✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शरमिंदा व्हायला इतर हजार गोष्टी आहेत!-कवी-लेखक सलील वाघ /मटा मधिल आजचा लेख.

अ
अनामिका यांनी
Sun, 11/23/2008 - 12:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3875 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

व
वेताळ Sun, 11/23/2008 - 14:01 नवीन

आताच एका बातमीनुसार

बाळासाहेबाच्या आमंत्रणावरुन राज ठाकरे ३ वर्षानंतर प्रथमच मातोश्रीवर गेले आहेत. अजुन भेट चालु आहे. उध्दव हजर नाही आहे तिथे. :?
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 11/23/2008 - 19:15 नवीन

बातमी प्रमाणे...

उध्दव हजर नाही आहे तिथे. म.टा. तील बातमी प्रमाणे: राज ठाकरे आज दुपारी एकच्या सुमारास मातोश्री येथे दाखल झाले. त्यांनी सुरुवातील उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मातोश्रीच्या दुस-या मजल्यावर असलेल्या बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन राज ठाकरे बाळासाहेबांना भेटले. त्यावेळी खाली हॉलमध्ये असलेल्या उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांनी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी काही वडिलकीचा सल्ला दोघांना दिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ
स
सुक्या Sun, 11/23/2008 - 14:28 नवीन

बुध्दीजिवी . . .

बुद्धीजिवी लोकांमधे ही मराठी अस्मीतेसाठी होत असलेल्या ह्या आंदोलनाला मान्यता मिळते आहे हे वाचुन आनंद झाला. आताच्या राज्यकर्त्यांनी थोडा बोध घ्यावा हीच आशा .. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sun, 11/23/2008 - 14:38 नवीन

छान!

अत्यंत रोखठोक, प्रतिक्रीयात्मक लेख. मनापासून आवडला. विचारवंत/लेखक मंडळी आता या मुद्द्यावर एकत्र येतील तर बरे! विलासरावांचे अजूनही दिल्लीच्या तख्तापुढे मुजरा घालणं चालूच आहे. परमेश्वर त्यांना सुबुद्धी देवो!! लेख/लेखाचा दूवा दिल्याबद्दल अनामिकालाही धन्यवाद! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Sun, 11/23/2008 - 18:07 नवीन

मार्ग वेगळे झालेच आहेत पण द्वेष नको...............!

"मार्ग वेगळे झालेच आहेत पण द्वेष नको.तसेच दोन्ही पक्षांमधे निकोप स्पर्धा असावी" असा सल्ला वडिलकीच्या नात्याने माननिय बाळासाहेबांनी दिल्याचे समजते... या भेटिने महाराष्ट्राच्या राजकारणातील समिकरणे बदलोत अथवा न बदलोत पण उद्धव व राज यांच्या मनातील किल्मीष व एकमेकांबद्दल आलेल मत्सर व द्वेषाच मळभ या निमित्ताने दुर झाल असाव अशी आशा करायला हरकत नाहि.या भेटिमुळे बहुतांश मराठी माणुस आनंदि असेलच पण आजची रात्र पवार,देशमुख,निरुपम व त्यांच्यासारख्या इतर विघ्नसंतोषी राजकारण्यांची झोप उडवणारी असेल हे मात्र नक्की.............. उद्धव राजने बाळासाहेबांच्या या सल्ल्याचा मान राखावा.व या पुढिल राजकारण अगदी गळ्यात गळे घालुन नाही केल तरी हातात हात घालुन कराव अशी आपली आमची माफक अपेक्षा.............. ही भेट घडवुन आणणार्‍या व्यक्तीचे आम्ही समस्त मराठी जन ऋणी आहोत्.कोण असेल बर तो पडद्यामागचा सुत्रधार. :? "बाळासाहेबांच्या प्रकृतीची चिंता असणारी" "अनामिका"
  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 11/23/2008 - 19:19 नवीन

भेटीची पार्श्वभूमी...

राज यांच्या म्हणण्याप्रमाणे: बाळासाहेबांचा आवडता व्यंगचित्रकार आहे डेविड लो. त्याची काही पुस्तकं माझ्याकडे होती. काही दिवसांपूर्वी साहेबांचा फोन आला होता. डेविड लोचं पुस्तक आहे का, अशी विचारणा करणारा. मी माझा लॉट तपासला. त्यात ते पुस्तक होतं. मी सांगितलं त्यांना की, पुस्तक आहे माझ्याकडे. ते म्हणाले, पाठवून दे. मग मी विचार केला. म्हटलं, मीच घेऊन येतो. तर ते म्हणाले... ये ! =)) आशा करतो, यातून काही चांगले निष्पन्न होईल! पडद्यामागचा सुत्रधार हा "जेष्ठ पत्रकार" आहे. असेल कदाचीत एखादा संसदपटू ;) बाकी मला त्यांच्यातील राजकीय आणि व्यक्तिगत नाते मोडकळीस आले आहे असे वाटत नाही. (कदाचीत चांगल्या अर्थी पण...) टर्मिनेटरचे हे दोन तुकडे परत एकत्र येतील असे वाटते. कुठल्या रुपात ते काळ सांगेल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिका
प
पांथस्थ Sun, 11/23/2008 - 18:09 नवीन

मस्त ठोकला!

दिल खुष झाला! - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Mon, 11/24/2008 - 12:09 नवीन

काही कळेल का?

पांथस्थ कुणी कुणाला ठोकल? काही कळेल का? :P "अनामिका"
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Mon, 11/24/2008 - 08:32 नवीन

अत्यंत

अत्यंत सडेतोड आणि योग्य लेख
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 11/24/2008 - 12:38 नवीन

सहमत !!

अत्यंत सडेतोड आणि योग्य लेख असेच म्हणतो....... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Mon, 11/24/2008 - 12:58 नवीन

्मत

वा छान व सडेतॊड लेख लिहिला आहे...दिलिप मराठी माणसानी "कुत्र्याचे काळे पिल्लु" सारखी कविता सहन केली ना? का त्या वेळी शरम वाटते म्हणुन मान खाली केली??
  • Log in or register to post comments
अ
अभिरत भिरभि-या Mon, 11/24/2008 - 14:01 नवीन

चित्रे आणि अत्रे

राजचे मार्ग आक्षेपार्ह वाटले तरी बरेचसे मुद्दे सडेतोड आहेत. महाराष्ट्रातल्या (उरल्यासुरल्या) विचारवंतांकडून या भरधाव सुटलेल्या बांधाला योग्य पाट घालून देण्याची अपेक्षा होती. एलटीटीईच्या आणि तमिळ अस्मितेच्या मुद्द्यावर तमीळ खासदार राजीनाम्याचे हत्यार वापतात, सौरभ गांगुलीसारख्या अत्यंत सरासरी दर्जाच्या उर्मट क्रिकेटरसाठी सगळे बंगाली एका सुरात गळा काढतात, डेरा सच्चाच्या प्रकरणात कथित अपमानाची प्रतिक्रिया म्हणून सरदार लोकं नंग्या तलवारी घेऊन भांडुपपासून परळपर्यंत दहशत माजवतात. तेव्हा या गोष्टींची नाही शरम वाटत आणि मराठीप्रेमाची मात्र शरम वाटते? वरिल सर्व उदाहरणात तत्प्रांतिय वैचारिक नेतृत्व इतकी आत्मघातकी भूमिका घेताना पाहिले नाही. खुळ्या राष्ट्रिय एकतेसाठी आत्मघात करणारे चित्रे पाहिले आणि महाराष्ट्रात या भूमीची काळजी करणारे अत्र्यांसारखे वैचारिक नेतृत्व संपल्याची खात्री पटली. सौरभ गांगुलीसारख्या अत्यंत सरासरी दर्जाच्या उर्मट क्रिकेटरसाठी सगळे बंगाली सौरभ गांगुली अगदीच सामान्य नाही पण त्याला कलकत्यात असलेला परमेश्वरासमान दर्जा मला व्यक्तीशः लायकीपेक्षा जास्त वाटतो. icon-पूजक बंगालमधे बरीच वर्षे असलेला आयकॉन चा अभाव बंगाली सौरभच्या रुपात पूर्ण करत आहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा