न्याय मला दिसला होता......
न्याय मला दिसला होता......
लोकशाहीच्या, दुर्गंधी पसरवणाऱ्या, सडक्या प्रेताचे, उघडे बटबटीत डोळे, आपल्या अणकुचिदार चोचीने फोडणाऱ्या, धनिक, राजकारणी गिधाडांच्या नख्यांच्या, धारदार अचूक पकडीत,
न्याय मला दिसला होता.
भ्रष्ट, रक्तपिपासू लांडग्यांनी बनवलेल्या, क्रूर परिस्थितीच्या फासात अडकून मेलेल्या, स्वाभिमानी माणसांच्या मढ्यावरचे प्रसिद्धीचे लोणी खाऊन, करपट ढेकर देणाऱ्या, विकाऊ माध्यमांच्या कावीळ झालेल्या पिवळ्या डोळ्यांत,
न्याय मला दिसला होता.
आपल्या विचारांच्या टोकदार लेखणीत, जळजळीत अनुभवाची शाई भरून, रखरखीत सत्याची कविता रेखणाऱ्या एका साध्या नि:शस्त्र म्हाताऱ्या कारकूनाला फटकारून शिक्षा सुनावणाऱ्या कर्तव्यदक्ष मुखांत,
न्याय मला दिसला होता.
क्षीणपणे ओरडत होता तो,
मला वाचवा.....मला वाचवा.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
गांधी मला भेटला होता,या
.. दारुण भीषोण !!
खरे आहे!
हम्म :(
धन्यवाद अजयाताई!