Skip to main content

THE SECRET

लेखक sanjivanik१
शनिवार, 18/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच हिंदी डब्ड THE SECRET सिनेमा बघितला . अप्रतिम वाटला सिनेमा . त्यात सांगितलेल्या बर्याचश्या गोष्टी मी कृतीत आणायला शिकले आहे अस वाटलं . सगळ्याच ठिकाणी ते जमत नसल तरी बर्याच ठिकाणी . जास्तीत जास्त काय होईल , ठीक आहे. त्याचा स्वीकारून सामना करायची ठेवली कि आपोआपच आपल्याला नको असलेल्या, त्रास देणाऱ्या किंवा भीती वाटणाऱ्या गोष्टीचा विचार कमी होतो आणि मग आपल्याला जे हव आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित करू शकतो. माझ्या आयुष्यात आलेल्या खूप साऱ्या लोकांकडून कळत नकळत मी हे शिकले. या सिनेमाच्या भाषेत सांगायचं झाल तर चांगले विचार डोक्यात राहतात व त्यानुसार सर्व काही आपल्याकडे आकर्षित होत किंवा योग्य दिशेने कृती करण्यासाठी आपल्याला मार्ग सुचतो . सिनेमातील काही गोष्टी कृतीत आणण शक्य नसल किंवा काही पटल नसल तरी त्यात मांडलेल निरर्थक नक्कीच नाही.

वाचने 4817
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

आमच्या मातोश्रींनी नुकतेच हे पुस्तक (मराठी अनुवादीत) वाचून संपवले आहे. ही डॉक्युमेंटरी मी ३-४ वर्षांपूर्वी पाहिली होती. छान आहे.

In reply to by sanjivanik१

आणखी थोडक्यात नव्हे. जरा अजून थोडं लिहा असं म्हणायचं होतं. समजून घ्या. बाकी चित्रपट पाहूनच समजून घ्यायचे असेल तर या चार ओळी तरी कशाला लिहायच्या? नुसतं लोकहो अमुक एक चित्रपट पाहा असं खरडफळयावर लिहीलं तरी पुरेल. :-)

In reply to by sanjivanik१

अच्छा ! म्हणजे तुमचे सिक्रेट आमच्यासाठी सिक्रेटच रहाणार तर ... कारण आम्ही काही सिनेमा बघणार नाही, किंवा पुस्तकही वाचणार नाही. तुम्ही काही सांगीतले तरच काही कळण्याचे चान्सेस ...

"जास्तीत जास्त काय होईल ? ठीक आहे. त्याचा स्वीकारून सामना करायची ठेवली कि" - तुम्ही दिलेल्या माहितीवरून फारसे काही कळले नाही तरी मला वाटते त्या सिनेमात "बी प्रीपेअर्ड फॉर द वर्स्ट" हा संदेश दिला असावा. कोणत्याही परस्थितीत, 'वाईटात वाईट' काय होऊ शकेल आणि त्या 'वाईटातल्या वाईट' परिस्थितीतून बाहेर पाडण्यासाठी काय काय करता येईल ह्याचा विचार आणि त्या अनुषंगाने तयारी आणि कृती करावी. असे केल्याने गोष्टी सोप्या जरी झाल्या नाहीत तरी त्या मॅनेजेबल होतील, असे मला वाटते. सिनेमात हेच सांगायचे आहे का ?

या चित्रपटात सांगितले आहे , ज्या गोष्टीच तुम्ही जितका जास्त विचार करता तशीच परिस्थिती तुमच्या कडे आकर्षित होते. आपण जास्त करून आपल्याला नको असलेल्या, त्रास देणाऱ्या गोष्टीचा विचार जास्त करतो. तर त्याचा जास्त विचार न करता सुख समृद्धीचा, आपल्याला काय हव आहे त्याचा जास्त विचार करावा . हे रहस्य आहे. ते कृतीत आणायला शिकलेले दिग्गज लोकांनी यात आपले अनुभव कथन केले आहे. ते अनुभव , प्रक्रिया सगळ लिहू शकत नाही . तर या नको असलेल्या विचारांपासून दूर राहण्याचा माझा अनुभव हा वाईट परिस्थितीला सामना करायची तयारी ठेवली कि जातात असा आहे.