Skip to main content

जालीय निदान

लेखक सुबोध खरे यांनी रविवार, 19/04/2015 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
जालीय निदान ( internet diagnosis) काल माझ्याकडे सोनोग्राफीसाठी २५ वर्षांची एक लग्न न झालेली मुलगी आली होती. तिला पाळीच्या दिवसात फारच जास्त त्रास होत असे म्हणून स्त्रीरोग तज्ञाने माझ्याकडे पाठविले होते. माझ्या सोनोग्राफी च्या खोलीत मी रुग्णांच्या नातेवाईकांनासुद्धा येण्याची परवानगी देतो. त्याप्रमाणे तिची आई सुद्धा आली होती. मी तिचे केस पेपर पाहीले त्यात फारसे काही आढळले नाही. तिची सोनोग्राफी सुरु केल्यावर तिने मला बरेच प्रश्न विचारायला सुरुवात केली. डॉक्टर endometriosis अजून आहे का/ माझ्या ओव्हरीज कशा आहेत. त्यावर काही डाग आहे का? आतमध्ये सिस्ट (cyst) आहे का? गर्भाशयाला सूज आहे का? सर्व साधारणपणे मी रुग्णाशी सोनोग्राफी करताना संवाद साधतो. त्यामुळे बर्याच गोष्टी ज्या निदानाला आवश्यक असतात त्या लक्षात येऊ शकतात. काही वेळेस त्यांना पाठवणार्या डॉक्टरांच्या लक्षात न आलेल्या गोष्टी पण तुमच्या लक्षात येऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे रुग्णाने कितीही प्रश्न विचारले तरी मी चिडत नाही . मी तिला विचारले कि तुम्हाला endometriosis चा त्रास केंव्हा पासून आहे. त्यावर ती काहीच बोलली नाही. मग मी तिला विचारले कि तुमची laparoscopy झाली आहे का? यावर ती म्हणाली कि नाही. मग मी विचारले कि तुम्हाला endometriosis आहे हे कोणी सांगितले. त्यावर ती म्हणाली कि अगोदरचे स्त्रीरोग तज्ञ पाळीचा इतका त्रास होतो तर असे काहीतरी असण्याची शक्यता आहे असे म्हणाल्याचे आठवते. मी तिला परत विचारले कि हे सिस्ट किंवा ओव्हरीज वर डाग तुम्हाला कोण म्हणाले? त्यावर ती म्हणाली कि ते मी इंटरनेट वर वाचले. हे ती मुलगी बोलत असताना मला थोडेसे हसू आले आणि मी तिला विचारले कि का हो तुमचा टी व्ही बिघडला कि तुम्ही त्याचा आय सी गेला आहे का सर्किट खराब झाले आहे का याचा जीवाला त्रास करून घेता का? किंवा इंटरनेट वर वाचून पाहता का? यावर त्यामुलीची आई सूचक हसली. अर्थात ती मुलगी नाही म्हणाली. मग मी तिला म्हणालो कि केवळ तुमच्या एका डॉक्टर नि हा शब्द उच्चारला म्हणून त्यावर तुम्ही जालावर बरेच वाचन केलेत आणि त्याने आपले डोके पिकवून घेतलेत?. तिला मी व्यवस्थितपणे पाळीचा त्रास का होतो हे समजावून सांगितले. बर्याच मुलींच्या गर्भाशयाचे तोंड लहान असते त्यामुळे पाळीच्या वेळेस झालेल्या रक्ताच्या गाठी बाहेर टाकण्यासाठी गर्भाशय जोरात आकुंचन पावते त्यामुळे ओटीपोटात मुरडा झाल्यासारखे( spasm) प्रचंड दुखते. लग्न झाल्यावर जेंव्हा मुलगी प्रथम गरोदर राहते तेंव्हा तिची पाळी बंद होते आणि नंतर जसा जसा गर्भाशयाचा आकार वाढत जातो तसे त्याचे तोंड मोठे होते आणि शेवटी प्रसुतीनंतर गर्भाशयाचे तोंड मोठे होते आणि हा प्रश्न कायमचा बंद होतो. मी तिला हसत म्हणालो कि याचा अर्थ तुम्ही लगेच लग्न करा असे मला सुचवायचे नाही. तुम्ही लग्न केंव्हा करावे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे होईस्तोवर माझी सोनोग्राफी पूर्ण झाली होती आणि मला असे दिसले कि तिला वजन थोडेसे वाढल्यामुळे PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) हा आजार होता. पण हा काही फार गंभीर आजार नाही. मी तिला पुढे म्हणालो कि जर पाळीचा फारच जास्त त्रास होत असेल तर गर्भाशयाचे तोंड डायलेटर टाकून मोठे करता येते. परंतु लग्न न झालेल्या मुलीची खालून शक्यतो कोणतीही शल्यक्रिया केली जात नाही. हा उपाय अगदी शेवटचा म्हणूनच वापरला जातो. पाळीच्या त्रासावर परिणामकारक वेदनाशामक औषधे उपलब्ध आहेत ती सहज घेता येतील. नेट वर वाचून कोणतेही निदान करणे हे फारसे चांगले नाही. मी तिचे सर्व जुने कागदपत्र परत पाहायला मागितले.त्यात कुठेही endometriosis असल्याचा उल्लेख दिसला नाही. अगोदर केलेल्या सोनोगाफितही नाही.त्या सोनोग्राफीत तिला mild PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम) असल्याचे लिहिले होते. गम्मत म्हणजे तिने जालावर वाचून केलेल्या निदानावर एका आयुर्वेदिक वैद्याने तिला endometriosis चे उपचार चालूही केलेले होते. त्यातून तिला अडीच महिने पाळी पण आली नव्हती.( अर्थात हे कदाचित PCOS (पॉली सिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम मुळे पण असू शकेल) तिच्या भावाच्या आग्रहामुळे ती आता स्त्रीरोग तज्ञाकडे गेली होती. मला आश्चर्याचा धक्काच बसला. नक्की निदान नसताना गृहीत गोष्टींवर आजार आहे हे समजणे आणी त्यावर इलाजही करणे. मुळात जालावर वाचून अर्धवट ज्ञान घेऊन लोक येतात हा अनुभव मी गेली बरीच वर्षे घेत आलो आहे. दुर्दैवाने त्या माहितीचा उपयोग कसा करून घ्यायचा हे बहुतांश लोकांना कळत नाही आणि त्यामुळे ते भरपूर टेन्शन घेतात हे मी पाहतो आहे. हे सर्व झाल्यावर आम्ही बाहेर आलो. ती मुलगी टॉयलेट मध्ये गेली असताना तिची आई मला म्हणाली डॉक्टर तुम्ही इतके छान समजावून सांगता तर मी तुम्हाला एक विनंती करते कि तिला नीट समजावून सांगा, काही तरी वाचते आणी टेन्शन घेऊन बसते.ती स्वतः इलेक्त्रीकल इंजिनियर आहे. चांगली मोठ्या कंपनीत नोकरी आहे.आपल्याला काहीतरी गंभीर आजार आहे असे काहीतरी डोक्यात घेऊन बसली आहे. तिच्यासाठी चांगले स्थळ आले होते.मुलगा पण मेकानिकल इंजिनियर होता. तिने त्या मुलाला सांगितले कि मला ENDOMETRIOSIS आहे तेंव्हा मला मुल होण्याची शक्यता नाही. झाले ते लोक निघून गेले. असे सांगितल्यावर कोण लग्न करेल हिच्याशी? मला धक्काच बसला तिचा मोठा भाऊ इतका वेळ बाहेर बसला होता तो पण अगदी कळवळून म्हणाला कि डॉक्टर काहीतरी खूळ डोक्यात घेऊन बसते आणी म्हणते मला कुणाला फसवायचे नाही. तुम्ही तिला समजावा हो.मी त्यांना हसून धीर दिला. ती मुलगी तोवर टॉयलेटमधून बाहेर आली. मी तिला स्पष्टपणे सांगितले तुम्हाला कोणताही आजार नाही. तुम्ही नवीन कार विकत घेता तेंव्हा कारची कंपनी तुम्हाला तीन वर्षे किंवा ३०,००० किमी ची WARRANTY का देते तर नवीन गाडीत काही खराबी येण्याची शक्यता नसतेच म्हणून. तसेच आहे. पंचविसाव्या वर्षी कोणता आजार होईल. फार तर प्रेम जमू शकेल अहो पंचवीस वयाला मी आजार किंवा असल्या काही गोष्टी माझ्या स्वप्नात पण नव्हत्या. उद्या कुठे फिरायला जायचे. कुठल्या सिनेमाला जायचे.कुठे मुली पाहायला जायचे. असले विचारच आमच्या डोक्यात असत. पंचविशीला तुम्ही भलत्याच गोष्टी डोक्यात ठेवल्या आहेत. नेटवर वाचले म्हणजे त्यातील सर्वात वाईट आणी गुंतागुंतीचे प्रश्न आपल्याला होतील असे तुम्ही जे गृहीत धरता आहात ते चुकीचे आहे. माझ्या कडे भरपूर गरोदर बायका जालावर काही बाही वाचून डोकं पिकवून घेऊन येतात. मुलाची वाढ व्यवस्थित आहे का? माझा आहार बरोबर आहे ना? ई ई . तुम्ही तर त्याच्या पुढे गेलात. नसलेला आजार गृहीत धरून तुम्ही तुम्हाला मुल होणार नाही हे मनात धरलेत? तुम्हाला अगदी endometriosis असेल तरीही त्यात मुल होत नाही हे कुणी सांगितले? मी गेली कित्येक वर्षे वंध्यत्व या विषयात काम करत आलो आहे आणी शेकड्यांनी बायका endometriosis च्या पाहील्या आहेत ज्या गरोदर होऊन व्यवस्थित मुलांना जन्म देऊन आनंदात आहेत. तुम्ही गाडीच्या ABS मधून आवाज यायला लागला कि नेटवर तपासता कि सर्व्हिस सेंटरला जाता? तुम्हाला पंचविसाव्या वर्षी काय आजार होणार आहे? उगाच स्वतःवर आणी आपल्या कुटुंबावर टेन्शन कशाला आणता आहात? मी तुमची सोनोग्राफी केलेली आहे त्यात endometriosis मुळीच दिसत नाहीये. त्यातून endometriosis अगदी असेल तरी ते सूक्ष्म स्वरुपात असेल आणी इतक्या कमी प्रमाणात असलेल्या endometriosis मुळे मुल होणार नाही हे समजणे साफ चूक आहे. त्यावर ती मुलगी हसली. तिला ते पटले.काहीवेळा सोनारानेच कान टोचावे लागतात तिच्या आईच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. भाऊ सुद्धा सद्गदित झाला. मी त्या मुलीला म्हणालो कि मला लग्नाला नाही तरी रिसेप्शनला बोलवा. मला आईस्क्रीम फार आवडते अन फुकट असेल तर अजूनच. ते सर्व जण हसले आणि मला निरोप देउन गेले. जाता जाता --- माहिती आणि शहाणपण यात फरक करायला आपण शिकले पाहिजे. टोमाटो हे फळ आहे हि "माहिती" आहे पण ते फ्रुट सॅलड मध्ये घालू नये हे "शहाणपण" आहे
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 38696
प्रतिक्रिया 129

प्रतिक्रिया

In reply to by विदेशी वचाळ

मला त्या मुलीचे अजिबात काही गैर वाटत नाही . तिने प्रयत्न प्रामाणिक केलेला अहे. भले माहिती अपुरी वाचली असेल. आणी तसे असेल तर मग वैद्यबुवांनी समजवायला नको का? का समजावून सांगितले तर बाभळ बुडते? वाचाळ साहेब मुलीचा प्रयत्न प्रामाणिक नाही असे मी म्हणालेलो नाही फक्त चुकीच्या दिशेने होता. अजून भरपूर माहिती जालावर उपलब्ध आहे कि तिने जरूर वाचावी. पण मग आपल्याला मूल होणारच नाही हा तिने काढलेला निष्कर्ष बरोबर आहे हे आपण कसे ठरवले? त्यामुळे मानसिक तणाव घेऊन तिचे वजन कमी झाले तर हे धुणे वैद्यबुवांनी का धुवावे ? आपण ४९८ अ या कायद्याबद्दल( घरगुती हिंसाचार) जालावर भरपूर वाचन करून शंका निरसनासाठी एखाद्या वकिलाकडे गेलात आणि त्याने जर आपल्याला पाच हजार रुपये फी सांगितली तर आपले काय म्हणणे आहे? अशीच फी एखाद्या डॉक्टरने घेतली तर ती द्यायची किती लोकांची तयारी असेल? जर लोकांची अशा सल्ल्यासाठी पाच हजार रुपये द्यायची तयारी असेल तर मी माझे सोनोग्राफी मशीन बंद करून असा सल्लागार म्हणून दुकान टाकायला एका पायावर तयार आहे. बोला कुठे यायचं ? आजचा सुविचार --क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.

डॉक्टरांची विश्वासर्हता खरोखरच घटली आहे का? अशीक्षीत व उच्चशिक्षीत असे सर्वच लोक वाईट अनुभव आल्यावर डॉक्टरवर हात का उचलत आहेत? तेही हा गुन्हा आहे हे माहीत असुन? डॉक्टरांच्या उपचार करण्याच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या उपचार करण्याच्या ईच्छेपद्दल लोकांना संशय येत असेल का? डॉक्टर्स पैसे उकळण्यासठी चुकीचे/अपुरे उपचार करत असतील असे त्यांना वाटत असेल का? अशा घटना वारंवार का व्हाव्यात? या मध्ये डॉक्टर लोकांचेही काही चुकते का यावर त्यांनी तटस्थपणे विचार करावा (आत्मपरीक्षण करावे) हे सुचवणे कोणत्या मर्यादे बाहेर आहे का? आणी केवळ अशी सुचना करणार्‍यावर कुणी डॉक्टर वैयक्तीक पातळीवर जाउन शाब्दीक हल्ले करत असेल, तर प्रत्यक्षात त्याच्या पेशंटवर त्याने केलेल्या उपचारा बाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तो कीती शांतपणे देत असेल? तसेही आपण लिहुन दिलेल्या औषधांची संपुर्ण माहीती, प्रत्येक औषधाचे सर्व साईड ईफेक्टस कीती डॉक्टर रुग्णांना समजाउन सांगतात? आणी संभाव्य साईड ईफेक्टच्या माहीती आभावी तसा अनुभव आल्यावर रुग्णाला डॉक्टर विषयी अविश्वास वाटला, व त्याने आयुर्वेद, ईंटरनेट ईत्यादीचा आधार शोधला तर तोच एकटा दोषी आहे का? आत्मपरीक्षणाचा सल्ला दीला म्हणजे दोषी ठरवले असे समजणार्‍या उच्चशीक्षीतांना काय म्हणावे? असा सल्ला देणार्‍यावर वैयक्तीक पातळी वर जाउन शाब्दीक हल्ले करणारी मनोवृत्ती ही वाईट अनुभव आल्यावर डॉक्टरना मारहाण करणार्‍या मनोवृत्ती पेक्षा वेगळी कशी? डीस्क्लेमरः *** हे प्रश्न कुणा एका डॉक्टर बाबत केलेले नाहीत. (गोपाळसरांनी उत्तर दीले नाही तरी चालेल) *** ** खुप चांगले, सेवाभावी, प्रोफेशनल, कुशल, रोग्यांविषयी कळकळ असणारे, प्रसंगी स्व-खर्चाने उपचार करणारे डॉक्टर भारतात आहेत (व त्यातले काही मिपा वर ही आहेत) याची पुर्ण कल्पना आहे. त्यांचा अपमान करायचा किंवा त्यांना कसलाही दोष द्यायचा उद्द्येश नाही. * समा़जात दुसर्‍यांना बेअक्कल समजणारे महाभाग असतातच. डॉक्टरला काय कळते, असे समजुन स्वतःच उपचार बदलणे हे कदापी समर्थनिय नाही. मी माझ्या कुठल्याही प्रतीसादात पात्रता नसताना स्व-उपचार करणार्‍यांचे समर्थन केलेले नाही.

असे जालीय आजाराने ग्रस्त लोक हल्ली खूपजण आजूबाजूला दिसतात. लेख आवडला तसेच इतर डॉक्टर मंडळींचे प्रतिसादही आवडले.

माझे आजे सासरे वय वर्ष ८४ . ठार बहिरे असून त्यांना जो आजार आहे तो आम्ही सांगितलेला नाहीये आणि फमिली वैद्य हि सांगत नाहीये त्यामुळे आम्ही त्यांचा आजाराबद्दल काय बोलतोय हे समजत त्यांना नाही , तर आजोबा काय करतात तर त्यांच्या औषधाच्या वरील माहिती वाचून इंग्लिश शब्द कोश मध्ये शोधतात आणि स्वतःच्या आजाराचे निदान करतात त्यामुळे आम्ही शब्द कोश लपवून ठेवले आहे.

लेख आवडला. माहिती आणि शहाणपण याचे उदाहरण अगदी चपखल ! पटले.

नेत्रेश साहेब आपले मूळ गृहीतच चुकीचे आहे म्हणून आपले येणारे निष्कर्ष चुकीचे येतील यात काही विशेष नाही. पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराने मानवी शरीर बनवले आहे ( आपला विश्वास असेल तर) आणि मोटार मानवाने बनविली आहे. त्यामुळे स्वताहून बरे होणे हि प्रक्रिया मानवी शरीरात असतेच तशी गोष्ट मोटारीत नाही. उदा. आपले डोके दुखत असेल तर ते काही काळाने स्वतःहून थांबते. पण आपल्या मोटारीच्या मागच्या मडगार्ड मधून आवाज येत असेल तर तो स्वतःहून क्वचितच थांबेल (मड गार्ड पडून गेले कि आवाज थांबेल). तेंव्हा फालतू कारणासाठी डॉक्टरकडे जाऊ नये असेच ( आणि बरोबर असे ) आपल्याला लहानपणीच शिकवले जाते. दुसरी गोष्ट आपल्याला होणारे लहान सहान आजारात आपण घरगुती औषधे घेऊन बरे होऊ शकतो हा अनुभव सर्वाना आहेच. तेंव्हा आपल्या शरीराच्या कामातील बिघाड कमी आहे कि जास्त आहे याची संवेदना आपल्या मेंदूला मिळतच असते. एक साधे उदाहरण मी आपल्याला देतो -- घराच्या रजिस्ट्रेशन साठी मी सरकारी कार्यालयात गेलो होतो वेळ सकाळी ११. यासाठी मी घरून १०.३० ला जेवून निघालो होतो. काम आटोपेपर्यंत संध्याकाळचे चार वाजले होते. आपण किती क्षुद्र आहोत हे समजण्यासाठी एक तर हिमालयात जावे किंवा सरकारी कार्यालयात. तेथून मी परत घरी आलो तो कावलेला होतो डोकं दुखत होतं. आईने विचारले काय झालं. मी सर्व सांगितलं तिने मला एक रव्याचा लाडू खायला दिला एक ग्लास भरून बोर्न्व्हिता टाकून गरम दुध दिलं आणि थोडासा डोकं चेपलं. आणि लगेच माझं डोकं दुखणं थांबलं. यावर आई म्हणाली अरे तुला भूक लागली होती. भूकेनेही डोकं दुखतं. हि साध गोष्ट मी डॉक्टर असूनही मी विसरलो होतो. ती हसत म्हणाली तू डॉक्टर असलास तरी मी डॉक्टरची आई आहे. तात्पर्य काय? आज आपल्याला काही होतंय हे सांगण्यासाठी आपल्या घरात अनुभवी अशी आपली माणसा नाहीत यामुळेहि बरेच लोक नेट चा आधार घेतात. पूर्वी लहान सहान गोष्टीन्साठी किंवा मानसिक तणावाने होणारे आजार घरच्या अनुभवी माणसांच्या आधार देणाऱ्या शब्दांमुळे आणि घरगुती औषधामुळे बरे होत असत. आता विभक्त कुटुंबात हि आधार देणारी प्रणाली नाहीशी झाल्यामुळे नेटचा आधार घ्यावासा वाटतो. पण हा आधार कुठपर्यंत घ्यावा याची मर्यादा समजता आली पाहिजे. यंत्रणेत बिघाड झाला आहे हे समजावे अशी कोणतीही गोष्ट बहुसंख्य मोटार गाड्या मध्ये नसते. त्यातून ९५ % लोकांना गाडीमधले काहीच कळत नाही त्यामुळे मेक्यानिकने कसा आणि कधी थुका लावला आहे हे आपल्याला समजत नाही.( आपण धागा काढून पहा २०० पार होतात कि नाही?) आणि जरी आपण मोटार गाडीचे इंजीनियर असलात तरी त्याला लागणारे स्पेअर पार्टस साठी आपल्याला मेक्यानिक कडे जावेच लागते. त्यामुळे गाडी बाबत माणूस मेक्यानिक कडे जातो पण स्वतः बाबत नेट वर जातो याच्या मागील मूळ कारण हे आहे कि मानवी निर्मिती बद्दल त्याला खात्री नाही पण परमेश्वरी निर्मिती बद्दल त्याला जास्त खात्री आहे. ( याच कारणासाठी तो गाडीचे सर्व्हिसिंग नियमित ३-६ महिन्यांनी करतो.परंतु स्वतःच्या शरीराचे सर्व्हिसिंग वर्षानुवर्षे ( पन्नाशी साठी पर्यंत) सुद्धा करत नाही. दुर्दैवाने असा मौलिक विचार न करता तुम्ही आत्म परीक्षण आणि मेकांनीकची विश्वासार्हता डॉक्टर पेक्षा जास्त आहे अशा वितंडवादात पडलात. आपण पिवळा चष्मा लावलात कि जगाला कावीळ झाली आहे असे आपल्याला दिसते. जर आपण नीट पाहिलेत तर आपल्याला लक्षात येईल कि मी कुठेही नेट वर जाऊ नका असे म्हणालेलो नाही. माझे म्हणणे एवढेच आहे कि नेट वर वाचून जसे आपण वकिली करू शकत नाही तसेच आपण डॉक्टर होऊ शकत नाही. जे असा प्रयत्न करतात त्यांचे स्वतःचे नुकसान होते. नेट वर केंव्हा जावे हे हि मी लिहिले आहे आपल्या साठी परत उद्धृत करतो. (अर्थात अजूनही असे काही फायदे असू शकतात जे मला आत्ता आठवत /जाणवलेले नसतील.) अंतर्जाला वरील माहिती हि नक्कीच उपयुक्त आहे परंतु त्या माहितीच्या आधारावर आपण रोगनिदान करायला जाऊ नये. पण आपल्याला रोग निदान नक्की झाल्यावर कोणता आजार आहे त्यावर कोणते पथ्य पाळावे काय आहार विहार उपयुक्त ठरेल इ माहितीचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. उदा.आपल्याला सोरीयासीस किंवा दमा हा आजार असेल तर तो आजार कोणत्या गोष्टीने वाढू शकतो किंवा कोणती पथ्ये पाळली असता तो कमी होऊ शकतो. आपण घेत असलेलीं औषधे त्यांचा प्रभाव आणि त्याचा साईड इफेक्ट या सर्व गोष्टींचे ज्ञान आपण मिळवू शकतो. आणि यांनतर येणाऱ्या शंकांचे निरसन आपण आपल्या डॉक्टरांकडून करून घेऊ शकतो.

In reply to by सुबोध खरे

बरेच डॉक्टर रुग्णांच्या चुकीच्या वागण्याविषई तक्रार करत आहेत. तक्रार रास्त आहे. पात्रता नसताना नेटवरचि अर्धवट माहीती वाचुन उपचार करणे, औषधांची मात्रा बदलणे, औषधे घेणे थांबवणे आणी हे सर्व डॉक्टरपासुन लपवणे हे चुकीचे आहे यात वादच नाही. पण आपला जीव जाणुनबुजुन धोक्यात टाकायला हे सर्व सुशिक्षीत लोक मुर्ख आहेत का? काही असतील पण सर्वच नक्कीच नसावेत. मग लोक स्वतःच्या जीवाशी असे खेळ का करतात? त्यांना डॉक्टरवर पुर्ण भरवसा वाटत नाही का? डॉक्टर संवाद साधण्यात कुठे कमी तर पडत नाहीत? रोगाची, त्यावरच्या उपचाराची, लिहुन दिलेल्या औषधांची व त्यांच्या साईड ईफेक्टसची संपुर्ण माहीती रोग्याला पुर्ण समजेपर्यंत दीली जाते का? डॉक्टर व रोगी हे एक टीम बनुन रोगाशी लढत आहेत, की डॉक्टरांचे वर्तन हे रींगमास्टर/ड्रीलमास्टर प्रमाणे आहे - "मी सांगीतलेली औषधे मी सांगीतलेल्या वेळेला एकही प्रश्न न करता गपचुप वेळच्या वेळी घे, बरा होशिल. बाहेर बरेच पेशंट आहेत तेव्हा आता काही शंकानिरसनाला वेळ नाही." या सारखी वाक्ये कायमच रुग्णांना ऐकावी लागत आहेत का? या सारख्या गोष्टींमुळे तर लोक असे वागत नसतील? एक डॉक्टर म्हणुन रुग्णाचा पुर्ण विश्वास संपादन करायला मी आणखी काय करु शकतो? या, व अशा अनेक गोष्टींचा डॉक्टर म्हणुन तुम्ही विचार करत असाल, पण सर्वच डॉक्टर्सनी तो केला तर मला वाटले आपण मांडलेली समस्या कमी व्हायला नक्कीच मदत होउ शकेल. तुम्हाला या अपेक्षा वावग्या किंवा अवास्तव वाटतात का? आत्मपरीक्षण म्हणजे याच गोष्टींचा विचार करावा असे सुचवले होते. यात काही कावीळ झाल्यासारखे विचार आहेत असे मला तरी वाटत नाही. अवांतर : "काविळ झालेल्याला जग पिवळे दीसते" ही म्हण माहीत होती. पण आपल्या प्रतीसादातले "आपण पिवळा चष्मा लावलात कि जगाला कावीळ झाली आहे असे आपल्याला दिसते." हे वाक्य मात्र समजले नाही.

१००% सहमत खरे साहेब ! याबाबतीत नरेंद्र मोदींचे वाक्य मला फार आवडते," इण्टरनेटसे जानकारी मिलती है पर ज्ञान नाही मिलता" डॉक्टरकाकांनी दिलेले औषध गुगलकाकांकडून तपासून घेण्याचे खूळ सध्या पसरले आहे. माझ्यासमोर घडलेला किस्सा सांगतो. एका ज्येष्ठ डॉक्टरकाकांनी कुठल्याशा समस्येवर एका तरुण रुग्णाला औषध दिले. त्यावर तरुण म्हणाला," या औषधा विषयी नेट वर खूप वाईट वाचलेले आहे. तरीसुद्धा तुम्ही मला का देताय ?" डॉक्टर काका म्हणाले ," माझा औषधाचा गुण आला नाही तर त्यावर उत्तर द्यायला मी बांधील आहे. तुझ्या नेट वरच्या माहितीसाठी मी बांधील नाही. पुढच्यावेळेस माझ्याकडे येऊ नको. नेट ला विचार !"

In reply to by चिनार

एका ज्येष्ठ डॉक्टरकाकांनी कुठल्याशा समस्येवर एका तरुण रुग्णाला औषध दिले. त्यावर तरुण म्हणाला," या औषधा विषयी नेट वर खूप वाईट वाचलेले आहे. तरीसुद्धा तुम्ही मला का देताय ?" डॉक्टर काका म्हणाले ," माझा औषधाचा गुण आला नाही तर त्यावर उत्तर द्यायला मी बांधील आहे. तुझ्या नेट वरच्या माहितीसाठी मी बांधील नाही. पुढच्यावेळेस माझ्याकडे येऊ नको. नेट ला विचार !"
हे कुठे तरी पटत नाही का ? म्हणजे असे की प्रश्नच विचारायचे नाहीत का ? आपल्या शाळांमध्ये बरेच मास्तर असेच उत्तर देऊन शंका मारुन टाकतात आणि ते नक्कीच बरोबर नाही असं वाटतंय. समोरचा अगदी मुद्दाम शंका काढायच्या (अथवा स्वतःचे अक्कल-प्रदर्शन करायचे) म्हणून विचारत असेल तर ते उत्तर देणार्‍याच्या लक्षात येतेच की. जाणकार अशा डॉक्टरांनी (किंवा इतर क्षेत्रात असेल तर त्यातल्या तज्ञांनी) उलट नीट उत्तरे द्यावीत असे वाटते. उदा. एक अनुभव सांगतो. एका डॉक्टरांनी एक क्रीम लावायला दिले त्यात स्टेरोईडस होते. आता साईड-इफेक्टसमध्ये त्याचे "दीर्घकालीन वापरानंतर परिणाम" वाचायला मिळाले. पुढच्या वेळेस त्या डॉक्टरांनी तीच क्रीम अजून ३ महिने वापरायला सांगितल्यावर त्याबद्दल प्रश्न विचारला. त्यांनी "good question" असं म्हणून अगदी व्यवस्थित समजावले. गरज पडल्यास कोणती लक्षणे पहायची तेही सांगितले. आता हे दोघांसाठीही योग्यच झाले ना ? माहीती हाताशी असणे योग्यच म्हणून कोणी नेट-डॉक्टर बनायला जाऊ नये हे ही तितकेच खरे. पण डॉक्टरांना पण आता अशा प्रश्नांना उत्तर द्यायला तयार रहावे लागणार तेव्हा अगदीच "पुढच्यावेळेस माझ्याकडे येऊ नको" असली उत्तरे तितकीशी योग्य वाटत नाहीत.

In reply to by हाडक्या

डॉक्टर हाहि एक माणूस आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे काही लोकांना परत प्रश्न विचारले कि राग येतो किंवा त्यांचा इगो दुखावतो. ( आपण आपल्या बॉस ला "उलट" प्रश्न विचारले तर किती वरिष्ठ त्याला सरळ उत्तर देतील). असेच प्रश्न वरिष्ठ डॉक्टरांच्या बाबतीत होताना आढळतात. जास्त प्रश्न विचारणाऱ्या माणसाला तुमची फी परत घेऊन जा आणि परत माझ्याकडे येऊ नका असे सांगणारे एक वरिष्ठ डॉक्टर मी पाहिलेले आहेत. स्वभावो दुरतीक्रमः . दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते पण तसे होत नाही आणि होणारही नाही.अगदी इंग्लंड अमेरिकेत ( जेथली वैद्यकीय सेवा आदर्श आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे) हि तुम्हाला असेच अनुभव येतील. कुठेही जा मानवी स्वभावाला औषध नाही हेच खरे. ते बरोबर आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही. तुम्ही आपले काम करायला सरकारी कार्यालयात जाऊन पहा यापेक्षा सुरस आणि चमत्कारपूर्ण अनुभव येतील.

In reply to by सुबोध खरे

आपण आपल्या बॉस ला "उलट" प्रश्न विचारले तर किती वरिष्ठ त्याला सरळ उत्तर देतील
हे उदाहरण येथे गैरलागू आहे हो डॉक. कारण डोक्टर-पेशंट नाते आणि वरिष्ठ(बॉस)-कनिष्ठ नाते अगदीच वेगळे (अ‍ॅप्पल न ऑरेन्ज हो). लोक त्यांच्या तब्येतीच्या काळजीने तुमच्यासमोर येतात तेव्हा जर कोणी वरिष्ठ आहे म्हणून उद्धट वागणार असेल तर ते स्वभाव म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. चौकशी कक्ष असो वा कॉल-सेन्टर अथवा ज्यांचा पेशंटशी प्राथमिक संपर्क येतो ते डॉक्टर (सर्जन, रेडिओलोजी अथवा स्पेशालिस्टना हे कदाचित लागू होणार नाही.) त्यांनी ते तुमच्या व्यवसायाचा भाग म्हणून समजून घ्यायलाच हवे.
दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते पण तसे होत नाही आणि होणारही नाही.अगदी इंग्लंड अमेरिकेत ( जेथली वैद्यकीय सेवा आदर्श आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे) हि तुम्हाला असेच अनुभव येतील.
नम्र तर सगळ्यांनी सगळ्यांशीच असावे असे मत आहे, मग तरिसेप्शनिस्ट, पेशंट वा रिसेप्शनिस्ट अथवा ट्रेनमधला दुसरा प्रवासी. बादवे वरचा अनुभव इंग्लंडमधला आहे आणि सहनशीलतेच्या, नम्रतेच्या (आणि नीट उत्तर देण्याच्या) बाबतीत जरी पैकीच्या पैकी गुण देता येणार असतील तरी इतर बाबतीत फार आदर्श वगैरे मला तरी वाटत नाही.
तुम्ही आपले काम करायला सरकारी कार्यालयात जाऊन पहा यापेक्षा सुरस आणि चमत्कारपूर्ण अनुभव येतील.
हे तर आहेच पण कोणी चूक वागले म्हणून तो बेंचमार्क म्हणून वापरता कामा नये. तुमचेच एक वाक्य वापरतोय इथे "दुसर्‍याची रेघ लहान करुन आपली रेघ मोठी दाखवता येत नाही." सरकारी कार्यालये जर आदर्श नसावा (अनुभव आहेच). पण इतरांनी (सर्वच खाजगी सेवा) पण तेच करायचे ठरवले तर मात्र खूपच अवघड आहे. :)

In reply to by हाडक्या

आपण चुकीचा अर्थ लावलात. मी बॉसं चे उदाहरण इगो साठी दिले आहे. कुठेही समर्थनासाठी नाही. यात डॉक्टरांच्या वर्तनाचे समर्थन नसून विश्लेषण आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा अहंगंड ( इगो) किती मोठा असतो यासाठी हे उदाहरण दिले आहे. आमचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही आणि आम्हाला कुणाची गरज नाही आणि लोकांचे आमच्या वाचून अडते या वृत्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर यासाठी ते उदाहरण दिले

In reply to by सुबोध खरे

या साठीच डॉक्टर्सना आत्मपरीक्षणाचा सल्ला दीला होता :) (कृपया हलकेच घ्या)

In reply to by नेत्रेश

१. सल्ला विचारायला कुणी आले होते का? २. आपली सल्ले देण्याची लायकी आहे का? :पुन्हा एकदा शेवटचा प्रतिसाद देऊन नाचणारा भावला:

In reply to by आनंदी गोपाळ

सल्ला तुमच्या घरी येउन दीलेला नाही, तुमच्या लेखावरही दीलेला नाही, तेव्हा व्यक्तीशःह घ्यायचे कारण नाही. आंतरजालावरचे लेखन, पटले तर घ्यायचे, नाहीतर पुढे व्हायचे. प्रतीसाद देताना माझ्याकडुन कधीही खालच्या लेवलचे, वक्तीगत पातळीचे प्रतीसाद गेलेले नाहीत. आपण मात्र प्रत्येक प्रतीसादागणीक एक एक पायरी खाली जाउन, व्यक्तीगत पातळीवर चिखलफेक करणारे प्रतिसाद लिहुन आपली लायकी जगाला दाखवत आहात.

In reply to by नेत्रेश

टोकाचा अहंकारी दर्प आणि उन्मत्त वक्तव्य हि कित्येक वेळा मनाच्या असुरक्षित अवस्थेतून आलेली स्थिती असते .. सुभाषितकरांनी "विद्या विनयेन शोभते" हे उगीच म्हटलेले नाही ... मी किती ज्ञानी ...माझी कशी बुद्धीमत्ता ...मी कसा खोऱ्याने पैसा कमावला .. माझ्या कडे ग्राहक कसे अगतिकपणे आलेले असतात ..मी कशी त्यांची निकड भागवतो .. मी इतरांना तुच्छ लेखतो पण कुणी माझे काही करू शकत नाही ... काय अन काय ... पुलंनी म्हटलंय (त्यात थोडा बदल करून) कि अपयशा पेक्षा यशानेच माणसे जास्त सैरभैर होतात ... असो ...गेट वेल सून म्हणायचे आणि पुढे जायचे ....

In reply to by अत्रन्गि पाउस

विनय मीच ठेवायचा, असा काही नियम आहे का? म्युच्वल रिस्पेक्ट नको का?

In reply to by आनंदी गोपाळ

respect is to be commanded ...not demanded ... उठ सुठ इतरांची लायकी काढणे ...स्वत:च्या अक्कल हुशारीची स्वत:च तारीफ करणे ... आपण जणूकाही जगात एकच डॉक्टर आहोत आणि काहीतरी अचाट gift to mankind आहोत ह्या अविर्भावात सतत दर्पयुक्त वक्तव्ये करणे ... माफ करा पण इतक्या गुर्मीत विचार करणारे पहिलेच डॉक्टर बघितले / वाचले ... ...रिस्पेक्ट म्हणे

In reply to by सुबोध खरे

डॉक प्रत्येक गोष्टीचे समर्थन केलेच पाहिजे असे काही नाही. सदर उदाहरणात डॉक्टर नक्कीच चुकीचा वागलेला आहे. अवास्तव शंका विचारल्या तर त्यातही समजु शकतो पण पेशंटला त्या विषयातली माहिती नाही म्हणुनच तो डॉक्टरकडे येतो तेव्हा त्याच्या योग्य त्या शंकांचे योग्य ते निरसन करणे हे कुठल्याही डॉक्टरचे कर्तव्य आहे. मानवी स्वभाव म्हणून तुम्ही आम्ही इतर व्यावसायिकांचे वर्तन दुर्लक्षित नाही. पुणेरी दुकानदाराचा नमूनेदारपणा आपल्याला खटकतो, विकत घ्यायचे नव्हते तर आलात कशाला असे म्हणणारा कापड दुकानदार खटकतो, तासभर ताटकळत ठेवुन पदार्थ संपले म्हणुन सांगणार हॉटेलवाला खटकतो तर मग असली दुरुत्तरे करणारा डॉक्टरही खटकणारच. लोक पदरचे पैसे खर्च करुन डॉक्टरकडे येतात तर योग्य त्या सेवेची अपेक्षा करणारच. पैसे घेताना कोणी कमी घेत नाही. ते वाजवुनच घेतात ना सगळे डॉक्टर्स. मी व्यवसायाने कंपनी सेक्रेटरी आहे. माझ्याकडे एखादा क्लायंट आला आणि मी त्याला एखादा सल्ला दिला की त्याने झापडे लावुन तो ऐकावा आणी काही प्रश्न विचारुच नयेत (खासकरुन आंजावर कुठेतरी वाचुन) अशी अपेक्षा मी ठेवु शकत नाही. ठेवणे योग्यही नाही. मग डॉक्टरांनाच केवळ वेगळा न्याय का म्हणे? तुम्ही "कुठेही जा मानवी स्वभावाला औषध नाही हेच खरे. ते बरोबर आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही." असे म्हणता आणि लगेच सरकारी बाबुंचा उर्मटपणा दाखवुन देता. हेच इतर व्यावसायिकांनी उर्मटपणा केला तर कराल का? या न्यायाने सगळ्याच व्यावसायिकांचा उर्मटपणा आपण चालवुन घ्यावा काय? दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते दुर्दैवाने? ?????? ही कुठल्याही पेशंटची अथवा त्यांच्या नातेवाईकांची बेसिक अपेक्षा असु नये? लोक मोल देउन डॉक्टरांच्या सेवा खरेदी करतात तेव्हा त्यांना सेवा मिळत असताना देणार्‍याने ती नम्रपणे देउ नये? डॉक्टरने खाजगी जीवनात कितीही उर्मटपणा करावा पण ग्राहकांशी त्याने नीट संवाद साधला पाहिजे जशी इतर व्यावसायिकांकडुन अपेक्षा असते. माणूस सोने किंवा कापड खरेदी करायला जातो तेव्हा तो आनंदात असतो. माणूस डॉक्टरकडे जातो तेव्हा आधीच तो व्याधींनी किंवा दुखण्यांनी गांजलेला असतो. त्याची मनःस्थिती आधीच वाईट असते. अश्यावेळेस डॉक्टरने नक्कीच त्याच्याशी जास्त मार्दवतेने आणि सहिष्णुपण वागले पाहिजे. तशी अपेक्षा करण्यात काहीच गैर नाही. ग्राहकांनी अशी अपेक्षा करणे हे दुर्दैवी आहे हे तुमचे मतच मुळात अतिशय दुर्दैवी आहे. डॉक्टरने त्याच्या सेवेचा चोख मोबदला वसूल करण्यात काहीच गैर नाही तसेच गिर्‍हाइकाला देखील चोख, तत्पर आणि नम्र सेवा मिळालीच पाहिजे. त्यातही काहिच गैर नाही. आणि दुर्दैवी तर नाहिच नाही.

In reply to by मृत्युन्जय

यात डॉक्टरांच्या वर्तनाचे समर्थन नसून विश्लेषण आहे या वाक्याच्या खालीच आपण "डॉक प्रत्येक गोष्टीचे समर्थन केलेच पाहिजे असे काही नाही" असे लिहिले आहे. एक तर आपण मी काय लिहिले आहे ते नीट वाचलेले नाही किंवा हा स्कोर सेटलिंगचा प्रकार असावा असे वाटते. दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते. पण तसे होत नाही आणि होणारही नाही. त्या चार शब्दांऐवजी( मृदू , सहनशील, सेवाभावी आणि नम्र) डॉक्टर "आदर्श" असावा अशी समाजाची अपेक्षा असते असे लिहायला हवे होते का ? तसे लिहितो. पण त्याचा अर्थ असा आहे कि समाजाची डॉक्टर बद्दल अवास्तव अपेक्षा आहे आणि अशी अपेक्षा ठेवल्यास दुर्दैवाने अपेक्षाभंग होणार कारण डॉक्टर आदर्श हा पुस्तकात असतो आणि व्यवहारात तो माणूस असतो होणारही नाही. या ऐवजी त्या दुर्दैवी शब्दाचा कीस पाडत त्यांनी डॉक्टराना उच्च विचारसरणीचा सल्ला दिला. डॉक्टरने त्याच्या सेवेचा चोख मोबदला वसूल करण्यात काहीच गैर नाही. यात सेवाभावी कसे हो येणार? तसेच गिर्‍हाइकाला देखील चोख, तत्पर आणि नम्र सेवा मिळालीच पाहिजे. पण त्या साठी तितका मोबदला देण्याची समाजाची तयारी आहे का? असो. यात डॉक्टर बद्दल आलेल्या वाईट अनुभवामुळे दिसत असलेला वैयक्तिक आकस दिसतो आहे. मुळ धागा कशावर आहे आणि लोक आपले वैयक्तिक स्कोर सेटल करायला पाहत आहेत. नेत्रेश साहेब तर प्रत्येक प्रतिसादाच्या शेवटी कसेही कुठूनही शब्द्च्छल करुन डॉक्टरानि आत्म परीक्षण करावे हेच पालुपद घेऊन बसलेले दिसतात. हे म्हणजे एखाद्या वकिलाने कायद्याच्या ज्ञानाबद्दल एखादा धागा काढावा आणि त्याला लोकांनी वकील कसे हरामखोर आहेत आणि त्यांनी कसे सुधारणे गरजेचे आहे हा सल्ला देण्यासारखे आहे. ठीक आहे याचा साधा सरळ अर्थ आहे कि तुम्ही आम्हाला काही शिकवायची गरज नाही आम्ही सर्वज्ञ आहोत.असाच असेल तर मग यापुढे वैद्यकीय माहितीवर धागा काढणे मी बंद करतो. आणि हे मी भावनेच्या आहारी जाऊन लिहिलेले नाही. धन्यवाद

In reply to by सुबोध खरे

यापुढे वैद्यकीय माहितीवर धागा काढणे मी बंद करतो.
डॉक्टर , तुम्ही मिपावरचे जुने जाणते .. तुम्हीबी असा म्हणला तर कसा व्हायचा

In reply to by सुबोध खरे

ह्या चर्चेचा निष्कर्ष काय निघेल ते माहित नाही पण ह्या धाग्यावर डॉक्टरांनाच टारगेट करुन अवांतर केलं जात आहे हे मलाही खेदजनक वाटलं. शिवाय ही सगळी चर्चा आत्ताच काही दिवसांपुर्वी फारच डीटेल मध्ये झाली आहे. तो धागा वापरा हवं तर..

In reply to by सुबोध खरे

:( डॉ. साहेब, ज्या संयमाने आपण इथे उत्तरे देत आहात - गेले कित्येक दिवस- त्यातून खूप काही शिकायला मिळाले आहे. पण हे कधी तरी थांबणार्/थांबावं असं मला वाटत होतं हे खरं. कारण अत्यंत चीड येइल अशा पद्धतीने प्रतिसाद येत होते... विनंती आहे की लिहित रहा. इथे अनेक वाचक आहेत जे आपल्या लेखांची वाट बघतात. हे उलट प्रतिसाद देणारे त्यांच्यासमोर नगण्य संख्येने आहेत.

In reply to by असंका

सहमत...

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर साहेब, कदाचित अशा लेखनाला योग्य ती पोचपावती देण्यास आम्ही कमी पडत आहोत. परंतु कृपया वैद्यकीय माहितीवर धागा काढणे थांबवू नका. मी २०१२ मध्ये मिपावर सक्रीय झालो. तेव्हापेक्षा २०१५ मधले मिपाचे वातावरण खूपच सकारात्मक वाटते. एकतर असा गुणात्मक बदल प्रत्यक्षातच घडला असेल. किंवा संवेदनशील मनाला त्रास देणार्‍या (ट्रोलछाप) विचारांकडे दुर्लक्ष करायला मी शिकलो असेन. काही लोकांना बाहेरच्या जगात जे काही खटकते त्याचे स्पष्टीकरण मिपावरच्या त्या क्षेत्रातील प्रतिनिधींकडून हवे असते. हे पूर्णपणे अव्यावहारिक आहे. आशा करूया की त्या लोकांना आज ना उद्या अशा आचरणाच्या नकारात्मक परिणामांची जाणिव होईल. बाकी सार्वजनिक आयुष्यात फार संवेदनशील राहून चालत नाही हे तर त्रिकालबाधित सत्य आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

डॉक्टर साहेब, कदाचित अशा लेखनाला योग्य ती पोचपावती देण्यास आम्ही कमी पडत आहोत. परंतु कृपया वैद्यकीय माहितीवर धागा काढणे थांबवू नका.
असेच म्हणतो. जालावर काय किंवा छापील लेखनात काय, जितक्या वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांचं अनुभवविश्व येईल; तितकंच ते संकेतस्थळ/पुस्तकव्यवहार अधिक समृद्ध, अधिक वाचनीय होत राहील.

In reply to by सुबोध खरे

एक तर आपण मी काय लिहिले आहे ते नीट वाचलेले नाही किंवा हा स्कोर सेटलिंगचा प्रकार असावा असे वाटते. गंमतच आहे. आजकाल प्रत्येक गोष्टीला स्कोर सेटलिंग म्हणायची फ्याशन आली आहे, तुमचे सगळे धागे काढुन बघा. त्यात आवडला म्हणुन तरी प्रतिसाद असेल किंवा द्यायचा राहुन गेला असेल. ते कुठल्या प्रकारचे स्कोर सेटलिंग होते कुणास ठाउक. कुठल्याही प्रतिसादाला प्रतिवाद केला की तो स्कोर सेटलिंगचा प्रकार होतो? डॉक्टरांच्या इतक्या ढीगभर धाग्यांवर मी कधी फार निगेटिव्ह प्रतिसाद दिलेला आठवत नाही. याआधी तुमच्याशी कधी माझा वाद झाल्याचे आठवत नाही. तरी हा स्कोर सेटलिंगचा प्रकार होतो? मी काय लिहिले आहे ते आपण नीट वाचले आहे की नाही हा मलाच पडलेला प्रश्न आहे आता. दुर्दैवाने डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते. पण तसे होत नाही आणि होणारही नाही. त्या चार शब्दांऐवजी( मृदू , सहनशील, सेवाभावी आणि नम्र) डॉक्टर "आदर्श" असावा अशी समाजाची अपेक्षा असते असे लिहायला हवे होते का ? नाही. मी तुमच्या अपेक्षा पुर्ण करतो आहे खरे सांगायचे तर. डॉक्टर हा सुद्धा इतर सर्वांप्रमाणे एक व्यावसायिक आहे आणि त्यामुळेच त्याने इतर व्यावसायिकांसारखे सौजन्यशील असायला हवे हे सांगण्यासाठीच मी ४-५ पॅरा खर्ची घातले आहेत. इतर व्यावसायिकांप्रमाणे त्यांनाही त्यांचे पैसे चोख वाजवुन घेण्याचा अधिकार आहे असेही लिहिले आहे. मी आधी लिहिलेले परत लिहितो " जर डॉक्टर इतर व्यावसायिकांप्रमाणे असेल तर इतर व्यावसायिकांप्रमाणे त्याने सौजन्यपुर्ण सेवा द्यावी". (आणी तो तसाच असावा असे मला वाटते). इतर दुकानदार जर तर्‍हेवाईकपणे वागत असतील तर आपण त्यांच्यावर टीका करतो पण डॉक्टरांच्या चुकीच्या वागण्यावर टीका म्हणजे अब्राह्मण्यम असे का म्हणे? डॉक्टर चुकीचा वागला की "तो पण माणूसच आहे, सरकारी कार्यालयात अजुन सुरस अनुभव येतील, इंग्लंड अमेरिकेत वगैरे सुद्धा असेच अनुभव येतील, मानवी स्वभावाला औषध नाही" वगैरे गोष्टी का लिहाव्याशा वाटतात? तिथे त्याच्या चुकीच्या वागण्यावर टीका का होत नाही? वर "डॉक्टरने कसे मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र असावे अशी समाजाची अपेक्षा असते पण तसे होत नाही आणि होणारही नाही" असेही आपण लिहिता. मी जर पैसे देत असेन तर सेवाकर्त्याने सौजन्यपुर्ण सेवा देणे हा माझा एक ग्राहक म्हणुन अधिकार आहे. मग डॉक्टरने "मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र" असण्यात गैर ते काय? परंतु उलट तुम्हीच अतिशय ठामपणे असे होणारच नाही असे लिहिता. मग ग्राहकाकडुन तरी योग्य वर्तणुकीची अपेक्षा कशी काय धरता? म्हणजे डॉक्टरने मुजोरी करावी, उर्मटपणे वागावे, पैसा वाजवुन घ्यावा (तो त्याचा हक्कच आहे), ग्राहकांच्या प्रश्नांची नीट उत्तरे देउ नयेत पण तरीही ग्राहकाने मात्र न कुरकुरता, न कटकट करता, डॉक्टर जे म्हणेल त्याला होयबा म्हणुन मान डोलावुन, एकही अधिक उणा प्रश्न न विचारुन निमुटपणे पैसे द्यावेत आणि मिळालेल्या सेवेत काहिही कमतरता असेल तरीही कुठेही तक्रार करु नये असेच ना? तसे लिहितो. पण त्याचा अर्थ असा आहे कि समाजाची डॉक्टर बद्दल अवास्तव अपेक्षा आहे आणि अशी अपेक्षा ठेवल्यास दुर्दैवाने अपेक्षाभंग होणार कारण डॉक्टर आदर्श हा पुस्तकात असतो आणि व्यवहारात तो माणूस असतो होणारही नाही. अवास्तव अपेक्षा नाहित पण योग्य ती सेवा द्यावी, सौजन्यपुर्ण वागावे आणि शंकांचे निरसन करावे, ग्राहक आधीच व्याधीग्रस्त आणि पीडाग्रस्त आहे, काळजीत आहे हे समजुन घेउन थोडे मार्दवाने थोडे सहिष्णु वृत्तीने वागावे अशी माफक अपेक्षा आहे. चूक आहे काय? या ऐवजी त्या दुर्दैवी शब्दाचा कीस पाडत त्यांनी डॉक्टराना उच्च विचारसरणीचा सल्ला दिला. डॉक्टरने त्याच्या सेवेचा चोख मोबदला वसूल करण्यात काहीच गैर नाही. यात सेवाभावी कसे हो येणार? उच्च विचारसरणी असण्यात काही चूकही नाही. उच्च विचारसरणी म्हणजे पदरचे पैसे खर्च करुन समाजोद्धार करावा असे नाही. सेवाभाव म्हणजे मनापासून सेवा करण्याची वृत्ती. त्याबदल्यात मोबदल्याची अपेक्षा धरु नये असे काही नाही. डॉक्टरांनी चोख मोबदला घ्यावा पण योग्य ती सेवा द्यावी हे मी आधीपण लिहिले आहे. तसेच गिर्‍हाइकाला देखील चोख, तत्पर आणि नम्र सेवा मिळालीच पाहिजे. पण त्या साठी तितका मोबदला देण्याची समाजाची तयारी आहे का? गिर्‍हाइकाला काही चॉइस आहे? असो. यात डॉक्टर बद्दल आलेल्या वाईट अनुभवामुळे दिसत असलेला वैयक्तिक आकस दिसतो आहे. मला डॉक्टरांचे एक दोन अनुभव वाईट आहेत. पण त्यात काही फार राग नाही. एक डॉक्टर ज्यांचा एक अनुभव वाईट आला त्यांच्याबद्दल इतर कारणांनी आदरच आहे. या डॉक्टरांनी शेवटपर्यंत आपली चूक मान्य केली नाही. इतर ४-५ डॉक्टरांनी अगदी ठामपणे चूक कुठे आणि कोणाकडुन (म्हणजे पहिल्या डॉक्टरकडुन) झाली आहे हे ठामपणे सांगितले. हा अनुभव येउनही परत आम्ही त्याच डॉक्टरकडे जातो. ती गोष्ट वन ऑफ चूक म्हणुन दुर्लक्ष केली (त्याचा त्रास अजुनही होतो ही गोष्ट वेगळी). त्यामुळे यात डॉक्टरी पेशाबद्दल वैयक्तिक आकस कुठेही नाही. तुमच्याबद्दल असण्याचा तर प्रश्नच नाही. तरीही तुम्ही असे लिहिले हे बघुन खेद झाला. मुळ धागा कशावर आहे आणि लोक आपले वैयक्तिक स्कोर सेटल करायला पाहत आहेत. कुठला वैयक्तिक स्कोर सेटल करतो आहे मी ते सांगाच आता. माझा प्रतिसाद केवळ श्री चिनार यांचा अनुभवाच्या अनुषंगाने होता. मी त्यांचा किंवा ते माझा डु आयडी नाही. नेत्रेश या आयडीशीही माझा काही संबंध नाही, मग हे स्कोर सेटलिंग नक्की कसे? नेत्रेश साहेब तर प्रत्येक प्रतिसादाच्या शेवटी कसेही कुठूनही शब्द्च्छल करुन डॉक्टरानि आत्म परीक्षण करावे हेच पालुपद घेऊन बसलेले दिसतात. मी अजुनतरी असे काही म्हटलेले नाही. हे म्हणजे एखाद्या वकिलाने कायद्याच्या ज्ञानाबद्दल एखादा धागा काढावा आणि त्याला लोकांनी वकील कसे हरामखोर आहेत आणि त्यांनी कसे सुधारणे गरजेचे आहे हा सल्ला देण्यासारखे आहे. मान्य ठीक आहे याचा साधा सरळ अर्थ आहे कि तुम्ही आम्हाला काही शिकवायची गरज नाही आम्ही सर्वज्ञ आहोत.असाच असेल तर मग यापुढे वैद्यकीय माहितीवर धागा काढणे मी बंद करतो. मी यावर प्रतिक्रिया देत नाही. तुमच्याशी भांडण करण्याची माझी कुठलीही इच्छा नसल्याने याला पास देतो. माझ्यावर झालेल्या स्कोर सेटलिंगच्या आणी वैयक्तिक आकसाच्या निरर्थक आरोपांमुळे व्यथित झालो आहे असे मात्र खेदपुर्वक नमूद करु इच्छितो.

In reply to by मृत्युन्जय

डॉकना या धाग्यावर कुणी असं रोखठोक आणि मुद्देसुद विचारणं अपेक्षित नसेल त्यामुळे डॉक भांबावून गेले असतील आणि त्यांना तुझे प्रतिसाद स्कोअर सेटलिंगचा प्रकार वाटला असेल.

In reply to by सुबोध खरे

> "यात डॉक्टर बद्दल आलेल्या वाईट अनुभवामुळे दिसत असलेला वैयक्तिक आकस दिसतो आहे. मुळ धागा कशावर आहे आणि लोक आपले वैयक्तिक स्कोर सेटल करायला पाहत आहेत. नेत्रेश साहेब तर प्रत्येक प्रतिसादाच्या शेवटी कसेही कुठूनही शब्द्च्छल करुन डॉक्टरानि आत्म परीक्षण करावे हेच पालुपद घेऊन बसलेले दिसतात" म्हणजे डॉक्टर्सनां लोकांचे आलेले वाईट अनुभव लिहुन त्यांना उपदेश करायची परवानगी आहे. पण लोकांनी डॉक्टरकडुन काही अपेक्षाच ठेवायची नाही, आणी काही चांगले सुचवायचेच नाही? जसे तुम्ही केलेली टीका प्रत्येकाला लागु होत नाही तशी डॉक्टरचा वाईट अनुभव आलेल्यांनी डॉक्टर्सवर केलेली टीका प्रत्येक डॉक्टरने पर्सनली घ्ययची गरज नाही. डॉक्टरकडुन असलेल्या अपेक्षा मोकळेपणी मांडल्या तर त्याला वैयक्तीक आकस / स्कोअर सेटलींग म्हणायचे? वर काही डॉक्टर्सचे प्रतीसाद तर यापेक्षा जास्त वैयक्तीक आणी खालच्या दर्जाचे आहेत. (डॉ. खरे यांच्या प्रतीसादापद्दल बोलत नाही, गैरसमज नको) बाकी डॉ. खरे व त्यांच्यासारख्याच अनेक विद्वान आणी प्रोफेशनल डॉक्टर्सविषयी मी काही लिहीलेले नाही. पण अनेक अन-प्रोफेशनल आणी वाईट डॉक्टर्स अस्तीत्वात आहेत आणी लोकांचा डॉक्टरवरील विश्वास कमी व्हयला त्यांचे वर्तन (कट-प्रक्टीस,लुबाडणुक, ईत्यादी) कारणीभुत आहे ईतके तरी त्यांना मान्य होण्यास हरकत नसावी. तसेच आत्मपरीक्षण करणारा हा दोषीच असतो असे नाही. माझ्या माहीतीप्रमाणे या शब्दाचा मराठी अर्थ self-assessment / self-evaluation आहे. असो. माझ्या कोणत्याही प्रतीसादात कुणाही डॉक्टरवर वैयक्तीक टीका केलेली नाही. डॉ. खरे यांनी माझा कुठलाही प्रतीसाद पर्सनली घेउ नये.

In reply to by सुबोध खरे

आपल्या लिखाणाबद्दल सर्वच मिपा करांना नितांत आदर आणि आस्था आहे ... आपली संयत भाषा ... अनुभव, समजावून देण्याची हातोटी ह्या सगळ्यांची आम्हाला जाणीव आहे ... आणि हे आपण सतत मनात ठेवा हि आपल्याला नम्र विनंती "हंसोहंस: ..बकोबक:" हे आम्हीही जाणतो ..

एक नंबरी ले़ख जाल् (हिंदी) =====जाळ(अग्नी)(मराठी) किंवा जाल् (हिंदी)=== जाळे मराठी) अता यात अडकायचे का पोळायचे हे ज्याचे त्यानी ठरवायचे दिवस आले आहेत. वैयक्तीक आयुष्यात अगदी अत्यंत कटू प्रसंग येऊनही सगळ्याच डॉक्टरना आरोपी न समजणारा अनुभवी नाखु

आजाराबद्दल आंजावर माहिती शोधणे हे चांगलेच आहे. बाबांना कॅन्सर झाला होता तेव्हा बाकी रूग्णांचे , त्यांच्या नातेवाईकांचे अनुभव फार उपयोगी पडले ( औषधोपचार नाही पण इतर परीस्थिती हाताळताना) . पण आंजावर वाचून पुर्वग्रह करणे आणि औषधोपचार स्वत:च घेणे हे शुद्ध मुर्खपणाचे लक्षण आहे. जर नेत्रेश म्हणतात त्याप्रमाणे डॉक्टर खात्रीशीर नसेल तर डॉक्टर बदलावा पण कधीही स्वतः औषध घेउ नयेत. नेट वर बर्‍याचदा अर्धवट माहिती असते. साईड इफेक्ट नसतात. माझा अनुभव असा आहे , पुणे - मुंबईचे बहुसंख्य डॉक्टर खूप काम असल्याने रूग्णाशी कमी बोलतात , नक्की काय झाले आहे , कशाने झाले आहे, पथ्ये काय हे सांगत नाहीत. "गोळ्या दिल्या आहेत, बरे नाही वाटले तर या पुन्हा " अशी वृती आहे . त्यामुळे रूग्ण आंजावर माहिती घ्यायचा प्रयत्न करतात.

In reply to by कपिलमुनी

पुणे - मुंबईचे बहुसंख्य डॉक्टर खूप काम असल्याने रूग्णाशी कमी बोलतात , नक्की काय झाले आहे ,.....
बेंगलोरमध्येही हीच रडकथा आहे. अपॉईंटमेंट घेऊन गेलो तरीसुध्द्या कमीत कमी अर्धा तास ते जास्तीत जास्त कितीही वेळ स्वतःचा नंबर येऊ पर्यंत बसावे लागते. आणि सध्या फी सुध्दा जास्त झाल्या आहेत त्यामुळे बर्याच वेळेला रूग्णाला आपण आतापावेतो वाया घातलेल्या वेळेचा व दिल्या जाणार्या पैशांचा परतावा थोडी जास्त माहीती मिळवुन घ्यावा असे वाटते. उदा. ३५० रू. तपासणी फि आहे व मला माझा नंबर येण्यासाठी ४५ मिनिटे बसावे लागले. आणि डॉक्टरने फक्त तपासुन काहीही बातचीत न करता मोजुन ५ मिनिटात बाहेर काढले तर मनात त्याने पुरेसा वेळ न देता डायग्नोसिस केले ही शंका घर करुन बसते. अर्थात पुरेसा वेळ देणारे डॉक्टर ही अनुभवले आहेत व त्यावेळेला फि कडे न पाहता त्याच डॉक्टरकडे नंतरही गेलेलो आहे.

In reply to by कानडाऊ योगेशु

हि गोष्ट दुर्दैवाने खरी आहे कि बरेच डॉक्टर रुग्णांना पुरेसा वेळ देत नाहीत. फी जर कमी ठेवली तर तेवढेच पैसे मिळवायला तुम्हाला जास्त रुग्ण पाहायला लागतात. या ऐवजी आपण फी वाढवा आणि जेवढे येतील त्यांना पूर्ण न्याय द्या असे माझे म्हणणे आहे. परंतु बाजार प्रभावीत व्यवस्थेत तसे करण्याचे धैर्य बर्याचशा डॉक्टरना नाही हि वस्तुस्थिती आहे. माझी फी वरच्या पट्टीतील आहे असे मला काही रुग्णांनी सांगितले आहे त्यावर माझे म्हणणे एवढेच कि चार रुग्ण पाहतो आणि त्यांना पूर्ण न्याय देतो. उगाच एक ना धड भाराभर चिंध्या हे मला जमत नाही. तुम्हाला परवडेल आणि पटेल तेथे तुम्ही जावे.ज्यांना हे पटते ते माझ्याकडे येतात.

In reply to by सुबोध खरे

असे फार थोडे डॉक्टर असतात. बहुसंख्य डॉक्टर हे कायम भारग्रस्त आणी त्यामुळे तणावग्रस्त असतात. त्यामुळे रुग्णांचा शंकांवर चिडणे, पाट्या टाकल्या सारखे ५ मिनीटांत १ रुग्ण निपटवणे, दीवसात १०० च्या वर रुग्ण तपासणे इत्यादी प्रकार सर्रास होतात. मग ५ मिनीटात बाहेर आलेला (घालवलेला) रुग्ण नेटवर जाउन आपले शंका निरसन करायला बघतो आणी बाकी ईतर माहीती (साईड ईफेक्टस वगैरे) वाचुन घाबरतो. परत शंका निरसन करायला डॉक्टर भेटत नाही तेव्हा वैद्याच्या सल्याने किंवा स्वतःच्या मनाने औषधे किंवा डोस बदलतो. ईथे रुग्ण चुकीचे वागतो नि:संशय. पण ही परीस्थीती डॉक्टर बदलु शकतात.

गप्प बसायचे ठरवले आहे. ;)

जालावरू न निदान करू पाहणे चुकीचेच ! तथापि योग्य मार्गाने स्वत:च्या शरीराबद्दल आणि आजाराबद्दल माहिती घेणे अगदी स्वाभाविक आणि आवश्यक आहे. पुष्कळदा डॉक्टर्स याबाबत रुग्णांना पुरेसे विश्वासात घेत नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे अशा अप्रत्यक्ष मार्गाने जाण्याची वेळ येत असावी. वरील उदाहरणातच त्या तरुणीस पूर्वीच्या डॉक्टरने असे सूचित केलेलं दिसते.
मग मी विचारले कि तुम्हाला endometriosis आहे हे कोणी सांगितले. त्यावर ती म्हणाली कि अगोदरचे स्त्रीरोग तज्ञ पाळीचा इतका त्रास होतो तर असे काहीतरी असण्याची शक्यता आहे असे म्हणाल्याचे आठवते
यावरून डॉक्टरनीही पुरेशा जबाबदारीने पेशंटला निदानाबद्दल सांगितले नाही असे वाटते. स्वत: स्वत:च्या आरोग्याचा मागोवा घेणे, परिक्षण करणे यात चुकीचे काही नाही. स्वत:च्या शरीर व प्रकृतीमान याबद्दल वाजवी माहिती असायलाच हवी. अर्थात त्याचा फोबिया होऊ नये.

खरे काका आणि गोपाळ काका (गम्मत हो..) ह्यांचे प्रतिसाद आवडले. आपल्याला नक्की काय झालंय हे नेट वर शोधुन पहावेसे वाटणे अगदी स्वाभाविक आहे.. पण ते चुक आहेच.. १. अनेकदा नेट वरती लिहीलेले बरोबर असेलच असे नाही. चुकीची माहिती सुद्धा मिळु शकते. २. नेट वर संपुर्ण सत्य कळत नाही. एखाद्या आजाराची १०० कारणे असु शकतात. आता माझ्या शरीरात त्यातली कोण कोणती, काय कॉम्बिनेशनने काम करत आहेत आणि त्यावर माझे शरीर कसे रिअ‍ॅक्ट करत आहे हे कुणास ठाऊक? ३. मानवी शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचे प्रकरण आहे, ते आपल्या सारख्या शररीशास्त्राबद्दल काहीही न वाचलेल्या / शिकलेल्या माणसाने हाताळु नये हे माझे मत आहे. ४. सर्वच डॉक्टर काही मार खात नाहीत. जे पेशंटला विश्वासाते घेत नाहीत / ज्यांना पाहुनच हा मानूस काही तरी लपवतोय असं वाटतं ते मार खात असावेत. अशा माणसांची पैशाची हाव समजुन येते. पण सरसकट सगळे तसे नसतात. आपण डॉक्टरकडे जाताना चौकशी करुन जावी. ज्यांच्या हाताला गुण आहेत असे अनेक चांगले डॉक्टर आहेत. इमर्जन्सीला मात्र जर वाईट डॉक्टर भेटला तर तो नशिबाचाच भाग आहे. पण वाईट माणसं सर्वत्र आहेत.. त्याला तुम्ही काही करु शकत नाही. ५. डॉक्टर लोक आपल्या आयुष्यातला बराच वेळ शिक्षणात घालतात. त्यात त्यांच्याही धंड्याची गणितं आहेत. सर्वच डॉक्टर बक्कळ कमावत नसावेत. आणी कमावलं तरी तो त्यांच्या प्रोफेशनचाच एक भाग आहे. जसं त्यांना रात्री अपरात्री काम करावं लागु शकतं हा ही एक कामाचा भाग आहे तसं. (बाकी प्रोफेशन्स सोबत तुलना करायचं काही कारण नाही. जगात सर्व काही समान पातळीवर नसतंच..) अशावेळी त्यांनी धर्मादाय काम करावं ही अपेक्षा आपण ठेवु शकत नाही. ६. डॉक्टरांनीही पेशंटला वेळ आणि नीट माहिती देणं आवश्यक आहे. अनेकदा तसं होताना दिसत नाही.

@डॉक्टर खरे आणि डॉक्टर गोपाळ साहेब - तुम्ही कशाला जस्टिफिकेशन च्या मोड मधे जाउन डॉक्टरांची बाजू मांडायचा प्रयत्न करत आहात? ज्या लोकांना डॉक्टरांबद्दल मनात प्रचंड जळजळ आहे ते जातात तरी कशाला डॉक्टर कडे? ह्या अश्या डॉक्टरांवर च्य बिनबुडाच्या आरोपांना तुम्ही उत्तर देणे म्हणजे तुमचा अपमान आहे. दुर्लक्ष करा. खरेतर अश्या लोकांची काळी यादीच डॉक्टरांनी करुन ठेवली पाहीजे. आणि ह्यांच्या पैकी कोणी आले तर सरळ हाकलुन द्यायला पाहीजे.

In reply to by प्रसाद१९७१

ह्या अश्या डॉक्टरांवर च्य बिनबुडाच्या आरोपांना तुम्ही उत्तर देणे म्हणजे तुमचा अपमान आहे. >> अगदी हेच मनात आले काही प्रतिक्रिया आणि डॉक्टरांनी दिलेली उत्तरे पाहून. खरं तर लेखातला मुद्दा लक्ष्यात घ्यायचा सोडून उगीच फाटे फोडण्यात काय अर्थ आहे? मला मराठी टाईप करण्याचा कंटाळा येतो म्हणून मी फार थोडक्यात प्रतिक्रिया देत असते. पण माझ्या स्वत:च्या अनुभवावरुन मी शिकले आहे की आरोग्याच्या बाबतीत नेटवर वाचलेल्या माहितीवरून निष्कर्ष काढत बसू नये आणि वेळीच डॉक्टरांकडून शंकानिरसन करुन घ्यावे. म्हणून न राहावून इतकं टाइप करत आहे. आं.जा. वर अनेक ठिकाणी वेगवेगळी माहीती असते. त्यातली विश्वासार्ह कुठली आणि नाही कुठली ते समजत नाही. मला वाटते माणसाचे मन हे बर्याचदा स्वत:ला अपेक्षित असलेली बातमी ऐकायला / वाचायला उस्तुक असते. मग ते भविष्य असो, किंवा अजून काही. आपण बाकी सोडून तेवढं उचलतो आणि मग ते कसं खरं आहे/ लागू होत आहे याचे पुरावे शोधत राहतो. मी एकदा तशीच चूक केलीही. इथे अमेरीकेत मनात आलं की डॉक्टरांकडे जाणं सोपं नाहीये, पण इमेल / फोन करुन शंका निरसन करून घेता येते आणि तरीही वाटलं तर जाउन दाखवता पण येतं. पण नेटवरुन वाचून अगदीच निर्धास्त राहणं किंवा निदान करुन उपचार करणं हे मी आता नाही करणार. तसं इथे गाडी मेकॅनिककडे नेणंही सोपं नाहीये आणि कधी कधी खूप खर्चिकही असतं. त्यामुळे एक छोटासा बिघाड झाला असताना नेटवर वाचून घरीच उपाय केला आणि आता तीन वर्षे झाली तरी 'तो' बिघाड पुन्हा झाला नाही. पण मोठा बिघाड / निदान/ दुरुस्ती यासाठी तेथे पाहिजे जातीचेच!

In reply to by प्रसाद१९७१

डॉक्टरांनी अशा लोकांना प्रत्युत्तर देऊ नये. वैद्यकीय 'सेवा' देतो म्हणून सेवकासारखे वागावे, असल्या अपेक्षा आता फेकून द्यायचीही वेळ निघून गेली आहे, म्हणून अशा लोकांना मी उत्तर देत असतो. "सेवाभावी" संस्थांनी चालवलेल्या चॅरिटेबल हॉस्पिटल्सच्या प्रचण्ड लक्रेटिव्ह धंद्याचं गणीतही इथे लिहीन कधीतरी. मग सेवाभावी म्हणजे काय असतं ते लोकांना समजेल नीट. नॉर्मली प्रचण्ड शांत असलेल्या डॉ. खरे साहेबांचीही चिडचीड होण्याला कारणीभूत लोकांसाठी आता पुढचे लिहितो आहे. जेन्युइन शंकांना उत्तरे नक्कीच दिली जातात. पण शंका विचारणे अन 'प्रश्न' विचारणे यातला फरक सहज लक्षात येतो. उदा. मी कुणा पेशंटला क्विनाईनची गोळी लिहून दिली, तर त्याचा अर्थ त्याला मलेरिया झालेला आहे असा नेहेमीच होतो का? या प्रश्नाचे उत्तर लोकांनी गूगल करून शोधावे. आता, हेदेखिल माहिती नसताना यापुढे जाऊन त्या औषधाचे 'साईड इफेक्ट' नेटवर वाचून चौकश्या करणार्‍या लोकांची शिकवणी घ्यायला खरेच वेळ नसतो. कागदावर औषध लिहून देताना, हे औषध या पेशंटला उपयोगी किती अन इजा काय करू शकेल, याचा संपूर्ण हिशोब डोक्यात करून नंतर ते लिहिलं जातं. या औषधाचा त्रास तुम्हाला स्वतःला पूर्वी झालेला असल्यास नक्कीच सांगा. पण, 'मी नेटवर वाचल्या प्रमाणे २२% लोकांना या औषधाच्या सेवनानंतर गुंगी येते, मग तुम्ही हे औषध मला का लिहिले?' हा प्रश्न मुळातच अनाकलनीय व खुसपटकाढू आहे. या औषधाला असणार्‍या 'अ‍ॅडव्हर्स इफेक्ट्स'बद्दल त्या डॉक्टरांना माहिती नसेल, हे गृहितक त्या प्रश्नापाठी असते. तुम्हाला आजार काय झाला, तो होताना शरीरात काय बदल होतात, व ते औषध त्या आजाराच्या उपचारासाठी नेमके कोणते जीवरासायनिक बदल घडवून आणते, त्यामुळे होणार्‍या फायद्यांसोबत तोटेही कसे होऊ शकतात हे सगळे डिटेल सांगायचे, तर तितका वेळ हवा, अन त्यासाठी मग तितके पैसेही मोजायची तयारी हवी. शेपन्नास डॉलर तपासणी फी देणार असलात, तर मी नक्कीच हे सगळे समजवून सांगण्याचा प्रयत्न करीन. मात्र असला प्रयत्न आपल्याकडे करणे मुर्खपणाचे आहे, याचा अनुभव १०० पैकी ९५ पेशंट्स देतात. तुला अमुक झाले आहे, त्यासाठी अ ब आणि क या तीन उपचारपद्धती आहेत. यापैकी प्रत्येकीचे फायदे तोटे अमुक तमुक आहेत. आता आपण निर्णय घेऊ. ही बडबड केली, तर 'तुम्हीच ठरवा. आम्हाला समजलं अस्तं तर तुमच्याकडे कशाला आलो असतो' अन दुसरं, म्हणजे आजार समजवून सांगायचा. उपचाराची डिसीजन मीच सांगायची हे केलं, की शेवटचा प्रश्न, "पित्तामुळे होतंय ना हे असं?" अशा प्रकारचा येतो. क्लासिक कपाळबडवती योग. नेटवर पब्लिक डोमेनमधे फुकट उपलब्ध असलेल्या वैद्यकीय क्रमिक पुस्तकांची नांवे, वा इतर फुकट मिळू शकणार्‍या खर्‍या विश्वासार्ह माहीतीचे स्रोत किती व कोणते, हे मला कुणी सांगेल का? हे असे काहीही मलातरी मिळालेले नाही. कोणत्याही विश्वासार्ह वैद्यकीय माहितीसाठी इंटरनेटवर मला पैसे मोजावे लागतात. एकच औषध एकाच आजारासाठी अनेक लोकांना दिले तर प्रत्येकाचा त्या औषधाला येणारा प्रतिसाद वेगळा असतो. ही दुसरी कठीण गोष्ट. यावरून त्या पेशंटच्या शारिरिक तपासणी नंतर मला जे ज्ञान मिळालेले असते, ते इंटरनेट सर्च करून मिळालेल्या माहितीपेक्षा वेगळे असते. याचा विचार औषध लिहिण्याआधी केला जातोच, याचे कारण म्हणजे औषध हेदेखिल एक शस्त्र आहे, ते उपायासोबत अपाय करू शकते या जबाबदारीची जाण डॉक्टरला असतेच असते. त्यामुळे, परत इंटरनेटवर 'रिसर्च' करून जर कुणी रिकामे प्रश्न विचारत असेल, तर बाबौ, हे तुझे पैसे, आता निघ. माझ्या दुकानात परत येऊ नकोस, हे अन हेच मी सांगेन. आय कॅन रिफ्यूज अ गिर्‍हाईक लीगली, यू नो!

In reply to by आनंदी गोपाळ

डॉ. खरे साहेबांचीही चिडचीड होण्याला गोपाळराव माझी चिडचिड झाली नाही तर खंत वाटली कारण लोक फक्त आपल्याला पाहिजे तसाच अर्थ काढत राहतात. त्यावर कितीही स्पष्टीकरण दिले तरी यांचे पालुपद चालूच. मुळ विषय काय आणि लोक फक्त डॉक्टर हरामखोर कसे आहेत याबद्दलच प्रतिक्रिया देत राहतात. मग त्याचे खंडन करण्यात काय फायदा? पण योग्य ती सेवा द्यावी, सौजन्यपुर्ण वागावे आणि शंकांचे निरसन करावे, ग्राहक आधीच व्याधीग्रस्त आणि पीडाग्रस्त आहे, काळजीत आहे हे समजुन घेउन थोडे मार्दवाने थोडे सहिष्णु वृत्तीने वागावे अशी माफक अपेक्षा आहे जाताजाता एक उदाहरण देत आहे. रात्री दीड वाजता माझ्या बायकोच्या एका रुग्णाचा घरी फोन आला मला झोप येत नाहीये काय करू? मी त्याला विचारले कि हि काय इमर्जन्सी आहे का?तरीही मी त्याला "शांतपणे"( यावरही काही लोकांनी टिप्पणी केली होती) चिडचिड न करता फेनारगनची गोळी लिहून दिली. पहिल्यांदा त्याने पेन आणि पेपर आणेपर्यंत वाट पाहायला लागली.( हा एक उच्छाद असतो १००% रुग्ण पेन आणि पेपर घेऊन फोन करत नाहीत) मी त्याला फेनारगनची गोळी लिहून दिली. हि एक गोळी आत्ता घे. आणि झोप रात्री दोन वाजता त्याचा परत मला फोन आला आणि उलट तपासणी घेण्याच्या आवाजात त्याने मला जाब विचारला कि डॉक्टर तुम्ही मला झोपेची नव्हे एलर्जीची गोळी लिहून दिलीत. मी त्याला विचारले कि रात्री दीड वाजता कोणता केमिस्ट तुला प्रिस्क्रिप्शन शिवाय झोपेची गोळी देणार आहे? या गोळीचा साईड इफेक्ट म्हणून झोप येते. यावर त्याने आवाज खाली आणून सोर्री म्हटले. यानंतर तो बरेच दिवस उगवलाच नाही( गरज सरो आणि वैद्य मरो). मला लोकांना हे विचारायचे आहे कि या गोष्टीचा त्या रुग्णाकडून किती मोबदला घ्यायचा आणि रात्री दीड ते अडीच या काळात दोन वेळा व्यत्यय आलेल्या झोपेची किंमत किती? अर्थात मी एक गोष्ट अनुभवानेच पण फार अगोदर शिकलो आहे कि रात्री रुग्णावर चिडचिड केली तर आपल्यालाच झोप लागत नाही त्यामुळे मी शांत असतो. पण किती डॉक्टर असे "मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र" असू शकतील. आणि रात्री तुम्ही कितीही वाजता झोपा सकाळी तुमच्या दवाखान्यात तुम्हाला प्रसन्न वदनाने लोकांचे स्वागत करावेच लागतेकारण ते "गांजलेले' असतात. तुम्ही काय त्यांना उपलब्ध असलेच पाहिजे( माझा एक मित्र मला चक्क या शब्दात म्हणाला होता कि अरे कधी कधी मला वेश्येसारखे वाटते.) डॉक्टर इतर व्यावसायिकांप्रमाणे असेल तर इतर व्यावसायिकांप्रमाणे त्याने सौजन्यपुर्ण सेवा द्यावी". किती व्यवसाय असे आहेत कि ज्यांना रात्री दीड दोन वाजता असे उठवले जाईल? वकिलाला मी रात्री दोन वाजता फोन केला आणि काही शंका विचारली तर तो किती सौजन्यपूर्वक उत्तर देईल? माझी केबल/ इंटर्नेट रात्री बंद पडली तर केबल वाला/ एम टी एन एल वाला येतो का? हे म्हणजे एखाद्या वकिलाने कायद्याच्या ज्ञानाबद्दल एखादा धागा काढावा आणि त्याला लोकांनी वकील कसे हरामखोर आहेत आणि त्यांनी कसे सुधारणे गरजेचे आहे हा सल्ला देण्यासारखे आहे. मान्य मूळ मुद्द्याला किती सफाईने फाटा मारला आहे असो या वितण्डवादाचा मला कंटाळा आला आहे.

In reply to by सुबोध खरे

माझ्या प्रतिसादातील वाक्ये लिहुन प्रतिसाद दिला आहे म्हणुन टंकायला लागत आहे. नाहितर एकदा खुलासा करुन झाल्यानंतर दुर्लक्ष केले होते. एकतर तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचला नाही किंवा जाणूनबुजुन दुर्लक्ष केले किंवा दुसर्‍याच कोणाचेतरी प्रतिसाद माझे समजुन गैरसमज करुन घेतलेत. माझा मूळ प्रतिसाद आणि त्यानंतरचा दूसरा प्रतिसाद यात कुठेही डॉक्टरी पेश्याला टार्गेट केलेले नाही. श्री चिनार यांनी एक उदाहरण दिले होते. त्या उदाहरणातील डॉक्टर अतिशय अव्यावसायिक पद्धतीने वागला असे माझे मत आहे आणि त्या अनुषंगाने प्रतिसाद दिला होता. चुकीच्या गोष्टींचे समर्थन करु नये असे माझे मत होते, आहे आणि राहिल. यात कुठेही सरसकटीकरण केलेले नाही. डॉक्टर्स "हरामखोर" असतात असे तर मी कुठेही म्हटलेले नाही. आपले शब्द तुम्ही माझ्या तोंडात का कोंबत आहात हे कळत नाही. डॉक्टर हा ही एक माणूस आहे हे स्वत: तुम्हीच म्हणत आहात तर मग त्या माणसांच्या चुकीच्या कृतीचे समर्थनही नको. कट प्रॅक्टिस होते हे सत्य आहे. तुम्ही की इथले इतर डॉक्टर नाही करत तर ते स्तुत्य आहे पण म्हणून होतच नाही याकडे काणाडोळा करुन चालणार नाही किंवा डॉक्टर होण्यात किती पैसा खर्च होतो हा तर्कही योग्य होणार नाही (हे केवळ उदाहरण म्हणुन. या विषयावर मी एरवी भाष्य केले नव्हते आणी करायची इच्छाही नाही.) तुम्ही दिलेले उदाहरण वाचुन हसु आले. सदर प्रकरणातील रुग्ण नक्कीच मुर्ख असु शकतो. पण यावर मी तुम्हाला "शेवटी तो ही एक माणूसच आहे. प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. त्यामुळे काही लोकांना कधीही प्रश्न विचारायची सवय असते. दुर्दैवाने रुग्णाने कसे सहनशील असावे आणि स्थळकाळाचे भान ठेउन वागावे अशी डॉक्टरांची अपेक्षा असते पण तसे होत नाही आणि होणारही नाही. अगदी इंग्लंड अमेरिकेत ( जिथले लोक जास्त सॉफिस्टिकेटेड आहेत असे काही लोकांचे म्हणणे आहे) हि तुम्हाला असेच अनुभव येतील. कुठेही जा मानवी स्वभावाला औषध नाही हेच खरे. ते बरोबर आहे असे माझे मुळीच म्हणणे नाही." असे गोंडस उत्तर दिले तर चालेल का? इथे बरोबर नाही असेही म्हणायचे आणि त्या डॉक्टरची चुक आहे असे ढळढळीत दिसत असताना त्याचे माणूस असणे, सरकारी अधिकार्‍यांपेक्षा त्याचे वर्तन बरे असणे वगैरे गोष्टी तुम्हाला का दाखवाव्याश्या वाटल्या. ती जी गोष्ट ज्याला तुम्ही केवळ विश्लेषण म्हणत आहात हे इनडारेक्टली समर्थनच आहे असे मला वाटते. तो डॉक्टर चुकीचा वागला असे तुमचेही म्हणणे असेल तर प्रश्नच मिटतो. मी तेवढेच म्हणतो आहे. किती व्यवसाय असे आहेत कि ज्यांना रात्री दीड दोन वाजता असे उठवले जाईल? तुम्ही व्यावसायिक आहात, मी नौकरी करतो. आमच्या कंपनीत काही पेटले की असेच रात्री अपरात्री फोन करतात. डायरेक्टर लोकांचे २४ तासात कधीही फोन येउ शकतात. खासकरुन ते जर परदेशात फिरत असतील तर कामाच्या भरात त्यांना बर्‍याच वेळा टाइम डिफरंसचे भान राहत नाही. पहाटे दीड दोन वाजता मला कैक वेळा कॉल आले आहेत. तुम्ही किमान गरज पडल्यास त्या पेशंट वर चिडु शकता मी तर डायरेक्टरवर चिडुही शकत नाही. बर्‍याचदा या असल्या कॉल्समुळे माझीच काय बायकोची आणि छोट्या मुलाचीही झोपमोड झाली आहे. डॉक्टरांना असल्या कॉल्सचा त्रास होत असेलही कदाचित पण हे बर्‍याच व्यावसायिकांच्या आणि नौकरपेशा लोकांच्या नशिबात असु शकते. मला लोकांना हे विचारायचे आहे कि या गोष्टीचा त्या रुग्णाकडून किती मोबदला घ्यायचा आणि रात्री दीड ते अडीच या काळात दोन वेळा व्यत्यय आलेल्या झोपेची किंमत किती? माझ्या ओळखीतले एक डॉक्टर आहेत जे स्पष्ट सांगतात की मी फोनवर कन्सल्टन्सी करत नाही. दवाखान्यात या. एखाद्याने अगदीच गरज दर्शवली तर तात्पुरत्या गोळ्या लिहुन देतात. माझ्यामते तरी रात्री अपरात्री फोन करुन त्रास देणार्‍या रुग्णाकडुन दुप्पट पैसे वसूल करावेत. बाकी जेन्युइन रुग्णांना डॉक्टर्स बर्‍याच वेळी कंसिडर करतात असा माझा अनुभव आहे. पण किती डॉक्टर असे "मृदू सहनशील सेवाभावी आणि नम्र" असू शकतील. माझ्या माहितीतले बरेच आहेत. जितके तुमचे लेख वाचलेत त्यावरुन तुम्हीही आहात. बाकिच्यांनीही तसेच असावी अशी अपेक्षा आहे. आमचे फॅमिली डॉक्टर, फिजीशियन, ऑर्थोपेडिक, डेंटिस्ट, पेडिट्रिशियन हे सर्व वरील सर्व गुणांनी युक्त आहेत. आमच्या सगळ्या शंकांचे निरसन करतात आणी वाजवुन फी घेतात. एक डॉक्टर सकाळी गेल्यावर ४०० रुपये घेतात आणि परत संध्याकाळपर्यंत मुलाला ताप चढला म्हणुन गेलो की परत ४०० घेतात. जास्त वाटतात. पण त्यांच्या हातचा गुण आणि तत्पर "सेवा" बघता आम्हाला खळखळ करावीशी वाटत नाही. मी जेव्हा इथे "सेवा" म्हणतो आहे तेव्हा "सर्व्हिस प्रोव्हायडर" या अर्थाने वापरतो आहे "सर्व्हंट " या अर्थाने नाही हे समजले असावे अशी अपेक्षा आहे. आणि रात्री तुम्ही कितीही वाजता झोपा सकाळी तुमच्या दवाखान्यात तुम्हाला प्रसन्न वदनाने लोकांचे स्वागत करावेच लागतेकारण ते "गांजलेले' असतात. तुम्ही काय त्यांना उपलब्ध असलेच पाहिजे( माझा एक मित्र मला चक्क या शब्दात म्हणाला होता कि अरे कधी कधी मला वेश्येसारखे वाटते.) मला वेश्यांबद्दलचा अनुभव नाही त्यामुळे पास. पण मी स्वतः डॉक्टर असलो असतो तर स्वतःची तुलना वेश्येशी केली नसती. असे म्हणून तुमच्या मित्राने स्वतःला डिग्रेड झाल्यासारखे वाटते असे सुचवले असेल तर नक्कीच नाही (एखाद्या स्त्री ने वेश्या असणे मी तुच्छ मानत नाही पण त्याची चर्चा इथे नको) माझी केबल/ इंटर्नेट रात्री बंद पडली तर केबल वाला/ एम टी एन एल वाला येतो का? डॉक्टरची सेवा आणि यांची सेवा यात थोडा फरक आहे असे मला वाटते. असो. एम टी एन एल वाला तर सरकारी कर्मचारी असतो ना? तिथे तर खुपच सुरस आणि चमत्कारपूर्ण अनुभव येतील. मूळ मुद्द्याला किती सफाईने फाटा मारला आहे मी?? ???? तुमचा युक्तिवाद मान्य केला आहे की. मग काय प्रॉब्लेम आहे हे वरील वाक्य खालील चर्चेसंदर्भात होते
हे म्हणजे एखाद्या वकिलाने कायद्याच्या ज्ञानाबद्दल एखादा धागा काढावा आणि त्याला लोकांनी वकील कसे हरामखोर आहेत आणि त्यांनी कसे सुधारणे गरजेचे आहे हा सल्ला देण्यासारखे आहे.
मान्य
असो या वितण्डवादाचा मला कंटाळा आला आहे. भयानक कंटाळा आला आहे. पण म्हणुन चुकीचे आरोप मी सहन करीन असे वाटत नाही. मी परत एकदा आधी लिहिलेल्या गोष्टी लिहितो आणि त्यातली कुठलीही चूक आहे असे मला वाटत नाही: १. डॉक्टरांनी इतर व्यावसायिकांप्रमाणेच सौजन्यशील असावे २. डॉ़क्टरांनी आपली फी चोख वाजवुन घ्यावी ३. डॉक्टर हाही इतरांप्रमाणे एक व्यावसायिक आहे. मी खालील वाक्ये कधीही लिहिलेली नाहितः १. डॉ़क्टर हरामखोर असतात माझा तुमच्या खालील विधानांवर ठाम आक्षेप आहे: १. आपण मी काय लिहिले आहे ते नीट वाचलेले नाही किंवा हा स्कोर सेटलिंगचा प्रकार असावा असे वाटते खासकरुन स्कोर सेटलिंग बद्दल का लिहावेसे वाटले हेच मला उमजत नाही. धन्यवाद.

In reply to by सुबोध खरे

> माझा एक मित्र मला चक्क या शब्दात म्हणाला होता कि अरे कधी कधी मला वेश्येसारखे वाटते. आता स्वत: डॉक्टरच असे म्हणत असेल तर त्यात काही तरी तथ्य असलेच पाहीजे. समजुन घेण्यासाठी आपण तुलना करुन पाहु. १. डॉक्टर आणी वेश्या दोघेही व्यावसाईक. दोन्ही व्यवसाय शेकडो वर्षे ईतीहास असलेले. दोन्ही व्यवसाय भातात एकेकाळी अत्यंत भरभराटीस आलेले (आयुर्वेद आणी कामसुत्र) २. दोघांचे उद्दीष्ट ग्राहकांचे पुर्ण समाधान हेच असुन दोघेही आपल्या सेवेची किंमत ग्राहकाकडुन घेतात. ३. दोघांचेही ठरलेले दर नसतात. ज्याच्याकडुन चांगली सेवा मीळते तीथे ग्राहक जास्त पैसे मोजायला तयार असतात. ४. दोघेही व्हीजीटींग फी आकारतात. ५. उच्चभ्रु ग्राहकांसाठी पंचतारांकीत सेवा दोन्ही व्यवसाय देतात, ज्या सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असतात. ६. आलेला ग्राहक शक्यतो न नाकारण्याकडे दोघांचाही कल असतो. ७. ग्राहक नाईलाजाने दुसरीकडे पाठवावा लागला तरी आपला 'कट' वसुल करायला शक्यतो दोघेही विसरत नाहीत ८. छोट्याशा हलगर्जीमुळे ग्राहकाचे आयुश्य उध्वस्त करायची ताकद दोघांकडे पण आहे ९. डॉक्टर आणी वेश्या प्रत्येक गावात्/शहरात असतात. या पैकी डॉक्टरला समाजात अनेक शतके देवासारखा मान होता तर वेश्येला फारसा मान कधीच नव्हता. पण जर आता डॉक्टरनी आपल्या कर्माने तो मान घालवला असेल तर मग फारसा फरक रहात नाही ना? म्हणुनच कदाचीत तो डॉक्टर स्वतःची तुलना वेश्येशी करत असेल का?

शेवटचं वाक्य १ नंबर आहे :) लेख खरंच छान आहे. हा लेख वाचल्यावर काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेची आठवण झाली.कदाचित सर्वांनी ती बातमी वाचली असेलच.IITian who killed family fearing AIDS, tests negative

या सर्व वरिल विषयांवरुन मला ( तसा काही संबध नसताना) वह कौन थी या सिनेमा मधला एक प्रसंग आठवला - डॉक्टर असलेल्या मनोज कुमारला एक अनोळखी मनुष्य खुप केविलवाण्या सुरात रात्री उशीरा फोन करुन आपल्या आजारी मुलीला तपासायला घरी बोलावतो . डॉक्टर मनोजकुमार त्या पावसाळी काळोख्या रात्री गाडी चालवत त्या माणसाने सागितलेल्या पत्त्यावर गावाबाहेरील एका सुनसान , दिवे नसलेल्या हवेलीत पोचतो. तेव्हा काही वेळापुर्वी केविलवाण्या सुरात बोलणारा तो माणुस अचानक त्याच्याशी चढेल आवाजात बोलायला लागतो .

In reply to by सिरुसेरि

मस्त अवांतर. यावरून आठवले, मला हा पिक्चर पहायचा आहे. डीव्हीडीवर उपलब्ध आहे का? कुठे मिळेल? 'वह कौन थी' आणि 'बीस साल बाद' हे दोन्ही पिक्चर परत बघायचे आहेत. :-D

लेख व प्रतिसाद वाचून माझे मत मांडतो आभासी जगतात जी माहिती उपलब्ध असते तिचा आपण सर्वच शेत्रात स्वतः पुरता वापर करून घेतो , किंबहुना आता असे करणे आता आपल्या जीवनपद्धतीचा भाग झाला आहे , वैद्यकीय गोष्टींच्या बाबतीत नेत वरून माहिती घेण्यास वावगे काहीच नाही. मात्र एक मुलभुत फरक एवढाच आहे ही माहिती आपल्या माहितीसाठी ठेवावी , त्यावरून आपण कोणताही निष्कर्ष काढू नये तो काढण्य्याचा अधिकार डॉ लोकांचा , मात्र वैद्यकीय तपासणी करण्यास गेल्यावर मला असे झाले आहे का किंवा तमके झाले का असे प्रश्न डॉ ह्यांना जिज्ञासेच्या पोटी विचारणे गैर नसावे मात्र आपण नेत वरून जी माहिती मिळाली आहे त्यावरून निदान करणे वाईट व त्यावरून पुढे कृती करणे वाईट डॉ ह्यांच्या लेखातून व त्या मुलीच्या उदाहरणातून हेच सांगण्यात आले , जे बरोबर आहे. मला माझ्या प्रकृतीच्या विषयी काही माहिती हवी असेल तर येथे जरी वैद्यकीय सेवा मोफत असली तरी मिळण्यास कधी कधी वेटिंग लिस्ट असते तेव्हा नेत वरून माहिती घेतो , ह्यावर विषयावर गुगल वर सर्च केल्यास अनेक दुवे सापडतात ते वाचून मिळालेली माहिती तपासून घेतो , आणि त्यातून निघालेला निष्कर्ष म्हणजे असे मला झाले असेल अशी एक शक्यता मनात ठेवतो मात्र अंतिम निर्णय हा डॉ चा आहे म्हणूनच त्यांचा कडे जायचे आहे ह्याबद्दल मनात दुमत नसते. माझ्यावर एक शस्त्र क्रिया होणार होती तेव्हा डॉ ह्यांनी तिचे नाव सांगितले तेव्हा तू नळीवर ती कशी करतात हे पाहून घेतले व मनाची मी थोडी तयारी केले , अशी शस्त्रक्रिया झाल्यावर रुग्णांचे अनुभव फोरम वर वाचले व त्याने मनात काही प्रश्न उभे राहिले त्याबद्दल डॉ विचारायचे असे मनात ठरवले . थोडक्यात काय तर डॉ पुरेसा वेळ किंवा दर्जेदार सेवा देत नाही म्हणून नव्हे तर एकूणच नेत वारू माहिती घेण्याचा ट्रेंड आहे , आता मिसळपाव व त्यावरील डॉ खरे ह्यांचे लेख त्यात त्यांना आलेले अनुभव वाचून मी एकप्रकारे नेत वरून माहिती मिळवली . डॉ असो किंवा इतर कोणत्याही शेत्रातील व्यक्ती कस्टमर सर्विस वर लक्ष देणे ही काळाची गरज आहे , अनेकदा चेहऱ्यावर हास्य आश्वासक आवाज व संवाद कौशल्य ह्यामुळे एकाच विभागात दोन डॉ असतील तर एकाकडे जास्त गर्दी असते तर दुसर्‍याचा दवाखाना रिता असतो. डॉ लोकांना संवांद कौशल्य असणे गरजेचे आहे माझ्यामते रुग्णाचा आपल्या डॉ वर विश्वास बसला कि तो आपसूकच आपला फेमिली डॉ बनतो व त्यास उठसूठ प्रश्न विचाराने आपसूकच टाळले जाते.

..लक्षणे दिसणे ऊर्फ त्रास --> नेट --> भीती --> सर्वात वाईट शक्यतेचे मनात घर (मनुष्यस्वभाव) --> भीतीआधारित नवीन लक्षणे--> भीतीचा कडेलोट -> डॉक्टर व्हिजिट --> अविश्वास --> नेटवरच्या शंका --> तपासण्या --> आणखी शंका ..या टॉर्चर मार्गापेक्षा .त्रास -> डॉक्टर -> त्यांनी सांगितल्यास तपासणी --> त्यांचे निदान --> त्यांचे औषध --> अधिक तपशिलासाठी हवा तर नेटवर शोध .हा मार्ग नक्कीच सुखकर आणि लॉजिकल आहे. ..शंभरातला एक डॉक्टरच पूर्ण हिस्टरी वगैरे घेतो आणि फिजिकल टेस्ट करतो हेही दुर्दैवाने सर्वत्र दिसतं..ते नाकारता नाही येत ही बाजूही खरीच..चूक दोन्हीकडे आहे.चांगला डॉक्टर मिळणं हे नशिबात हवं.

In reply to by गवि

केवळ सल्ल्याचे नीट पैसे देणे-घेणे हि मानसिकता आली तर ...डॉक्टरसाहेब २ पैसे जास्त घ्या पण निश्चित निदान सांगा ...आणि कृपा करून घुमवू नका असे सांगता येईल ... आणि निदान तद्न्य लोकांनी (कुठल्याही क्षेत्रातील) त्यांचे 'ठाम' मत देणे जरुरीचे आहे ... "आज उत्तर पश्चिम महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे ...काही भागात आकाश निरभ्र राहील' असली उत्तरे नकोत ...

एव्हड्याचसाठी फक्त मनोविकारांचीच माहिती नेट अथवा पुस्तकातुन घ्यावी असे सुचवेन. शरीराशी खेळ करायच्या फंदात पडू नये.

डॉक्टर हा प्रथम माणूस आहे व नंतर डोक्टर आहे. त्यामुळे राग,लोभ,मोह,काम्,क्रोध,मत्सर हे षड्रिपु आलेच.