरेबिक सुरई मध्ये) आणि खजूर” हे ठेवलेच गेले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी होते कि नाही यावर सुद्धा लक्ष ठेवण्यात येईल. (आणि खास अधिकाऱ्यांकडून ते नियमितपणे तपासले जाते.) आपण ओमान मध्ये आहात आणि इथली भाषा आणि संस्कृतीचा आदर करणे सर्वांवर बंधनकारक आहे!
आज महाराष्ट्र दिन. आपल्याकडे मराठीचा असा आग्रह धरणे कठीण आहे का?
जय महाराष्ट्र!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपल्याकडे मराठीचा असा आग्रह
लेखनाच्या आशयाशी असहमत
काही अंशी सहमत , पण याच
काय काय टिकून राहणार
बुद्धीला पटतेय हो . पण मनाला
संस्कृती
आग्रह
आप्ले भाषेचे आग्रही लोक
उसासा ~
मराठीचा आग्रह धरणे अजिबात कठीण नाही, फक्त कठीण मराठी नको.
कसं आहे नं
जरा अवांतर
सहमत
काय हे!
दिव्य मराठी किंवा मराठीतले दिव्य !
शब्द माहित असणे आणि अर्थ