सध्या उन्हाळी शिबिरांचे खूप च फॅड आहे (आपण लहान असताना नव्हते असले काही शिबीर वगैरे म्हणून म्हणाले फॅड) .
माझा मुलगा तीन वर्षाचा आहे , तर त्याला या उन्हाळी शिबिरांमध्ये घालावे कि न घालावे हा मोठा प्रश्न आहे , बाकी चे लोक घालत आहे म्हणून आपण पण घालावे कि ती सध्या गरज आहे हेच कळत नहिये.
बर्याच ठिकाणी अशी हि परिस्थिती आहे कि आई वडील दोघे हि नोकरी करणारे असल्याने मुलां कडे सुट्ट्यांमध्ये कोण लक्ष देणार म्हणून त्याला पर्याय उन्हाळी शिबिरे.
उन्हाळी शिबिरांमध्ये खूप नवीन गोष्टी शिकवल्या जातात , रचनात्मक नवीन वस्तू निर्मिती वगैरे वगैरे … पण खरेच हे गरजेचे आहे का …कि मुलांनी प्रत्येक वेळेस काही तरी शिकायलाच हवे .
सुट्ट्यांमध्ये सुद्धा त्यांनी शिस्त पाळावी, शिबिरांमधील उपक्रम जो घरी पूर्ण करण्यासाठी दिला आहे(जसा शाळेतील होमवर्क ) तो पूर्ण करावा.
मुलांनी मनमोकळे पणे खेळावे , कोणाचेही कसलेही बंधन नसावे , सुट्टीचा मनमुराद आनंद लुटावा असे पालकांना वाटत नाही का ? प्रत्येक गोष्टीत स्पर्धेचा विचार का करावा , तुझ्या वर्गातल्या मुलांनी अमका क्लास लावला , मग तू पण जा त्या क्लासला , तमक्याने पोहण्याचा क्लास लावला मग तू पण जा पोहायला . त्याने बघ चित्रकलेचा क्लास लावला होता मागच्या उन्हाळ्यात तर या वर्षी त्याला शाळेत चित्रकलेमध्ये बक्षीस मिळाले, मग तू हि या वर्षी सुट्ट्यांमध्ये जा क्लासला . अशा मानसिकतेने मुलांना शिबिरात पाठवणे किती योग्य आहे ?
माझे तर असे मत आहे कि मुलांना त्यांच्या मर्जीने खेळू द्यावे . बाहेर ऊन आहे म्हणून संगणक वर गेम न खेळू देता काही बैठे खेळ आपण त्यांच्याबरोबर खेळावे. मुलांची खरे च काही नवीन शिकायची इच्छा असेल तर जरूर अशा क्लासेस ला घालावे पण जबरदस्तीने नव्हे, कारण वर्षभर शाळा , शाळेतील अभ्यास , लावला असेन तर ट्युशन या मध्ये ते आपल्या आवडीचा क्लास नाही करू शकत , अश्या परिस्थितीत सुट्ट्यांमध्ये हे साध्य करता येईल . काही ठिकाणी तर हे शिबीर तर फक्त पैसा मिळवण्याचे साधन झाले आहे आणि काही पालकांची तर अशी हि मानसिकता बनत चालली आहे कि त्यांची मुले उन्हाळी शिबिरात जातात हे एक मोठे स्टेटस आहे. काही पालकांची अशी हि स्थिती आहे कि पाल्य घरी बसून टीव्ही पाहणार किंवा मग संगणकावर गेम खेळणार त्यामुळे डोळे बिघडणार त्यापेक्षा शिबिराला पैसे गेले तरी चालेन पण आपले पाल्य तिथेच अडकलेले बरे . जर अशी परिस्थिती असेल तर पालकांचा शिबिरात घालण्याचा हा निर्णय बरोबर कि चूक ? या वर कृपया मार्गदर्शन करा .
काही ठिकाणी अशीही परिस्थिती आहे कि , पालकांना वाटते कि अमका जातोय त्या क्लासला , मग आपले पाल्य मागे पडेन ,अशा वेळी काही पालक तर शिबिराचे शुल्क जास्त असूनही आपल्या पाल्यांना शिबिरात घालतात , हा खर्च अनाठायी नाही का ?
ज्या क्षेत्रात मुलांना आवड आहे तिथे खर्च करण्यास काहीच हरकत नाही पण प्रत्येक गोष्टीत स्पर्धेचा विचार करून किंवा शेजार्याने घातले शिबिरात किंवा कार्यालयातील सहकार्यांनी पण घातलेय शिबिरात मग मी का नको घालू या हेतूने केलेला खर्च किती रास्त आहे.
कृपया जर माझे काही मुद्दे पटले नसतील तर त्यावर जरा प्रकाश टाका आणि मार्गदर्शन हि करा .
वाचने
7988
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
तीन वर्षाच्या मुलाला कसले
सह्मत
In reply to तीन वर्षाच्या मुलाला कसले by सुबोध खरे
.
बालमानसशास्त्राचा तुमच्या
In reply to . by जेपी
मी फक्त माझे मत मांडलेले आहे..
In reply to बालमानसशास्त्राचा तुमच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
मग "ञ" करा ;)
In reply to मी फक्त माझे मत मांडलेले आहे.. by स्वीत स्वाति
अर्रे जेपीची पियच्चडी हाये
In reply to बालमानसशास्त्राचा तुमच्या by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो का बर बर :-))
In reply to अर्रे जेपीची पियच्चडी हाये by टवाळ कार्टा
हे सर्व माहिती असूनही
धन्यवाद ..
In reply to हे सर्व माहिती असूनही by अजया
मी माझ्या मुलाला शिबिरात टाकू कि नको याच बरोबर ...
फार विचार करता आहात.पहिली ते
फक्त ३ वर्षाच्या मुलाला कसलं
नका हो नका!!! सोळा वर्षांची
अजिबात लावु नका.. मलाही ३
+१
In reply to अजिबात लावु नका.. मलाही ३ by पिलीयन रायडर
अग्दि योग्य !!
मुलांनी आणि पालकांनी हे २ शब्द वगळून सुद्धा वरील ओळ वाचावी
पहिल्यात पहिले म्हणजे तीन
आणि हो.....
समर कँप...
ज्यांच्याकडे मुलाला बिझी
माझ्या लहानपणीच्या शिबिराच्या
स्वछन्द बागडण्याच्या वयात
शिबिराला न पाठवता दुसरी गंमत
माझी लेक तर प्रचंड उत्सुक असते.
आपण लहान असताना नव्हते असले
सह्मत
In reply to आपण लहान असताना नव्हते असले by हसरी
धन्यवाद