उन्हाळ्यात अनेक प्रकारची फळे येतात. पांढरे जाम ज्यांना आमच्याकडे विलायती जाम म्हणतात ते या दिवसात मोठ्या प्रमाणात होतात. नुसते खायला छान लागतातच, पण काढल्यावर फार दिवस टिकत नाहीत. घरीच झाड असल्याने त्यांचा दुसरा काहीतरी उपयोग म्हणून सरबत करून पाहिले. सरबत चवीला पन्ह्यासारखे लागते, आणि फ्रिजमध्ये दोन दिवस टिकतेही! हा जामचा फोटो!
साहित्यः पांढरे जाम २०, साखर चार पाच चमचे, मीठ, वेलची पावडर, थंड पाणी.
कृती: जाम स्व्च्छ करून घ्यावेत.जामचे दोन भाग करून त्यातील बिया काढून घ्याव्यात. ज्युसर जारमध्ये जामच्या फोडी , मीठ, साखर घालावे. मीठ साखरेचे प्रमाण चवीनुसार कमी जास्त करावे. या जामना किंचीत आंबट चव असते.साधारण वीस जामसाठी एक ग्लास पाणी घालावे. आणि हे सर्व मिक्सरला फिरवावे. गाळून घ्यावे. वेलची पावडर घालून थंडगार सर्व्ह करावे.
तयार सरबत!

वाचने
8740
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच!
मस्त
हे तर पेढ्यांसारखे दिसत आहेत!
हरेश्वर आठवलं!
जाम अजाबात आवडत नाहीत पण
जाम खूपच आवडतात! भारी लागत
जाम कुठुन मिळवु आता,झाडंच
फोटो भारी आहेत.जाम पाच
सरबत आवडले. मौसमी फळांचा
+१
In reply to सरबत आवडले. मौसमी फळांचा by रेवती
मस्त.
काय छान दिसतंय सरबत. जाम
सानिका, इकडे ये
In reply to काय छान दिसतंय सरबत. जाम by सानिकास्वप्निल
मुळातच बेचव चवीचं जाम अजीबात आवडत नाहि
मस्त!
दीपकने कुठचे जाम खाल्ले देवजाणे!.................
.
जाम आवडत फळ..मस्तच लागत असणार
पांढर्या जामचे सरबत
प्रचंड आवडणार्या फळांपैकी एक
जाम खाताना याचे सरबत सुद्धा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Baltimore declares emergency as Freddie Gray riots eruptमस्त दिसतय सरबत.अजुन हे फळ