उन्हाळा हा फिरण्यासाठी फारसा योग्य सीझन नाही त्यामुळे सहलीच्या ठिकाणांचे पर्याय कमी असतात पण शालेय सुट्ट्या या वेळेस असल्याने ट्रिपचे नियोजन करायचे आहे.
सहकुटुंब फिरता येतील . गाडीने जाउन ४ दिवसात ट्रिप करायची आहे कारण ऐन वेळेस ट्रेन बुकिंग मिळत नाहीत.
अशा पर्यटन स्थळांची माहिती ( हॉटेल, पाँईटस, प्रवास , इतर) हवी आहे .
मी शोधलेली काही ठिकाणे
१. सापुतारा : पुण्याहून ३५० किमी असणारे हे गुजरात मधले थंड हवेचे ठिकाण आहे. हस्तकला प्रदर्शन, तलाव , बोटींग, रोप वे, सुर्यास्त पाँइट ही आर्कषणे आहेत. येताना वणीची सप्तश्रृंगी देवी बघता येते. जास्त वेळ असेल तर नाशिकच्या वाईन फार्म्स मध्ये सुद्धा दिवस घालवता येतो.
दुवा
२. महाबळेश्वर : पुण्यापासून १२० किमी वर आहे. वेण्णा लेक आणि बरेच पॉईटस आहेत.जानेवारी ते मार्च स्ट्रॉबेरीचा सीझन असतो. तापोळा देखील छान आणि जवळ आहे. तापोळाला बोटींग करता येते.
३. दांडेली : पुण्यापासून ४४० किमीवर दांडेली अभयारण्य (कर्नाटक) आहे. आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.हे अभयारण्य जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे. रात्री कॅम्पिंगची सोय करतात. नदीमधले राफ्टिंग आणि रॅपलिंग असे साहसी खेळसुद्धा आहेत. बरेचजण इथे पक्षीनिरीक्षणासाठी येतात. रहाण्यासाठी खासगी, सरकारी होटेल्स आहेत.
माबोवरचा दुवा
इतर काही ठिकाणे माथेरान , चिखलदरा अशी आहेत. कोकणामध्ये उन्हाळ्याचा त्रास खूप होतो म्हणून तो विचार टाळला आहे.
तुम्हाला माहिती असलेली पर्यटन स्थळे सुचवून मदत करा :)
वाचने
12260
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम धागा!! उन्हाळ्यात
आंबा घाट - सह्याद्रीतील
काही संपर्क असेल तर पाठवा
In reply to आंबा घाट - सह्याद्रीतील by प्रचेतस
हे घ्या
In reply to काही संपर्क असेल तर पाठवा by नितिन५८८
धन्यवाद
In reply to हे घ्या by प्रचेतस
कोकणात त्रास?
या वर्षी कोकणात भयंकर गरम आहे
In reply to कोकणात त्रास? by पैसा
आंबे नाहीत
In reply to या वर्षी कोकणात भयंकर गरम आहे by सुबोध खरे
कोकण दॊरा होणारच
In reply to आंबे नाहीत by पैसा
तारखा कळव
In reply to कोकण दॊरा होणारच by स्पा
डन डना डन
In reply to तारखा कळव by पैसा
कोकणातले पत्ते द्या राव
In reply to तारखा कळव by पैसा
पत्ते?
In reply to कोकणातले पत्ते द्या राव by नितिन५८८
योग्य वेळी आलेला धागा.
मे मध्ये कुर्ग भरपूर गरम
In reply to योग्य वेळी आलेला धागा. by विशाखा पाटील
चांगला धागा.
कोकणात काजूच्या, आंब्याच्या,
कुठे रे ?
In reply to कोकणात काजूच्या, आंब्याच्या, by टवाळ कार्टा
अश्या बागा कोकणात बर्याच आहेत
In reply to कुठे रे ? by कपिलमुनी
१. सापुतारा : पुण्याहून ३५०
या वर्षी
हंपी.
In reply to या वर्षी by कपिलमुनी
पुणे/ मुंबई/नागपूर/जळगाव