मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुके मटण - आता छायाचित्रांसह

पांथस्थ · · पाककृती
नमस्कार मंडळी, ललिता यांच्या 'सुके मटण' या पा.कृ. ला आमच्या फोटूंचा साज चढवत आहे (अर्थात परवानगी घेउन!). मुळ पा.कृ. ला प्रतिक्रिया देतांना अनेक मिपाकरांनी फोटू न टाकल्याची खंत व्यक्त केली होती. ती आता दुर होइल अशी अपेक्षा. मुळ पा.कृ. - माझे छोटे बदल - फोटू सुचना: ही पाकृ वेळ देऊन निगुतीने बनवावी लागते. पार्टीला आदल्या दिवसाचं सुकं मटण वाढावं, मसाला मुरल्यामुळे मटण अप्रतिम चविष्ट लागतं. >> आम्ही मात्र त्याच दिवशी खाल्लं तरि मस्त लागलं!! (सामिष पदार्थ आज बनवुन उद्या खाण्यायेवढा संयम आमच्या कडे नाहि बुवा!) साहित्य -- ७०० ग्रॅम मटण (नळ्यांसकट असेल तर १ किलो) >> मी एकटाच खाणारा त्यामुळे ३०० ग्रॅम वापरले (मी सिना आणि गर्दन आणतो) ५, ६ कांदे बारीक चिरून >> ३ कांदे बारीक चिरुन दोन मोठे टॉमेटो (सालं काढून किसून घ्यावे) >> मी एक मोठा टोंमॅटो प्युरे करुन घेतला १ मोठा कप भरून दही >> अर्धा कपच घेतले अर्धा कप तेल >> हे मात्र न मोजता अंदाजाने घातले (अंदाज अपना अपना!!!) २ टेबलस्पून आलं + लसूण + हिरव्या मिरच्या पेस्ट >> हि मात्रा एवढिच ठेवली (लसुण-आलं-मिरची हे कस सढळ हस्ते हवं) २ चमचे धने + १ चमचा जिरे + १ चमचा शहाजिरे (कोरडे भाजून पूड करावी) >> आमच्या कडे धने-जिरे पुड असतेच. तेव्हा शहाजिरे भाजुन त्यांची पुड करुन घेतली. बाकी प्रमाण तेच. मीठ चवीप्रमाणे >> बरोबर. ते पण खाली दिल्याप्रमाणे मटण शिजल्यावरच घातले. कोथिंबीर चिरून >> नुसती चिरुन नाहि तर बारीक चिरुन टाकली :) खडा मसाला -- ४ लवंगा, ६-७ मिरें, दालचिनी (१"), २ मसाल्याची वेलची, ३-४ हिरवे वेलदोडे, पाव चमचा जायपत्री, २ तमालपत्रं >> ५ लवंगा, ६ मिरे, १" दालचिनी,३ हिरवे वेलदोडे, पाव चमचा जायपत्री, १ तमालपत्र (मसाला वेलेची राहिली हे आत्ता लक्षात येतयं :( ) पध्द्त -- एका पसरट कढईत -कढई नसेल तर पसरट भांड्यात- तेल गरम करावे. तेलात खडा मसाला टाकून किंचित तळावा. त्यावर चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात आल्यालसणाची पेस्ट घालून दोन मिनिटे परतावे. नंतर मटण व धने+जिरें+शहाजिर्‍याची पूड एकत्र घालून मटणाचे तुकडे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे. मटण जितके जास्त परतले जाईल तितकी चव खुलत जाते (स्वानुभव). दही व टोमॅटो घालून मटण मंद आचेवर भांड्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे, अर्थात् मध्ये मध्ये ढवळत रहावे. गरज वाटली तरच अगदी थोडे गरम पाणी घालावे, शक्यतो टोमॅटो व दहयावरच शिजवावे. मटण पूर्ण शिजले की मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. वाढताना वरुन कोथिंबीर पेरावी व लिंबाच्या फोडी बाजुला लावून सजावट करावी. टीपः उत्तम प्रतीचे मटण साधारण पाऊण ते एक तासामध्ये मऊ शिजलं पाहिजे. >> आणि नाहि शिजलं तर मोठे लोक सांगुनच गेलेत - "शेळी जाते जीवानीशी आणि खाणारा म्हणतो वातड कशी" :) कूकरमध्ये शिटी काढून मटण कधीच शिजवू नये, लज्जत निधून जाते. मटण शिजल्यानंतर मीठ घातलं तर वातड होत नाही. >> हे मात्र पटलं. अवांतरः मटणाला धुरी दिली तर एकदम पंचतारांकित हॉटेल-शेफच्या हातचं मटण तयार! एक ज्वलंत कोळसा पाकृप्रमाणे तयार केलेल्या मटणात खळगा करून त्यात ठेवा, वर थोडा लिंबाचा रस व तूपाचे थेंब सोडा... धूर निघेल, लगेच बाजूचे मटण कोळशावर पसरून भांड्याला झाकण गच्च लावून १० मिनिटे ठेवून द्या. मटणाला सौम्य व लज्जतदार धुराचा वास लागतो. >> कोसळा आणि वेळे अभावी हे मात्र जमलं नाहि.... करून पहा आणि रिपोर्ट द्या! >> एकदम झकास पा.कृ.! आत्मा तृप्त!! धन्यवाद!!! (आपला पा.कृ.भिलाषि) पांथस्थ...

वाचने 14460 वाचनखूण प्रतिक्रिया 12

सुनील Fri, 11/21/2008 - 20:05
मूळात पाकृ छान होतीच आता फोटोमुळे रंगत वाढली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वेताळ Fri, 11/21/2008 - 20:44
हा पदार्थ आता नक्कीच करुन खायला हवा.फोटो बद्दल काय लिहावे ? शेवटच्या फोटोला हात लावुन बघितला.पण तुकडा पकडता आला नाही. =)) पांथस्था धन्यवाद वेताळ

सहज Fri, 11/21/2008 - 20:56
तुम्ही एक नवा मापदंड घालून दिला आहे, इथे पाककृती देण्यात. धन्यवाद.

In reply to by सहज

चित्रा Fri, 11/21/2008 - 21:12
असेच म्हणते. करीत असतानाचीही छायचित्रे घेणे म्हणजे खूपच काम झाले.

बिसोबा खेचर Fri, 11/21/2008 - 22:43
पांथस्था..... गड्या पोटात खड्डा पडला रे चित्रे बघुन..... आता करुन बघितल्याशिवाय आत्मा थंड होणार नाहि. सुंदर!!! और भी आने दो!

खादाड Sat, 11/22/2008 - 15:54
वा! मी आज शनिवरी हे पहिल ! उद्या रविवार मग काय होउन जाउ द्या ! फारच छान विवरण आहे !

मनस्वी Mon, 11/24/2008 - 14:19
अरे काय खेळ लावलाय?? अप्रतिम फोटो. लगेचच्या लगेच पाकृ करून खावीशी वाटतीये.