✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पैसोबा पुराण

न
निमिष सोनार यांनी
Wed, 04/29/2015 - 11:01  ·  लेख
लेख
माझ्या अल्प ज्ञानानुसार आणि अल्प अनुभवानुसार मी लिहिलेले पैसोबा पुराण- माणसे जिंका. माणसे जोडा. पण ती पैशांनी नव्हे! आपल्या चांगल्या कृत्यांनी. चांगल्या स्वभावाने! पैशांनी जोडल्यास पैसा संपल्यावर माणसे पण दूर जातील. पैसा जवळ असो किंवा नसो, काही लोक पैशांचा खोटा बडेजाव दाखवतात. एक उदाहरण द्यायचे तर एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. असे जे करतात तेच पैशांना नकळत त्यांच्या जीवनात अवाजवी महत्व देत असतात, पण त्यांच्या मनात मात्र पैशांबद्दल द्वेष असतो. पैशांचा द्वेष करू नका. कारण पैसे निर्जीव आहेत. पैसे जवळ असणार्‍या माणसांचा द्वेष करू नका. कारण त्यांनी तो मिळवण्यासाठी केलेली मेहेनत आपल्याला माहित नसते. आणि जर कुणी वाईट मार्गाने पैसा मिळवला असेलच तर त्याला त्याचे फळ मिळेलच. त्याची चिंता आपण कर्मफल सिद्धांतावर सोडून द्यावी. अर्थात पैशांचे महत्व आहे आणि ते नाकारून चालणार नाही. तेव्हा पैशाला तुमचे गुलाम बनवा. पैशाचे गुलाम बनू नका. पैशाने पैसा वाढवा. कारण मोठमोठया उद्योगपतींनी मोठमोठी स्वप्ने पाहिली नसती आणि करोडोंचे भांडवल टाकून, मोठमोठया कंपन्या उभारल्या नसत्या तर आपल्यासारख्या लाखो करोडो लोकांना आज चरितार्थ चालवायला नोकर्‍या मिळाल्या असत्या का? त्या उद्योगपतींनीही आणि सगळ्यांनीच जर हाच विचार केला असता की, "जास्त पैसा नाश करतो, चला आपण अल्पसमाधानी राहू आणि एखादा जाॅब शोधू" तर मग या जगात इतरांना नोकरी देणार्‍या कंपन्या कारखाने उभेच राहिले नसते. मेहेनत करा. पैसा कमवा. पैसा टिकवा. पैसा वाढवा. माणसे जोडा. माणसे टिकवा. पण पैशाच्या प्रभावाने नव्हे तर चांगल्या स्वभावाने! पाच हजार रूपये जेवढे महत्वाचे तेवढेच पाच पैसे सुध्दा महत्त्वाचे हे जो जाणतो तोच खरे पैशाचे मोल जाणतो. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत की शाही घराणे, राज घराणे यांना वारसा हक्काने पैसा मिळतो पण त्यांना तो टिकवता आला नाही. उलट तो विकून खाल्ला गेला. पैसा टिकवणे आणि वाढवणे हे एक कौशल्य आहे. ते ज्या राजघराण्यांना जमलं त्यांची रया कधीच लयाला गेली नाही. एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला जर आपण अशी दूषणे देत असू की "याच्या लेखी पैसाच सर्वकाही आहे" तर त्याच न्यायानूसार आपण सुद्धा दोषी ठरतो कारण "फक्त पैशांची मदत केली नाही म्हणून त्याला वाईट समजतो" म्हणजेच त्या व्यक्तीशी असलेल्या मैत्री अथवा नात्याला आपण सुद्धा फक्त पैश्यांपुरते महत्व देतो आहे असा त्याचा अर्थ होतो, नाही का? हे जर खरे असेल तर माणसे जोडण्यामागे स्वार्थ असतो हे सिद्ध होते. महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला? पटतंय का अापल्याला मी माझ्या अल्पज्ञानानुसार लिहिलेलं हे पैसापुराण? आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
अर्थकारण
अर्थव्यवहार
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
22189 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

निमिष्काका, शीर्षक पटलं नाही!

खेडूत
Wed, 04/29/2015 - 11:28 नवीन
निमिष्काका, शीर्षक पटलं नाही! पुराण कुठाय? थोपुवरून उचलून डायरेक टाकलंत ?
आवडल्यास जरूर लाईक करा आणि शेअर करायला तर करायला तर मुळीच विसरू नका बरं का!
हे मिपावर कसं काय करता येतं ?
  • Log in or register to post comments

थोपू म्हणजे काय?

निमिष सोनार
Wed, 04/29/2015 - 12:17 नवीन
थोपू?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

फेसबुक

भुमन्यु
Wed, 04/29/2015 - 14:01 नवीन
फेस = चेहरा/थोबाड बुक चेपु/थोपु फेसबुक = चेपु/थोपु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

बुक

रुस्तम
Wed, 04/29/2015 - 16:06 नवीन
पु पुस्तक चेहरा / थोबाड पुस्तक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भुमन्यु

मी हे फेसबुक व्हाटस ऐप साठी लिहिलं. म्हणून तसं लिहिलं ..

निमिष सोनार
Wed, 04/29/2015 - 11:40 नवीन
हे मी स्वत:च लिहिलं आहे
  • Log in or register to post comments

इतरांना मिपा च्या धाग्याची लिंक शेअर करू शकता..

निमिष सोनार
Wed, 04/29/2015 - 11:42 नवीन
काय? बरोबर ना?
  • Log in or register to post comments

त्ये कळतंय हो !

खेडूत
Wed, 04/29/2015 - 12:11 नवीन
त्ये कळतंय हो ! पण मध्यम बदलताना काई संस्कार करायचे कष्ट घ्याल कि नाई? आमी उठसूट कायबी शेर करत नसतो! बाकी लेख प्रचंड आवडला हे सांगायचं ऱ्हायलं …
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

पाच पैसे कुठे आहेत?

स्पंदना
Wed, 04/29/2015 - 11:48 नवीन
पाच पैसे कुठे आहेत?
  • Log in or register to post comments

पटतंय का अापल्याला मी माझ्या

यसवायजी
Wed, 04/29/2015 - 11:52 नवीन
पटतंय का अापल्याला मी माझ्या अल्पज्ञानानुसार लिहिलेलं हे पैसापुराण? कोल्हापुरला या. पैसा'पुराण ऐकवतील.
  • Log in or register to post comments

:)

टवाळ कार्टा
Wed, 04/29/2015 - 11:57 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

वाती आणा

पैसा
Wed, 04/29/2015 - 12:01 नवीन
वाती आणा वळायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

जाहीर आमण्त्रन?

यसवायजी
Wed, 04/29/2015 - 12:09 नवीन
:)) येतोच मग. रावसाब, अन्या माझं नाव घाला रे तांबडा-पांढर्‍याच्या लिष्टीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

धन्यवाद

नाखु
Wed, 04/29/2015 - 12:28 नवीन
वळलेल्या वाती जेप्याकडे पाठवून देणे (२५च्या) जोड्या करून सत्काराला पाहीजेत. परस्पर भागवत चिटणीस
मि.मा.मि.मं. सचालित ल.हा.धा.स. तर्फे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

हघेरे

यसवायजी
Wed, 04/29/2015 - 12:49 नवीन
@ वळलेल्या वाती जेप्याकडे पाठवून देणे >> जेप्याला अजुन कुठे दिवे लावायला सांगताय? पुरे झालेत आधीचेच. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

ट्रक बिक पायजे का?

पैसा
Wed, 04/29/2015 - 12:28 नवीन
कोल्लापूरला यायला ट्रक बिक पायजे का? अन्या दातारला त्वरित संपर्क करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

आपणा सर्वांची व्यवस्था

यसवायजी
Wed, 04/29/2015 - 12:35 नवीन
आपणा सर्वांची व्यवस्था 'बघायला' आम्ही केयस्सारटीशीच्या बशीने आदले दिवशीच निपाणीत दाखल झालेले असू. पुराण तेवढं जंक्शान होऊद्या. ;) (धाग्याची 'वात' लागते वाततं)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Wed, 04/29/2015 - 12:41 नवीन
पुराणाची कल्जीच नको! कापूस त्येवडा भरपूर आणा म्हणजे झालं. मग धाग्याची वात नाय लागायची. बेळगाव निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पैजे वगैरे फ्लेक्क्ष तयार केलेत का नाय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

"बेळगाव-मच्छे-खानापूर-गोवा

यसवायजी
Wed, 04/29/2015 - 12:56 नवीन
"बेळगाव-मच्छे-खानापूर-गोवा-निप्पाणीसह संयुक्त महाराष्ट्र" असा फ्लेक्क्ष करायची ऑर्डर सोलापुरकरांना दिल्ये. खाली "सुप्रशिद्ध पैसापुराण- आग्रहाचे आमंत्रण. तिकीटविक्री चालू." अशी अ‍ॅडपण हाय. बर्री निवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अरेच्चा!

पैसा
Wed, 04/29/2015 - 13:03 नवीन
माझ्या नावावर पयशे गोळा करायला चालू? चन्नागिदे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

@ कोल्हापुरला या. पैसा'पुराण

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/29/2015 - 12:05 नवीन
@ कोल्हापुरला या. पैसा'पुराण ऐकवतील.>> :-D अगदी अगदी! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

मला वाटले पैसा तैचे "अहो"

स्पा
Wed, 04/29/2015 - 12:00 नवीन
मला वाटले पैसा तैचे "अहो" पण आले काय मिपावर
  • Log in or register to post comments

ह्या:

पैसा
Wed, 04/29/2015 - 12:02 नवीन
त्याला काय कामं नाहीत काय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

:-D :-D :-D

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/29/2015 - 12:12 नवीन
:-D :-D :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१

एस
Wed, 04/29/2015 - 12:10 नवीन
शीर्षक वाचून मलापण अगदी असेच वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१००

अजया
Wed, 04/29/2015 - 12:15 नवीन
=))मलाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

:)

मोहनराव
Wed, 04/29/2015 - 15:22 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

एखादी वस्तू विकत घेतल्यावर न

सुबोध खरे
Wed, 04/29/2015 - 12:17 नवीन
एखादी वस्तू विकत घेतल्यावर न विचारता काहीजण त्याची किंमत सांगत सुटतात. हि प्रवृत्ती जवळ जवळ सर्व माणसात असते. याचे कारण बर्याच वेळेस ती वस्तू महाग मिळते म्हणून नव्हे तर मला ती स्वस्तात कशी मिळाली हे लोकांना दाखवण्यासाठी. ( म्हणजे मी किती व्यवहार चतुर आहे हे दाखवण्यासाठी). यात उच्छाद म्हणजे बायका त्या आपल्याला हि वस्तू कितीला मिळाली हे विचारतात. म्हणजे किंमत जास्त सांगितली कि त्यांना आनंद होतो. मला म्हणून स्वस्त दिली, एकच नग होता इ इ. ( मी किती गृहकृत्यदक्ष आहे हे दाखवता येते) बाकी आपण आय फोन ६ का घेतला किंवा बुलेटच खरी बाईक असे सुद्धा सांगणारे लोक असतातच ते म्हणजे आपण कसे वेल प्लेस्ड आहोत किंवा आपलि अभिरुची कशी उच्च आहे हे दाखवणे याचा नमुना. गेला बाजार --मी सवाई गंधर्व मध्ये फक्त भीमसेन ऐकतो. बाकी गंगुबाई हनगल फिरोज दस्तूर वगैरे "ठीक" आहेत म्हणणारे पण बरेच दिसत असत.
  • Log in or register to post comments

बुलेटच खरी बाईक असे सुद्धा

टवाळ कार्टा
Wed, 04/29/2015 - 12:28 नवीन
बुलेटच खरी बाईक असे सुद्धा सांगणारे लोक असतातच
यावर मी एक धागा टाकणार आहे...आधीच कॉपिराईट करुन ठेवलाय हा विषय इथे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

तुला भलतंच कॉपीराईटाचं वेड रे

हाडक्या
Wed, 04/29/2015 - 14:07 नवीन
तुला भलतंच कॉपीराईटाचं वेड रे ? उद्या टाकलेल्या पिंका पण कॉपीराईट करत बसशील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मी म्हैसोबा पुराण अस वाचल..

जेपी
Wed, 04/29/2015 - 12:30 नवीन
मी म्हैसोबा पुराण अस वाचल..
  • Log in or register to post comments

निषेध

नाखु
Wed, 04/29/2015 - 12:35 नवीन
"गुप्त" नाव फोडून जाहीर केल्या बद्दल निषेध. आता एकशे एक वेळा लिहून काढ निमित्त्-निमिष् निस्सीम-निदान आजचा ग्रुहपाठ म्हून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

जल्ला तेवढा ग्रुहपाठ सोडुन

जेपी
Wed, 04/29/2015 - 12:39 नवीन
जल्ला तेवढा ग्रुहपाठ सोडुन निषेध स्विकारण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

निसो रॉक्स अगेन..

होबासराव
Wed, 04/29/2015 - 12:39 नवीन
:)
  • Log in or register to post comments

अगदी सहज म्हणून शीर्षक तसे लिहिले. काही चुकलयास माफी असावी.

निमिष सोनार
Wed, 04/29/2015 - 12:45 नवीन
कारण मला हे कोल्हापूर वगैरे काय म्हणत आहेत ते समजले नाही. कृपया शीर्षक बदलून "पैसा पुराण" किंवा वाचकाना जे हवे असेल ते करण्यासाठी कोठे क्लिक करावे लागेल ते सांगा, मी करतो. शीर्षक मला महत्वाचे नाही. लेख महत्वाचा आहे.
  • Log in or register to post comments

तुमचा काय प्रॉब्ळम नाय

पैसा
Wed, 04/29/2015 - 12:46 नवीन
तुमचा किंवा लेखाचा प्रॉब्ळम नाय. आम्ही जरा दुसर्‍या धाग्याबद्दल मधेच गंभीर चर्चा करत होतो. मिपाच्या पहिल्या पानावरचे धागे वाचलेत तरी तुमच्या लक्षात आलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

हो ना. कैच्याकै चाल्लंय राव.

यसवायजी
Wed, 04/29/2015 - 12:49 नवीन
हो ना. कैच्याकै चाल्लंय राव. इशय काय? कोल्लापुर कुटं? यांना लेख महत्वाचा नाही. शीर्षक महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

सोणार साहेब कधितरी इतरांच्या

स्पा
Wed, 04/29/2015 - 12:59 नवीन
सोणार साहेब कधितरी इतरांच्या जिलब्यांनाही आपले म्हणा. मग लागतील संदर्भ, :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष सोनार

=))))))

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/29/2015 - 14:24 नवीन
=))))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आणि जर कुणी वाईट मार्गाने

मराठी_माणूस
Wed, 04/29/2015 - 12:45 नवीन
आणि जर कुणी वाईट मार्गाने पैसा मिळवला असेलच तर त्याला त्याचे फळ मिळेलच
हे फळ म्हणजे अधिक पैसा का ?
  • Log in or register to post comments

निसो

होबासराव
Wed, 04/29/2015 - 13:28 नवीन
आपल्या जिलब्या आम्हि फ्रीज मध्ये जपुन ठेवल्यात. एका आपटार्ड मित्रा बरोबर पैज लागलिय, खरे तर त्याला समुपदेशना चि नितांत आवश्यकता आहे पण पठ्ठा ऐकत नाहिये. नॅस्ट्रॉडेमस नि उल्लेख केलेला भारतिय युगपुरुष असल्याच्या तोर्‍यात वावरतोय तो. पैज हारल्यास मि सांगेल ते त्याला करावे लागणार आहे. सो त्यावेळेस आपले लेख त्याल वाचायला दिले जातील आणि त्यावर प्रश्णोत्तर तास सुध्दा ठेवल्या जाइल :) (ह्.घ्या. :))
  • Log in or register to post comments

इतक्या चांगल्या प्रबोधनपर

अन्या दातार
Wed, 04/29/2015 - 14:56 नवीन
इतक्या चांगल्या प्रबोधनपर धाग्यावर चाललेला निरर्थक दंगा पाहून एक मिपाकर म्हणून लाज वाटली.
  • Log in or register to post comments

लाजेला घाल पापाच्या तिकटीत. ९

यसवायजी
Wed, 04/29/2015 - 15:01 नवीन
लाजेला घाल पापाच्या तिकटीत. ९ ला रात्री बसायची सोय कुठं केलीस ते सांग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

या

नाखु
Wed, 04/29/2015 - 15:02 नवीन
तुमचीच बाकी होती, जरा सरकून घ्या रे नवा भिडू आलाय जरा बॅट्याला पण जागा ठेवा !!! मुद्दाम घुसेन लाज वाटणार्‍या मिपाकरांचा सालस* मित्र *शब्दाचे अर्थाचे हक्क कॅप्टनने राखून ठेवले आहेत तेव्हा माहीतीकरता व्यनी करा. अक्षीहित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

निमिष सोनार यांचे लेख मला

अन्या दातार
गुरुवार, 04/30/2015 - 15:22 नवीन
निमिष सोनार यांचे लेख मला खरंच आवडतात. खुप विचार करुन लिहिलेले असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

खुप विचार करुन लिहिलेले असतात

होबासराव
गुरुवार, 04/30/2015 - 15:41 नवीन
आणि वाचल्यानंतर खुप विचार करायला प्रव्रुत्त करतात्..खरच. कस ईतक छान छान, इतकि खोलि असलेल आणि सौन्दर्यानुभुती देणार लेखन असत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

आपले लेख खुपच विचारप्रर्वतक

मोहनराव
Wed, 04/29/2015 - 15:26 नवीन
आपले लेख खुपच विचारप्रर्वतक असतात. लोकांना जिल्ब्या का वाटेनात.. टाकत रहा ... सॉरी... टंकत रहा!!
  • Log in or register to post comments

महागुरू आचार्य चाणक्यांनी

आदूबाळ
Wed, 04/29/2015 - 18:04 नवीन
महागुरू आचार्य चाणक्यांनी सुद्धा यासंदर्भात बरंच काही लिहून ठेवलंय ते सुद्धा कालातीत म्हणजे कोणत्याही काळाला लागू होणारं.. काय वाटते आपल्याला?
आयला! चाणक्य पण महाग्रू होते?? मला वाटलं ते आपले .... च आद्य महागुरू. चाणक्याचे अर्थविषयक विचार वाचायला आवडतील.
  • Log in or register to post comments

पैसा पुराणाचं नित्यानेमानी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/29/2015 - 18:27 नवीन
पैसा पुराणाचं नित्यानेमानी पठण करणार्‍यांवर काजुकृपा होते असं ऐकिवात आहे. ख.खो.दे.जा. :P
  • Log in or register to post comments

ये ख.खो.दे.जा क्या है, ये ख

मोहनराव
Wed, 04/29/2015 - 18:41 नवीन
ये ख.खो.दे.जा क्या है, ये ख.खो.दे.जा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

खरं खोटं देव जाणे.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 04/29/2015 - 18:55 नवीन
खरं खोटं देव जाणे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा