✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्वच्छंद - १

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 04/26/2015 - 20:04  ·  लेख
लेख
शहरात राहात असूनही सुदैवाने सकाळ उजाडते ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने. बुलबुलची साद, दयाळचा सूर, इवल्याश्या सनबर्डसचा चिवचिवाट, तांबटाचा टिकटिकाट, देवकावळ्याचे घुमणे, किंगफिशरचा किर्किरात, चिमण्यांची चिवचिव आणि सर्वांवर टिपेला जाणारा पोपटांचा कलकलाट. तसे पोपट पूर्वीपासूनच आहेत पण गेल्या पाच एक वर्षात त्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. निलगिरी, सुबाभुळ, शेकट, सोनमोहर अशा अनेक झाडांवर ही मंडळी वावरताना दिसतात. एकाने साद घालायची, तिघा चौघांनी प्रतिसाद द्यायचा, मग सर्वांनी कलकलाट करायचा आणि मग एकसमयाव्च्छेदेकरुन सर्वांनी थव्याने उडुन जायचे हा नित्यक्रम. पक्षी हा मुक्त व स्वच्छंद विहरतानाच छान दिसतो. पक्ष्यांना पिंजर्‍यात डांबणे यासारखे क्रौर्य नाही. पोपट पिंजर्‍यात ठेवलेला पाहवत नाही. विशेषतः जेव्हा पोपटांना असे विहरताना पाहतो तेव्हा पिंजर्‍यातल्या पोपटांची फार दया येते. इथे दिसणारे पोपट हे एकत्र राहात असले तरी ते भिन्न प्रजातींचे असावेत. काही पोपट पोपटी हिरवे तर काही निळसार झाक असलेले. पिल्ले कंठ न फुटलेली व हलक्या पोपटी व पिवळसर रंगांची. यांनी घारींची फार भिती वाटत असावी. कावळ्यांचा उपद्रव तर असतोच. पण तरीही हे पोपट मोठ्या डौलात झाडांवर बसतात, रुबाबात वावरतात. लाल तुर्‍यांची फुले यांना नाश्त्याला फार आवडतात. सकाळी काचा सरकावाव्यात तो फळांनी झाड लगडावे तसे पोपटांनी बहरलेले दिसते. पोपट घरटी करत नाहीत, ते ढोल्यांमध्ये राहतात असे ऐकुन आहे. पण सकाळी भल्या पहाटेपासून मंडळी झादावर वावरताना दिसतात. अनेक वर्षे वावरुन सरावलेले हे पोपट आता निर्धास्त पणे कठड्यावर वा छज्जावर येउन बसतात. वरुन खाली सरळ गेलेली डिशची केबल हा त्यांचा झोपाळा. या केबलवर लटकुन चौकसपणे घरात डोकावणे हा यांचा नित्यक्रम. आता सकाळी चिमण्यांना तांदूळ टाकण्याबरोबर पोपटांच्या लीला पाहणे हा एक नवा छंद जडला आहे. घरबसल्या टिपलेली ही काही चित्रे. सकाळ झाली. झाड गजबजलं 1 "ऐकल का?' - बित्तंमातम्या सुरू 2 खबरबात कान देउन ऐकताना 3 "फोटो घेताय? घ्या" 4 5 कावळे वा घारीची चाहूल लागताच झेपावण्याच्या तयारीत 6 फांदीवर फिरताना 7 छोटु 8 कोवळ्या उन्हाच्या प्रतिक्षेत 9 परिसराची पाहणी 10 आळस! आज कामावर दांडी माराय्चा विचार दिसतोय 11 छोटू अजुन झोपेतून पुरता जागा झाला नसावा 12 फांदीवर बसून खालच्या झाडावरची पुले शोधताना 13 "सावधान' पवित्र्यात 14 उड्डाणाच्या तयारीत 15 उच्चावलोकन 16
  • सत्यकथा .. अध्याय - ३
  • स्वच्छंद - २
  • स्वच्छंद - ३
  • ठाणे पोपट कट्टा - न पाहिलेले पक्षी

Book traversal links for स्वच्छंद - १

  • सत्यकथा .. अध्याय - ३ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
21201 वाचन

💬 प्रतिसाद (32)

प्रतिक्रिया

अरे वा! भाग्यवान आहात!

चुकलामाकला
Sun, 04/26/2015 - 20:08 नवीन
अरे वा! भाग्यवान आहात!
  • Log in or register to post comments

मस्त

एक एकटा एकटाच
Sun, 04/26/2015 - 20:45 नवीन
छान फ़ोटो आले आहेत
  • Log in or register to post comments

१ शंका...पोपट चावतो कै?

टवाळ कार्टा
Sun, 04/26/2015 - 20:46 नवीन
१ शंका...पोपट चावतो कै?
  • Log in or register to post comments

मस्त!

नंदन
Sun, 04/26/2015 - 20:52 नवीन
पाखरांची मुक्त मांदी गात ये आल्हादनांदी, अंगणी तालात डोले एक न्हाती शुभ्र फांदी
या ओळी आठवल्या.
  • Log in or register to post comments

:)

यशोधरा
Wed, 04/29/2015 - 05:37 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

भारी आलेत सगळे राघवदास!

शिव कन्या
Sun, 04/26/2015 - 21:33 नवीन
भारी आलेत सगळे राघवदास!
  • Log in or register to post comments

सुन्दर

स्वामिनी
Tue, 04/28/2015 - 18:13 नवीन
अप्रतिम
  • Log in or register to post comments

छान फोटो!

एस
Tue, 04/28/2015 - 19:43 नवीन
छान फोटो!
  • Log in or register to post comments

मस्त. नशीबवान आहात :)

पॉइंट ब्लँक
Tue, 04/28/2015 - 19:50 नवीन
मस्त. नशीबवान आहात :)
  • Log in or register to post comments

हे तर पोपटपुराण !जनातलं

कंजूस
Wed, 04/29/2015 - 02:08 नवीन
हे तर पोपटपुराण !जनातलं मनातलं/स्वच्छंद १या नावामुळे लक्ष गेलं नव्हतं. मस्त फोटो अन मथळे .
  • Log in or register to post comments

फोटो छान

कंजूस
Mon, 05/11/2015 - 21:41 नवीन
मस्त फोटो अन मथळे .
  • Log in or register to post comments

बंगलुरू

सर्वसाक्षी
गुरुवार, 04/30/2015 - 00:14 नवीन
गेले दोन दिवस बएंगलुरूत पाट्या टाकल्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

सर्वसाक्षी साहेब

सुबोध खरे
Tue, 04/28/2015 - 22:38 नवीन
सर्वसाक्षी साहेब तुम्ही राहता कुठे? तुमच्या घरी एक मिपा कट्टा करू. सर्व खर्च आमचा. आरामात खाऊ पिऊ. पक्षी निरीक्षण करू.
  • Log in or register to post comments

वा वा!

सर्वसाक्षी
गुरुवार, 04/30/2015 - 00:17 नवीन
डॉ. साहेब आमचे भाग्य उजाडले. एखाद्या, शक्य झाल्यास येत्या रविवारी जमवुया. अवश्य या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वा वा..

स्वाती दिनेश
Tue, 04/28/2015 - 22:59 नवीन
साक्षीदेवा, शुकमहाराजांचे फार छान फोटो! स्वाती
  • Log in or register to post comments

हे क्काय, सगळे पोपटांचेच फोटो

किसन शिंदे
Tue, 04/28/2015 - 23:06 नवीन
हे क्काय, सगळे पोपटांचेच फोटो? मला वाटलं वर उल्लेख सगळ्याच पक्ष्यांचे फोटो पाहायला मिळतील. बाकी पोपटांच्या भावमुद्राही छान आहेत.
  • Log in or register to post comments

मस्त आहेत फोटो!

पिवळा डांबिस
Tue, 04/28/2015 - 23:08 नवीन
मस्त आहेत फोटो!
  • Log in or register to post comments

वाह सुंदर

श्रीरंग_जोशी
Wed, 04/29/2015 - 01:00 नवीन
आजकाल असे मुक्त पोपट बघायला मिळत नाहीत... :-( खरंच नशीबवान आहात. या लेखनाबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

वा!!!

जुइ
Wed, 04/29/2015 - 05:04 नवीन
फारच सुंदर!!!
  • Log in or register to post comments

मस्त! ब,गारु तिरुपतीलाही

यशोधरा
Wed, 04/29/2015 - 05:38 नवीन
मस्त! बंगारु तिरुपतीलाही देवळापासच्या झाडाच्या ढोल्यांमधून असेच थव्याने पोपट पाह्यले होते, त्याची आठवण झाली!
  • Log in or register to post comments

छान फोटो!

चिनार
Wed, 04/29/2015 - 09:20 नवीन
छान फोटो!
  • Log in or register to post comments

झकास्स्स्स... :)

मदनबाण
Wed, 04/29/2015 - 09:30 नवीन
झकास्स्स्स... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :-Nepal earthquake: humanitarian crisis engulfing 8 million people – rolling report
  • Log in or register to post comments

माझ्याकडे किंग पॅरट्स असतात

स्पंदना
Wed, 04/29/2015 - 10:13 नवीन
माझ्याकडे किंग पॅरट्स असतात बाहेरच्या फिओजाच्या झाडावर. ही फळं वर्णन न करता येण्याच्या चवीची आहेत. मी आपली सांगायच म्हणुन साधारण पेरुसारखी म्हणते, पण फार वेगळी अन अ‍ॅडीक्ट करणारी चव या फळांची!! तर हे सगळे महाशय तेथे येउन अगदी लुटु लुटु चालत एक एक फळ तोडुन ते हातात धरुन (तेच ते एका पायाच्या पंजात) निवांत खात बसतात, मग अर्ध मुर्ध खाउन टाकुन देतात अन पुन्हा नविन फळ. त्यांच्या बरोबर गल्लाह्ज पण येतात. पण गल्लाह्ज झाडाच्या खाली चरत असतात. मग उरले मॅगपाय!! यांना मात्र काहीही चालत. त्यातला एक "काय मालकिण बाई? आज पाणी नाही बर्ड बाथ मध्ये!! नाही म्हंटल आंघोळ राहू दे, निदान प्यायला घोटभर ठेवा! शोभा येइल!!" अस पुणेरी बाण्याने मला सुनवतो. Image removed. हा आहे गल्लाह. Image removed. हा आहे किंग पॅरट Image removed. हा आहे मॅगपाय. दिसतो कावळ्यासारखा पण कोकिळ कंठी आहे. आपली कोकिळा कशी कुहु कुहु करते तस नाही पण कुळुकुळु अस मंजूळ गातात. कंटाळा येत नाही त्या कुळुकुळु चा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

पैसा
Wed, 04/29/2015 - 10:20 नवीन
खूपच छान फोटो! हे पोपट घरटी बांधत नाहीत तर अंडी आणि पिले कुठे ठेवतात? एवढ्या ढोल्या आतात का?
  • Log in or register to post comments

अफाट,जबराट,तूफ्फान फोटोज आणि

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/29/2015 - 10:31 नवीन
अफाट,जबराट,तूफ्फान फोटोज आणि लेखन. प्रत्येक फोटू चोरावासा वाट्टोय! :-D
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो!

विशाखा पाटील
Wed, 04/29/2015 - 11:09 नवीन
अप्रतिम फोटो!
  • Log in or register to post comments

काय सुरेख फोटो आहेत अगदी !!

सानिकास्वप्निल
Wed, 04/29/2015 - 12:04 नवीन
काय सुरेख फोटो आहेत अगदी !! खूप आवडले.
  • Log in or register to post comments

फारच आवडले सगळे फोटो

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 04/29/2015 - 12:20 नवीन
स्वच्छंद - २ च्या प्रतिक्षेत. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

काय अदा टिपल्या आहेत

सस्नेह
Wed, 04/29/2015 - 12:45 नवीन
काय अदा टिपल्या आहेत पोपटांच्या ! फारच सुंदर !
  • Log in or register to post comments

शिर्षकांमूळे अधिक छान वाटतात

मराठी_माणूस
Wed, 04/29/2015 - 12:47 नवीन
शिर्षकांमूळे अधिक छान वाटतात
  • Log in or register to post comments

धागा लेखकाचे नाव पाहून

नाखु
Wed, 04/29/2015 - 15:24 नवीन
उघडला आणि बिल्कुल "पोपट" झाला नाही. तर चक्क "शुकशुकाट" दिसला !! धन्यवाद. घरी डाळींबाचे झाड असल्याने कधीकधी राघुदर्शनलाभी नाखु निरिक्षणकर
  • Log in or register to post comments

मस्त फोटो!

पिशी अबोली
Wed, 04/29/2015 - 16:40 नवीन
मस्त फोटो!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा