✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महात्मा घेता का ,महात्मा ??

न
नितिन शेंडगे यांनी
Wed, 04/22/2015 - 17:01  ·  लेख
लेख
आज काल आरक्षण विषयी ची बातमी दर दोन दिवसाआड येते . कितीतरी संघटना, पक्ष त्यावर भांडत असतात. हे सगळे चालू असताना कुणी त्यांची पत्रक किंवा जे ब्यानर लावले जातात त्या कडे पाहिले आहे का ? कोणत्या ना कोणत्या ऐतिहासिक व्यक्तीचे चित्र त्यावर असते. त्याचा अर्थ काय ? आज आपण कितीही पुढे गेलो तरी काही राजकीय पुढारी आणि समाजातील स्वताला श्रेष्ठ समजणारी माणसे आपल्याला जाती आणि धर्मा मध्ये वाटून टाकतात . कितीतरी मोठ्या व्यक्तींना ह्या लोकांनी एखाद्या जाती आणि धर्मामध्ये अडकवून ठेवले आहे. आणि आम्हीपण ते मान्य केले आहे . खाली काही उदाहरणे देत आहे, छत्रपति शिवराय : मराठा महात्मा फुले : माळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर : बौद्ध राणी अहिल्यादेवी होळकर : धनगर लोकमान्य टिळक : ब्राम्हण हि तर काही उदाहरणे आहेत , आमच्या मनावर हे सगळे इतके ठासवून भरले आहे कि काही साहित्यक पण जाती पातीचा उल्लेख करूनच ह्या सर्व व्यक्तींबद्दल लिहितात . जर ह्या लोकाची चरित्र वाचली तर ह्यांनी मात्र कधीही जातीपातीला आपल्या मनात थारा दिला नव्हता . त्यांना एकच जात माहित होती , माणूस . आज काल जर समजा मी वरील पैकी कुणाचेही गोडवे गावू लागलो कि लोक आधी माझी जात पाहतील. कधी संपणार हे ? आजही शाळेत जातीचा दाखला मागितला जातो , का म्हणून ? एका बाजूला जाती पाती संपवून टाका म्हणायचे आणि जिथून खरे संस्कार सुरु होतात त्या विद्यामंदिरात जात तपासायची . वरील उल्लेख केलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत सर्व जाती धर्माची लोक होती. त्यांनी कधीही म्हटले नाही कि हा अमुक जातीचा आहे म्हणून ह्याला सोबत नको . मग आपण का ह्यांना जाती आणि धर्मात अडकवून टाकलेय ?? प्रत्येक वेळेस कुठल्या नि कुठल्या राजकीय स्वार्था साठी एखादे ऐतिहासिक व्यक्तिमत्व बळी जातेय. http://goshtmanatil.blogspot.in/
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज

प्रतिक्रिया द्या
2967 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

पॉपकॉर्न सुद्धा नको

कपिलमुनी
Wed, 04/22/2015 - 17:07 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

जाने दो कमुतै नया है वह!

प्रमोद देर्देकर
Wed, 04/22/2015 - 17:13 नवीन
जाने दो कमुतै नया है वह!
  • Log in or register to post comments

कमु "तै" नैत =))

टवाळ कार्टा
Wed, 04/22/2015 - 17:17 नवीन
कमु "तै" नैत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

प्रकाटाआ

प्रमोद देर्देकर
Wed, 04/22/2015 - 17:17 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

ह्यावर चर्चा करून काय फायदा

पॉइंट ब्लँक
Wed, 04/22/2015 - 18:16 नवीन
ह्यावर चर्चा करून काय फायदा नाय. सगळ्यांना स्वतःचा फायदा बघायचाय. ऐतिहासिक व्यक्तीचा बळी गेला काय आणि त्याचा बाजार झाला काय, सगळ एकच!
  • Log in or register to post comments

हा विषय च्युईंग गम चघळण्या

सुबोध खरे
Wed, 04/22/2015 - 19:06 नवीन
हा विषय च्युईंग गम चघळण्या सारखा आहे कितीही वेळ चव पोटात काही जात नाही आणि थोड्या वेळाने तोंडाला स्वाद पण राहत नाही.
  • Log in or register to post comments

असल्या जिल्ब्या आजकाल तळल्या

मोहनराव
Wed, 04/22/2015 - 19:12 नवीन
असल्या जिल्ब्या आजकाल तळल्या जात नैत!
  • Log in or register to post comments

गांधीबाबाला मात्र

बाबा पाटील
Wed, 04/22/2015 - 20:21 नवीन
कोणतीच जात समावुन घेत नाही.
  • Log in or register to post comments

छान

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 04/22/2015 - 22:16 नवीन
चांगला मुद्दा रे नितिना. आम आदमी पार्टी सोडली तर बाकी सगळे जात-धर्म मानणारे पक्ष आहेत.
  • Log in or register to post comments

काही उदाहरणे ??

धर्मराजमुटके
Wed, 04/22/2015 - 23:18 नवीन
खाली काही उदाहरणे देत आहे, छत्रपति शिवराय : मराठा महात्मा फुले : माळी डॉ . बाबासाहेब आंबेडकर : बौद्ध राणी अहिल्यादेवी होळकर : धनगर लोकमान्य टिळक : ब्राम्हण
अहो मग हे चांगलेच नाही का ? भारतात तुमची जात कोणतीही असो, त्यात एखादा तरी महापुरुष जन्माला आलेला असतोच. समजा मी मराठा आहे आणि इतर सर्व जातीत महापुरुष आहे पण माझ्याच जातीत नाही तर मला कमीपणा नसता का वाटला ? या महापुरुषांच्या महानपणामुळे तुम्ही अगदी दिपून जाता व त्याचा मार्ग अनुसरण्यास तुम्हाला उभा जन्म पुरत नाही. मग इतर महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन जीवन घडविणे कधी जमणार ? त्यामुळे आहे ते ठीक आहे. पुढे चालत रहा.
आजही शाळेत जातीचा दाखला मागितला जातो
माझ्या शाळेत तर नव्हता मागीतला बुवा.
  • Log in or register to post comments

आडनाव लावायचे बंद केले तर

खटपट्या
गुरुवार, 04/23/2015 - 00:43 नवीन
आडनाव लावायचे बंद केले तर होईल का काही?
  • Log in or register to post comments

आम्ही जात-पात पाळत नाही असं

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 04/23/2015 - 07:58 नवीन
आम्ही जात-पात पाळत नाही असं म्हणणारी नवीन "निर्जात जात" उदयाला येईल. आणि अल्पसंख्य असल्याच्या नावावर आरक्षण मागेल. आपल्या देशाचा भरोसा नाही. सिरियस होउन जरी आपल्या डॉक्युमेंटवरती जात लावणं बंद केलं तरी जवळपास ७०-८०% अर्ज भरताना जातीची जागा रिकामी सोडुन चालत नाही. :/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

महात्मा घेता का ?महात्मा>>>

जेपी
गुरुवार, 04/23/2015 - 08:55 नवीन
महात्मा घेता का ?महात्मा>>> घेतो की! काय भाव चालु आहे..
  • Log in or register to post comments

आवशीकखावव्हरान, आमच्यात कोन

सतीश कुडतरकर
गुरुवार, 04/23/2015 - 11:32 नवीन
आवशीकखावव्हरान, आमच्यात कोन म्हपुरूस जन्माकच येवक नाय. अंबानी, बिर्ला, अगरवाल, गुप्ता यांच्यापैकी कोन हा काय?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा