✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बिनडोकपणे रस्ता तोडला (BRT)

ट
टवाळचिखलू यांनी
Sat, 11/22/2008 - 10:10  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2720 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

झ
झकासराव Sat, 11/22/2008 - 10:42 नवीन

बीआरटी

बीआरटी म्हणजे *****(फाइव्ह स्टार म्हणजे..... पुणे कट्ट्यात ठरलेला शब्द) रोड ट्रॅफिक सिस्टीम मुळात जवळपास ४ पदरी असलेला रस्ता कधी कधीच धावणार्‍या पीएमटीच्या डब्यासाठी पेशल राखुन नेहमी धावणार्‍या बाकीच्या गाड्याना उरलेल्या छोट्याशा रस्त्यावरुन जायला भाग पाडणे. वैताग आहे नुसता. कात्रजच्या घाटापात्तुर जायला यष्टी लयी येळ घेते राव. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 11/22/2008 - 19:24 नवीन

अपघात

होणार्‍या अपघाताला मनपा जबाबदार राहील. हा प्रोजेक्ट फार दिवस चालणार नाही. पैसे खायचे धंदे सारे. (मागे एकदा नाशिकला मायको सरकल बांधत होते. त्या सरकल च्या टोकदार जाळ्या बांधकामानंतर थेट रस्त्यावर येणार होत्या. हे बेसीक ज्ञान त्यांना नको का ? मी खिशाला चाट लावत हे संबधीत यंत्रणेला कळवत राहीलो. नंतर ते डिझाईन बदलले.) -( सणकी )पाषाणभेद
  • Log in or register to post comments
क
कपिल काळे Sat, 11/22/2008 - 20:49 नवीन

कन्सेप्ट खूप चांगली

बी. आर टी ही कन्सेप्ट खूप चांगली आहे. पण ती पुण्यात अयोग्यरितीने कार्यवाहीत आली आहे. प्रवाशांनी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या थांब्याकडे जाण्यासाठी सिग्नल किंका वाहतूक पोलिस/ सहाय्यक अशी व्यवस्था असेल असे प्रस्तावित होते. पण सध्या भारनियमनामुळे वीज नाही मग सिग्नल तरी कसा चालायचा? शिवाय बी आर टी ची लेन इतर वाहनांनी वापरणे ही भानगड आहेच. रस्तेच पुरेसे रुंद नाहीत तर वाहनचालक तरी काय करतील? समस्येचे मूळ हे शहरांचा बेसुमार विकास, त्यामुळे निर्माण झालेला विकासाचा असमतोल आणि त्यामुळे येणारे लोंढे हा आहे. विकासाचे विंकेद्रीकरण करुन गवोगावी रोजगाराची संधी प्राप्त करुन दिल्यास असे अनेक प्रश्न सुटू शकतील. http://kalekapil.blogspot.com/
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 11/22/2008 - 21:09 नवीन

विकासाचे

विकासाचे विंकेद्रीकरण करुन गवोगावी रोजगाराची संधी प्राप्त करुन दिल्यास असे अनेक प्रश्न सुटू शकतील. अगदी! मुंबईचीही तीच कथा आहे, आणि इतर सर्व मोठ्या शहरांचीही!! बी. आर टी ही कन्सेप्ट खूप चांगली आहे. दर अर्ध्या तासानी बस येणार असेल तर अर्थातच वाईट संकल्पना आहे. बाणेर, सातारा रस्ता, या भागांमधे बसेसच मुळात दिसत नाहीत. आता तुमच्या भागात किती वारंवारिता आहे तेही बघणं महत्त्वाचं आहे. शिवाय मधल्या लेनमधे बस असलेली बरी, दोन्ही बाजूंनी वापरता येईल लेन! शिवाय, इतर वाहनांना वळायचं असल्यास त्याचा त्रास होणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिल काळे
क
कपिल काळे Sat, 11/22/2008 - 21:41 नवीन

वारंवारिता आणि बोगोटातील बीआरटी

अदितीचा मुद्दा योग्य आहे. म्हणूनच म्हणतो बी आर टी ची " संकल्पना" चांगली आहे. " संकल्पनेमध्ये" मध्ये वारंवारिता जास्त आहे. पण पुण्यात संकल्पनेची अंमलबजावणी योग्य रितीने झालेली नाही. त्यामुळे असे प्रश्न आहेतच. सार्वजनिक जागेचा खाजगी वाहनांकडून वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे अनेक प्रश्न ह्यावर उत्तम उपाय म्हणजे बी आर टी. पुण्यात हा प्रकल्प हाती घेतला तेव्हा बोगोटा, कोलंबिया येथील बीआर टी चे उदाहरण डोळ्यासमोर ठेवले गेले होते. १३ लाख जनता रोज बोगोटासारख्या शहरात बीआरटी चा वापर करते. पुण्याची लोकसंख्या ३० लाखाच्या आस्पास असेल त्यातील रोज कामानिमित्त बाहेर पडणारे लोक इतकेच किंवा अजून पाच- सहा लाख. पण खालील दुव्यावरुन जर बोगोटामधील बीआरटी बघितली तर पुण्यातील बीआर टी प्रकल्पात किती घिसाडघाइ आणि संयोजनातील भोंगळपणा झाला आहे ते लक्षात येइल. बोगोटा बीआरटी ची माहिती ... http://www.streetsblog.org/2008/01/28/streetfilm-brt-in-bogota/
  • Log in or register to post comments
स
सचिन बडवे Sat, 11/22/2008 - 22:13 नवीन

सहमत

पैसे खायचे हेच उद्दिष्ट बाकि रस्ता काय ज्याला जायचे आहे तो शोधेलच कि...... सचिन
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sun, 11/23/2008 - 12:04 नवीन

घिसडघाइ . .

अतिशय चांगल्या सकल्पनेचं मातेरं कसं करायचं ते आपल्या इंजिनियर लोकांना सांगा. साले दारु पिउन प्लॅन बनवतात कि काय कोण जाने. रस्त्याच्या मध्यभागि असलेल्या थांब्यावर जाण्यासाठी फूट ओवर ब्रिज (मराठी शब्द सापडला नाही. जाणकारांनी मदत करावी) केला तर बरेच प्रश्न सुटतील. बाकी लोकांचा विचार कोण करतो? अपघातात २०/२५ मेले तरी कुनाच्या बापाचे काय जाणार आहे. ज्याला पैसा कमवायचा असतो तो मेलेल्याचे पन भांडवल करतो. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
  • Log in or register to post comments
ट
टवाळचिखलू Sun, 11/23/2008 - 21:23 नवीन

आभार ...

नमस्कार, प्रतिक्रियेबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. अदितीचा मुद्दा योग्य आहे. म्हणूनच म्हणतो बी आर टी ची " संकल्पना" चांगली आहे. " संकल्पनेमध्ये" मध्ये वारंवारिता जास्त आहे. पण पुण्यात संकल्पनेची अंमलबजावणी योग्य रितीने झालेली नाही. त्यामुळे असे प्रश्न आहेतच. खरं आहे " संकल्पना" चांगली आहे. पण ती कीती मुर्खपणे राबवली गेली आहे हे जेव्हा कळंत तेव्हा तळपायाची आग मस्तकाला जाते. ३. आतापर्यंत सव्वा दोन हजार कोटी रुपये मान्यता (कात्रज ते हडपसर) आणि आज नाशिक फाटा ते वाकड आणि काळेवाडी ते देहु-आळंदी मार्गासांठी ४४२ कोटी ६० लाख रु. मान्य. बीआरटी ची सद्यस्थिती पाहीली तर इतके पैसे कुणाच्यातरी घशात गेलेत हे कुनीही (मी काय शेंबडं पोर पण ) सांगेल. पण टॅक्स भरुन आपला पैसा कसा वापरला जातोय हे कळल्यावर पश्चातापाशिवाय दुसरे काही करता येत नाही. पण तुमच्या सगळ्यांजवळ मन मोकळे करुन बरं वाटले. - चिखलू ( पुसणार कुणी असेल तर डोळे भरुन यायला अर्थ आहे, रडणार कुनी नसेल तर मरणही व्यर्थ आहे) पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा