Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विवेकपटाईत on Tue, 04/14/2015 - 16:26
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
एतत्मांसस्य मांसत्वं प्रवदन्ति मनीषिणः॥ ज्या प्राण्याचे या जन्मी भक्षण कराल,पुढच्या जन्मी तोच प्राणी तुमचे भक्षण करेल. (मनुस्मृति- 5:55) वैदिक युगाच्या सुरवातीला लोक गौ. भक्षणकार्याचे, नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली. गौ. हत्येचे फळे आज मानव समाज भोगत आहे. महाराष्ट्रात गौ. हत्या बंदी लागू झाली. तथाकथित अति शहाण्यांनी स्वाभाविकरित्या गौ. बंदीचा विरोध केला. त्या शिवाय त्यांना पुरोगामी कोण म्हणणार. (सध्या १५०-२०० रु किलो ने मिळणारे गौ. मांस गरिबांचे अन्न आहे, असा दुजोरा ही त्यांनी दिला). सध्या देशातल्या अधिकांश राज्यात गौ. बंदी असल्यामुळे गौ. मांस १५०-२०० रु किलोच्या हिशोबाने मिळते. दूध न देणाऱ्या भाकड गायी आणि शेती साठी अनुपयुक्त बैल विकल्या जातात. पण संपूर्ण देशात गौ. बंदी उठल्यावर काय होईल, याची कल्पना देतो. अर्थातच धार्मिक भावनांना महत्व न देता शुद्ध व्यवसायिक आधारावर विवेचन. गौ. मांसाचे व्यवसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु होईल. देशी गायींची जागा अधिक मांस असणार्या विदेशी गायी घेतील ज्या प्रमाणे जर्सी गायींच्या आयातीसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनुदान देतात तसेच, मांस निर्यातीच्या धन्ध्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिक मांस देणाऱ्या गाईंचा आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देईल. सध्या ही गौ. मांस निर्यातीसाठी अनुदान दिले जाते. या गायी गावात मिळणारे शिळे अन्न, भाजीचा व अन्य कचर्या वर जगणार नाही. त्यांना अन्न ही भरपूर लागेल. परिणाम भारतीय गौ. वंश पूर्णपणे समाप्त होईल. कृषी कार्यासाठी बैल मिळणार नाही. (विदेशी बैलांना भारतीय बैलांसारखे कुबड नसतात व भारतीय बैलांसारखे काटक ही नसतात, त्यांचा मांसा शिवाय अन्य उपयोग नाही). गौ. मांस खाणे वाढेल. मध्यम वर्ग आनंदाने केफसी, मेक्डी इत्यादी जागी गौ. मांस आधारित व्यंजनांचा आस्वाद घेताना दिसेल. .४-५ वर्षातच २० लाख टन पेक्षा गौ. मांस देशात खपू लागेल. शिवाय ३०-४० लाख टन गौ. मांसाचे निर्यात ही होऊ लागेल. आता जगात सर्वात जास्त गौ. मांस खाणार्या देश्यात अर्थात युएस मध्ये सर्वात जास्त गाई गौ. मांसासाठी व्यवसायिक रीतीने पाळल्या जातात. तिथल्याच आंकड्यानुसार एक गाय ३०० किलो होण्यासाठी ३ वर्ष लागतात. ३०० किलोच्या गाई पासून ७० किलो मांस मिळते. एक किलो मांसासाठी ७-१३ किलो मक्का आणि ३०-४५ किलो चारा लागतो. १५००० चार्यासाठी लागणारे पाणी (१ किलो मक्या(corn) साठी १५०० लिटर पाणी लागते), स्वच्छता आणि पिण्यासाठी ३० हजार लिटर लिटर पाणी. हे सर्व केवळ १ किलो मांस साठी लागेल. (तेवढ्या पाण्यात २5 किलो तांदुळाचे, ६० किलो बटाटा, ३० गहू ). महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब आणि हरियाणा या राज्यांत ही जलस्तर २०० फूट खोल गेलेले आहे. दुर्मिळ पाण्याचा उपयोग केवळ माणसांसाठी खाद्यान्न उत्पन्न करण्यासाठी झाला पाहिजे कि निर्याती साठी मांस उत्पन्न करण्यासाठी. दुसर्या शब्दात गौ. मांस निर्यात म्हणजे पाण्याचा व अन्नाचा निर्यात. पाणी कृषीच्या जागी मांस निर्मितीसाठी वापरल्या जाईल. ५० लक्ष टन मांसासाठी किमान ५ कोटी टन खाद्य आणि १५ कोटी टन चारा ही लागेल. लोक शेतात मक्का आणि चारा लावतील.(नगदी फसल म्हणून). जीवनावश्यक पदार्थ गहू, तांदूळ, डाळी गरीब सोडा तुमच्या आमच्या मध्यम वर्गाच्या आवाक्या बाहेर जातील. अमेरिकेत ही हेच झाले आहे. गरिबांना दोन वेळचे खाणे अशक्य होईल.शिवाय देश्यात दुष्काळी वातावरण निर्माण होईल. अमेरिकेत एका वर्षात उत्त्पन्न होणाऱ्या मक्याच्या ७०% भाग मांस उत्पादनासाठी वापरला जातो. त्यात ८० कोटी आफ्रिकन लोकांचे पोट भरता येईल. जगाचा विचार केल्यास केवळ गायीचे मांस खाणे बंद झाले तर जगात कुणी ही उपाशी राहणार नाही. या भारतीय गायीं विदेशी गायींपेक्षा वेगळ्या आहेत. भारतीय गायी इथल्या वातावरणाच्या बदल्याचा सामना करू शकतात. त्यांना अन्न ही कमी लागते. ऊन पाणी, अकाल, इथल्या रोग राई इत्यादींचा सामना त्या करू शकतात. वर्षाकाठी एक वासरू ही त्या देतात. भारतीय गाई बहुउपयोगी आहे. त्यांना खाद्य ही कमी लागते, पाणी ही कमी लागते. (रोज अंघोळ घालावी लागणार नाही, कूलर किंवा एसी लागणार नाही, विजेचा खर्च वाचेल). शिवाय दुग्ध आणि मांस व्यतिरिक्त विदेशी गायी अन्य उपयोगाच्या नाही. सध्या पतंजली योग संस्थानात भारतीय गायींवर अनुसंधान सुरु आहे. गौ. आधारित कृषी क्रांती त्यांचे लक्ष्य आहे. पुढच्या १० वर्षात किमान १० लाख गायींची दुग्ध उत्पादन क्षमता १० लिटरच्यावर वाढविण्याचे लक्ष्य आहे. भारतीय गायींच्या गौ. मूत्रापासून औषधी आणि कीटनाशकांच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याचे लक्ष्य आहे.(भाकड गाय आणि बैलाच्या गौ. मूत्र आणि शेणाचा व्यवस्थित उपयोग केल्यास, रासायनिक कीट नाशकांवर आणि खतांवर जो खर्च होतो त्यात त्यांची गुजराण होऊ शकते). आपल्या देश्याच्या वाढत्या जनसंख्येचे पोट भरण्यासाठी आणि पाण्याच्या योग्य वापर होण्यासाठी गौ. हत्या बंदी सर्व भारतात झाली पाहिजे. या शिवाय लोकांनी मांस खाणे ही सोडले पाहिजे . केवळ मांसासाठी जनावरे पाळणे ही बंद झाले पाहिजे. लोक शाकाहारी झाल्या शिवाय वाढत्या जनतेचे पोट भरणे अशक्य आहे. लोकांची भूक शमविण्यासाठी तरी गौ. हत्या बंदीला समर्थन केले पाहिजे. अधिक माहिती साठी दोन विदेशी लिंक ही देतो आहे. अंतर्जालावर या विषयावर भरपूर माहिती आहे. http://ajcn.nutrition.org/content/78/3/660S.full http://amor.cms.hu-berlin.de/~h1981d0z/pdf/2010-10-viedma/water-footprt.pdf
  • Log in or register to post comments
  • 13803 views

प्रतिक्रिया

Submitted by खंडेराव on Wed, 04/15/2015 - 19:29

Permalink

हितेश

आपणास विनंती, चर्चेचा स्तर खाली नेउ नका.
  • Log in or register to post comments

Submitted by अर्धवटराव on Wed, 04/15/2015 - 21:52

Permalink

काय ठरलं मग ?

गोमांस खावे कि नको? गोमांसाचा धंदा करायची परवानगी सरकारने द्यावी म्हणुन मिपाकरांच्या आंदोलनात सामिल व्हावे कि नको? सगळ्या जगाला शाकाहारी बनवायची शपथ मिपाकरांनी घ्यावी काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अवतार on गुरुवार, 04/16/2015 - 23:24

Permalink

नंतर कामधेनु

नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली.
ह्या वाक्यात गौतम बुद्ध ह्या एका छोट्याशा व्यक्तीचा उल्लेख अनवधानाने राहून गेला असावा. म्हणून आठवण करून दिली.
  • Log in or register to post comments

Submitted by hitesh on Fri, 04/17/2015 - 04:32

In reply to नंतर कामधेनु by अवतार

Permalink

सहमत

जैनमत , बौद्धमत यांच्या आगमनानंतर हा देश शाकाहाराकडे वाटचाल करु लागला.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल मेंढे on Wed, 04/22/2015 - 18:17

In reply to नंतर कामधेनु by अवतार

Permalink

गौतम बुद्ध

ह्या वाक्यात गौतम बुद्ध ह्या एका छोट्याशा व्यक्तीचा उल्लेख अनवधानाने राहून गेला असावा. म्हणून आठवण करून दिली.
गौतम बुद्ध छोटी व्यक्ती? _/\_
  • Log in or register to post comments

Submitted by अवतार on गुरुवार, 04/23/2015 - 19:33

In reply to गौतम बुद्ध by अमोल मेंढे

Permalink

हे हे हे

एवढ्या मोठ्या व्यक्तीला ( आणि तिच्या कर्तृत्वाला ) अनुल्लेखाने मारण्यापेक्षा छोटीशी व्यक्ती म्हणून आठवण ठेवलेली ( आणि करून दिलेली ) चांगली नव्हे काय?
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 04/17/2015 - 06:26

Permalink

मोह आवरत नाही म्हणून या

मोह आवरत नाही म्हणून या लेखातला अजून एक घोळ लक्षात आणुन देतो. खरेसाहेबांनी दिलेल्या लिंकनुसार २०१२ मधे भारतात सुमारे ३६ लाख टन बीफ तयार झाले असून त्यातले सुमारे १९ लाख टन निर्यात झाले आहे. यात बहुतांश मांस हे म्हशीचे आहे असे म्हटले आहे. वर लेखात ५० लक्ष टन मांसासाठी किमान ५ कोटी टन खाद्य आणि १५ कोटी टन चारा ही लागेल असे म्हटले आहे. जर आताच ३६ लक्ष टन मांस निर्मिती होते आहे ती संभावित निर्मितीच्या ७० टक्के आहे. या मांस निर्मितीला वरच्या गणिताप्रमाणे लागणारे खाद्य आणि चाराही लागत आहे. जर ७०% एवढे खाद्यान्न्+चारा+पाणी आत्ताच आपण देत आहोत तर वरच्या लेखात उल्लेखलेली संभाव्य भयावह परिस्थिती किमान ७० टक्क्याएवढी देशात आत्ताच दिसायला हवी होती. मागे एका लेखात ५० टक्क्यांच्या वर काही आढळत असेल तर ते लक्षात घेण्यासारखे आहे असे काही लोक म्हणत होते. आता हे ७०% मला या देशात आढळत नाही आहे. मला कोणी मार्गदर्शन कराल काय? असो. हिंदूंच्या फ्रॅक्चर्ड आयडीओलॉजीचा विकृत फायदा घेण्यासाठी गायीला पद्धतशीरपणे राजकारणात ओढण्यात आले आहे. हिंदूंचे मुक्या प्राण्यांवर दया करा, कणकणमें है भगवान ह्या सर्व कल्पना फक्त गायीवरच एकवटल्या आहेत. हा प्रचंड दांभिकपणा बघून हसायला येते. उद्या मासे हे विष्णुचा अवतार आहे म्हणून मासेमारी आणि खाणे बंद केले तर? हे सरकार हिंदुहिताची रक्षा करते असे खोटे चित्र रंगवून, यांनी दिलेली सर्व आश्वासने जणू पुर्ण झाली आहेत या मूर्ख बेहोशीत काही स्वतःला हिंदू समजणारे नाचतायत. आधी राममंदीरच्या नावावर पेटवून, नंतर गुपचुप रामालाच खाकेला मारून, आता गायीवरून जनमतात फूट पाडू इच्छीत आहेत. असे अजिबात न होवो, पण देश रवांडाचे अनुकरण करण्याचे दिशेने हळूवार शीळ घालत पावले टाकत आहे असे जाणवते आहे. देशी गायींचे वाण जपणे आणि त्याला प्रोत्साहन देणे हे मूळ कायद्यातले उद्देश हेतूपुरस्सर लपवून इतरधर्मीय खातात म्हणून हिंदूना पुज्य असणारी गाय कुणी मारू नये हा प्रचार विखारी आहे. त्याचा उद्देशही अतिशय भंगार आहे. असे निर्बुद्ध निर्णय म्हणजे साप सोडून जमीनीवर काठी आपटण्यासारखे आहे. मुस्लिमांना आपण आपल्या टाचेखाली ठेवले याचा दंभ काही स्वघोषीत हिंदूंना करायचा आहे. म्हणून हा सगळा खटाटोप चालू आहे. तो दिवसेंदिवस बालिश आणि हास्यास्पद होत चालला आहे. भाजपचा खंदा पुरस्कर्ता असूनही मला या मुद्द्यांवर विरोध करायचा आहे तो मी करत राहीन. बाकी, एक कयास असा आहे की पटाईतसाहेब काडी टाकून पसार झाले आहेत. त्यांनी लेखात टंकलेले त्यांचे स्वतःचे मत आहे असे दिसत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on गुरुवार, 04/23/2015 - 10:07

In reply to मोह आवरत नाही म्हणून या by संदीप डांगे

Permalink

छान प्रतिसाद.

आमच्या एक्सेल शीटमधील तुमच्या आयडीचे वर्गीकरण बदलण्यात आलेले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on गुरुवार, 04/23/2015 - 14:19

In reply to छान प्रतिसाद. by आनंदी गोपाळ

Permalink

अग्गाग्गा.. अशी कुणी

अग्गाग्गा.. अशी कुणी चित्रगुप्ताप्रमाणे मिपा पाप-पुण्याची नोंदपण ठेवत असेल असे वाटले नव्हते. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on गुरुवार, 04/23/2015 - 15:30

In reply to अग्गाग्गा.. अशी कुणी by हाडक्या

Permalink

व्हय जी. हितल्याच जुन्या

व्हय जी. हितल्याच जुन्या जाणत्यांकडून शिकलो. बाकी तुमची नोंद घेण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 04/23/2015 - 16:57

In reply to व्हय जी. हितल्याच जुन्या by आनंदी गोपाळ

Permalink

बाब्बौ...मिपावर लोक असे पण

बाब्बौ...मिपावर लोक असे पण कर्तात...पुण्यातले पेंशनर्पण असले रिकामटेकडेपणाचे उद्योग करत नस्तील रच्याकने....जमा झालेल्या पाप-पुण्यावर व्याज चढते कै? :)
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on गुरुवार, 04/23/2015 - 19:16

In reply to बाब्बौ...मिपावर लोक असे पण by टवाळ कार्टा

Permalink

तुला जिथे तिथे व्याजाचीच

तुला जिथे तिथे व्याजाचीच चिंता रे.. (आता काय भागवतांची दीक्षा घेतलीयेस का ? ;))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 04/23/2015 - 19:21

In reply to तुला जिथे तिथे व्याजाचीच by हाडक्या

Permalink

भागवतांची दीक्षा

भागवतांची दीक्षा
अय्या ही कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 04/23/2015 - 19:37

In reply to भागवतांची दीक्षा by बॅटमॅन

Permalink

"अय्या"??? तुझा आयडी हॅक झाला

"अय्या"??? तुझा आयडी हॅक झाला कै??
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 04/23/2015 - 19:41

In reply to "अय्या"??? तुझा आयडी हॅक झाला by टवाळ कार्टा

Permalink

हाहा, उगीच रे.

हाहा, उगीच रे.
  • Log in or register to post comments

Submitted by हाडक्या on गुरुवार, 04/23/2015 - 19:43

In reply to "अय्या"??? तुझा आयडी हॅक झाला by टवाळ कार्टा

Permalink

"अय्या"???

"अय्या"???
संगतीचे परिणाम हैत भौतेक.. ;) (टका, भागवतांच्या दिक्षेबाबत बोल तू.. ;) )
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on गुरुवार, 04/23/2015 - 21:47

In reply to "अय्या"??? by हाडक्या

Permalink

हाहा आधी दीक्षा मिळू तर दे ;)

हाहा आधी दीक्षा मिळू तर दे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on गुरुवार, 04/23/2015 - 16:09

In reply to छान प्रतिसाद. by आनंदी गोपाळ

Permalink

फाईल ओपन ठेवा. बर्‍याच

फाईल ओपन ठेवा. बर्‍याच दुरुस्त्या कराव्या लागतील वारंवार...
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on गुरुवार, 04/23/2015 - 23:40

In reply to फाईल ओपन ठेवा. बर्‍याच by संदीप डांगे

Permalink

आमची कायम उघडी असते.

आमची कायम उघडी असते. बंद करायचे काहीही प्रयोजन नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप डांगे on Fri, 04/24/2015 - 00:00

In reply to आमची कायम उघडी असते. by आनंदी गोपाळ

Permalink

बरं.

बरं.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Fri, 04/24/2015 - 00:07

In reply to बरं. by संदीप डांगे

Permalink

वयाच्या कॉलममधे नुकतीच

वयाच्या कॉलममधे नुकतीच दुरुस्ती केली. उघडी ठेवण्याच्या सूचने बद्दल धन्यवाद! अन हो! उघडी असली, तरी ती फक्त आम्हालाच अ‍ॅक्सेसिबल अस्ते बरं का.
  • Log in or register to post comments

Submitted by hitesh on Sat, 04/18/2015 - 10:01

Permalink

..

वंद्रे निवडणुकीच्या वेळी राणेंच्या घरासमोर कोंबड्या उडवणे तुडवणेअसे प्रकार झाले म्हणे.. www.youtube.com/watch?v=3SMtBYqftbM cow & भूतदया हा संबंध जोडणारे लोक इतर प्राण्याना सावत्र वागणुक का देतात ?
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on गुरुवार, 04/23/2015 - 23:18

In reply to .. by hitesh

Permalink

अरेरे, त्या ब्रॉयलर कोंबड्या

अरेरे, त्या ब्रॉयलर कोंबड्या आधीच अर्धमेल्या असतात. गावठी कोंबड्या आणल्या असत्या तर त्यांना सांभाळताना निदर्शकांची त्रेधातिरपीट उडाली असती.
  • Log in or register to post comments

Submitted by होबासराव on Sat, 04/18/2015 - 10:18

Permalink

मुर्गी चोर

:)
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on गुरुवार, 04/23/2015 - 23:07

Permalink

हे जरा वाचा

हे जरा वाचा
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on गुरुवार, 04/23/2015 - 23:47

In reply to हे जरा वाचा by निनाद मुक्काम …

Permalink

हे फार पूर्वीपासूनच आहे !

हे फार पूर्वीपासूनच आहे ! भारतातून निर्यात होणारे बीफ मुख्यतः कॅराबीफ (म्हैस आणि रेड्याचे मांस) असते, त्यामुळे या गोहत्याबंदीचा निर्यातीवर काहीच परिणाम होणार नाही. उलट, बीफ निर्यातीत जागतीक दुसर्‍या क्रमांकावरच्या असलेल्या भारत एक क्रमांकावर असलेल्या ब्राझीलला लवकरच मागे टाकेल अशीच लक्षणे आहेत... जागतीक निर्यात : ९,१६५,००० टन Rank Country.........2013.........% Of World 1 Brazil............1,849,000.........20.17% 2 India.............1,765,000.........19.26% 3 Australia.........1,593,000.........17.38% 4 United States.....1,172,000.........12.79% 5 New Zealand.........529,000.........5.77% 6 Uruguay.............338,000.........3.69% 7 Canada..............333,000.........3.63% 8 Paraguay............326,000.........3.56% 9 EU..................244,000.........2.66% 10 Belarus.............220,000.........2.40% 11 Argentina...........186,000.........2.03% 12 Mexico..............166,000.........1.81% 13 Nicaragua...........125,000.........1.36% 14 Pakistan.............50,000.........0.55% 15 Colombia.............46,000.........0.50% 16 Jordan...............35,000.........0.38% 17 Saudi Arabia.........35,000.........0.38% 18 Ukraine..............34,000.........0.37% 19 China................30,000.........0.33% 20 Costa Rica...........18,000.........0.20% 21 Honduras.............13,000.........0.14% 22 South Africa.........13,000.........0.14% 23 Russia...............12,000.........0.13% 24 Malaysia..............6,000.........0.07% 25 Chile.................5,000.........0.05% 26 Guatemala.............4,000.........0.04% 27 Korea, South..........4,000.........0.04% 28 Lebanon...............4,000.........0.04% 29 Switzerland...........3,000.........0.03% 30 Azerbaijan............2,000.........0.02% 31 Bosnia................1,000.........0.01% 32 Japan.................1,000.........0.01% 33 Kazakhstan............1,000.........0.01% 34 Philippines...........1,000.........0.01% 35 Taiwan................1,000.........0.01% 36 Senegal...................0.........0.00% Source: FAS/USDA (metric tons)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com