मी एकाही अरब देशात कधी राहीलो नाही, (नाही म्हणायला दोन-चार दिवसांचा अनुभव गाठीशी आहे, तेवढाच). अर्थात आंतरजाल कोणत्याही देशातून पाच मिनीटांसाठी वापरल आणि प्रताधिकारीत मजकुराची देवाण अथवा घेवाण केलीत की देश-विदेशांचे प्रताधिकार कायदे तुमची पाठराखण करू लागतात. काही आंतरराष्ट्रीय करारांमुळे बहुतांश देशांचे कायद्यांमध्ये साम्य असले तरीही फरकही बर्यापैकी आढळतात. थोडी फार मिपाकर मंडळी अरब देशातून असतील त्यांच्याकडून त्या त्या देशातील प्रताधिकार विषयक त्यांना काही माहिती आहे का ? असल्यास जाणून घेण्यास आवडेल. ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्या साठी अरब जगतातील प्रताधिकार नियमांची स्थितीची ढोबळ माहिती देणारा दुवा देत आहे.
सहसा कायदा बनवण्याच्या आधी/ बनवताना आंतरराष्ट्रीय करारांचा विचार होतो, कायदे लागू होताना तिथले तिथले कायदे लागू होतात.
एक भारतीय नागरीक व्यक्ती आहे, समजा गल्फ मधल्या एका देशात वास्तव्यास आहे, विमानाने प्रवास करताना मधल्या ब्रेक कालावधीत तिसर्या, चौथ्या आणि पाचव्या देशातून इंटरनेट वापरते सहाव्या देशातील प्रताधिकारीत मजकुर सातव्या देशातल्या वेबासाईटवर वापरते, आणि त्यापुढे जाऊन वेबसाईटचा अॅक्सेस मुख्यत्वे आठव्या देशातून आहे. तर कायदे कोणत्या देशाचे लागू होतील प्रताधिकार उल्लंघन झाले असल्यास कोणकोणत्या देशातील न्यायालयापुढे दावा दाखल होऊ शकेल ? (म्हणजे पतंग उडवणार्याच नागरीकत्व एका देशातल सर्वसाधारण रहीवास दुसर्या देशातला तिसर्या देशाच्या भूमीवरून चौथ्या देशाच्या माणसाचा पतंग घेऊन पाचव्या देशाच्या भूमीवरच्या पतंगाशी काटाकाटीचा खेळ खेळला तर कायदे कोणत्या देशातील लागू होतील ? )
आंतरजाल आणि तंत्रज्ञान वेगाने पुढे जात असले तरीही या विषयावरील कायदे आणि विधीतत्वमिमांसा (jurisprudence) अत्यंत मंदगतीने प्रगती करते आहे. या विषयावर साराह बर्ड यांचा लेख या विषयाची ओळख करून घेण्यासाठी चांगला वाटला.
वरील परिच्छेदातील केस मध्ये मजकुर वापरणारा आणि मजकुर ज्याच्या मालकीचा आहे त्यांच्यात आपापसात काही करार असेल आणि त्या करारात काही फिसकटल्यास कोणत्या देशातील कोर्टात केस चालावी याचा उल्लेख आहे का ? वेबसाईटच्या वापरावयाच्या अटींचे स्वरूप त्यात नमुद कायदे आणि ज्युरिस्डीक्शन विषयक भूमिका, वेबासाईटचा वाचक आणि ग्राहक मुख्यत्वे कोणत्या देशात आहे, ज्याच्या मजकुराच्या प्रताधिकाराचा भंग झाला त्याच्या देशातले कायदे काय म्हणतात, व्यक्ती रहीवासास कोणत्या देशात आहे त्या देशातील कायदे काय म्हणतात असा सगळा कायद्यांचा खीस (की कचकचाट ?) असतो. ज्याच्या मजकुराचा कॉपीराईट भंग झाला आणि दावा दाखल करण्याचे आणि त्या साठी कुठेही जाऊन दावे दाखल करण्याची त्याची तयारी आणि त्यासाठी लागणारी क्षमता या प्रॅक्टीकल गोष्टीही असताततच. एवढ्या सार्या अडचणी असूनही कायद्याचे हात लांब असतात हे दाखवणारी उदाहरणेही आहेत. आपण सोईस्करपणे कायद्यांना विसरण्याचा प्रयत्न केला तरी ते पाठराखण आणि पाठ शिवणी दोन्हीसाठी मागे उभे असतात. Spider Robinson नावाच्या लेखकाच वाक्य आहे To live outside the law, you must be lucky.
तळटिप: भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ चे प्रकरण ९ हे आंतरराष्ट्रीय कॉपीराइट संबंधाने आहे आणि भारत सरकारची इंटरनॅशन कॉपीराइट ऑर्डर १९९९ सुद्धा या संदर्भात महत्वाची आहे.
उत्तरदायकत्वास नकार: या धागालेखातील आणि प्रतिसादांमधील माहिती जुजबी स्वरुपाची असून कोणताही कायदेशीर सल्ला नाही. कुणास कायदे विषयक सल्ल्याची गरज असल्यास परवाना धारक ज्ञानवंत कायदे विषयक सल्लागाराकडून घ्यावा.
वाचने
7814
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
पास! :-)
नापास
काहिच समजले नाहि.
गल्फ मध्ये राहणार्या एन आर
मूळ मजकुर वा छायाचित्रे
In reply to गल्फ मध्ये राहणार्या एन आर by माहितगार
गणित एवढे साधे सोपे नसण्याची शक्यता
In reply to मूळ मजकुर वा छायाचित्रे by श्रीरंग_जोशी
झी मराठीचे उदाहरण