जरी आम्ही असू व्ह्यालेन्टायीन दिन'दिवाणे'
दरसाल गातो एकच गाणे
छे छे ,ही नसे अपुली संस्कृती
नसे ही अपुली परंपरा
जाळा ती शुभेच्छापत्रे
झोडपा त्या जोडप्याला
पाश्चिमात्यांचे हे प्रेमाचे चाळे
आम्ही आहोत मराठी मावळे
प्रेमदिनाची आम्हाला गरजच काय ?
हो हो,ते सगळ ठीकाय
आम्ही तरी कराव काय
आमची सेटिंग होतच नाय
किती वर्ष पहावी वाट
स्वप्नात दिसतो आंतरपाट
बोलणे माझे घे मनावर
नकोस सुंदरी राहूस तू सिंगल
करूनच टाक शुभमंगल
प्रपोज जरी बहु येती तुजला
एक ना धड भाराभर वर
गोंधळू नकोस पुकार स्वयंवर
मुंबईमध्ये जो घेई घर
त्यास मान तुझा प्रियवर...
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1700
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
मजेदार आहे. :-)
मुंबईमध्ये घर ?
वा वा वा!
२ महिने अन १३ दिवस झाले त्या
त्यांना आज झाली असेल कविता.
In reply to २ महिने अन १३ दिवस झाले त्या by बॅटमॅन
हम्म, तेही खरंच म्हणा.
In reply to त्यांना आज झाली असेल कविता. by सूड
विग्रह पायजे बिंगो!! ;)
In reply to हम्म, तेही खरंच म्हणा. by बॅटमॅन
"शीघ्रेल" घ्या. काव्यरेचक
In reply to विग्रह पायजे बिंगो!! ;) by सूड
हात मेल्या, कसला
In reply to "शीघ्रेल" घ्या. काव्यरेचक by बॅटमॅन
अर्र, विसरलोच की. -पोपटहित.
In reply to हात मेल्या, कसला by सूड